सोनी मराठी - तुमची मुलगी काय करते?

Submitted by DJ....... on 20 January, 2022 - 22:43

२० डिसेंबर पासुन सोनी मराठीवर नुकतीच नवीन मालिका सुरू झाली. "तुमची मुलगी काय करते?" असं त्या मालिकेचं नाव. ही थरारक वाटावी अशी मालिका असावी असं प्रोमो वरून लक्षात आलंच होतं ते आता मालिका सुरू झाल्यापासुन जाणवत आहे. मधुरा वेलणकर ही या सिरियल मधील प्रमुख पात्र असावी असं सद्ध्या तरी वाटतंय. हरीश दुधाडे हा पोलिस इन्पेक्टरच्या भुमिकेत चांगला वाटतोय.

या मालिकेचे लेखक अन पटकथालेखक चिन्मय मांडलेकर आहे तर संवाद लेखन मुग्धा गोडबोले यांनी केलं आहे. विषेश म्हणजे मालिकेची निर्माती मनवा नाईक यांची आहे.

images (1).jpeg

या मालिकेवरील चर्चेसाठी हा धागा..!! Bw

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुलीने कर्जत की बदलापुरहुन पार्ल्यात पोचल्यावर खिशात पैसे नाहीत तर सरळ रिक्शा करुन घरी यायचे व पैसे घरुन आणुन द्यायचे असे करता आले असते. मुम्बैत अजुनही रिक्शावाले एवढी सवलत देतात. पण त्याने कथा तिथेच सम्पली असती. असो.

रुद्रम आवडलेली म्हणुन मी ही मालिका बघायला सुरवात केली पण काहीच्या काहीच सुरु आहे. डिएस्पि आणि इन्स्पेक्त्टरला ही एकच केस आहे. इन्स्पेक्टर मुर्खशिरोमणी आहे त्यामुळे जो भेटेल त्यच्याशी वाकड्यात शिरायचे हेच एकमेव काम त्याला दिलेय. आता आईला ड्रग पेडलिन्ग मध्ये खेहेचताहेत. पोलिस स्वतःच्ता खबरीकडे फिर्यादीला माहिती काढायला पाठवतात हे सगळ्यात भारी. (खबरीचा सगळीकडे खबरीमावशी म्हणुन डन्का पिटलेला, पोलिस खबरी सहसा इतराना माहित नसतात असा आजवर समज झालेला.)

असा पाया रचल्यावर उद्या इन्स्पेक्टरच्या जागी आईच गुन्हेगाराच्या अड्ड्यावर धाड मारतेय, बन्दुक चालवतेय हे दाखवले तरी आश्चर्य वाटणार नाही. तेच दाखवणार आहेत म्हणा.

दोन आठवड्यानी काल पाहिली पण मधले काही चुकले असे वाटले नाही, फरक पडला नाही Happy

अन्जू अन साधना धन्स..! Bw

पण त्याने कथा तिथेच सम्पली असती. असो.>> Biggrin
उद्या इन्स्पेक्टरच्या जागी आईच गुन्हेगाराच्या अड्ड्यावर धाड मारतेय, बन्दुक चालवतेय हे दाखवले तरी आश्चर्य वाटणार नाही. तेच दाखवणार आहेत म्हणा.>> Biggrin Biggrin
दोन आठवड्यानी काल पाहिली पण मधले काही चुकले असे वाटले नाही, फरक पडला नाही>> Biggrin Biggrin Biggrin

ह्या मालिकेच्या तुलनेत रुद्रम खुपच उजवी होती.

मला जयन्त सावरकरचा काका की मामा ही एकच व्यक्ती सन्शयास्पद वाटतेय, तेही एक प्रसन्ग पाहुन. तो सन्शय खोटा ठरला तर रस्त्यावरची वेडगळ व्यक्ती इतकेच अस्तित्व उरते त्या पात्राचे. मधुरा रात्री रस्त्यावर येउन सावरकरला विचारते की सानवी इथवर येउन गेली, तुला दिसली का? त्या प्रसन्गात त्याला एक फोन येतो व हा तो घेतो. रस्त्यावरच्या अनाथ माणसाला रात्रिचा फोन करणार कोण व का? हे थोडे सन्शयास्पद वाटले. बाकी बेडरिडन म्हातारी मी अजुन पाहिली नाही. शाळेतला मित्र जेनुइन वाटतो. त्या भागात ड्रग पेडलर सानविची मैत्रिण असते.

दृश्यम शेवट कळेपर्यंत भारीच होती. Proud

एवढ्या बाड-बिस्तर्‍यामागचे कारण मात्र फुटकळ होतं.. जरा सनसनाटी असतं तर बरं झालं असतं असं वाटलं.

आता इथे नक्की काय प्रकार आहे ते पहाणं औत्सुक्याचं ठरेल..

रुद्रम बेस्ट होती. तिथला इन्स्पेक्टर पण खराखुरा प्रामाणिक आणि मदत करणारा दाखवलेला. इथला इन्स्पेक्टर मिरजकर फॅमिलीला रॅकेटमध्ये अडकवायला निघाला आहे की काय संशय यायला लागलाय, तोच जमदाडेला पाठवतो का श्रद्धाकडे किंवा जमदाडे सामील आहे का कोणाला. नाहीतर शेवटी भोसलेच किलवर दाखवतील, हाहाहा.

पोलिस येऊन सांगतात तुम्ही मुलीला शोधायला बाहेर पडा आणि ती रॅकेटमध्ये अडकते, काहीही अ आणि अ. रुद्रम भिडणारी होती अ आणि अ असली तरी. कुठेतरी पोचत होती मनात असं होऊ शकतं. एकही भाग चुकवू नये असं वाटायचं, इथे आठवड्यातून एकदा बघितली तरी चालेल असं वाटतं.

ही सिरियल पकड घेत नाही, बघायचा कंटाळा येतोय. अभय आणि श्रद्धाने मात्र झोकून देऊन काम केलंय.

मला जयन्त सावरकरचा काका की मामा ही एकच व्यक्ती सन्शयास्पद वाटतेय, तेही एक प्रसन्ग पाहुन. >>> हो मलाही, त्यांनीच सावनीला त्या गल्लीतून गायब करायला मदत केली की काय वाटतंय.

आज आठ मिनिटांचं बघितलं, तो भोसले जाम डोक्यात जातोय. आता श्रद्धाला सर्वांना टपकवायचंच असेल तर भोसलेला पहीला टपकव असं वाटलं मला.

मला त्या श्रद्धाच्या वाइस प्रिन्सिपॉल मित्रावर नाहीतर मग व्यंकट = श्रद्धाचा बाप यांच्यावर संशय आहे किल्वर असल्याचा !
कोणीतरी मिरजकर फॅमिलीचा हितचिन्तक आहे म्हणून सावनीला जीवन्त ठेवायची ऑर्डर आहे !
शेवटी श्रद्धाच्या हातानेच बापाला गोळी लागणार !

असू शकेल श्रद्धाचा बाप.

पण तो ऑलरेडी गुन्हेगारी जगतात आहेच, इथे धक्कातंत्र अपेक्षित आहे खरंतर. तो असेल तर फारसा धक्का बसणार नाही, फार अपेक्षित होईल ते.

तोच आता आश्रम बाबा झाला असेल तर सांगता येत नाही, ह्या गोष्टीचा शेवट त्या बरेचदा उल्लेख होत असलेल्या आश्रमात होण्याची शक्यता जास्त आहे. बाबा, गुरु माऊली, आश्रम यांचे उल्लेख असतात अधूनमधून आणि तो बंगल्याचा मालक एक पेडलरच आहे त्यातला असं वाटतं.

त्या मित्रावर मला पहिल्या दिवसापासून संशय येतोय.

त्या दिवशी नयना आपटे श्रद्धाला म्हणते की व्यंकट कितीही वाईट असेल तरी तो कोणाचा खून करु शकणार नाही, हे मी ठामपणे सांगू शकते, इथे एकामागोमाग एक खून होतायेत. त्यामुळे तो किलवर असेल तर खुनीही झालाय आता.

बाय द वे आता बघवत नाहीये, मी एक दोन शॉटस बघितले youtube वर. अभयला परत तो महाडीक अडकवणार, त्या फ्लॅटची चावी खरंच असते का राहिलेली अभयकडे, का कोणी अडकवतेय त्याला. एकतर जमदाडे घरात येऊन गेलेली आणि दुसरी चारू. ह्यांनी कोणी ठेवली असेल का चावी आणि पेपर्स.

युटयुबवर ' आई- मायेच कवच' चा भाग बघितला. त्या भार्गवी विचित्र मेकअप आणि हेअरस्टाईल मध्ये दिसली. हा काय प्रकार आहे?

मी पण मगाशीच बघितला एक प्रोमो, त्या ताई डायरेक्ट रॅकेट शोधायला जातायेत बहुतेक. इन्स्पेक्टर आणि तिचा plan आहे. त्याच प्रोमोत ती प्रेरणा सामील आहे त्या डॉक्टर आणि दुसऱ्या मुलाला दाखवले आणि कोण वाकड्या का मोडक्या आहे, तो तिला आधी भेटलेला असतो तोच drugs दाखवतोय एका खोलीत तिला, ती customer म्हणून गेलीय. हे सर्व मला एकत्र बघायला मिळाले.

हयात सुद्धा किलवर सारखा अजून वरचा बॉस आहे, त्याची चर्चाही होते त्या प्रेरणा सीनमध्ये.

धन्स अन्जू.

हयात सुद्धा किलवर सारखा अजून वरचा बॉस आहे, >>>>>> तो पोलिसच बॉस असावा.

हाहाहा, सहीच.

आई काय किंवा मुलगी काय, दोन्ही सिरियल्सचे एकदम शेवटचे भाग बघायला हवेत, बोअर आहेत तशा. youtube झिंदाबाद, छोटे दोन तीन मिनिटांचे प्रोमोज बघितले की विषय संपला, अर्धा तास वेळ देण्याची गरज नाही.

आत्ता एक शॉट बघून वाटतंय की नाना व्यंकटचे मित्र असावेत, श्रद्धाची अवस्था त्याला फोनवर कळवत असावेत कारण त्यात बघून श्रद्धाबद्दल त्यांना माया, करुणा, काळजी वाटतेय असं वाटलं.

त्या चारूवर माझा विश्वास नाही, अभयला अडकवण्यात तीही सामील वाटते त्या मिनिस्टरबरोबर, तिने ती चावी ठेवली की काय संशय येतोय मला.

मध्ये एक दोनदा बघितली. चारुकडे अभय पचकतो आणि ताई सुटते (किलवर व्यतिरिक्त drug रॅकेट चालवणारी आणि श्रद्धाला तिच्यासाठी काम करायला लावणारी पण श्रद्धा पकडून देते तिला स्मार्टली) , तिच्यावर आणि तिच्या बेडरीडन आईवर मला आधीपासून थोडा संशय आहे, बेडरीडन आई मेन दाखवली तर मजा येईल.

व्यंकटची एंट्री झालीय, एक सीन बघितला. संजय मोने आहेत त्या भूमिकेत. ताईच्या भावापासून आणि गुंडापासून वाचवतात श्रद्धाला.

मला त्या सिनियर महिला पोलिस ऑफिसरवर सुद्ध संशय आहे, श्रद्धा मधे तिला निनावी फोन करून कर्जतच्या घराची टिप देते, पोलिस रेड टाके पर्यन्त तो घरमालक पसार !
भोसलेलाही संशय आहे, म्हणून तो तिला अंकितचं खरं नाव नाही सांगत !

मला त्या सिनियर महिला पोलिस ऑफिसरवर सुद्ध संशय आहे, >>> हो ते मी त्यांच्या म्हणजे सोनीच्या fb पेजवर लिहिलं होतं मागे.

जमदाडेच्या नवऱ्याचा उल्लेख पण असतो मध्ये मध्ये बरेचदा.

मला मात्र चारू आणि तिच्या बेडरीडन आईचा सहभाग बघायला आवडेल. ती भूमिका गीतांजली कुलकर्णीने केलीय असं मला वाटतं आणि ती फक्त एकदा बेडवर पडून राहणारा रोल नक्कीच नाही करणार. त्या उत्तम अभिनेत्री असल्याने काहीतरी खोली असेल त्या भूमिकेला.

तिकडे कलर्स च्या 'आई- मायेच कवच' मध्ये विशाल निकमची एन्ट्री होणारे. प्रोमो पाहिला नुकताच. >>> मी ही प्रोमो बघितला. ती सिरियल बघत नाही पण एकंदरीत सुहानीबद्दल सहानुभूती वाटत नाही ( अर्थात म्हणून तिचं वाईट व्हावं असं वाटत नाही ) ती सावनी बद्दल वाटते.

सिरीयल आता उलगडत जाईल बहुतेक.

या आठवड्यात बघायला हवी लक्षात ठेऊन रात्री दहाला.

या आणि ताराराणी सिरीयलला म टा सन्मान पुरस्कार बरेच मिळाले. इन्स्पेक्टर भोसले म्हणजे हरीश दुधाडे अभिनेता आणि दिग्दर्शक भीमराव मुडेनाही मिळालं. मधुरा वेलणकर आणि आशिष कुलकर्णी यांनी उत्तम काम करुन नॉमिनेशन नव्हतं. हरीश यांनी चांगलं केलंय पण आशिष यांनी उत्तम केलं आहे, पर्सनल मत, दोघांचे एकत्र सीन्स बघून झालेलं.

स्वरदा ला ताराराणीसाठी उत्तम अभिनेत्री, कलर्स च्या सुंदराबरोबर विभागून.

हरीश स्वरदा दोघे माझे आवडते आहेत, त्यावेळी म्हणजे पुर्वी वाटायचं दोघांना मिळावं एकत्र, जेव्हा ते नायक नायिका होते एका सिरीयलमधे. तेव्हा स्वरदाला नव्हतं मिळालं, आता दोघांना मिळालं पण वेगवेगळ्या सिरीयलसाठी.

काल थोडं बघितलं आणि आज पूर्ण. त्या सहकारी शिक्षिकेचं काय गौडबंगाल आहे. मराठी नसते का ती. मी आज मंगळसूत्र वेअर नाही केलंय असं म्हणाली ती आणि पुढेही काहीतरी भयानक मराठी. सिनियर पोलीसबाई आधीही मधूगंधाच होती का. मला बदलल्यासारखी वाटली. ताईच्या भूमिकेत प्रतिमा जोशी आहे, प्रतीक्षा लोणकरची बहीण. संजय मोने आवडतात, इथेही आवडले. जयंत सावरकर यात एक विचित्र माणूस आहे, भीती वाटते बघितले की.

पोलीसबाई आधीही मधूगंधाच होती का. >>> हो.

ताईच्या भूमिकेत प्रतिमा जोशी आहे, प्रतीक्षा लोणकरची बहीण. >>> मी तिला ओळखलंच नाही, थँक यु. फार विचार करत होते, हिला कुठेतरी बघितलं आहे असा.

भाशा, विनायक गोरे (शिक्षक) यांचा रोल असणारच. गोरेचा पहील्या दिवसापासून संशय येतोय. चारु आणि तिच्या आईचाही.

ती श्रद्धाची जाऊही मदत करेल, चौधरी मॅमना असं वाटायला लागलं आहे मला.

चौधरी म्हणजे मधूगंधा का. >>> हो.

नताशाचा खून केला कोणीतरी, आत्महत्या दाखवली. तेव्हा मी रेग्युलर बघत नव्हते. असंच youtube वर बघायचे. तशी स्लो स्लो आहे. सोमवारपासून रेग्युलर बघायला सुरुवात केली.

सावनीला वाचवताना तिचे आजोबा आणि नाना मरतील बहुतेक, आजोबा व्यंकट नक्की सिरियल संपताना मरतील, तसे काही डायलॉगज आहेत त्यांच्या तोंडी.

आत्ता एक शॉट बघून वाटतंय की नाना व्यंकटचे मित्र असावेत, श्रद्धाची अवस्था त्याला फोनवर कळवत असावेत कारण त्यात बघून श्रद्धाबद्दल त्यांना माया, करुणा, काळजी वाटतेय असं वाटलं. >>> माझं हे वाक्य खरं निघाले चक्क. व्यंकट नाना जिगरी दोस्त आहेत.

भोसलेने अभयला जामीन मिळू नये यासाठी प्रयत्न नाही केले, तेव्हापासून भोसले मला आवडायला लागला होता, हाहाहा. मी त्यांच्या (सोनीच्या) fb पेजवर जाऊन लिहिलं होतं की भोसलेला नक्कीच चौधरी mam बद्दल काहीतरी समजलं असणार म्हणून त्याने जामीनासाठी विरोध नाही केला. नाहीतर आधी कसला थर्ड डिग्री वगैरे देत होता अभयला.

श्रद्धाची मुलगी बहुतेक पळून जाईल. ती ते इंजेकशन घ्यायचे नाटक करते बहुदा. भाषा त्या सरांशी लग्न करणार असते का, सुरुवात थोडी चुकली माझी आज. दुधाडेचे संवाद मस्त असतात. त्याच्यात आणि जमदाडेमध्ये मला काहीतरी केमिस्ट्री वाटते पण ती तर गळ्यात मंगळसूत्र घालते.

तिचं लग्न झालंय, तिच्या नवऱ्याचा उल्लेख असतो. भोसले कधी तिला जमदाडे म्हणतो, कधी सीमा. भोसले सभ्य माणूस आहे पण त्याला श्रद्धा हल्ली आवडते की काय असा मला उगाच संशय येतो.

शनिवारचा भाग बघितला नाही मी.

साऊचं पळणं सक्सेसफुल होणार नसेल तर कशाला पळवता तिला, राहूदे गमगुमान नाटक करत पडून. शंभर टक्के खात्री होती की साऊबाई पकडल्या जाणार.

साऊ पकडली गेली का, अरेरे. या आठवड्यात नाही बघायला मिळणार. पुढच्या आठवड्यात सगळे भाग एकत्र बघेन मोबाईलवर.

Pages