मराठी भाषा गौरव दिवस २०२२: घोषणा (उपक्रम २५ फेब्रुवारी ते २ मार्च)

Submitted by संयोजक-मभादि on 19 February, 2022 - 11:37

नमस्कार मंडळी!

आपल्या कवी आणि साहित्यिकांच्या दिमाखदार कृतींनी बहरलेल्या मायबोली मराठीच्या मायेपोटी आपण कवीवर्य कुसुमाग्रजांच्या जन्मदिवशी मराठी भाषा दिन साजरा करतो. ह्या वर्षी ह्या सोहळ्यासाठी नव्या दमाने पुन्हा सज्ज होऊया! आपल्या मायबोलीचा हा उत्सव यंदा २५ फेब्रुवारी ते १ मार्च ह्या काळात विविध उपक्रमांसह उत्साहाने साजरा करूया! ( लेख आणि अभिवाचनासाठी मुदत २ मार्चपर्यंत वाढवली आहे).

IMG-20220219-WA0006.jpg

मराठी मनाच्या गाभार्‍यात ज्यांच्या गाण्याचा सुगंध सदैव दरवळत असतो, अश्या पंडित भीमसेन जोशी, शांताबाई शेळके, वसंत बापट ह्यांची जन्मशताब्दी ह्या वर्षी आहे किंवा नुकतीच संपली आहे. त्याचबरोबर आपणा सर्वांच्या आवडत्या गानकोकिळा लता मंगेशकर ह्यांनाही श्रद्धांजली वाहण्याची इच्छा आहे. हे सर्व पूर्वघोषित आणि ऐनवेळेच्या उपक्रमांमधून योजण्याचा संयोजक मंडळाचा मानस आहे. शब्द आणि त्यांचे अर्थ ह्यांच्या भावसाधनेतूनच ह्या कलाकारांची कला आपणापर्यंत पोहोचते. ह्या शब्दरूपी आणि अर्थरूपी अलंकारांचाही उत्सव आपल्या उपक्रमांमधून साजरा होणार आहे. आपल्याला हे सर्व शब्दांचे धन लहानपणी कुणीतरी मुक्तहस्ते देऊ केलेले असते. त्यांच्यामुळेच आपण थोडेतरी मिरवू शकतो. अश्या ह्या शिक्षकांचे किंवा व्यक्तींचे आपण ऋणी असतो. अश्या व्यक्तींच्या आठवणींना लेखातून उतरवण्याची मजाही आपण मराठी भाषा दिनाच्या उपक्रमात ह्या वर्षी घेणार आहोत. इतिहासाचा हा धांडोळा घेत असताना मराठीच्या भावी पिढीलाही आपण विसरून चालणार नाही. त्या बच्चेकंपनीसाठी आपण अक्षरे आणि चित्रकला ह्यांचा अनोखा मेळ घेऊन आलो आहोत.

मराठी भाषा दिन २०२२च्या पूर्वघोषित उपक्रमांबाबत अधिक जाणून घेण्यासाठी पुढील दुव्यांवर टिचकी मारा.

(१) मराठी भाषा दिवस २०२२ - उपक्रम - सरस्वतीची चिरंजीव मुले
https://www.maayboli.com/node/81118

(२) मराठी भाषा दिवस २०२२ - उपक्रम - माझे मराठीचे मास्तर / माझ्या मराठीच्या बाई
https://www.maayboli.com/node/81119

(३) मराठी भाषा दिवस २०२२ - बालचित्रकारांसाठी उपक्रम - अक्षरचित्रे
https://www.maayboli.com/node/81120

(४) मराठी भाषा दिवस २०२२ - उपक्रम - अभिवाचन/साहित्यवाचन
https://www.maayboli.com/node/81146

ह्याशिवाय आधी म्हटल्याप्रमाणे ऐनवेळचे उपक्रम आणि खेळ आम्ही त्या त्या दिवशी घेऊन येणारच आहोत. त्यांचे दुवे खालीलप्रमाणे:

(५) मराठी भाषा दिवस २०२२ - खेळ: भाषेचे अलंकार
२५ फेब्रुवारी - आजचा अलंकार 'अनुप्रास' - https://www.maayboli.com/node/81163
२६ फेब्रुवारी - आजचे अलंकार 'उपमा, उत्प्रेक्षा, व्यतिरेक' - https://www.maayboli.com/node/81173
२७ फेब्रुवारी - आजचा अलंकार 'यमक' - https://www.maayboli.com/node/81181
२८ फेब्रुवारी - आजचा अलंकार 'अतिशयोक्ती' - https://www.maayboli.com/node/81190
१ मार्च - आजचा अलंकार 'श्लेष' - https://www.maayboli.com/node/81199

(६) मराठी भाषा दिवस २०२२ - उपक्रम - शब्दांचा झब्बू
https://www.maayboli.com/node/81164

(७) मराठी भाषा दिवस २०२२ - उपक्रम - लता मंगेशकरांच्या गाण्यांच्या भेंड्या
https://www.maayboli.com/node/81168

तर मंडळी! उचला आपापले लेखण्या-कुंचले, आणि होऊ द्या मायमराठीचा जल्लोष!

ता. क. : विशेष सूचना
सोहळ्यादरम्यान आलेल्या सूचनेनुसार २७ फेब्रुवारी हा 'मराठी भाषा दिवस' नसून 'मराठी भाषा गौरव दिन' असल्याचे लक्षात आले. ते लक्षात आणून दिल्याबद्दल चीकू यांचे आभार. तूर्तास हा सोहळा समाप्तीच्या जवळ येऊन ठेपल्याने सर्वच धाग्यांचे आणि ग्रुपचे नामकरण बदलणे किचकट आहे. तरीही ही अनवधानाने राहून गेलेली चूक मान्य करून एक प्रातिनिधिक बदल म्हणून मूळ घोषणेचे शीर्षक बदलून त्यात 'मराठी भाषा गौरव दिवस' हे शब्द वापरत आहोत.

मायबोलीवर आणि अन्यत्रही अनेक ठिकाणी गेली अनेक वर्षे २७ फेब्रुवारी हा दिवस 'मराठी भाषा दिवस' म्हणून साजरा केला गेला. परंतु खाली दिलेले संदर्भ चीकू यांच्या मतास पुष्टी देतात. त्यामुळे पुढील वर्षापासून हा दिवस मायबोलीवर 'मराठी भाषा गौरव दिन' या नावाने साजरा व्हावा अशी विनंतीवजा सूचना आम्ही करत आहोत.

संदर्भ -
https://maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/...
https://www.esakal.com/citizen-journalism/sadanad-kadam-writes-about-mar...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

(मक्याच्या लाह्या खात) ‘उलटसुलटता’ वाचते आहे! Proud
उपक्रमात विरजणतेचं उत्तदायित्व कोणीतरी घ्यायला हवंच की! Proud

म्हणजे सरस्वती ब्राह्मणी आहे किंवा नाही हे माहिती करून घेण्यापासून सुरूवात करायचीय ? खरंच ?

दत्तात्रेत साळुंके :
कुणाच्या शाळेत काय शिकवतात हे मला ठाऊक नाही. पण सावित्रीबाईंच्या शाळेत काय शिकवत होते आणि कोणत्या शाळेत सावित्रीबाई शिकवतात हे समजतेय. अक्षरावरून नाही लिखाणावरून.

उगीच त्यावरून ब्राह्मणी संस्कृती म्हणजे काय, ब्राह्मणांचे देव कोणते, ब्राह्मणांच्या लग्नाच्या पद्धती कुठल्या त्या इतर हिंदूंपेक्षा वेगळ्या का या य वेळा झालेल्या चर्चा पुन्हा करायच्या म्हणता ?

वळण पाडावे तसे पडते. त्यात विशेष काही नाही. वेगळे सर्वसमावेशक वळण पडावे अशी इच्छा असेल तर तसेही पडेल.
वेड पांघरून पेडगावला जाण्यात काय अर्थ ?
गुगल केल्यास ब्राह्मणी संस्कृतीवर भरपूर डिबेट्स पहायला मिळतील. विद्वानांस अधिक सांगायला लागत नाही.
मी आधीच म्हणालेलो कि नाही पटले तर उडवून टाका. हाकानाका.

सुकरात
मला वाटतं या ओळी तुमच्यासाठी पुरेशा आहेत...

माझी माय सरसोती माले शिकवते बोली
लेक बहिनाच्या मनी किती गुपित पेरली !!

दसा
सर्वात आधी माझे अक्षर पाहून ट्रोल म्हणाल्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार.
आपली योजना जाणीवपूर्वक ट्रोलिंगसाठी केली आहे. ब्राह्मणी संस्कृती वरून चर्चा आपणास जातीयवादाकडे न्यायची आहे.
सुकरात हा आयडी जातीयवादी आहे या पॉइण्टवर हा डिबेट संपवायचा आहे. आपल्याला हवे तसे होईल.
साळुंके सर, आपले गाव समजले तर छान होईल. गावात किती जणांकडे कुलदैवत सरस्वती आहे हे कळवावे. जमल्यास पाहून येईन.
बहिणाबाई चौधरी या मराठवाड्यातल्या चौधरी आहेत. यांच्या मधे सरस्वतीपूजन महत्वाचे आहे. याला संस्कृती म्हणतात. हे शाळेत शिकवत नसतील कदाचित. काही ठिकाणी आपणच शिकावे लागते. शक्य झाल्यास एखाद्या कॉलेजच्या इतिहासाच्या प्राध्यापकांकडे जाऊन विचारणा करावी.
धन्यवाद आपले.

>>>सर्वात आधी माझे अक्षर पाहून ट्रोल म्हणाल्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार.>>>
तुमच्या अक्षराबद्दल मी काहीही म्हणालो नाही....

सरस्वती, बहिणाई, सावित्रीबाई ही मराठी संस्कृतीची दैवतं अणि ती सर्वांची आहेत. त्यावर कोणाची मक्तेदारी नाही...

साळुंके दर, तुमच्या वादाच्या आवडीबद्द;अ काहीही म्हणणे नाही. फक्त एकदा माझा पहिला प्रतिसाद आता पुन्हा एकदा वाचा.
दैवतं कशाला हवीत ? हवीच असतील तरी काहीच म्हणणे नाही. कदाचित पुढच्या वेळी बहीणाईची मुले, नंतर सावित्रीची मुले असे होणार असेल.
पण हा कोणताही उल्लेख टाळणे अशक्य आहे का ? सर्वसमावेशकता समजत नसेल तर राह्यलं.
पण मी म्हणतो तसेच करा ही भूमिका घेऊन लढायला आलो असे कुठे दिसते का ? की ट्रोल करायला आलोय असे वाटते ?
रसभंग होत असेल, पटत नसेल तर उडवून टाका असे म्हटले होते. अक्षरावरून ओळखण्यापेक्षा अ‍ॅडमिनला सांगून उडवले असते तरी ते ही उत्तरच असते. पुन्हा हा विषय येणारच नाही.
अगदी छत्रपती शिवराय सरस्वतीपूजन करून लढायांसाठी निघाले असे उल्लेख आले तरी काहीही हरकत नाही.

मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून आधीच्या अनंत शब्दखूुळाच्या जोडीला आणतो आहोत ‘दैनिक शब्दखूुळ’ - रोज एक नवा तीन अक्षरी शब्द ओळखायचा. रोज खेळा आणि सोशल मिडियावर दवंडी पिटत, इतरांना सहभागी करत आनंद द्विगुणीत करा.

https://tinyurl.com/dailyshabdakhoool

@सुकरात, तुमच्या म्हणण्यात तथ्य असेल किंवा नसेल, पण तुम्ही 'प्रतिसाद उडवला तरी चालेल' असं सांगूनही तुमचे दोन्ही प्रतिसाद शिल्लक आहेत ही सर्वसमावेशकता नाही का?

@वावे, तुम्ही प्रश्न विचारून हो कि नाही एव्हढ्याच प्रतिसादाची अपेक्षा ठेवलेली आहे का ? मी एक अपेक्षा व्यक्त केली. ती ही गनपॉईण्टवर नाही. ही सूचना पटत नसेल तर डिलीट करू शकता रसभंग नको असे सांगणे हे एखादा दहशतवादी पाहिल्याप्रमाणे पाच सहा जणांनी धावून येऊन आव्हान देणे, जातीयवादी ठरवणे हे हास्यास्पद नाही का ? साळुंकेंचे सर्व प्रतिसाद हे असंबद्ध आणि अर्धवट आहेत. ही सर्वसमावेशकता आहे का ? सदर गृहस्थ वेळेवर ऑनलाईन आले याबद्दल त्यांचे जाहीर आभार

काय ब्राह्मणी आणि काय नाही हे सिद्ध करावे लागणे म्हणजे जणू काही सूर्य पश्चिमेला उगवला आहे असे विधान केल्यासारखा आव आणणे ही सर्वसमावेशकता आहे का ?

सूचना केल्याबरोबर अक्षर पाहून ट्रोल ठरवणे ही सर्वसमावेशकता आहे का ? या सदस्याला ट्रोल कोन हे ठरवण्याचे विशेष प्रशिक्षण मिळालेले आहे का ? ट्रोलिंग होतेय हे कशाच्या आधारावर ठरवले ? डिलिट करा नाही आवडले तर असे सांगितले तरी ही हीणकस टिप्पणी म्हणजे सर्वसमावेशकता का ?

मराठी भाषा दिन साजरा होतोय. संयोजक मेहनत घेत आहेत. त्यांच्या कामात कुठेच विघ्न आणण्याचा विचार नाही आणि नव्हता. तसेच हा वाद वाढवण्याचाही विचार नाही. पण चार पाच जणं विरूद्ध एक हा सामना पण चालूच आहे. कुठेतरी इग्नोर केल्याचा आनंद आहेच की. माझे म्हणणे मी मांडले. पटले न पटले ही गोष्ट वेगळी. पण जे प्रतिवाद झालेत ते नक्कीच सर्वसमावेशक असतील.

प्रतिसाद उडवले नाहीत म्हणून सर्वसमावेशकता याला उत्तर द्यायलाही कसेसेच वाटत आहे. तुम्ही विद्वान आहात. पुन्हा विचार कराल असे वाटते. हे प्रतिसाद उडवले तर तुम्ही जातीयवादी अशी भूमिका मी घेतलेली नाही. माझ्या सूचना अंमलात आणाच ही ही नाही. सण साजरा होत नसताना या विषयावर चर्चा नको असे वाटत असल्यास डिलीट करा प्रतिसाद ही भूमिका तुम्हाला जातीयवादी वाटतेय का ? म्हणून ते प्रतिसाद ठेवण्याची कृती सर्वसमावेशक वाटतेय ?

जे मला वाटले ती एक सूचना आहे साधी. कुठल्याच दैवताचा उल्लेख नको. हे करणे म्हणजे पहाड तोडण्यासारखे आहे का ? संयोजकांच्या हेतूवर पण शंका घेतली नाही. त्या वेळी त्यांना नाही लक्षात आले. पण इथून पुढे दक्षता घेऊ असेही म्हणता आले असते. किंवा तुमचे म्हणणे या कारणामुळे पटत नाही असेही म्हणता आले असते.

रात्री सगळे शांत झाल्यावर सकाळी पुन्हा प्रश्न विचारून उत्तरास भाग पाड्ण्यामागे काय कारण आहे ?
मी अजूनही सांगतोय कि जर हे पटलेले नाही तर सर्वच प्रतिसाद काढून टाका. जेणेकरून वादाचे गालबोट नको. यात तुम्हाला काय खटकतेय हेच समजत नाही.

च्रप्स यांना उत्तर देऊन थांबतो. सर्वांना एकट्याने उत्तर देणे अशक्य आहे. वादविवाद व्हावा ही सुद्धा इच्छा नाही हे मुख्य कारण आहे.

शाळेचा मुद्दा पहिल्यांदा दत्तात्रेय साळुंकेंनी आणला. च्रप्स तेच म्हणत आहेत.
साळुंखें आणि च्रप्स यांनी त्यांच्या गावाची नावे कळवावीत. गावात बहुसंख्येने लोकांच्या जीवनात सरस्वतीचे सांस्कृतिक महत्व आहे का ? किती घरात शुभं करोति पूर्वीपासून म्हटली जाते ? बहुजन समाजात बहुसंख्येने तिसरी किंवा चौथी पिढी शाळेत जाणारी असेल. आजही पहिली दुसरी पिढी शाळेत जाणारे आहेत. अपवाद म्हणून पाच पेक्षा जास्त पिढ्या शाळेत जाणारे आहेत. हे सर्व ब्रिटीशांच्या शाळेत शिकले. अशा शाळातून शिकवण्यासाठी पंतोजी असत. ब्राह्मण शिक्षकांना पंतोजी म्हणत. कारण इतर कुणाला अध्यापनाचा अधिकार नव्हता. शिक्षण नव्हतेच.

शाळेतून जे "वळण पडले" ते पंतोजींचे. ग्रीगणेशा झाला किंवा सरस्वतीची अक्षरे गिरवली हे वळण पत्तोजींनी पाडले. पुण्याची पेठीय भाषा सर्वांनी प्रमाण म्हणून स्विकारली कारण यामागे सांस्कृतिक आक्रमण आहे हे समजण्यासाठीही कुणाकडे शिक्षण नव्हते. एकीकडे हिंदी इंग्रजीचे आक्रमण , मराठी वाचवा मोहीम आणि दुसरीकडे पेठीय भाषेच्या आक्रमणाखाली दर दहा मैलावरची बदलती भाषा मृतप्राय होत आहे त्याबद्दल कमालीची अनास्था आहे.

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी जेव्हां शब्द कमी पडत होते तेव्हां इतर भाषेतून आलेले शब्द घ्यावे लागले. मराठी भाषा अहिराणी सुद्धा आहे, मराठवाडी आहे, खाआनदेशी आहे, कोकणी आहे, या सर्व बोली या भाषाच आहेत. या हळूहळू मृत होत जाणार आहेत. कारण शाळांमधून जसजशा पिढ्या बाहेर पडतात त्या प्रमाण भाषेत व्यवहार करतात. त्यांना आपली ग्रामीण बोली येत नाही. अनेक शब्द, म्हणी लुप्त होत चालल्या आहेत. याची खंत दिसत नाही.

शाळेत शिकवले म्हणून ती संस्कृती हे महान आहे. हेच खरे असेल तर या नोटवर हा वाद मिटवून सर्वच वाद डिलीट करावा ही विनंती.
धन्यवाद.

अगदी पहील्यांदा सुकरात यांचा पहीला प्रतिसाद वाचला. कोणी प्रत्युत्तर दिलेले नव्हते आणि वाचताक्षणी एकदम अपसेट व्हायला झाले. अरे काय हे इतकी मेहनत घेतायत संयोजक, लोक इतके उल्हासाने , आनंदान भाग घेत आहेत. कोणीतरी बासुंदीत, मीठाचा खडा काय टाकतो. ट्रोल्स फार माजलेत आजकाल. पण काहीच उत्तर दिले नाही केवळ 'डु नॉट फीड द ट्रोल्स' या हेतूस्तव
नंतर मात्र हळूहळू म्हणजे बर्‍याच शांततेनंतर दसा, सी, मै, अमित व अन्य लोक प्रतिसाद देउ लागले. तेव्हाही वाटत राहीले 'अरे गपा की. का उगा आगीत तूप ओतताय' ऑक्सीजनच नाही मिळाला तर आग आपोआप विझेल. का उगा वारा देताय?????
पण मग अन्य कोणाचे विधान खोडून काढण्याकरता सुकरात यांनी लिहीले, मग कोणीतरी त्यावर .... वगैरे वगैरे.
मुद्दा हा आहे की चारचौघे त्यांच्या अंगावर धावुन आले नाहीत उलट त्यांच्या माध्यमातूनच सुकरात यांचे विचार अधिक स्पष्ट होण्यास मदतच झाली. ही मात्र नक्कीच सर्वसमावेशकता आहे.
>>>उत्तर देऊन थांबतो. सर्वांना एकट्याने उत्तर देणे अशक्य आहे. वादविवाद व्हावा ही सुद्धा इच्छा नाही हे मुख्य कारण आहे.
या भूमिकेमुळे सुकरात ट्रोल नाहीत असेही मत बनले.
----------------------------------------------------------------------------
बाकी दैवतांचा उल्लेख ब्राह्मणी परंपरेचे प्रतिक काहीजणांना ते तसे वाटू शकते हेही माझ्यासाठी, नवीन रेव्हेलेशन आहे/ साक्षात्कार आहे. पण मला नवीन आहे म्हणुन, याचा अर्थ तसे वाटणे चूकीचे असेलच असेही नाही. असो परत ठाम भूमिका इतक्यात तरी घेता येणार नाही. पण एक नवीन दॄष्टीकोन कळला एवढेच म्हणेन.

सुकरात, तुमच्या विचारांचे स्वागत आहे.
हे ब्राह्मणी आहे हे नको असे नुसते म्हणण्यापेक्षा सर्वसमावेशक असे काहीतरी तुम्ही सुचवा.
किंवा पुढच्या वर्षी संयोजक म्हणून काम करा आणि तुम्हाला हवे तसे शब्द वापरून मराठी भाषा दिवस साजरा करूया! हाकानाका
माझ्या मते शब्दाचे मूळ काय यावरून आक्षेप घेण्यापेक्षा आज जर तो शब्द सर्रास सर्वांकडून वापरला जात असेल तर त्याचे आजचे स्थान लक्षात घ्यावे. समाज आणि भाषा दोन्ही प्रवाही गोष्टी आहेत.

अ‍ॅडमिन , कृपया माझे सर्व प्रतिसाद उडवावेत ही विनंती. थांबतो या आवाहना नंतर इतरांकडून तीच अपेक्षा आहे. माझी सूचना संयोजकांना आहे. सूचना करण्यासाठी आपणच संयोजक व्हावे लागते हे आज नव्याने समजले आहे. तसेच कुणाचेच काही नको हा भाग वगळून ब्राह्मणी नको यावर फोकस ठेवणे मान्य होण्यासारखे नाही. तुमचेही नको , माझेही नको या पद्धतीने आपण मिळून पुढे जाऊयात हे तीन वेळा सांगितले आहे. हे कुणाला अडचणीचे आहे ? दुर्दैवाने विपर्यास केला जात आहे. सोशल मीडीयावर विपर्यासाला धरूनच पुढे प्रतिसाद येत राहतात.

सामो, आपण समजून घेतल्याबद्दल आभार.

सुकरात - वादविवाद असलेच पाहिजेत.. भांडणे नसावीत... आणि तुम्ही व्यवस्थित पॉईंट्स मांडत आहात. मलाही ट्रोल वाटत नाही तुम्ही...
तुमचा मुद्दा कळला मात्र सरस्वतीची मुले म्हणजे ज्यांच्यावर सरस्वतीचा आशीर्वाद होता असे हे तीन भीमसेन जोशी, शांताबाई शेळके, वसंत बापट असा सरळ अर्थ मी तरी घेतला...
मला दुसरा अर्थ कळला नाही... आणि लेख साहित्यिकांबद्धल लिहायचा आहे तर सरस्वतीची मुले अशी पदवी ठीक वाटली...

संयोजक मंडळ -
एक महत्वाची दुरुस्ती कृपया कराल का? २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिवस आहे, मराठी भाषा अथवा मराठी राजभाषा दिन १ मे रोजी आहे. त्यामुळे मथळ्यात मराठी भाषा गौरव दिवस असा उल्लेख कराल का? लोकांना चुकीची माहिती जायला नको.
धन्यवाद!

आज मराठी लँग्वेज डे आहे.
मला तर हे कळल्यावर एक्स्ट्रिमली प्राऊड फील झालं.
म्हणून मी हा मेसेज कम्प्लिटली मराठीतच टाईप केला.
थोडे एफर्टस् घ्यावे लागले,
पण आफ्टर ऑल मराठी आपली मदरटंग आहे,
तर ऍट लीस्ट इतकं करणं मस्ट आहे.
तुम्हीपण माझा लीड फॉलो करा.
लाँग लिव्ह मराठी..

सगळ्यांना हॅप्पी मराठी डे हं !!

<< तर मग सरस्वतीची मुले असा उल्लेख करून ब्राह्मणी सांस्कृतिक आक्रमण का ? लेखक तर सर्वांचे असतात ना ? इथे सरस्वतीची मुले याला काउंटर म्हणून सावित्रीची मुले असेही नको. >>

सुकरात यांची टिप्पणी वाचून मला तर वाटले की सरस्वती ही ब्राह्मण होती, असे काहीसे म्हणताहेत की काय? Lol

२७ फेब्रुवारी हा 'मराठी भाषा दिवस' नसून 'मराठी भाषा गौरव दिन' असल्याचे लक्षात आणून दिल्याबद्दल चीकू यांचे आभार. तूर्तास हा सोहळा समाप्तीच्या जवळ येऊन ठेपल्याने सर्वच धाग्यांचे आणि ग्रुपचे नामकरण बदलणे किचकट आहे. तरीही ही अनवधानाने राहून गेलेली चूक मान्य करून केवळ एक प्रातिनिधिक बदल म्हणून मूळ घोषणेचे शीर्षक बदलून त्यात 'मराठी भाषा गौरव दिवस' हे शब्द वापरत आहोत.

मायबोलीवर आणि अन्यत्रही अनेक ठिकाणी गेली अनेक वर्षे २७ फेब्रुवारी हा दिवस 'मराठी भाषा दिवस' म्हणून साजरा केला गेला. परंतु खाली दिलेले संदर्भ चीकू यांच्या मतास पुष्टी देतात. त्यामुळे पुढील वर्षापासून हा दिवस मायबोलीवर 'मराठी भाषा गौरव दिन' या नावाने साजरा व्हावा अशी विनंतीवजा सूचना आम्ही करत आहोत.

संदर्भ -
https://maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/...
https://www.esakal.com/citizen-journalism/sadanad-kadam-writes-about-mar...

संयोजक चमू आणि माबो संस्थापकांचे, या संपूर्ण व्यासपीठाबद्दल, इथे व्यक्त होण्याची संधी दिल्याबद्दल खूप आभार. तहे दिल से शुक्रिया. मनापासून धन्यवाद.

अभिवाचन हा उपक्रम आवडला. युट्यूब विंडो उपलब्ध करून दिल्याने उड्या माराव्या लागल्या नाहीत. हा उपक्रम उशिरा चालू झाला त्यामुळे नेमके काय असेल याची कल्पना अनेकांना नसेल. तसेच उपक्रमादरम्यान मायबोलीही २४ तासापेक्षा जास्त काळ बंद होती. यामुळे अभिवाचनाची मुदत वाढवणे योग्य होईल असे वाटते. लेखकांना त्यांच्या मित्रमंडळींनी कल्पना द्यावी म्हणजे ज्यांच्यापर्यंत उपक्रम पोहोचलेला नाही त्यांनाही सहभागी होता येईल.

काही मायबोलीकरांना अजूनही अभिवाचन पाठवायची इच्छा आहे, पण वेळ झालेला नाही. लेखांबाबतीतही असं झालं आहे. त्यामुळे प्रवेशिका पाठवायची मुदत २ मार्च रात्री १२पर्यंत PST अशी एका दिवसाने वाढवण्यात येत आहे. अपूर्ण राहिलेल्या प्रवेशिका ह्या वेळपर्यंत पूर्ण करून पाठवाव्यात.

पुरूष अभिवाचन पाहण्यात नाही आले. मी केले असते पण पार्श्वसंगीत आणि साजेलसा व्हिडीओ यासाठी एक दिवस तरी निवांतपणा हवा. विंडोची सुविधा चालू राहिली तर पुन्हा केव्हांतरी.

जर काही कारणाने व्हिडीओ रेकॉर्डिंग शक्य नसेल तर केवळ ध्वनिमुद्रण (ऑडिओ) दिलेत तरी चालेल

कृपया प्रताधिकार-मुक्त असेल तरच संगीत आणि व्हिडिओ वापरा. शिवाय प्रताधिकार-मुक्त संगीत किंवा चित्रमुद्रण वापरल्यास त्याचा उल्लेख आपल्या ध्वनिमुद्रणात करावा लागेल.

Pages