सोनी मराठी - तुमची मुलगी काय करते?

Submitted by DJ....... on 20 January, 2022 - 22:43

२० डिसेंबर पासुन सोनी मराठीवर नुकतीच नवीन मालिका सुरू झाली. "तुमची मुलगी काय करते?" असं त्या मालिकेचं नाव. ही थरारक वाटावी अशी मालिका असावी असं प्रोमो वरून लक्षात आलंच होतं ते आता मालिका सुरू झाल्यापासुन जाणवत आहे. मधुरा वेलणकर ही या सिरियल मधील प्रमुख पात्र असावी असं सद्ध्या तरी वाटतंय. हरीश दुधाडे हा पोलिस इन्पेक्टरच्या भुमिकेत चांगला वाटतोय.

या मालिकेचे लेखक अन पटकथालेखक चिन्मय मांडलेकर आहे तर संवाद लेखन मुग्धा गोडबोले यांनी केलं आहे. विषेश म्हणजे मालिकेची निर्माती मनवा नाईक यांची आहे.

images (1).jpeg

या मालिकेवरील चर्चेसाठी हा धागा..!! Bw

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला या सीरियल वाल्यांच काहीच कळत नाही .आधी एकदम रांगत रांगत चालू होत... चारू काय ,तिची आई काय, ताई काय , बांगडू काय.. ताई आणि बांगड्या च्या प्लॉट ची खरच काही गरज होती का ..उगीच तेव्हा नको तेवढं पाणी ओतलं.. आता करोपतीसाठी पटापट उरकत आहेत...अगदी काही दिवसांपूर्वी भोसले चे आईवडील introduce केले..यांना काय forcasting मिळत नाही का .की किती time span aahe मालिकेचा . इतके दिवस मालिका बघितली ..शेवटी नुसता अपेक्षा भंग करत आहेत..

हे डोक किल्वरच नसावकारण ती साऊबरोबर असलेली मुलगी तिचा मेकअप करून साऊबरोबर फोटो काढताना म्हणते की पोरगी हवी तर दहा लाख द्या. >>> यु आर करेक्ट युपि. ती मुलगीच मागते पण तिला अभय भेटेल तिथे हे कसं वाटतं.

शनिवारी फार काही नाही.
त्या भोसलेने पकडलेला किल्वरचा माणूस एवढ मारूनही फार काही माहिती सांगत नाही.
साऊ त्या मुलीला अआपल्या अख्ख्या खानदानाचे मोबाईल नंबर देते.
अभय ,श्रध्दा आणि तो किल्वर अजूनही पत्ते पत्तेच खेळत आहेत.

अभय ,श्रध्दा आणि तो किल्वर अजूनही पत्ते पत्तेच खेळत आहेत. >>> सहीच, हाहाहा.

साऊ त्या मुलीला अआपल्या अख्ख्या खानदानाचे मोबाईल नंबर देते. >>> का बरं, आठवत नाही सांगायचं ना. आता ती मुलगी दहा लाखासाठी करत राहील फोन.

थँक यु युपि.

मी पण बर्‍याच दिवसानी शनिवारचा भाग पाहिला. सर्व काही तेच ते, कथा अन्गुळमात्रही पुढे सरकलेली नाही.

माझ्या घरी दारी सर्वत्र कोणी सतत वावरत असेल व मला भिती दाखवत असेल तर मी कायम दक्ष राहिन, मला रीलॅक्स राहता येणारच नाही.. इथे मिरजकर कुटुंब इतके रिलॅक्स की उशीखाली कुणि घड्याळ ठेवतंय तरी हे गाढ झोपलेले, खान्द्याच्या (झिपवाल्या??)पर्समध्ये, पर्स खांद्यावर असताना पत्ता टाकला तरी याना पत्ता नाही….अरे काय चाललेय काय? किलवर मोठा ड्रग ट्रफिकर असेल पण मिरजकर कुठे घरात ड्रग पिकवुन राहिलेत? आणि त्याना त्रास देउन काय मिळणार ह्याचे उत्तर द्यायला इतके एपिसोड का घेतोय? तो मिस्टर इन्डियासारखा गुप्त रुपाने वावर्तोय असा आता सन्शय येतोय..

केवळ आणि केवळ रुद्रमच्या नावामुळे ही मालिका पाहायला घेतली. भिमराव मुडेचा सतिश राजवाडे झाला. ह्या मालिकेत बहुतेक रुद्रमचेच पार्श्वसंगीत वापरलेय असे वाटतेय. तेवढाच रुद्रमशी संबंध.

बाकी आता इथलेच अपडेट वाचेन. पाहायची इच्छा मेली.

भराभरा एकाच भागात नको तेव्हढा मोठा घास घेतात आणि मग आठवडा भर नुसतं रवंथ करत बसतात.. काहीही चालू आहे खरच .. आणि तो किलवर यांच्या family च्या मागे का लागलाय..दुसरे धन्दे नाहीत का त्याला

नताशाचा bf किलवरचा माणूस.

आता खरं सांगू का, किलवर कोण जाणून घेण्यातला इंटरेस्ट संपला, हाहाहा.

जुगरानला एका फटक्यात पकडला आणि झेलेला अजूनही पकडता आलं नाहीये, झेले आहे रॅकेटमध्ये हे चौधरीला फोन करून सांगतेना खूप मागे, श्रद्धा.

आता व्यंकट सरळ घास न घेता कर्जतला जाणार. अरे ते सर्वजण इथेच कुठेतरी आहेत ते शोध ना. तो भोसले उगाच शायनिंग मारतोय जुगरान समोर. जुगरान फारच येडा दिसतोय, सहज जाळ्यात सापडला.

नक्की भीमराव मुडे यांनीच रुद्रम डायरेक्ट केलेली ना.

मालिकेचा लेखक,दिग्दर्शक ,निर्माता आणि चँनेल सगळे सॉलिड गंडले आहेत.मालिका श्रध्दाला समोर ठेवून लिहिली,प्रमोशन तिच्यावरच केल,पण भाव भोसलेला मिळत आहे,अँवॉर्ड भोसले घेऊन गेला.
आता श्रध्दा किल्वरला शोधणार की भोसले हे जोपर्यंत ठरत नाही,तोपर्यंत कील्वर कोण ते ठरवता येत नाही .आता हो काय करायच,अस झाल आहे, तमाम क्रिएटीव्ह लोकांच.
पण शेवटी श्रध्दाच बाजी मारेल ,मग तिला महान दाखवण्यासाठी तिच्या जवळच्याच व्यक्तीला किल्वर दाखवतील.
आता इन पीन सेफ्टीपीन करून श्रध्दा की भोसले हे लवकर ठरवा आणि काय तो एकदाचा सोक्षमोक्ष लावा.

आता इन पीन सेफ्टीपीन करून श्रध्दा की भोसले हे लवकर ठरवा आणि काय तो एकदाचा सोक्षमोक्ष लावा.>>होना ...आता मूड च गेलाय सीरियल बघायचा... मध्येच त्या मुलीचं कायु दहा लाख द्या मुलीला घेऊन जा.. ती विसरली का कीलवर च्या ताब्यात तिची आई आणि भाऊ आहेत.. नाताशाचा मित्र कीलवर चा माणूस काय.. काहीही कुठेही वाढवत आहेत

भोसलेला महान दाखवण्यासाठी, तो पेज थ्री बॉस आणला, हाहाहा.

पार इंटरेस्ट संपला आहे, किलवर कोण जाणून घ्यायची उत्सुकता राहीली नाही. मी लिहून आले त्यांच्या फेसबुक पेजवर परवा.

या विकमधे फार बघता आलं नाहीये, शनिवारी एरवीही बघत नाही. फार मिसले नसावं काही, हल्ली बघायचे लक्षातही रहात नाही.

चक्क आजचा बघायला मिळाला, ते डीव्हाईस सापडल्याने, प्रसादला आता स्वतः मागावर रहायला लागतंय का. तो अभय हुशार आहे, थांग पत्ता लागू देत नाही पण श्रद्धा माती खाणार. अर्थात चारु सामील असेल तर अभ्याला तरी कशाला हुशार समजायचं.

भोसले डोक्यावर पडलाय का, त्याला त्या सी बी आयच्या खानने काही मदत लागली तर कळव सांगितलेलं असतं ना मग ह्याला केसमधून बाजुला केलं ते कळवायला हवं होतं त्याने.

अर्थात तो पेज ३ बॉस भोसलेच्याच कर्माचं फळ आहे, चौधरी मॅमवर संशय त्यानेच घेतला ना.

मालिका आता भरकटलेली नाही तर पार भुईसपाट झाली आहे.
माझ्यामते भीमराव मुडेच आता केवळ नाव येत असाव,त्याचा कार्यभाग संपला असावा कारण आजच ,मजल ,सुबोध भावेच्या त्याच्याच प्रॉडक्शनच्या कुठल्यातरी प्रोजेक्ट च उद्घाटन पुण्यात झाल ज्यात मुडेसाहेबांचाही सहभाग आहे.

शेवटी झेले पकडला गेला..आणि मागे guess केल्या प्रमाणे किलवर स्त्री आहे...जरा झलक दाखवली उद्या च्या भागाची...कीलवर चारू वाटली.झालं कसतरी संपवलं ..

झेलेला पकडताना बरीच हाणामारी केली भोसलेने त्याच्या शरीराला न झेपणारी. विनोदी प्रसंग होता तो. मध्येच दोन बायका आल्या कोयते घेऊन. मोगरा आणि गजरा. झेले डील करणार आहे. खरेच असे होते का. श्रद्धा लगेच सहकुटुंब आली जशी काही सावनीच परत आलीये. आतापर्यंत किलवरचा आवाज पुरुषी दाखवत होते. ही मालिका सव्वा दहाला सुरु होऊन पावणे अकराला संपते, निवांत काम आहे सोनीचे.
हास्यजत्रा संपली का म्हणजे जुनेच भाग लावतात परत परत. नवीन काहीच दिसत नाही.
झेले मुरांबा मालिकेत आहे. स्वयंपाकी आहे तिकडे (बहुतेक). सज्जन दाखवलाय.

हम्म्म.

भोसले सतत तोंडघशी पडतो, त्याला नेहेमी जमदाडे वाचवत असते, हाहाहा.

झेले पकडला गेल्याचा फारसा आनंद अभ्याला झाला नाही, संदीग्ध होता.

आजपण आठ मिनिटांचं बघितलं.

हल्ली आठ आठ मिनिटांचेच बघतेय. चारु, प्रसादवर पहील्या दिवसांपासून सर्वांना संशय आहे मग चारुलाच किलवर दाखवून काय तीर मारला, मला तिची बेडरीडन आई दाखवली असती तर भारी वाटलं असतं.

हो ना, डोंगर पोखरून उंदीर निघाला. अगदी अभय जरी किलवर दाखवला असता तरी जरा धक्का बसला असता. झेले ईतका तुच्छ आहे तर तो आय पि एस त्याला भेटायला का आला होता. तो आय पि एस अगदी गोड आजोबा वाटत होता आणि झेले मस्ती करणारा त्याचा नातू. सगळं आयत्या वेळी लिहितात असं वाटतं किंवा कलाकारांना जे सुचेल ते त्यांनी करा.

चारु दाखवून अगदीच फुसका बार टाकला Uhoh
त्या श्रद्धाने सासुसासरे तिथे ठेवणे वगैरे फारच टिपिकल, आता काहीतरी क्राय बेबी रिझन देतील चारु गुन्हेगार बनल्याचं !

चारू आईला पुढे करणार.आईसाठी केल ,कसा अन्याय झाला होता,मग मी किती सहन केल, मग शेवटी हा मार्ग पत्करला वगैरे असा गळा काढणार.

अरे काय फालतुगिरी आहे,किल्वर चारू नाही दुसरच कोणीतरी आहे,बहुधा प्रसाद असावा.
ती चारू त्या किल्वरशी फोनवर बोलत असते.
आता खरच अभयला किल्वर दाखवल तर सिरियल हाय व्होल्टेज ड्रामा होईल .पण एवढ धाडसी कथानक नाही परवडणार सोनी मराठीला.

आज खूप दिवसांनी पुर्ण एपिसोड बघितला, आता परत किलवर कोण, चारु नाहीये. मग श्रद्धाची आई, चारुची आई, प्रसाद, अभयचा भाऊ हेच पर्याय उरतात. भोसले दाखवा नाहीतर.

श्रद्धाची आई खूप दिवस का दाखवली नाहीये.

चारूगाला असं मराठीत नाव पहिल्यांदा ऐकलं. मला वाटत होतं मी चारूबाला ऐकतेय पण दारावरची पाटी बघून खात्री पटली. एवढ्या मोठया बंगल्याला एव्हडंसं कुलूप. पोलीस स्थानकात मिरजकर कुटुंबासमोर पोलीस सगळं प्लॅन करतात, तिला स्केच दाखवतात, कहर म्हणजे झेलेशी गाठ घालून देतात. तिथे एवढे कमी पोलीस असतात की सगळे गेल्यावर एकटा भोसले उरतो तिकडे. अजून दोन दिवस राहिलेत, रविवारी महा एपिसोड नाही केला तर.

कोणाला आठवतंय का, अभय पहिल्यांदा चारूकडे जातो ते घर खूप साधे होतं, बिल्डिंगमध्ये तो जिना चढून जातो आणि तीन खोल्या होत्या फक्त. आज तो बंगला एवढा मोठा एकदम फर्निश्ड वगैरे.

Pages