सोनी मराठी - तुमची मुलगी काय करते?

Submitted by DJ....... on 20 January, 2022 - 22:43

२० डिसेंबर पासुन सोनी मराठीवर नुकतीच नवीन मालिका सुरू झाली. "तुमची मुलगी काय करते?" असं त्या मालिकेचं नाव. ही थरारक वाटावी अशी मालिका असावी असं प्रोमो वरून लक्षात आलंच होतं ते आता मालिका सुरू झाल्यापासुन जाणवत आहे. मधुरा वेलणकर ही या सिरियल मधील प्रमुख पात्र असावी असं सद्ध्या तरी वाटतंय. हरीश दुधाडे हा पोलिस इन्पेक्टरच्या भुमिकेत चांगला वाटतोय.

या मालिकेचे लेखक अन पटकथालेखक चिन्मय मांडलेकर आहे तर संवाद लेखन मुग्धा गोडबोले यांनी केलं आहे. विषेश म्हणजे मालिकेची निर्माती मनवा नाईक यांची आहे.

images (1).jpeg

या मालिकेवरील चर्चेसाठी हा धागा..!! Bw

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद DJ...
ती जमदाडे मस्त काम करते हा.>> अन्जू चा प्रतिसाद होता बरसात च्या धाग्यावर..
काम चांगल करते पण इतकही मट्ठ का दाखावल आहे तिला..??!!
आज काल वेब सिरिज मुळे सगळ्याच पोलिसांच्या रोल मधे..एक मेन पोलिस आणि त्याचा साइड किक असतोच.. Lol

त्या कर्जत च्या बंगल्याचा मालक मला बेरकी वाटला... त्याला जस प्रेजेंट केलय त्यावरून त्याचा रोल मोठा असणार... तसच आमदार पण आहेतच गुण्तलेले त्यात...

पहिल्यापासून थोडक्यात काय काय घडलं ते सांगा ना कोणीतरी. दुपारी दोन वाजता लागते बहुतेक परत. दोन्ही वेळेस बघणे शक्य नाही.

थॅंक यु डीजे.

काम चांगल करते पण इतकही मट्ठ का दाखावल आहे तिला..??! >>> ती मठ्ठ वाटली आधी, पण तिने एक डायलॉग मारलाना, एकदम आवडली मला. ती त्या भोसलेची चीडचीड सतत ऐकत असते, तो अतिच झापत असतो तिला, सतत घा पा करतो. एकदा ती त्याला सुनावते डोक्यात जाऊ नका, तेव्हा दुधाडे म्हणजे भोसले गार एकदम. बॉसचा माज उतरवते, ती चहा हवा का विचारत असते कारण त्याला हवा असतो, पण तो तिला तू काय माझ्या घरची मोलकरीण आहेस का विचारतो आणि ती जे सुनावते तेव्हा एकदम छा गयी. इतके दिवस तिच्याकडे फार लक्ष गेलं नव्हतं. एकदम आवडलीच मला ती.

या सिरियलबद्दल वाटतं की मिरजकर कुटुंबाचे काही लूप होल्स शोधून पूर्ण फॅमिलीला अडकवत आहेत का, बाबाने जुगार खेळणे सोडून दिलेलं असतं तरी त्याला आमिष दाखवून खेळायला बोलावतात. ती दुसरी मुलगी जी डायरेक्ट involved आहे ट्राफिकिंगमध्ये ती मिरजकर मुलीबरोबर सतत राहत असते आणि पार्टीसाठी नेते.

मधुरा वेलणकरच्या सिरीयलमधे मला गीतांजली कुलकर्णी (बेडरीडन म्हातारी) आणि विवेक गोरे (शाळेतला शिक्षक मित्र) यांच्या कॅरॅक्टर्सवर संशय येतोय. मी तीन चार मिनिटांचे प्रोमोज बघते, क्वचित आठ मिनीटं बघते. मंत्र्याचा हात असेलच पण मुलीचे बाबा जर त्या मंत्री का आमदारासाठी काम करतात तर पंधरा लाख चिल्लर रक्कम तो देऊ शकत नाही त्यांना.

मधुराच्या आईचा संशय आलेला पण नातीला गायब करणार नाही ती.

ती जमदाडे मस्त काम करते हा.

मधुरा, भार्गवीमधे मधुरा एकदम सहज काम करते. भार्गवी आवडते मला, मधुरा जास्त आवडते पण त्या भार्गवीच्या सिरीयलचे प्रोमोज फार बघितले जात नाही, वरद चव्हाण जीवलगा मधे पण इन्स्पेक्टर होता.

मधुराचे दीर दाखवलेत का, ते कसे आहेत. मला जाऊ दिसली पण दीर नाही दिसले.

दुसरीकडे ह्या सिरियलबद्दल लिहिलेली कमेंट, इकडे कॉपी करतेय.

ती चहा हवा का विचारत असते कारण त्याला हवा असतो, पण तो तिला तू काय माझ्या घरची मोलकरीण आहेस का विचारतो आणि ती जे सुनावते तेव्हा एकदम छा गयी. >> काय उत्तर देते ती त्या इन्स्पेक्टर भोसलेंना..??

डोक्यात जाऊ नका, तुमची काळजी वाटते म्हणून विचारते.

तो इमानदार, कष्टाळू इन्स्पेक्टर असतो पण अर्धवट पुरावा मिळाला की धावत असतो, गुन्हेगार शोधायला आणि तोंडावर पडतो आणि तो राग ज्युनियरवर काढत असतो.

अर्ध्या हळकुंडाने पिवळा होतोय म्हणजे... असो, आता पुढं काय होतंय याची उत्सुकता लागली आहे. मालिकेचं स्पीड तसं फास्टच दिसतंय. रुद्रमचं कॉपी पेस्ट नसावं अशे आशा आहे.

नंतर त्याच वळणाने जाईल, ती मुलीला शोधण्यासाठी धडाधड खून करेल असं वाटतंय आणि गुन्हेगार, ड्र्ग्ज रॅकेट शोधुन काढेल, तो इन्स्पेक्टर मदत करेल तिला. रुद्रमसारखंच सेम होईल.

रुद्रममधला इन्स्पेक्टर जास्त प्रभावी वाटलेला मात्र. मधुरा मुक्ताप्रमाणेच उत्तम काम करेल, करतेय. मधुरा एक उत्तम अभिनेत्री आहे, अगदी पहील्या सिरीयलमधेही नवखी असताना अभिनय उत्तम होता.

ती त्या शर्वरी लोहकरेची बेडरीडन आई मेन निघाली तर मला आवडेल.

धन्यवाद शिवश्री!
बाम्णांना शिव्या न देता, आपल्याला वेगळे लिहिता येते "बहुतेक"!

बापरे यातली नताशा कसली डेंजरस मुलगी आहे. ड्र्ग्ज ट्रॅफीकींग मधे मुरलेली मुलगी आहे, बॉस बिसना न घाबरता, माल आणि पैसे लंपास करुन पळायला बघते, खून करते.

यात आता आश्रम, अध्यात्मिक गुरु वगैरे उल्लेख यायला लागलेत. मी आश्रम वेबसिरीज वगैरे बघितली नाहीये पण इथला इन्स्पेक्टर भोसले हिरो असलेली एक सिरीयल त्यात आश्रमात ड्र्ग्ज वगैरे दाखवलेले. ते कॉपी करतायेत की यात वाटलं. अजूनही मी याचा एकही एपिसोड पुर्ण बघितला नाहीये.

इन्स्पेक्टर भोसलेला त्याच्या सिनियर लेडी बॉसने विश्रांती घ्यायला सांगितलं आणि कर्जतला जमदाडेला जा म्हणाली. यात काही गोम असेल का की ज्येन्युअनली त्या भोसलेला आराम मिळावा हा उद्देश असं वाटून गेलं.

ही काल थोडा वेळ बघितली. नंतर वेळ नव्हता म्हणून अर्धवट राहीली. तो प्रामाणिक इन्स्पेक्टर स्वतःला जाम हुशार समजतो पण बेरकी आमदार का मंत्र्याने गुगली टाकून अभय मिरजकर ड्रग रॅकेटमधे असल्याचा संशय निर्माण केलाय ते त्याला समजत नाही, मिरजकरला उचलून बुकलतो, आत टाकतो. त्याची मैत्रीण मस्त उत्तरं देते त्याला, तिच्यासमोर काही चालत नाही.

मिरजकर जुगारी आहे पण ड्रग्ज मधे नसावा.

ती पोरगी सुटून बदलापुर भागात दाखवली आहे आणि तिची आई जवळच रीक्षा करते आणि मालाड सांगते, हा प्रोमो बघितला, वेगळा युट्युबवर.

बदलापुर ते मालाड रीक्षा, धन्य आहेत, कॅब बुक करायची ना. मायलेकीची सध्या भेट होईल असं वाटत नाही.

आई मायेचं कवचच्या एका प्रोमो वरुन वाटतंयकी आईला इतर सर्व मिळून मानसिक आजारी ठरवणार.

मी ही शिरेल बघत नव्हतो पण आज दुपारी २ वाजता हाच एपिसोड पाहिला. भारी वाटला. आधुनिक जगातल्या त्या दोघी सवतींची जुगलबंदी पण फक्कड वाटली. Proud . इन्स्पेक्टर भोसले सोबत पोलिस स्टेशन मधले सीन्स तर भन्नाट होते. भयंकर चिमटे काढतो तो Proud

आधुनिक जगातल्या त्या दोघी सवतींची जुगलबंदी पण फक्कड वाटली. >>> ही कधी दाखवली, फोनवर बोलतात तो शॉट का. समोरासमोर आल्या असतील तर नाही बघितलं.

इन्स्पेक्टरचे डायलॉग्ज छान पण समोर मिरजकर आणि शर्वरी जास्त चमकतात, सहज करतात. तो जरा ओवर करतो. ते जास्त नॅचरल करतात. हाच माझे मन तुझे झाले मधे कित्ती नॅचरल वाटायचा, माझा आवडता अ‍ॅक्टर होता.

फोनवर बोलतात तो शॉट का. >> हो हो तेच.... आधुनिक जगात सवती एकमेकींसमोर येणं केवळ दुरापास्तच नव्हे तर अगदी अशक्य आहे..!! Biggrin

श्रद्धाने त्या इन्स्पेक्टरला मस्त सुनावलं तर जमदाडे तिलाच धमकी द्यायला आली. थर्ड डीग्री वापरतो तो नुसत्या संशयावरुन, वरुन दादागिरी करतो बाईवर. मला आता ते कॅरॅक्टर फार आवडत नाहीये. करप्ट नाही हे मान्य पण मॅनर्स कमी, श्रद्धा मिरजकरशी नीट बोलू शकतो ना तो.

ही सिरीयल स्लो वाटतेय, रुद्रमसारखी हॅपनिंग नाहीये, तिथे रोज काहीना काही घडायचं. लिमिटेड एपिसोडसची नसावी.

हो हो तेच.... आधुनिक जगात सवती एकमेकींसमोर येणं केवळ दुरापास्तच नव्हे तर अगदी अशक्य आहे..!! >>>>>>>>> अस आहे का? आई- मायेच कवच मध्ये सवती एकमेकींसमोर आलेल्या दाखवल्या आहेत.

मला आता ते कॅरॅक्टर फार आवडत नाहीये. करप्ट नाही हे मान्य पण मॅनर्स कमी >>>>>>>> मला 'मायेच कवच' मधला इन्स्पेक्टर नाही आवडला. डोक्यात जातो तो. स्वत:ला खूपच स्मार्ट समजतो.

तो वरद चव्हाण ना, जिथे तिथे इन्स्पेक्टर का असतो काय माहिती, जिवलगा मध्ये पण होता.

आई- मायेच कवच मध्ये सवती एकमेकींसमोर आलेल्या दाखवल्या आहेत. >>> आत्ताच शॉट बघितला, सवती सवती समोर. दोघी फार नाही आवडल्या, भार्गवी आवडते एरवी पण यात नाही आवडली.

दुसरीकडे मधुरा वेलणकर , शर्वरी लोहकरे मस्त आहेत. फार इझि काम करतात, ओढून ताणून आव आणून काही नाही, सहजता फार आहे.

तो वरद चव्हाण ना, जिथे तिथे इन्स्पेक्टर का असतो काय माहिती, जिवलगा मध्ये पण होता. >>>>>> हो. त्या सिरियलमध्येही त्याच कॅरेक्टर आवडल नव्हत.

तिकडे भार्गवीला तिची मुलगी दिसते, आई मुलीचा पाठलाग करते पण मुलगी पुढे निघून जाते आणि आईचा अपघात होतो. तसं काही झालं की नाही यात.

ती सध्या काय करते?
आई कुठे काय करते!
तुमची मुलगी काय करते?

पुढे काय?

मी कालचा एपिसोड नाहीं बघितला.

पण एक प्रोमो बघितला youtube वर, तो भोसले drugs श्रध्दाचा पर्स मध्ये टाकतो का, असं असेल तर तो कसला खालच्या दर्ज्यावर गेलाय, सगळीकडे तोंडघशी पडतो म्हणून.

कोणी बघितलं असेल तर लिहा.

आजपण उशीरा लावली ही सिरीयल . आमदार पी ए ला अडकवतो का भोसले ड्रग्जमधे, मग बेस्ट करतो कारण त्यानेच आमदाराला आयडीया दिलेली असते, अभय मिरजकरला ड्रग्जमधे अडकवा ही. उगाच मी नावं ठेवली काल त्याला. तो श्रद्धाला माझी नजर तुझ्यावर आहे हे खुन्नसने सतत सांगतो, ते नाही आवडत मला.

बरं हिची मुलगी काय करतेय हे कळाले का कुणाला..? कोणी बघत असेल तर कृपया अपडेट द्या... आज अचानक आठवण आली अन म्हट्लं गेला आठवडाभर मुलगी निपचीत पडून आहे की काय..!!

मी आजचा एपिसोड बघितला.

तिला म्हणजे श्रद्धा मिरजकरला drugs च्या जाळ्यात ओढतायेत कोणीतरी ताई don, ती पेडलर झाली तर मुलगी मिळेल नाहीतर तिचे सर्व खानदान म्हणजे कुटुंब नष्ट करणार.

काहीही दाखवतात, ती ताई आधी त्या विशिष्ट एरियात बिझनेस चालवायची, मध्येच कोण किलवर आला आणि हिचा बिझनेस बसला म्हणून तिला हिला ओढायचे आहे.

Pages