सोनी मराठी - तुमची मुलगी काय करते?

Submitted by DJ....... on 20 January, 2022 - 22:43

२० डिसेंबर पासुन सोनी मराठीवर नुकतीच नवीन मालिका सुरू झाली. "तुमची मुलगी काय करते?" असं त्या मालिकेचं नाव. ही थरारक वाटावी अशी मालिका असावी असं प्रोमो वरून लक्षात आलंच होतं ते आता मालिका सुरू झाल्यापासुन जाणवत आहे. मधुरा वेलणकर ही या सिरियल मधील प्रमुख पात्र असावी असं सद्ध्या तरी वाटतंय. हरीश दुधाडे हा पोलिस इन्पेक्टरच्या भुमिकेत चांगला वाटतोय.

या मालिकेचे लेखक अन पटकथालेखक चिन्मय मांडलेकर आहे तर संवाद लेखन मुग्धा गोडबोले यांनी केलं आहे. विषेश म्हणजे मालिकेची निर्माती मनवा नाईक यांची आहे.

images (1).jpeg

या मालिकेवरील चर्चेसाठी हा धागा..!! Bw

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अभयला पार गायबच केलंय या लोकांनी, शेवटी त्यालाच किलवर दाखवू नका. त्या साऊलापण बाबांची आठवण येत नाही का.

आता खरंतर किलवर जाणून घेण्यात इंटरेस्ट नाही, साऊ जिवंत केवळ पैशाच्या बॅगेमुळे आहे. मला अजुनही चारु आई किलवर दाखवली तर बरं वाटेल. प्रसादवर आणि चारुवर लोकांनी पहील्या दिवशीच संशय व्यक्त केलेला. नाहीतर शेवटी शेरेकरला उभा करतील किलवर म्हणून.

भोसलेसारखा मुर्ख इन्स्पेक्टर जगात नसावा, हाहाहा.

सिरियलमधला सस्पेन्स आणि इंटरेस्ट कधीच निघून गेला.कलाकार तरी कसे कंटाळले नाहीत कळत नाहीत आणि सिरियलला एक्स्टेंशन तरी कस काय मिळाल,ते ही कळत नाही.
सगळाच सावळा गोंधळ आहे.

आशिष कुलकर्णी एकाच वेळी तीन मालिकांत काम करतोय जसे आई कुठे काय करते (स्टार प्रवाह), तुमची मुलगी काय करते (सोनी मराठी) आणि माझी माणसं (सन मराठी). उज्वला जोगही तू तेव्हा तशी (झी मराठी) व कन्यादान (सन मराठी) मध्ये दिसतात. तसेच मीनल बाळ नावाची अभिनेत्री ही चार मालिकांत दिसते जसे लग्नाची बेडी (स्टार प्रवाह), जाऊ नको दूर... बाबा (सन मराठी), स्वराज्य सौदामिनी ताराबाई (सोनी मराठी) आणि आणखी एका मालिकेत आहे. नाव आठवल्यावर लिहितो.

खासगी वाहिन्यांच्या सुळसुळाट होण्याआधी एकाच कलाकाराला विविध वाहिन्यांवरील मालिकेमध्ये काम करता येत असे. मात्र मधल्या काळात कलाकारांना प्रतिस्पर्धी वाहिन्यांवर प्रक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये काम करू देत नव्हते, एका वेळी एकाच मालिका (एखाद्या वेळेस एकाच वाहिनीवरच्या दोन मालिका चालायच्या) करावी लागत असे. पण बहुतेक COVID - १९ नंतर चित्र बदलत आहे.

बघत आहे का कोणी ही सिरियल. अगदीच कचरा केला आहे.
कालचा एपिसोड बघून तर लेखकाची कीव करावीशी वाटली की इतके पोलिस मंद असतात का की दुसर्या पोलिस स्टेशनच्या एरियात घडलेल्या घटनेची चौकशी भलत्याच पोलिस स्टेशनमधला पोलिस करेल.
शेरेकरने तर भोसलेला आता लाथ मारून हाकलायला हव.
एवढ मोठ चारू गालाच सत्य की ती जळलेली बॉडी तिची नव्हती हे शेरेकर लपवून ठेवतो,त्या बोशुदराला सस्पेंड करतो.
काहीही म्हणजे काहीही चालू आहे.
सावनीला शिक्षण वगैरे घ्यायच नाही का,मूर्खपणा चालू आहे.
ही सिरियल जिला फार टीआरपी नसावा,ती चालू ठेऊन सोनी मराठीला काय मिळत आहे काय माहित.

सिरीयल सुरू ठेवते, पण बघण्यातला इंटरेस्ट कधीच संपलाय.

मठ्ठ भोसलेला शेवटी राष्ट्रपती पदक मिळवून देऊन, चॅनेल आणि निर्माती सिरीयल संपवेल बहुतेक.

हिला trp आणि ताराराणीला नाही, ती संपली.

अर्थात माझ्यासारख्या लोकांमुळे मिळत असेल trp , आवडत नाहीये, पटत नाहीये तरी ती सिरियल सुरू ठेवते. येता जाता बघते.

आज जमदाडे भारी वाटली, शेरेकर समोर कुल एकदम.

ती सावनी एक मूर्ख, भोसले सात मूर्ख. मायकेल लोबो प्रकरण.

भोसले त्या ईशानच्या बाबांवर दादागिरी करून वड्याचे तेल वांग्यावर काढत होता . त्या शेरेकरने तर भोसलेची पार तासली होती त्यांच्यासमोर.

आज पाच मिनिटे पाहिली. या सिरियलेचे डायलोग आणी स्टोरी लिहिणारे आणी डायरेक्टर यांना मेटल होस्पिटल मध्ये नाहि पाठवले तर बघणार्यांना जावे लागेल !

संपवतील इतक्यात वाटत नाही, पंधरा दिवस किंवा महिनाभर तरी ताणतील.

महाएपी चा गाजावाजा करतात, किलवर कोण हे दाखवतील की नाही याची खात्री नाही.

चारू गालाची म्हातारी आई त्या स्फोटात गेली बहुतेक. >>> हे त्यांना ( भोसले, जमदाडे, मियांना) समजेल असे वाटत नाहि.

चारू गालाची म्हातारी आई त्या स्फोटात गेली बहुतेक. >>> हे त्यांना ( भोसले, जमदाडे, मियांना) समजेल असे वाटत नाहि....
भोसलेला संशय आलेला असतो जेव्हा तिला बहरीनला नेल आहे अस कळत.तेव्हा तो म्हणतो की इतकी वर्ष बेडवर असणार्या बाईला अस कस नेता येईल.पण हे कँरँक्टर इतक कन्फ्युज्ड केल आहे की जेव्हा तो शहाण्यासारख वागतो तेव्हा त्याला माती खाल्लेली दाखवतात.कदाचित आता त्यांना कळेल की तो चारूचा प्लँन होता.
बाकी,कालचा भाग छान होता.बर्याच दिवसांनी सिरियल पुढे सरकल्यासारख वाटल.चौधरीच मिरजकरांना आणि शिधमला समजावण मस्त होत.
शेरेकर कसाही असला तरी त्या अँटरने छान काम केल आहे.नाव माहित आहे का कोणाला?नवीन आहे का?
एक बर केल की चारूलाच कील्वर दाखवल.
जमदाडे,बोशुंधरा,काल भोसले पण मस्त.
म्हणूनच ही सिरियल सोडवत नाही.

कालचा एपिसोड जरा हॅपनिंग होता पण नंतर गुंता सोडवत न नेता मातीही खाऊ शकतात, वाढवायची असेल तर काहीही करतील, संपवायची असेल तर एकेक उकलत नेतील.

बोशुंधरा च्या प्रकरणात शेरेकर जाणार बहुतेक - उद्याच्या झलकि मधे भोसले आणी त्याची बौस शेरेकरची गचांडी पकडताना दाखवले आहे

कालच्या भागातल एवढा अपमान होऊनही शेरेकरच वेंगसरकर सरांना सांगण "सर,मी सुपरकॉप आहे" फनी वाटल.
शेरेकरला का एवढा फुटेज मिळत आहे कळत नाही,मनवा नाईकचा रिलेटिव्ह आहे का
श्रध्दा मिरजकरांना जरा काही दिवस रजा दिलेली दिसते.

चारु किल्वर नाही. >> हे कधि झाले ?...
प्रिकँपमध्ये चारुला कील्वरशी फोनवर बोलताना दाखवले आहे.'सॉरी किल्वर,उशीर होत आहे .वगैरे '

मला वाटत अभय च किल्वर असेल. तो आणि चारू मिळून हे करत असतील. आधी पण दोघांनी कंपनीत काहीतरी फ्रॉड केलेला असतो ना?
वेगळी वाटली म्हणून हि सिरीयल बघायला सुरवात केली . मध्ये बंद केली तरीही काय झाले आले हि उत्सुकता वाटली कि मध्येक बघते. maxplayer हि सिरीयल आता दिसत नाही. आधी दिसायची.

प्रिकँपमध्ये चारुला कील्वरशी फोनवर बोलताना दाखवले आहे.'सॉरी किल्वर,उशीर होत आहे .वगैरे ' >> ओह , म्हणजे नवीन काहितरी
सावनी, सावनीची आजी, सावनीचा लहन चुलत भाउ किंवा अभयच्या गाडितील प्रेत शोधनारा पोलिसांचा कुत्रा सुध्हा किलवर दाखवली तरी आता काहिहि वाटणार नाहि इतका चाउन चाउन चोथा केला आहे रहस्याचा !

Pages