सोनी मराठी - तुमची मुलगी काय करते?

Submitted by DJ....... on 20 January, 2022 - 22:43

२० डिसेंबर पासुन सोनी मराठीवर नुकतीच नवीन मालिका सुरू झाली. "तुमची मुलगी काय करते?" असं त्या मालिकेचं नाव. ही थरारक वाटावी अशी मालिका असावी असं प्रोमो वरून लक्षात आलंच होतं ते आता मालिका सुरू झाल्यापासुन जाणवत आहे. मधुरा वेलणकर ही या सिरियल मधील प्रमुख पात्र असावी असं सद्ध्या तरी वाटतंय. हरीश दुधाडे हा पोलिस इन्पेक्टरच्या भुमिकेत चांगला वाटतोय.

या मालिकेचे लेखक अन पटकथालेखक चिन्मय मांडलेकर आहे तर संवाद लेखन मुग्धा गोडबोले यांनी केलं आहे. विषेश म्हणजे मालिकेची निर्माती मनवा नाईक यांची आहे.

images (1).jpeg

या मालिकेवरील चर्चेसाठी हा धागा..!! Bw

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी ही बिग बॉस बघते. ओटीटी वर धावत धावत बघितले हे, के के उगाच जातेय परत.

नवरात्रात कसं देवी दुष्ट प्रवृत्तीचा संहार करते, इथे मात्र दुष्ट भारी ठरले . ती लोखंडे पळाली एवढ्या पोलिस फोर्सला गुंगारा देऊन, त्या कोयत्यावाल्या बायका पळाल्या, एक मेली त्यातली तरी काय झालं.

एकच चांगलं की के के ला मुलगी झाली. माय लेक सुखरूप. त्यांना परत पाठवा किलवर केसवर.

कोयत्यावाल्या बायकांकडे अजून बऱ्याच मदतनीस बायका आहेत हे व्यंकट आणि भोसलेला माहिती होतं की पुर्वानुभवावरुन तरी माती खाल्ली तिथे.

इन्स्पेक्टर शेरेकर त्यांचा माणूस दाखवला, तो आधीपासूनच त्यांचा माणूस वाटत होता की.

कोण तो देवा नवीन एंट्री, त्याचा आश्रम, आदीवासींसाठी काम करतो, त्याची बायको चारु गाला (चारु लता नावाने वावरते, सोबर एकदम) . काहीही दाखवतात. त्या पत्रकाराला चारु गालाचा चेहेरा माहीती नाही का.

काहीही कसही सुचेल तस दाखवत सुटले आहेत.
शेरेकर शेवटी किल्वरचा माणूस दाखवायचा म्हणून ठेवल होत इतके दिवस.
पण केके ऑलरेडी हिंट देऊन गेल्यामुळे चौधरी गँग पोचेल शेरेकरपर्यंत पण नेहमीसारख कील्वर मारून टाकेल त्यालाही.
आता कील्वर दाखवायला कोणी राहिलच नाही म्हणून चारूलाच परत खरा किल्वर दाखवतील.

असच वाटत होत.पण एका भागात चारुलाच कील्वरशी फोनवर बोलताना दाखवल,अर्थात हे तिने सिक्रेट ठेवल आहे.

झेले पळून गेला पोलिसांच्या तावडीतून.
शेरेकरची फायनली ट्रान्सफर झाली ,कुठे ते माहित नाही.चौधरी एसीपी म्हणून आल्या बाई एकदाच्या.
बाकी कखय,तेच रवंथ चालू आहे.

अपडेट्साठी थँक यु. बघितलंत तर नक्की लिहा कारण छोड आये हम वो गलिया

तो बिचारा कॅन्सर पेशंट देवा आणि ती चारुदेवी आणि तो आश्रम, त्यात ही सर्व ड्रग्ज धंदे करणार, त्यामुळे सिरीयल काही संपत नाही.

सिरियलने सध्या तरी वेग पकडला आहे.रेंगाळत नाही.
अखेर पोलीस कस्टडीत असलेल्या निलांजनाकडून हिंमतच स्केच करून घेतल आणि साऊने ओळखल हिंमतला.
वंदना अजूनही बाहेरच आहे.निलांजनाला मारण्यासाठी कील्वरने जेलमध्ये पाठवलेल्या बाईला निलांजनाचा घोंगडीने गळा दाबताना चक्क वेळेवर पोचून जमदाडेने छातीत गोळी घातली.निलांजना आय सी यूत आहे.
श्रध्दाला पिस्तूल मिळाल वाटत.कधी वापरणार आहे काय माहीत.

आता मला ही सिरीयल आठवतही नाही, दोन मिनिटांचेही शॉटस बघत नाही पण शेवटचा भाग असेल तेव्हा जरुर सांगा. तो बघेन.

श्रध्दाला पिस्तूल मिळाल वाटत.कधी वापरणार आहे काय माहीत. >>> नवरा किलवर निघाला तर शेवटी उपयोगी पडेल.

आज बर्याच दिवसांनी थोडासा भाग पाहिला.
श्रध्दाने झेलेला मारल ,अशी न्यूज शेरेकरने त्या नेहाला द्यायला सांगितली. श्रध्दा जेलमध्ये आहे.पण शेरेटरची बदली झाली ना.
ती चारु खणि तो टक्कल केलेला हिंमत आता एकत्र दिसले ती न्यूज बघताना
सिरियल आहे तिथेच वाटत आहे.
संपायच नावच घेत नाही.

संपत आहे रे ही सिरियल ,16जानेवारी पासून नवी सिरियल सुरू होत आहे, तिचा प्रोमो कळला तर प्लीज सांगा नक्की काय प्रकार आहे,डोक्यावरून गेला.
अमोल बावडेकर स्त्रीवेषात का?

विजय केंकरे दिग्दर्शित व मनवा नाईक (तुमची मुलगी काय करतेची निर्माती), हरीश दुधाडे (इंस्पेक्टर), व डॉ. गिरीश ओक ह्यांच 'काळी राणी' हे नवीन मराठी नाटक नुकतचं रंगभूमीवर आलंय.

संपली एकदाची.पण सिक्वेलची सोय करून जो लवकरच येणार आहे भोसले आणि जमदाडेसोबत.ः
असो.
तर किल्वर कोण,हे ठरल एकदाच.
वेंगसरकर किल्वर असतो.शेरेकरचा उपयोग करून घेत असतो त्याच्या नकळत.शेवटी शेरेअरलाही तोच मारतो ,चौधरी म्डमला पण तोच मारतो.
बर ,त्या सीसी ड्राईव्हमध्ये वेंगसरकरचाच व्हिडिओ असतो जो तो किल्वर असल्याचा एकमेव पुरावा असतो,म्हणून त्याला तो हवा असतो.
अभय कुटुंबीय बहुतेक नाशिकला शिफ्ट होणार अस शेवटी दाखवल.
हिंमतला भोसले मारतो पण ती.वंदना पळते ,ती आता पुढे बिझिनेस चालवणार बहुतेक.
बिबॉसमुळे तीन महिने न बघितल्याने बाकीच्या कँरँक्टर्सच काय होत नाही कळल.
हे एवढ सगळ आजच्या एक तासाच्या भागात दाखवल.

संपली का एकदाची.

तर किल्वर कोण,हे ठरल एकदाच. >>> हाहाहा.

वेंगसरकर सर किलवर हे जरा वेगळं तरी दाखवलं म्हणा. चारुचं काय झालं.

चौधरी म्डमला पण तोच मारतो. >>> अरेरे, हे वाईट झालं.

वेंगसरकर पकडला गेला का, की पळून गेला.

पण सिक्वेलची सोय करून जो लवकरच येणार आहे भोसले आणि जमदाडेसोबत.ः>>> अरेरे, आधीपासूनच नको बघायला. मी त्या अभय श्रद्धासाठी बघायला सुरुवात केलेली खरंतर.

धन्यवाद युपि.

का कोण जाणे मला त्या वेंन्सरकरवरच शंका वाटत होती. नेहमीप्रमाणेच माती केली सिरियलची. अती रंजित, अती मारामारी आणि अती फ्लॅश चा वापर ही या सिरियलची खास वैशिष्ट्ये....सुटलो एकदाचे. आता याचा सिक्वेल पहायचाच नाही हे नक्की

नंतर नंतरच्या काळात या सिरीयल मध्ये एक एक पात्र दाखवेनासे झाले. जसे की सावनीचे काका काकू भाऊ आजी मोलकरीण इ. शेवटी शेवटी व्यंकट, वर्षाआजी आणि मग श्रद्धाच गायब. बहुधा बजेटमधे काटकसर करण्यासाठी असेल.

शेवटी वाइंड अप केली सिरीयल. एकदाचा किल्वर कोण ते कळलं.
शेवटच्या भागात सगळं जुळवलं. चौधरी मॅडम सावनी च्या एका मित्राला तो मेला आहे असे घोषित करून सेफ हाऊस मध्ये ठेवतात ते बहुतेक सगळेच विसरून गेले

शेवटचा भाग कसला बोअर होता. एवढा स्लो एक तास की बास रे बास. भोसले ओवरअॅक्टिंग, वेंगसरकर बोअर. तो शेरेकर मूर्ख लगेच दार उघडतो, हातात पिस्तूल तरी घ्यायची. वंदनाच्या पायावर गोळी मारता येत नव्हती का, सहज पळून गेली. एकंदरीत ही सिरियल बघत नव्हते ते बरंच होतं. अशा सिरियल्सचा शेवटचा भाग बघावा, त्यात आढावा असतो. पूर्ण सिरियल समजली. दुसरा भाग आला तर बघणार नाही. एक जमदाडे काय ती बरी वाटली शेवटच्या भागात, बाकी सर्व बोअर. ह्यापेक्षा बिग बॉस बघितलं ते बरं होतं.

वेंगसरकर सारखा अनेक वर्ष प्रामाणिक असलेला पोलिस ऑफिसर अचानक अगदी ड्रग्स बिझनेसकडे वळून बादशाह होईल हेच पटलं नाही.

Pages