सोनी मराठी - तुमची मुलगी काय करते?

Submitted by DJ....... on 20 January, 2022 - 22:43

२० डिसेंबर पासुन सोनी मराठीवर नुकतीच नवीन मालिका सुरू झाली. "तुमची मुलगी काय करते?" असं त्या मालिकेचं नाव. ही थरारक वाटावी अशी मालिका असावी असं प्रोमो वरून लक्षात आलंच होतं ते आता मालिका सुरू झाल्यापासुन जाणवत आहे. मधुरा वेलणकर ही या सिरियल मधील प्रमुख पात्र असावी असं सद्ध्या तरी वाटतंय. हरीश दुधाडे हा पोलिस इन्पेक्टरच्या भुमिकेत चांगला वाटतोय.

या मालिकेचे लेखक अन पटकथालेखक चिन्मय मांडलेकर आहे तर संवाद लेखन मुग्धा गोडबोले यांनी केलं आहे. विषेश म्हणजे मालिकेची निर्माती मनवा नाईक यांची आहे.

images (1).jpeg

या मालिकेवरील चर्चेसाठी हा धागा..!! Bw

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अंजू Lol किलवर कदाचित प्रसाद असेल. आज उल्लेख होता चारूच्या आईच्या घराचा जे विलेपार्लेमध्ये आहे. चौधरीला अजून असं वाटतंय की भोसलेला हे जमेल.

ती आई असेल किलवर तर भारी मजा येईल. फोन करते म्हणजे प्रसाद असावा. त्याचा रोल नक्कीच आहे.

आज उल्लेख होता चारूच्या आईच्या घराचा जे विलेपार्लेमध्ये आहे. >>> अच्छा.

चौधरीला अजून असं वाटतंय की भोसलेला हे जमेल. >>> त्यालाच हिरो करायचं आहे मालिकावाल्यांना, आधी त्यानेच सर्व वाट लावली आहे. मी आजही आठ मिनिटांचं बघितलं युट्युबवर, चौधरी आणि भोसले सीन नव्हता त्यात.

रुद्रमच्या तोडीचा इन्स्पेक्टर जन्माला यायचाय मालिकेत अजून, हाहाहा.

काल चौधरीला बघून खूप वाईट वाटल.मूर्ख भोसले,एकतर त्याच्या बिनडोकपणामुळे तिची नोकरी गेली आणि आता त्या शेरेकर मोराला नाव ठेवत आहे.
त्या झेलेचा पत्ता व्यंकटमुळे लागला,जुग्रान बद्दल चौधरीने सांगितल.
आणि हा रिकाम्या खोल्यांच जाऊन इंन्स्वेस्टिगेशन करतो.
कधीकधी वाटत अभयलाच किल्वर दाखवल तर शेरेकर बाजी मारेल,भोसलेला फार कॉन्फिडन्स आहे अभयबद्दल.
त्यातल्या त्यात एक बर आहे की राजेश शर्मिलाला सुपात ठेवल आहे.
प्रसाद किंवा चारुची आई ,ती तरी नक्की तिचीच आई आहे का? किल्वर असावेत.

चौधरीची नोकरी गेली का. मी ते भाग बघितले नाहीत. काल तर ती पोलिसांकडून व्यायाम करून घेत होती. नक्की काय करते ती आता मालिकेत. मला वाटत होतं तिची बदली झाली.

भोसलेने चौधरी mam ड्रग्सशी संबंधित आहेत, असं indirectly नेहा तायशेटे या पत्रकार मुलीला सांगितलं आणि संशय निर्माण केला. त्यामुळे त्यांची बदली ट्रेनिंग सेंटरला केली.

बरे झाले मी हल्ली पाहात नाही.

बाकी किलवर प्रकरण इतके बाळबोध का ठेवले कळत नाही. आणि ती किलवर काहिही माहिती नसलेल्या सानवीला गेले कित्येक महिने साम्भाळतेय. का? त्याचे निट पटेल असे उत्तर शेवटी मिळाले तर गन्गेत घोडे न्हाले समजायचे.

मला वाटलं आता दोन दिवसात संपावतील..पण कसलं काय.. वाटतं नाही... आतोपा आता लवकर.. चारू ने आपल्या आईला बहारीन ला पाठवलं आणि मिरजकर आई जी तिच्या कडे होती तिला हात पाय बांधून गुंगी च औषध देऊन high way वर टाकलं ..ती सापडली..बाकी ते नेहेमीच सगळ्यांच्या डोळ्याचा इकडून तिकडे शॉट घेणे चालूच आहे..त्यात पाच मिनिट घालवतात.. चालू द्या.. तिकडे भोसले एसीपी शेरेकर कम मोर याच्या कानाखाली वाजवणार आहे ...ते वाद विवाद काहीही दाखवलेत . इतर वेळी जितका अपमान करत sherekar बोलतो तस झालं असतं तरी justified होत..हे काहीही.. बस झालं ..संपवा आता

असं indirectly नेहा तायशेटे या पत्रकार मुलीला सांगितलं>> ती नेहा तायशेटे एक वेगळंच प्रकरण आहे . नो offense to actor पण ती फारच कंनिंग वाटते..

कानाखाली वाजवणार शेरेकरच्या Lol श्रद्दाला काहीतरी भयंकर दिसते हेच असतं प्रत्येक पुभामध्ये. शेरेकर फक्त म्हणतो की कशावरून अभय खोटं बोलत नाहीये तर त्यात राग येण्यासारखं काय आहे. भोसले स्वतःच म्हणाला होता श्रद्धाला की तुमची फॅमिली भयंकर आहे. ती फॅमिली खरंच चारलोकांसारखी नाही कारण श्रद्दाचे वडील जयंत सावरकर यांना त्या कुटुंबावर लक्ष ठेवण्यासाठी तिथे राहायला सांगतात वेड्याचे सोंग घेऊन. तेव्हातर श्रद्धाची फॅमिली नॉर्मल असते, अभयचे धंदे कोणाला माहिती नसतात मग लक्ष ठेवण्याची गरज काय. भोसलेला का एवढा पुळका या कुटुंबातील लोकांबद्दल.

मेहेरबानी करून त्या सावनीला सोडलेले दाखवायला नको,श्रध्दा आणि नीताचे डोळे बघून तसच वाटत आहे
सावनीला अस सोडण म्हणजे प्रेक्षकांना फसवण्यासारखच आहे.
श्रध्दा किंवा भोसले सावनी पर्यंत कसे पोचतात हा प्रवास म्हणजे खरतर ही सिरियल आहे,पण मनाला येईल तस कथानक फिरवत आहेत.
बहारीन काय,काय त्या कुमुद मिरजकरला हाय वे ला सोडलेल आहे,हाय वे वर गाड्या ,सीसीटीव्ही काहीच नाही का,
इतक मूर्ख समजतात प्रेक्षकांना.
कुठला एसीपी असा ऊठसूट मिडियाला बातम्या देतो.
काहीही म्हणजे काहीही.

तो कानफटात मारतो, ते आवडलं मला. जबरी वाटला तो शॉट.

त्याच्याही कानफटात त्या चौधरी मॅमने मारायला हवं होतं पुर्वी.

आईला साध्या कारमधुन पाठवते, मेख वाटते तिथे, अ‍ॅब्युलन्ससारखं हवं ना काहीतरी. आईच असेल किलवर. प्रसाद असेलच सामील, भाषाला अंदाज आलेला म्हणून उडवलं असणार. प्रसाद किलवर असेल तर लोकांनी त्याच्यावर आणि चारुवर पहील्या एपि पासून घेतलाय की संशय.

संपवत नाहीच ही, रविवारी दोन तास स्पेशल एपिसोड ठेऊन संपवायला हवी होती.

श्रद्धाचे वडील संजय मोने दाखवलेत ना? जयंत सावरकर कसे? प्रसाद कोण? मी बर्‍याच उशिरा पहायला सुरुवात केली.

आता खरंच कंटाळा आला, मागे पण अभयच्या भावावर संशय दाखवला होता की, आता तो एकदम आत्महत्येचा प्रयत्न वगैरे करतो. तो पेज थ्री इन्स्पेक्टर बरोबर उचलतो की मग त्या भावाला आणि फॅमिलीला, श्रद्धा सोडवते. आता भाऊ खरंच सर्व करतो की कोणाचा आळ आपल्यावर घेतोय. प्रसाद हजर होता यावेळी. भाऊ स्वतः खरंच करत असेल तर आता थोडे दिवसांत आटपतील की अजून घोळ घालतील.

असो आता किलवर म्हणून कोण बघण्यात इंटरेस्ट राहीला नाही, जास्तीत जास्त शंभर भागांची करावी असली सिरीयल.

श्रद्धाचे वडील संजय मोने दाखवलेत ना? जयंत सावरकर कसे? प्रसाद कोण? मी बर्‍याच उशिरा पहायला सुरुवात केली......
श्रध्दाचे वडील मोनेच आहेत,सावरकर त्यांचे त्या काळातले क्राईम पार्टनर असतात आणि नंतर मुलीवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी सावरकरांवर टाकतात आणि स्वत:गायब होतात.
प्रसाद श्रध्दाचा मित्र असतो ,तिच्याच शाळेत की कॉलेजमध्ये शिकवत असतो,एकतर्फी प्रेम पण असत.

आजच्या म.टा च्या मुंबई टाईम्समधल्या बातमीनुसार सावु एकदाची श्रध्दाला सापडणार आहे.पण सिरियल संपणार नाही म्हणे,आणखी रहस्यमय वळण घेणार आ हे.
आता आणखी काय रहस्यमय वळण, मांडलेकर जाणे.

दळा. आता अभ्याच किलवर दाखवतील मग मायलेक त्याच्या विरोधात. अभय इतक्या खालच्या दर्ज्याचा असेल असं आत्तातरी वाटत नाही, पण लेखकु जाणे.

मुलींची बोली वगैरे प्रकार दुसरीकडे होता, कलर्सवर. काही सीन्स बघितले होते, युट्युबवर. तेच इथे आहे.

सावनी आता सापडेल असं काल वाटलं होतं कारण सोनीने मेन सीन बदलला आई मुलगी एकत्र दाखवलेत.

भोसले खरच मूर्ख आहे,आधीच तो शेरेकर त्याच्यावर भडकलेला असतो,आता त्याच्यावर भोहलेने काल जी स्तुतिसुमन उधळली,ती ऐकून तो काय याला स्व:ची खुर्ची देणार होता का,हाकलणारच ना,वर त्यालाच म्हणतो,"डोन्ट डू धिस".ऐकेल का तो?
बाकी ,बर्याच दिवसांनी ताई अचानक बोर्डीमध्येच उगवली.काही म्हणजे काहीही चालू आहे.
अजूनही क्रिएटिव्ह टीमच नेमक किल्वर कोणाला दाखवायच,हे अजूनही ठरलेल दिसत नाही.

हो आता किलवर म्हणून काळे कपडे घातलेली आकृती दाखवतात ती यंग वाटतेय.

भोसलेला झीशान खानने सांगितलेलं असतं काही मदत हवी असेल तर सांग, वेंगसरकर सर ह्याच्या बाजूने असतात तरी हा कोणाला कळवत नाही. ह्यानेच मुळ केस बिघडवून ठेवलिय म्हणून मोर नाचायला आलाय आणि आताही डोकं चालवत नाहीये आणि ती जमदाडे झोपा काय काढतेय.

सोनी लिव ऍपवर याचा कालचा भाग बघायला पैसे भरा सांगतात Biggrin कोणाचं एवढं अडलंय. दोन तीन दिवस चला हवा येऊ द्या मुळे हे बघायला विसरले पण काही विशेष घडलेलं नाही हे वरील चर्चा वाचून कळले. अभय गेलाय का सावनीला शोधायला.

अभय, बायको आणि सासरा गेलेले. अभय किती माणसे बघायला फ्रंट साईडला जाऊन गाडीत बिघाड झाल्याचे नाटक करतो, एकतर अभयला विदाउट गन पाठवणे हा मूर्खपणा होताच वरुन गुंड तो कोण ओळखू शकले असते तर. त्याच्यावर संशय येतो आणि तो पळताना गोळ्या झाडतो एकजण पण अभय गायब होतो, चारूने पळवले की काय समजत नाही.

साऊ सापडते तो सीन टचिंग होता. तिला दुसरीकडे ठेवलेलं, त्या मुली होत्या तिथे ती नव्हती, ती दिसली नाही म्हणून श्रद्धा बाकी मुलींना बांधलेले सोडवत नाही हे आवडलं नाही, एकीला सोडवायचे आणि तिला बाकीच्यांना सोडव सांगायचं होतं. शेवटी सांगते ती बाकीच्या लोकांना त्यांना सोडवा.

श्रद्धा सावनी सीनमध्ये अभय हवा होता, तिला नाही पण मलाच त्याची फार आठवण येत होती.

लपाछपी चालू आहे.सावू सापडली,अभय गायब.
श्रध्दाने भोसलेला फोन केल्यावर कॉन्टँक्ट होत नाही,मग ती चौधरीला का कॉल करत नाही,लेखक विसरला,की डिरेक्टर, की भोसलेपेक्षा चौधरी हुशार आहे आणि ती पण सिरियलमध्ये आहे.
बर बोर्डी मध्ये पोलीस स्टेशन नाही का,त्यांना सांगायला.पण नाही,यांना श्रध्दाला हिरवीण दाखवून,ताईला महान दाखवायच आहे.
पण त्या बावळट श्रध्दाला हे कस कळल नाही की ताई सटकली आणि ही अडकली.

अभय आला, इतका सहज कसा आला हा. चारूची आणि त्याची भेट झाली असावी, त्याला काहीतरी काम दिलं असावं असं मला वाटतं. त्याची मुलगी सोडण्याच्या बदल्यात डील असेल. अभय परत संदिग्ध वाटला मला.

शेवटी चारूच्या हाताखालचे बोरडीला तुम्हाला हवं होतं तसं झालं असं चारूला म्हणतात ना.

शेरेकरच कँरँक्टर बहुतेक आटपत घेत असावेत.
चौधरी परत येणार अस दिसतय.
यायलाच हव्यात कारण अजूनही फक्त त्यांनाच अस वाटत आहे की चारू किल्वर नाही.
बाकी खरच सगळे माठ आहेत.
भोसलेला पण या केसमधून बाजूला करून ताई ,जमदाडे ,व्यंकटची निवड करावी,आणि गोळीबाराच्या वेळी अधूनमधून श्रध्दाला न्याव.

गोळीबाराच्या वेळी अधूनमधून श्रध्दाला न्याव. >>> हाहाहा.

या सिरियलला नारळ देतील बहुतेक >>> वाटत नाही. ताराराणी असावी बहुतेक, स्वरदा लिड आहेना, ती दुसरं काहीतरी करतेय, असं वाटतंय. एकतर सिरियल आवरती घेतील किंवा ताराराणी बदलतील.

मुलीचे 200 एपि असतील असं वाटतंय.

प्रसादची सायक्रॅटीस्ट कोणीतरी आहे, तिथे साऊला नेऊया म्हणतोय, ती का तो रॅकेटशी संबंधित असेल आणि औषधी गोळ्या म्हणून ड्रग्ज देईल साऊला, तिला सवय झालीय ना.

Pages