सोनी मराठी - तुमची मुलगी काय करते?

Submitted by DJ....... on 20 January, 2022 - 22:43

२० डिसेंबर पासुन सोनी मराठीवर नुकतीच नवीन मालिका सुरू झाली. "तुमची मुलगी काय करते?" असं त्या मालिकेचं नाव. ही थरारक वाटावी अशी मालिका असावी असं प्रोमो वरून लक्षात आलंच होतं ते आता मालिका सुरू झाल्यापासुन जाणवत आहे. मधुरा वेलणकर ही या सिरियल मधील प्रमुख पात्र असावी असं सद्ध्या तरी वाटतंय. हरीश दुधाडे हा पोलिस इन्पेक्टरच्या भुमिकेत चांगला वाटतोय.

या मालिकेचे लेखक अन पटकथालेखक चिन्मय मांडलेकर आहे तर संवाद लेखन मुग्धा गोडबोले यांनी केलं आहे. विषेश म्हणजे मालिकेची निर्माती मनवा नाईक यांची आहे.

images (1).jpeg

या मालिकेवरील चर्चेसाठी हा धागा..!! Bw

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला श्रद्धाचा मित्र kilwar किंवा त्याचा माणुस वाटतोय. सतत तिच्या घरात असतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्याची होणारी बायको श्रद्धाला काही तरी सांगनार होती तिचा अचानक अपघात झाला होता.

राजेश आणि शर्मिलाला घेण्याच कारण काय,ते कळतच नाही.जरा कुठे सिरियल वेग घेत आहे अस वाटत तर मध्येच घुटमळतात.
आता श्रध्दाला पळवून नेणार आहेत.
आता शेरेकरसारख मलाही वाटत आहे की किल्वर वगैरे कोणी नाहीच आहे.

प्रसाद उद्या भेटणार आहे साऊला, आता साऊच्या आसपास घरातले कोणीना कोणी हवं खरंतर. तो काय ड्रगजही पुरवेल तिला. साऊच्या सुटकेबद्दल तो नक्की काय सांगतो तिला, अर्धवट समजलं.

चिकू आणि त्याचे आई वडील आले की मी आवाज बंद करते. साऊ घरी आली तेव्हाही आवाज बंद. अर्धी अधिक म्युट वरच बघितली. गाला हे आडनाव आहे. ती जळालेली बाई म्हणजे चारू का.

साऊच्या सुटकेबद्दल तो नक्की काय सांगतो तिला, अर्धवट समजलं.....
प्रसाद सांगतो की,तुला सोडल आहे ,म्हणून तू आलीस.आता थोड्या दिवसांसाठी प्रसादला कील्वर दाखवतील आणि मग त्यालाही मारतील.
शेवटी साउला जस श्रध्दाने आणल तस कील्वरला पण श्रध्दाच शोधणार.

हाहाहा. तसंच हवं, नाहीतर काही न करता भोसलेला हिरो करतील.

चारु मेली नसावी असं वाटतं.

थँक यु युपि.

आई मला भूक लागली, शाळा सुटली, पाटी फुटली, टन टन टन टन टन Lol मस्त आहे शेरेकर. सगळं सोपं करून टाकतो. नव्वद टक्के जळालेली बाई चारू आहे सांगून मोकळा होतो. ड्रुगचं नाव मस्त ठेवलंय, किलबिल. मालिकाही किलबिल स्तराचीच आहे.

भोसलेला बहुतेक चक्क हिरवीण दिली आहे.
फॉरेन्सिक डिपार्टमेंट मधली बोशुंदरा गोडबोले,आई बंगाली,वडील मराठी.
जराशी वेंधळी दाखवली आहे.
सिरियल वाढवणार असतील तर यांची जोडी दाखवतील.

अंजूला अनुमोदन. आधीच तो भोसले डोक्यात जातो. करत काहीच नाही आणि उगाच मिशांना पीळ मारत फिरत असतो. नाव तरी काय बोशूधरा. असं नाव असतं का. ते लोक बोलताना गोल गोल बोलतात पण नावं नॉर्मल असतात त्यांची, हो ना? मुळात हे बंगाली पाणी घालायची काय गरज. आता राजेश शर्मिला चिकू आणि हे नवीन पात्र असा टाईमपास करतील. मी अर्धा अधिक वेळ म्युट करूनच बघते.

डॉ .निरंजना म्हणून मनवा नाईक आली आहे.
तिची एन्ट्री अशी गूढ का आहे का ते नाही,म्हणजे तिच बोलण,वागण,नचर अस संशयी ठेवल आहे की आपल्याला वाटाव की हीच किल्वर आहे.
अजून किल्वर कोणाला दाखवायच हे कंपनीच ठरलेल दिसत नाही.
बाकी अजून शेरेकर आणि भोसलेच वर्बल युध्द चालूच आहे.
तो भोसले त्या हॉटेलवाल्याला काय बावळटासारख उचलतो,तो सांगतोय की मी 300पार्सल्स दिली त्यातल एक तुमच्यापोलिस स्टेशनच होत,फूटेज चेक करा,तरी त्याला मारत बसलाय,झेलेला विष त्या पार्सलमध्ये बाहेर पण कोणीही घालून देऊ शकेल,एवढ साध कस कळत नाही.

काल नाही बघितली ही सिरीयल, मनवा नाईक शॉट बघितला युट्युबवर, ही इतकी कृत्रिम अभिनय का करायला लागली. खुप मागे एका हिंदी सिरीयल मधे आवडलेली मला.

शेरेकरच काम करणार मनवा नाईक ऑर क्रिएटिव्ह कंपूतला आओळखीचा आहे का,केवढा फुटेज खात आहे.एवढ फुटेज तर मधुगंधा कुलकर्णीला पण मिळत नाही आहे.
कालचा भाग कहर होता.
एवढे महत्वाचे डीएनए रिपोर्ट्स ,तेही शेरेकरने मागणी केलेली नसताना,कुठल्या वेंधळ्या बाईला पोलिस स्टेशनमध्ये घेऊन यायला सांगतील.
शेरेकरला साऊशी बोलायला घरातल्यानी दिल नाही,पण तिच्या घरी मात्र कोणीही येऊन तिला भेटत,बोलत.
अजब आहे सगळ.

शेवटी स्ट्रॉबेरी पिक्चर निर्मित 'तुमची मुलगी काय करते' ह्या मालिकेत निर्मात्या 'मनवा नाईक' ह्याही आल्या, आणि तिकडे 'बॉस माझी लाडाची' ह्या दुसऱ्या मालिकेत आई 'मीना नाईक' ह्यांही एका कसल्यातरी भूमिकेत दिसत आहेत.

बोअरच होतेय, हल्ली मी टीव्ही लाऊन ठेवते पण लक्ष फार देत नाही.

सर्व मेन पैसा कुठे लपवला नताशाने हे शोधत असणार (ते फक्त साऊला माहीती असणार) , नीलांजनाही त्यासाठीच आलेली असणार, आधी पॉझिटीव्ह दाखवली आहे उगाचच.

ही सिरीयल काही संपायचं नाव घेत नाहीये. ताराराणी संपतेय, त्याजागी नवीन येतेय. तीही मी बघत नव्हते म्हणा.

शेवटी ठरल एटदाच किल्वर कोण ते.
स्वत: निर्मातीण बाईच आल्या मैदानात किल्वर बनून.
नाईक बाईंना मोह आवरला नाही अभिनय करण्याचा.

हेच लिहायला आलेले UP

शेवटी शो च्या निर्मिती ताईंना किलवरपद घ्यायचा मोह आवरला नाही.

कालच्या भागात तसच वाटलं पण आज फ्लॅश बॅक दाखवताना मनवा मॅडम म्हणाल्या चारू गाला ला.. किलवर ला सांगा तिला सोडायला .. तिला घरी जाऊ द्या .. तिच्या कडून माहिती काढायची जबाबदारी माझी.. आणि आज प्रसाद तिच्या कडे treatment साठी येतो त्याला ती म्हणते सावनी वर काम चालू झालंय...अजून ठरत नाहीये वाटतं...प्रसाद ला करतील उभ अस वाटतंय.. खूप दिवसांपासून अभय , श्रध्दा चे बाबा गायब आहेत..

हो किलवर मनवा पण नाहीच .

ती मूर्ख सावनी सर्व डायरी प्रकरण शेरेकरला सांगते.

अभय त्या सन मराठीत पण काम करतो बहुतेक. एका सिरियल प्रोमोत बघितला, व्हिलन असावा. सिरियलचे नाव विसरले पण एकटी मुलगी घर सांभाळते नोकरी करून, बाकी रिकामटेकडे आणि अपेक्षा करणारे असा काहीसा विषय आहे.

किती घोळ घालत आहेत हे लोक.नुसती गुंतागुंत. काही दिवसांनी लेखक आणि दिग्दर्शक विसरतील की नक्की काय दाखवल आणि काय दाखवायच आहे.
मध्येच काय तो झेलम,मग तो व्हिडीओ गेम,त्या मुलाचा म्रुत्यू.
कशाचा कशाला मागमूस नाही.
सिनियर लोकांना घरी बसवलेल दिसत आहे.

सुरवातीला मी खूप आवडीने बघायचे . लिमिटेड एपिसोड असतील असे वाटलेले. आता सोडून दिली.
मला वाटतं किलवर ही एक व्यक्ती नाही, तीघं असतील > मेन्टेलिस्ट च्या रेड जॉन सारखे Happy

निलांजनाबद्दल साऊला संशय आलाय बहुतेक, बॅगेची माहिती मिळवायला अधीर झालेली वाटली तिला, किंवा दुसरं म्हणजे तिला आधी बघितलेलं आठवतही असेल, जरी तेव्हा साऊ शुद्धीत नव्हती, तरीही पुसट चेहेरा आठवत असावा.

संपवा आता.

Pages