सोनी मराठी - तुमची मुलगी काय करते?

Submitted by DJ....... on 20 January, 2022 - 22:43

२० डिसेंबर पासुन सोनी मराठीवर नुकतीच नवीन मालिका सुरू झाली. "तुमची मुलगी काय करते?" असं त्या मालिकेचं नाव. ही थरारक वाटावी अशी मालिका असावी असं प्रोमो वरून लक्षात आलंच होतं ते आता मालिका सुरू झाल्यापासुन जाणवत आहे. मधुरा वेलणकर ही या सिरियल मधील प्रमुख पात्र असावी असं सद्ध्या तरी वाटतंय. हरीश दुधाडे हा पोलिस इन्पेक्टरच्या भुमिकेत चांगला वाटतोय.

या मालिकेचे लेखक अन पटकथालेखक चिन्मय मांडलेकर आहे तर संवाद लेखन मुग्धा गोडबोले यांनी केलं आहे. विषेश म्हणजे मालिकेची निर्माती मनवा नाईक यांची आहे.

images (1).jpeg

या मालिकेवरील चर्चेसाठी हा धागा..!! Bw

Group content visibility: 
Public - accessible to all site users

भोसले आईबाबान्सोबत झोपलेला पाहुन मला ती क्लिप आठवली. आईबाबान्पेक्षा मोठा दिसणारा भोसले आणि विनोदी आई बाबा. >>> हाहाहा.

भोसलेच्या आई वडलांची एंट्री झाल्यावर मी लिहून आले सोनीच्या fb पेजवर, भोसलेचे आईबाबा भोसलेपेक्षा फिट आणि यंग वाटतायेत.

अभय असेल तर श्रद्धा नक्कीच त्याचा खून करेल.

पत्ते पिसतो किलवर तेव्हा अभय जुगार खेळायचा हे आठवत राहते म्हणा.

मला अभय किंवा भोसले दाखवले किलवर तर फुसका बार वाटेल.

रेडा Rofl
हेच वाटलं होतं पण असे समर्पक शब्द नाही सुचले. भोसलेला मुलगाही आहे Uhoh खारी खाऊन खाऊन भोसले रेड्यासारखा वाढलाय. बॉस कसाही असला तरी बारीक आहे आणि पहिल्याच दिवशी भोसलेला सुटलेल्या पोटावरून बोलला. ती तायशेट्टे पण अतिअभिनय करते. हाडाची पत्रकार म्हणे. सोसायटीला ऑफिस नाही का. काल श्रद्धाचं घर वेगळंच वाटत होतं एखाद्या बिअर बारसारखं, चमचम फ्लोरोसंट लाईट दिसत होते.

भोसलेला मुलगा आहे, कधी समजलं.

खरंतर फार overacting केलीय त्याने, तो मुळात चांगला अभिनेता आहे पण इथे अतिरंजीत वाटतो त्याच्यापुढे जमदाडे, चौधरी फार सहज काम करतात. श्रद्धा, अभय तर करतातच उत्तम. पण म टा सन्मानला हयापैकी कोणाला साधे nomination ही नव्हतं. भोसलेला अवॉर्डही मिळालं.

अर्रर्र हमही है वो गुनाहगार, सॉरी सॉरी.

ती पालक सभा कोणाची असते. जावेच्या मुलाची का. >>> हो. भावाच्या मुलाची लिहायचं होतं, भोसले कसं काय लिहीलं मी, डोकं आपटून घेणारी बाहुली.

ती तायशेट्टे पण अतिअभिनय करते. >>> हो ही एक डोक्यात जाते आधीपासूनच.

भोसलेच्या मुलाच्या शाळेत? त्याला शाळेत जाणारे मुलही आहे? देवा…. ते विनोदी आईबाबा आहेत ते काय कमी आहे म्हणुन आता मुलही पैदा केले डायरेक्टरने??? >>> नाही नाही, चुकून लिहिलं मी.

आठ मिनिटांचा शॉट बघितला. भोसले पेक्षा त्याच्या वडलांना घ्या पोलिसखात्यात. एकतर ते फिट आहेत आणि चहा खारी न खाता पिता डोकं छान चालते.

सिरियल खूपच स्लो होत आहे.गटांगळ्या खात आहे.
मांडलेकर रायटर असेल तर सध्या बिझी असेल,हे एक कारण.
चौधरी,व्यंकट,ताई,बांगडू सगळे गायब.
लिंक तुटत आहे
पण भीमराव मुडेच्या सिरियलमध्ये सस्पेन्स हा जवळचीच कोणीतरी व्यक्ति असते.उ.दा...रुद्रम बापमाणूस.
त्यावरून मला तीन संशयित वाटतात.
चारू
प्रसाद
श्रध्दाचा दीर(चान्सेस कमी आहेत पण तरी)

काल कै च्या कैच दाखवत होते. पाय बांधलेली सावनी त्या पुजाऱ्याला गादीने मारत असते. गादी किती लागणार त्याला आणि तोही मार खात होता. सावनीला अमानवी दाखवण्यासाठी प्रयत्न केले पण ती मानवीच दिसत होती. तिचा तथाकथित रुद्रावतार काही प्रभाव पाडून गेला नाही. तिला मदत करणारी ती मुलगी छान आहे. रेड्याच्या बाबाला घ्या पोलिसात, त्याचं फार डोकं चालतंय आणि तो फिट पण आहे. भोसलेने केस सोडवली तरी सगळे श्रेय त्याचा बॉस घेणार. श्रद्धा आव्हान देते किलवरला, घरात भिंतीवर ओरडून काय होणारे.

श्रद्धा आव्हान देते किलवरला, घरात भिंतीवर ओरडून काय होणारे. >>> सगळं ऐकू जातं ना त्याला.

भोसलेच्या बाबांनाच पोलिसात भरती करून घ्या असं परवा सोनीच्या fb पेजवर लिहून आले.

. भोसले पेक्षा त्याच्या वडलांना घ्या पोलिसखात्यात. एकतर ते फिट आहेत आणि चहा खारी न खाता पिता डोकं छान चालते. >>> माझी हीच कमेंट कॉपी करून आले तिथे, हाहाहा.

अभयची पोरगी १८ ची, म्हनजे तो कमीतकमी ३६ चा तरी असेल. आपल्यासारखा सामान्य माणुस असेल तर ४५ चा असायला हवा. सिरियल सुरु झाली तेव्हा तो इमाने इतबारे एका बेइमान माणसाची चाकरी करत होता, त्याच्यासाठी मोठी रक्कम इकडुन तिकडे हलवायचे काम करत होता. हे करताना त्याने कधीही ‘मला हॉटेल सुरु करायचे आहे‘ असे म्हटलेले ऐकले नाही. आणि परवा तो कागदपत्रे घेउन इन्टेर्व्युला निघाला तर बायको म्हणते उगीच नोकरी करुन तुझे रेकॉर्ड खराब करु नको. हॉटेल टाकायचे तुझे स्वप्न आहे ना?’ ४५ शी गाठलेले हे बाळ अजुन स्वप्नच बघणार आहे, त्या स्वप्नाला प्रत्यक्षात उतरवायला लागणारे आर्थिक बळ आकाशातुन पडणार आहे, उगिच नोकरी बिकरी करुन आर्थिक बळ कमावले तर स्वप्न प्रत्यक्षात उतरायची भिती वाटत असेल बायकोला. अशा चांगल्या बाया कुठे मिळतात देव जाणे…. आणि इतकी वर्षे ज्या प्रकारची नोकरी करत होता ते पाहता कागदपत्रे दाखवुन करावयाची नोकरी त्याला कोणी देइल असे वाटत नाही. सामान्य माणसे कागदपत्रे दाखवुन नोकरी मिळवतात.

गादीने मारणारा भाग मी अजुन पाहिला नाही पण अगदी पातळ गादी बनवली तरी ती सात आठ किलोची बनते. सान्वीसारखी दुबळी मुलगी उचलु तरी शकेल का? एनी वेज, भाग बघते व मग टिका करते Happy

चंपा, रेडा Happy

त्याला बघितले की रेडाच आठवतो…. Happy

घरातून आव्हान देऊन काय होणार, त्यासाठी बाहेर पडायला पाहिजे असे म्हणायचे होते मला. अभय ज्या माणसासाठी काम करत होता त्याने सहजा सहजी अभयला सोडू दिले का काम, कारण आता अभयला त्याची सगळी गुपिते कळली ना. श्रद्धा आणि अभयचे कसे जमले ते सांगितले नाही का मालिकेत, दोघे अगदीच विरुद्ध आहेत.

भोसलेच्या राजेशने किलवर नाव घेणारा पत्त्यात एक्स्पर्ट असणार हे भोसलेच्या कानावर इतक्या वेळा घातले की शेवटी भोसलेने एक और एक ग्यारा करत अभयचे नाव सन्शयीत म्हणुन स्वतःच्या डोक्यात घुसवले. आता बघु काय होते पुढे.

बोअर होतंय सर्व.

अजून कोण होणार करोडपती प्रोमोमध्ये लवकरच एवढंच येतंय , वेळ कधी काय दाखवत नाही. त्यामुळे ही सिरियल संपणार कधी हा प्रश्न आहे. आज मी खूप दिवसांनी पूर्ण एपिसोड बघायला बसलेय.

उद्या अभय सापडेल बहुतेक भोसलेला. तोच पडलेला दाखवला आहे आणि रुमाल बांधून फिरणारा पण तोच आहे की काय समजलं नाही, दोन्ही अभय असावेत की काय. पूर्ण सिरियलमध्ये दाढीवाला एकटा अभय आहे ना.

उद्या अभय सापडेल बहुतेक भोसलेला. तोच पडलेला दाखवला आहे आणि रुमाल बांधून फिरणारा पण तोच आहे की काय समजलं नाही, दोन्ही अभय असावेत की काय>> रुमाल बांधलेला मला तर त्या सावनी च्या बहिणीचा boy friend वाटला..तो ख्रिश्नन .. दोघांचंही नाव आठवेना...ती भाडीपा च्या व्हिडिओ मध्ये असते.. पण खरच काहीही चालू आहे..

एवढं मिरज करांच्या घरात येऊन कोणी काय काय ठेवतय..हे जुन्या काळा सारखं बिल्डिंग बाहेर गस्त घालत बसलेत.. कोणी शहाणा माणूस असता तर आधी आपल्या दारा बाहेर सीसीटीव्ही लावून घेतला असता..पण यांना serial वाढवायची आहे ना .

बिल्डिंगमधले अभय सोडून काका, अभय भाऊ दाखवणार असतील तर अभय भाऊ, मुलगी, ख्रिश्चन bf टीम पण दाखवतील, काहीही दाखवतील, मुर्खपणा सर्व.

तो नवीन आलेला सिनियर पार्ट्या झोडत का फिरत असतो

श्रद्दाला गप्प बस म्हणून चिट्ठी पाठवणारा अगदीच रिकामटेकडा आणि टुकार माफिया आहे Lol कोण कुठली श्रद्धा आणि तिला काय गप्प बसायला सांगतो. नाक्यावर पानबिडी विकणारे यापेक्षा मोठा ड्रगचा धंदा करत असतील. जयंत सावरकर दिसले नाहीत खूप दिवसात. त्यांची तब्येत उत्तम असू दे. तो रेड्याचा बॉस सारखा गडचिरोलीची धमकी देत असतो. बिचारे तिकडचे लोक, काय वाटत असेल त्यांना.

अजून कोण होणार करोडपती प्रोमोमध्ये लवकरच एवढंच येतंय , वेळ कधी काय दाखवत नाही. .........
करोडपती सोमवार ते शनिवार 9 ते 10 असत,हास्यजत्रा रविवारी करतात
त्यामुळे जोपर्यंत दुसर्या सिरियलची अँड येत नाही किंवा दुसर्या सिरियलच टाईम चेंज करत नाहीत तोपर्यंत ही सिरियल का ही संपत नाही.

जावेच्या मुलीचा मित्र फारच डेंजर आहे, तरी जाऊ नाक उडवून म्हणते की आम्ही फारच सभ्य आणि श्रद्धाला वाटेल तसं बोलत असते. त्या अभयला बाथरूममध्ये पाठवायचं की सोफ्यावर बसवायचं आल्यावर. चौधरी आहेत पुढच्या भागात. त्या मागे रेड्याच्या घरात लपून का शिरल्या होत्या, काय हवं असतं त्यांना तेव्हा.

रुमाल बांधलेला मला तर त्या सावनी च्या बहिणीचा boy friend वाटला..तो ख्रिश्नन .. >>> ग्रेट तुरु, मी नव्हतं ओळखलं.

श्रद्दाला गप्प बस म्हणून चिट्ठी पाठवणारा अगदीच रिकामटेकडा आणि टुकार माफिया आहे Lol कोण कुठली श्रद्धा आणि तिला काय गप्प बसायला सांगतो. नाक्यावर पानबिडी विकणारे यापेक्षा मोठा ड्रगचा धंदा करत असतील. >>> हाहाहा, कसली भारी कमेंट आहे ही.

त्यामुळे जोपर्यंत दुसर्या सिरियलची अँड येत नाही किंवा दुसर्या सिरियलच टाईम चेंज करत नाहीत तोपर्यंत ही सिरियल का ही संपत नाही >>> हम्म्म. बघायलाच नको मग सध्या.

रुमाल बांधलेला मला तर त्या सावनी च्या बहिणीचा boy friend वाटला..तो ख्रिश्नन .. >>> ग्रेट तुरु, मी नव्हतं ओळखलं >> हा हा हा.. thanks अन्जू.. त्याच्या चष्म्याच्या हिरव्या काडी वरून ओळखलं .. मध्ये एका भागात तो सावनी च्या बहिणीचा पाठलाग करताना दाखवला होता.. ती घाबरते आणि पेपर स्प्रे मारते .तिला वाटलं की कीलवर चा कोणी माणूस आहे..तो तिला काही सांगायला हॉटेल मध्ये घेऊन जातो..बसून बोलू..ते पुढे काही दाखवलं नाही .त्यात काही धागा असू शकेल काय..

किती रेंगाळवतात... कालचा भाग टिपी म्हणुन पुर्ण पाहिला. काहीही घडले की श्रद्धाचा एकेक डोळा आलटुन पालटुन पाहुन आता कंटाळा आलाय. साधा दरवाजा वाजला तरी सगळे पाच मिनिटे एकमेकांकडे बघत बसतात हे पाहुनही आता वैतागलेय.

दोन मोठी दारे असलेला दरवाजा या मालिकेतच पहिल्यांदा पाहिला. आणि इतक्या मोठ्या फ्लॅटच्या दरवाजाला आतुन नुसती एक छोटीसी कडी. लॅच वगिरे काहीही नाही... दाराला पिन होल पण नाही.

तो किलवर, पुजारी, रखवालदार मुलगी हा सगळा सेटप अगदी बुळा आहे.... डॅमीट कोठारे साहेबांचे टकल्या हैवान, खविस व. मंडळी पण यांच्यापेक्षा हुशार होती... आज किलवर सानुला भेटायला येणार आहे म्हणे... काय येडा आहे का तो? सान्वी कोण आहे त्याच्यासाठी? आज आम्हाला सांगुन उपकृत केले तर बरे होईल. बर्याच दिवसांनी काहीतरी हाती लागेल...

रेडा दिसायला रेडा असला तरी गाढव आहे. जेरॅम डिकोस्टा 'कोणितरी मला पत्ता विचारला आणि नंतर मला डंपिंग ग्राऊंडवर जाग आली' हे सांगतो. रेड्याला हे खोटे वाटते. ठिक आहे, खरे वाटायलाच हवे असे काही नाही. पण सेम हीच कहानी अभय सांगतो तेव्हा डोक्यात घंटा वाजायला हवी. अभय 'पत्ता विचारणारा माणुस मला जेलमध्ये...." असे काहीतरी सांगायला बघतो तर हा त्याला अर्धवट बंद पाडतो. निदान ऐकुन तरी घे रे बाबा पुर्ण..

चौधरी मॅडम रेड्याशी परत का बोलतात हे आज कळेल. माझ्या हाताखाली असला रेडा असता तर त्याला कामे देऊन माझे काम बिघडवण्यापेक्षा त्याला बेंचवर बसवुन माझी डोकेदुखी संपवली असती.

अभयला बोलू का देत नाही भोसले, हेच मनात आलं, साधना.

स्वतःला अतिशहाणा समजतो, भोसले. केस कधी सुटली तर श्रेय खबरी मावशीला द्यायला हवं, तीच मेन बातम्या पुरवते, तिला भरपूर पैसे देऊन सर्व काढून का नाही घेत किंवा तिचं नेटवर्क तपासत नाहीत.

रुद्रमचा इन्स्पेक्टर कसला ग्रेट होता, तो आठवतो अजूनही.

खरेच गं.. तो मारला गेला तेव्हा खुप वाईट वाटलेले. रेड्याला परत कायमचे निलंबीत केले तर बरे होईल असे वाटतेय Happy

खबरी मावशीचे नेटवर्क ती मुलगी.. काल ती मुलीच्या अंगावर थोपटत म्हणते ना माझे डोळे ही आहे म्हणुन... काहीही दाखवतात.
त्या पोरीला काय आधीच माहिती असणार कोण कुठे कधी का व कसे भेटणार आहे ते? आणि ही एकच केस असणार का खबरी मावशीकडे? दहा केसेसची शंभर माणसे कुठे न कुठे भेटत असणार, मुलगी कुठे कुठे धावत बसणार...

Pages