सोनी मराठी - तुमची मुलगी काय करते?

Submitted by DJ....... on 20 January, 2022 - 22:43

२० डिसेंबर पासुन सोनी मराठीवर नुकतीच नवीन मालिका सुरू झाली. "तुमची मुलगी काय करते?" असं त्या मालिकेचं नाव. ही थरारक वाटावी अशी मालिका असावी असं प्रोमो वरून लक्षात आलंच होतं ते आता मालिका सुरू झाल्यापासुन जाणवत आहे. मधुरा वेलणकर ही या सिरियल मधील प्रमुख पात्र असावी असं सद्ध्या तरी वाटतंय. हरीश दुधाडे हा पोलिस इन्पेक्टरच्या भुमिकेत चांगला वाटतोय.

या मालिकेचे लेखक अन पटकथालेखक चिन्मय मांडलेकर आहे तर संवाद लेखन मुग्धा गोडबोले यांनी केलं आहे. विषेश म्हणजे मालिकेची निर्माती मनवा नाईक यांची आहे.

images (1).jpeg

या मालिकेवरील चर्चेसाठी हा धागा..!! Bw

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जर ऑडिओ पाठवलेला खरा असेल ( म्हणजे भाषाने वगैरे चालबाजी करून बदलला नसेल ) तर आवाज मला गीतांजली mam चा (म्हणजे बेडरीडन चारूची आई) वाटला.

लहान मुलीचा आवाज असतो ना. मी अर्ध बघितलं. ते पेन ड्राइव्ह येते त्यात ऑडिओ क्लिप असते. त्या आधी काय झालं माहिती नाही. पुभा मध्ये कुणाचा तरी अपघात झाला आहे बहुतेक.

लहान मुलीसारखा आवाज कोणीतरी काढला असेल ना.

त्या कुठल्या वेबसिरीज मध्ये लहान मुलगी खून वगैरे करते तसं तर दाखवणार नाहीत, होप सो.

भाषाचा अपघात म्हणजे खून झाला, ताईला हॉस्पिटलमधून गायब केलं.

भाषाला का मारलं, तिचा काय संबंध. मी शेवटचा भाग बघितला. झेले कोण असतो. त्याच्या बायकोचा खून झाला.

झेलेच्या बंगल्यात पार्टी होणार असते बहुतेक. तो रॅकेट मधे सामील असतो. अध्यात्मिक मार्गावर आहे दाखवत, नको ती कामं करतो, ती त्याची बायको नसते, पैसे देऊन नाटक करायला आणलेली असते.

भाषा श्रद्धाची शाळेतली मैत्रीण कम सहशिक्षिका. किलवर सांगतेना श्रद्धाला तुझ्या जवळच्या माणसांना मारणार, तो ऑडिओ येतो त्यात.

पण भाषा तर सहकारी असते ना. मला वाटलं जवळची म्हणजे फक्त कुटुंबातील माणसं. झेलेच्या बायकोला का मारलं पण. तिने काय केलंय. चौधरीची बातमी टीव्हीवर येते ना म्हणजे नाव न घेता. पुढे काहीच नाही का त्यादृष्टीने तपास वगैरे.

झेलेची बायको झालेली पैसे घेऊन पळत असते, म्हणून झेलेच त्या साऊच्या केअरटेकर मुलीला जबरदस्ती खून करायला लावतो तिचा.

चौधरीची बातमी टीव्हीवर येते ना म्हणजे नाव न घेता. पुढे काहीच नाही का त्यादृष्टीने तपास वगैरे. >>> नाही अजूनही स्लो स्लो आहे आणि रात्री दहाला काही नवीन सुरू होणार का त्याचे प्रोमोज पण नाहीयेत त्यामुळे परत सिरियल बघण्यात गॅप घेऊ का विचार करतेय. आत्ता स्लो स्लो दाखवतील आणि शेवटच्या भागात सविस्तर न दाखवता गुंडाळतील.

तो अभय सगळं जाऊन त्या चारुला सांगत असतो.

ती चौधरी गोव्यात जाणार असते, त्या ताईला तीच घेऊन गेली की काय.

आजचा भाग फार बोर होता. मिलिंद फाटक दुधाडेचा बाबा वाटत नव्हता. पूर्णवेळ त्याचे आई वडील दाखवले. श्रद्धाच्या घरात एवढ्या भानगडी आणि जाऊ धुतल्या तांदळाची हे काही पटत नाही. थोडे प्रॉब्लेम तिकडेही दाखवायचे. पत्ते आणि ती रडारड बघून कंटाळा आला. श्रद्धा कधी बाहेर पडणार रुद्रम मधल्या मुक्तासारखी. तसं काही असेल तर मजा येईल. आता फारच बालिश वाटत आहे.

तो भोसले आणि त्याचे आईवडील किती कृत्रिम वाटलं सर्व. आता एकतर हे चॅप्टर असणार किंवा ह्यांचे बळी जाणार.

अजून एक म्हणजे भोसलेचे आई बाबा भोसले यांच्यापेक्षाही यंग आणि फिट वाटत होते, हाहाहा.

प्रसाद आणि चारू रॅकेट मध्ये असणार हा संशय गडद होत चाललाय, एक आजोबा पण सोसायटीतले मदत करत असतात त्यांच्यावर पण मला संशय येतोय पण ते कमी येतात आणि श्रद्धा अभय जे काही होतं ते प्रसाद चारुला सतत सांगत असतात.

श्रद्धाची आई बरेच दिवसांत दाखवली नाहीये.

शनिवार चा एपिसोड कोणी बघितला का.. विजय चे आंधळे आई वडील घरी असतात .. तिथे काही मिळतंय का हे बघायला madam चौधरी दबक्या पावलांनी त्यांच्या घरात शिरतात...पण ते विजय च्या आई वडीलांना कळते..आणि मग तिची जी पुरेवाट लावतात की सोय नाही .मस्त झालाय तो पूर्ण सीन.. Lol त्याची आई पाणी समोर करते.. धाप लागली का. ?? चौधरी तोंडावर हात ठेवते तर आई म्हणते श्वास कशाला रोखतात आता.. सोफ्यावरून का उडी मारताय.. जाताना दरवाजा लावून घ्या.. आपण माती खाल्ली हे समजल्यावर चौधरी तिकडून निघते .मस्त झाला पूर्ण सीन

प्रसाद आणि चारू रॅकेट मध्ये असणार हा संशय गडद होत चाललाय --) मला पण प्रसाद वर संशय येतोय.. कारण मरणाच्या आधी भाषा ला काही कळाले ले होते जे तिला श्रद्धा ल सांगायचे होते..पण त्या आधीच तिचा accident hoto.. आणि ती प्रसाद च्याच काही कामासाठी बाहेर आलेली असते.. चारू वर आधी संशय होता ..पण परवा तिच्या घरी श्रद्धा च्या सासू सासर्याना शिफ्ट करायचं ठरत...आणि एकंदरीत कथेचा प्लॉट बघता सध्या ती वाटतं नाही

हो तो सीन मस्त होता, चौधरीबाई रंगेहात पकडल्या गेल्या Biggrin आपल्या ओळखीच्या लोकांपैकी कुणी यात असेल असा संशय न येता घरात काहीतरी बसवलेले असेल असं का वाटते श्रद्धा आणि तिच्या नवऱ्याला. भोसलेलाही तेच वाटते. हे लोक भोसलेला सगळं का सांगत नाहीत. त्या मुलाच्या बॅगेत ड्रग सापडले हे सांगितलेच नाही भोसलेला.

आपल्या ओळखीच्या लोकांपैकी कुणी यात असेल असा संशय न येता घरात काहीतरी बसवलेले असेल असं का वाटते श्रद्धा आणि तिच्या नवऱ्याला>>कारण त्यांचं ठरलेलं असतं की आई बाबांना तळेगाव ला असलेल्या घरी शिफ्ट करायचं..हे त्यांचं रात्री ठरत आणि पहाटे ते निघतात.. तिथे पोचल्यावर घराला लागलेली वाळवी बघून पंधरा मिनिटात परत यायला निघतात.. नंतर कळतं की त्या घरात गॅस चा स्फोट झाला. म्हणजे ते पोहोचण्या आधी तिथे कोणीतरी जाऊन हे setting करतं.. हे सगळं कसं कोणाला कळलं..त्या वरून भोसले अंदाज बांधतो की घरातलं बोलणं बाहेर काहितरी ऑडियो device mule कोणीतरी ऐकत आहे..म्हणून चारू घरी येते तेव्हा श्रध्दा तिचा अपमान करते..बाहेर जाऊन सगळं सांगते की तिला मदत लागेल चारू ची..

मस्त झालाय तो पूर्ण सीन. >>> हो जबरदस्त झालाय, लय भारी. मी काल youtube वर तो सीन बघितला. शनिवारी एपिसोड बघितला नव्हता.

तुमची मुलगी काय करते , मिरजकरांच्या घरात रेकीर्डिंग डिव्हाइस आहे ना अजुन ?
अता मिरजकर , व्यंकट आणि भोसले घरीच करतायेत सगळे कट !
त्या पोराला कुठे ठेवलय किडनॅप कर्रोन? मिरजकरच्या भावाकडे ??
डे १ पासून प्रसाद वरच संशय आहे अणि तेच खर असेल तर एकदम प्रेडिक्टेबल होणार सगळं !

भावाकडे.

जमदाडे सामील आहे की आत्ता काही धमकी दिलीय तिला पण भोसले चौधरीसमोर इतका कसा दुबळा पडला, चौधरी पण प्रशिक्षण घेतलेली पोलीस आहे हे विसरला का तो, व्यंकट ला बरोबर न्यायला हवं होतं.

अजूनही दहाच्या स्लॉटसाठी नवीन सिरीयल प्रोमो नाहीये, त्यामुळे ही किती लांबवणार काय माहिती, आता आवरा.

कन्टाळा आला आता… रुद्रममुळे ही पाहाय्ला घेतली. गेले काही दिवस आठवड्याला फक्त २ भाग पाहतेय, काहीही चुकल्यासारखे वाटत नाही Happy

भोसले मुर्खच आहे. पहिल्यापासुन गाढवपणाखेरीज दुसरे काय केलेय त्याने?

आज चा भाग एकदम कहानी मे ट्विस्ट वाला.. काल दाखवल चौधरी आणि जमदाडे दोघीही भोसलेवर पिस्तूल रोखून आहेत.. आजच्या भागात चौधरी श्रद्धा ला फोन करते की मला माहित आहे की गुड्डू ..तिचा मुलगा श्रद्धा कडेच आहे..आणि सांगितलेल्या पत्त्या वर बोलावते.तिथेच विजय भोसले ला या दोघी पण घेऊन येतात.. तो हाच बंगला असतो जिथे संशयास्पद रित्या चौधरी भेट देत असते ..आणि त्या बंगल्यात चक्क सावनी चा मित्र अंकित याला लपवलेले असते..ज्याचा काही दिवसा पूर्वी पोलीस कस्टडी मध्ये मृत्यू झाला अशी बातमी आलेली असते.. ते सगळं कसं manage केलं होत यावर फार काही समजत नाही.. पण या सगळ्यातून एवढं कळतं की चौधरी कोणत्या gang मध्ये नाही आहे.. ती हे सगळं किलवर ला पकडण्या साठी च करत असते.. संपत आली वाटतं आता मालिका... सगळे एकत्र झालेत आता... पण आजच्या भागामुळे परत त्या चारू वर संशय यायला लागला आहे

भोसले मुर्खच आहे. पहिल्यापासुन गाढवपणाखेरीज दुसरे काय केलेय त्याने? >>> अगदी अगदी. खरं सांगायचं तर ओव्हरअॅक्टिंग पण खूप केलीय त्या chara ने त्यापेक्षा अभय मिरजकर सरस पण मटा सन्मान भोसलेलाच मिळालं. तो माझा पूर्वी अत्यंत आवडता अॅक्टर होता त्यामुळे उगाच आवडत नाही म्हणून नावं ठेवायची म्हणून त्याला नावं त्याला ठेवत नाहीये. पूर्वी अतिशय कौतुकही केलंय त्याचं पण यावेळी फार कमी सीन्स असे होते की, मस्त केलं त्याने असं वाटलं.

चारू , तिची आई आणि प्रसाद दाखवा मेन. फालतू ट्विस्ट नको. नाहीतर अभयचा भाऊ दाखवतील उगाच.

चौधरी chara positive केलं आता. भोसले तोंडावर पडला.

चारू आणि प्रसादवर पहिल्या दिवसापासून संशय आहे तो अजूनही दूर झाला नाहीये. उलट कथेत आई बाबांना काहीतरी अंदाज यावा म्हणून तिथे पाठवले असावं असं वाटतं.

चार चार पाच पाच वेळा चौधरी मॅडम, भोसले समोर उभा असताना, तू जर मध्ये आला नसतास तर एव्हाना किलवर माझ्यासमोर असता म्हणत होत्या, मला वाटायला लागलं आता भोसलेलाच किलवर दाखवतील, हाहाहा.

तू जर मध्ये आला नसतास तर एव्हाना किलवर माझ्यासमोर असता म्हणत होत्या, मला वाटायला लागलं आता भोसलेलाच किलवर दाखवतील, हाहाहा.
<<<
अगदी हेच्च लिहायला आले होते Proud

हो. समहाऊ ती आधीपासूनच पकाऊ आहे.

मी 22 एप्रिलला लिहिलं त्याप्रमाणे अभयचा भाऊ दाखवणार की काय प्यादे म्हणून. डायरेक्ट किलवर दाखवला त्याला तर मूर्खपणाची हद्द होईल.

मी हल्ली पूर्ण एपिसोडस बघत नाही, शॉट्स बघते youtube वर पण शुक्रवारी पूर्ण एपिसोड बघितला.

श्रद्धा मैदानात मागे तात्पुरती उतरली, त्यानंतर घरीच बसून आहे, मग श्रद्धा जीपमध्ये पिस्तुल घेऊन मारते, ते सतत कशाला सारखं हायलाईट करता.

मी फार अपेक्षा ठेवून गेले काही दिवस बघतेय पण काहीच घडत नाही. पुभामध्ये अगदी काहीतरी भयंकर दिसलंय असं दाखवतात पण ते लगेच पुढच्याच भागात दाखवतील असे काही नाही आणि दाखवतात तेव्हा तो फुसका बारच असतो. किलवर अगदीच फुसका दिसतो. सोसायटीचा नामफलक खोटा दिसतो. मला तर अभयचाच संशय येतोय Lol सावनीला सांभाळणारी मुलगी कोण असते, तीच तिला पळून जायला मदत करेल असे वाटते. ती पालक सभा कोणाची असते. जावेच्या मुलाची का. भोसलेचा बॉस अति करतो.

हो, पालकसभा भोसलेच्या मुलाच्या शाळेत असते.

अभयला नका दाखवू, तो मला फार आवडतो Lol

पुढच्या भागात पाठमोरी मुलगी दाखवली आहे ती आगाऊ पत्रकार आहे का.

चौधरी ताईन्ना सिरियलमधुन काढुन टाकले का?

सिरियल आता अमानवी व्हायला लागलीय. मिरजकर दाम्पत्य झोपलेले असताना उशाखाली गजराचे मोठे घड्याळ…. आधी भोसले माठ वाटायचा. आता सगळेच माठ झालेत.

भोसलेच्या मुलाच्या शाळेत? त्याला शाळेत जाणारे मुलही आहे? देवा…. ते विनोदी आईबाबा आहेत ते काय कमी आहे म्हणुन आता मुलही पैदा केले डायरेक्टरने???

मागे एक भाग पाहिला त्यात आई बाबा बेडवर योग्य अन्तर ठेउन पडलेले आणि हा रेडा त्यान्च्यामध्ये जाऊन मी तुमच्या सोबत झोपतो म्हणत पडतो असे बघितले.

व्हऑस्ट्सपवर एक क्लिप बघितलेली. शिम्पी पक्ष्याएवढ्या लहान पक्ष्याच्या घरट्यात कोकिळेने अन्डे घातले. ते पिल्लु जरा मोठे झाल्यावर त्याचा आकार घरटा मालकाच्या तिपटीने वाढला. घरटे मालक पक्षी त्याला ‘ आमचे बाळ अम्मळ हेल्दी आहे हो‘ म्हणत भरवतानाची ती क्लिप होती.

भोसले आईबाबान्सोबत झोपलेला पाहुन मला ती क्लिप आठवली. आईबाबान्पेक्षा मोठा दिसणारा भोसले आणि विनोदी आई बाबा.

हो.सध्या फारच पकवत आहेत.. चौधरी मॅडम ची बदली हीच काय गोष्ट घडली या आठवड्यात.. बाकी नुसता उंदीर मांजरी चा खेळ ..उगीच ब्रेक च्या नंतर म्हणून झलक मध्ये मोठे डोळे दाखवायचे ..नंतर फुसका बार.. कोण होणार करोडपती सुरू होई पर्यंत हे असच time pass करणार... अभय वरच संशय येतोय सध्याच्या कार नाम्या मध्ये..

बाकी ते कीलवर च्या सीन मध्ये काय बाळबोध music लावतात.. ते महेश कोठरेंच्या जुन्या कुबड्या खविस, टकलू हैवान अशा व्हीलन लोकांची आठवण येते Lol

Pages