सोनी मराठी - तुमची मुलगी काय करते?

Submitted by DJ....... on 20 January, 2022 - 22:43

२० डिसेंबर पासुन सोनी मराठीवर नुकतीच नवीन मालिका सुरू झाली. "तुमची मुलगी काय करते?" असं त्या मालिकेचं नाव. ही थरारक वाटावी अशी मालिका असावी असं प्रोमो वरून लक्षात आलंच होतं ते आता मालिका सुरू झाल्यापासुन जाणवत आहे. मधुरा वेलणकर ही या सिरियल मधील प्रमुख पात्र असावी असं सद्ध्या तरी वाटतंय. हरीश दुधाडे हा पोलिस इन्पेक्टरच्या भुमिकेत चांगला वाटतोय.

या मालिकेचे लेखक अन पटकथालेखक चिन्मय मांडलेकर आहे तर संवाद लेखन मुग्धा गोडबोले यांनी केलं आहे. विषेश म्हणजे मालिकेची निर्माती मनवा नाईक यांची आहे.

images (1).jpeg

या मालिकेवरील चर्चेसाठी हा धागा..!! Bw

Group content visibility: 
Public - accessible to all site users

भोसले जाडा झाला आहे हे खर आहे,कदाचित दिग्पाललांजेकरच्या शिवरायांवरील पिक्चर्समध्ये बहिर्जी नाईक करताना,शरीर कमवायच्या ऐवजी वजनच कमावल असेल.
पण झीमवरच्या 100 डेज मालिकेत त्या ठोकळ्या कोठारेने जो इन्स्पेक्टर साकारला होता त्यापेक्षा भोसले इन्स्पेक्टर नक्कीच उजवा आहे,कथानकात दम राहिला नाही हेही कारण असेल.
बाकी मोनेंनी त्यांच्या लहरी स्वभावानुसार सिरियल सोडली की काय?
राजेश आणि शर्मिलाला एवढा फूटेज दिला आहे याचा अर्थ त्यांचा बादरायण संबंध कुठेतरी जोडतील.
पण मालिका पुढे जाण्यासाठी आता मात्र श्रध्दाला झाशीची राणी करून"मेरी झाँशी नही दूँगी" या धर्तीवर "मेरी सावनी को वापस लाऊँगी"अस म्हणून रणांगणात उतरवा.

आज भोसलेला सर्व रेडीमेड मसाला पुरवते, चौधरी मॅम.

खरंतर चीप किंवा काही बसवलं असेल अभयच्या शरीरात किंवा अभय संशयित असेल तर लगेच टेस्टस व्हायला हव्या होत्या ना.

कैच्याकै दाखवत आहेत.एवढा मोठ्ठा आंतरराष्ट्रीय गुन्हेगार जुग्रान ज्याच कनेक्शन पाकिस्तानात पण आहे,तो मुंबईत येणार आहे,हे ट्रान्स्फर झालेल्या चौधरीला कळत आणि नवीन एसीपीला तो माहितच नाही.
काहीही म्हणजे काहीही चालू आहे.
तो बिनडोक किल्वर ,एवढा स्वत:ला दिसू नये म्हणून काळजी घेतो,तो व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुळात मेमरी त्या औषधाने कमी झालेल्या सा्वनीकडून माहिती काढण्याएवजी स्वत:येतो आणि एक साधी मुलगी डोक लावून त्याचा चेहरा बघते,,आणि याला कळत नाही,काहीही.बहुतेक तिचाही गेम करतील.
आणि पैशाचीच माहिती सावनीकडून घेण्यासाठी सावनीला जिवंत ठेवले असेल तर आधीच काढून घ्यायची की झोपेच औषध देऊन देऊन तिची मेमरी कमी झाल्यावर काढून घ्यायची
खरच,चिन्मय मांडलेकर सध्या शिवराय आणि चंद्रमुखी मध्ये बिझी झालेले दिसतात,काहीही लिहित आहेत.

टोटली फेल गेली आहे सिरीयल.

नविन एसीपी पेज ३ मधुन उचलुन आणलाय आणि गडचिरोली सांगतायेत, हाहाहा.

भोसलेचं इंप्रेशन कमी होत चाललंय त्याच्या आईबाबांपुढे म्हणून काल त्याला, मी आईबाबांना कसं तयार केलं हे डायलॉग्ज होते.

घरात किलवरचं चिन्ह काय होतं.

परवाचा किलवर मुखदर्शन सोहळा मी मिसला. काल काहीच घडलं नाही. ती कोण बाई आजकाल येऊन बसते जावेच्या घरी, मुलीशी बोला, तिला मदत करा वगैरे फार वेळ खाते. उरलेला वेळ जुन्या आठवणी काढण्यात जातो. चौधरी मॅडम छान दिसत होत्या. भोसलेचे नाक पण मस्त सरळ आहे, फारच क्लोजअप दाखवत होते Lol

मुख दाखवलं का, मला नाही दिसलं.

भोसलेचे नाक आणि डोळे दोन्ही छान आहेत, डोळेही तेजस्वी आणि भेदक आहेत पण या सर्वांचा नीट उपयोग करून घेतला नाही सिरियलमध्ये. माझे मन तुझे झाले मध्ये हायलाईट व्हायचं हे . इथे वजन वाढलेला भोसले दिसतो जास्त.

पेज थ्री इन्स्पेक्टर पर्सनॅलिटी छान आहे पण कामात लक्ष नाही की मुद्दाम तसं दाखवलं आहे. त्यातही काही मेख आहे.

मुख दाखवलं का, मला नाही दिसलं.....
मुखदर्शन आपल्याला नाही झाल,पण ती साऊला इंजेक्शन देणारी स्मार्ट मुलगी आहे ना,तिला झाल,हुशार निघाली पोरगी,झाडाच्या फांद्यांच्या आड लपून पाहिल किल्वरला.
आता गेम नको व्हायला तिचा म्हणजे झाल.

आणि पैशाचीच माहिती सावनीकडून घेण्यासाठी सावनीला जिवंत ठेवले असेल तर आधीच काढून घ्यायची की झोपेच औषध देऊन देऊन तिची मेमरी कमी झाल्यावर काढून घ्यायची>>. त्यापेक्षा जिला आधी माहित होत..तिलाच म्हणजे नाताशाला कशाला मारलं..तिच्या कडून माहिती घ्यायची ना.. इथे मोठा ड्रग डीलर दाखवला आणि ५० ६०कोटिंसाठी मागे लागलाय..याला काय बाकी काम नाहीत का..

मुख दाखवलं का, मला नाही दिसलं>> नाही दाखवल आपल्याला . त्याचा मुंबई च्या गरमी मध्ये surgical gloves घातलेले हात फक्त दाखवले . काही बोलला / बोलली नाही किलवर.. आणि ते टा ना ता ना music.. फुल गल्ली तला चोर वाटतोय

भोसलेचे नाक आणि डोळे दोन्ही छान आहेत, डोळेही तेजस्वी आणि भेदक आहेत पण या सर्वांचा नीट उपयोग करून घेतला नाही सिरियलमध्ये>> हो...त्याने वजन कमी केलं तर मस्त दिसेल तो.. त्याचे आणि जमदाडे किंवा चौधरी मॅडम चे संवाद छान असतात ..

गल्लीतला चोर Lol

तो इंटरनॅशनल येणार आहे तो नाक्यावरचा निघायचा.

दोन तिन भाग चुकवले पण काही चुकले नाही … Happy

नविन एसिपी मुद्दाम असा दखवला बहुतेक. प्रत्येक पो स्टे ला एसिपी असतो का? मुद्दाम नेटवर तपासले तर मुम्बैला॓१२४ एसिपी आहेत असे सापडले. म्हणजे प्रत्येक पो स्टे ला असावा. मला वाटले होते खुप वरची पोस्ट आहे. चौधरी एसिपि भोसले पो इ, जमदाडे पो स इ आणि याखाली कोन्स्टेबल अशी उतर्ती भाजणी असावी.

शनिवारी फार काही झाल नाही.पण आजचा मात्रुदिन विशेष एक तासाचा भाग तसा बरा होता.एकतर फास्ट होता.
अखेर ते डिव्हाइस सापडल,साऊच्या जुन्या चार्जर मध्ये लपवलेल असत.
आज व्यंकट श्रध्दाने सांगितल्याप्रमाणे नीताच्या मैत्रिणीच्या मुलीचा फोन त्याच्या सोर्सकडून पळवून श्रध्दाला देतो.लगेच अक्षयला ती बोलावते,अक्षय फोन हँक करतो,त्यावरून नीताच्या मैत्रिणीची मुलगी ड्रग्ज घेते,अस समोर येत.तेवढ्यात ती मुलगीच गायब झाल्याच श्रध्दानीताला कळत,जमदाडे, भोसलेचे फोन लागत नसल्याने श्रध्दा मँडम स्वत:च तिथे जाणार आहेत.
इकडे,जमदाडेकडून फँशन शोमधील एका मॉडेलच्या फोववरच्या बोलण्यातून जुग्रानचा उल्लेख झाल्याच भोसलेला कळत, तो खास टीम पाठवायला सांगतो.
आता जुग्रान,भोसले,चौधरी,श्रध्दा ,नीता असा लवाजमा त्याच लोकेशनवर पोचणार आहे.
बापरे,केवढ पुढे नेल आज एका तासाच्या भागात.

बाकी भोसले डीव्हाईस शोधायला इतक्या उशीरा का टीम पाठवतो. हे कधीच व्हायला हवं होतं ना.

भोसलेला सर्व बातम्या मात्र चौधरी आणि जमदाडे पुरवतात. कधी त्याचे वडील डोकं लढवतात. हा तर फेल जातो चौधरीवर संशय, मुलाचं किडनॅपिंग. व्यंकट म्हणतो तसा माती खात असतो नेहेमी.

तो जुगरान असेल तर खरंच नाक्यावरचा वाटत होता, हाहाहा.

ह्या आठवड्यात संपणार असेल तर उलगडतील. श्रद्धाताई उतरल्या मैदानात. किलवर कोण हे आजतरी कळेल का.

जुगरान का जुगराल पकडला गेला तरी पेज ३ इन्स्पेक्टर भोसलेलाच बडबडतो. आता सी बी आय एंट्री.

श्रद्धाला वाचवणारी सावली कोणाची होती, अभय की तिचे बाबा. पण सावली जाड नव्हती मग अभय असेल का, तो तिथे कसा पोचला. प्रसाद असेल तर तो वाचवेल का तिचा जीव. ज्याने वाचवले तोच किलवर असेल का. अभय, भाऊ, प्रसाद, चारू किंवा तिचे बाबा. तिचे बाबा जीव वाचवतील पण किलवर नसतील पण सावलीवरुन बाबा वाटत नव्हते.

सध्या गोंधळात गोंधळ चालू आहे.सिरियल पुढे सरकत आहे इतकच.
श्रध्दाला वाचवणारा तिला दित नाही ठीक आहे,पण बाहेर इतकी माणस होती,त्यांना पण दिसू नये.
शेरेकर एसीपी झालाच कसा,अस वाटण्यागत त्याच कँरँक्टर हास्यास्पद केल आहे,केवळ चौधरी आणि भोसले हीरो ठरावेत म्हणून ही सोय.

शेरेकर एसीपी झालाच कसा,अस वाटण्यागत त्याच कँरँक्टर हास्यास्पद केल आहे,केवळ चौधरी आणि भोसले हीरो ठरावेत म्हणून ही सोय. >>> मलाही सेम वाटतंय.

भोसलेने खूप माती खाल्लीय ऑलरेडी, चौधरी प्रकरणात. त्यात त्याच्या बाबांचं डोकं चालते तेवढंही त्याचं चालेना. त्यामुळे chara अगदीच खाली गेलेले, याने वर आलं.

मदर्स डे एपिसोड काय हस्यास्पद होता !
ती श्रद्धा खेळण्यातले पिस्तुल खेळावे तशी चोर पोलिस खेळत फिरत होती, टु मच !
बाकी किलवर कोण हे बहुदा लेखकांनीच अजुन ठरवलं नाहीये Proud

डीजे हाहाहा.

इथे किलवर नाही माहिती अजून आणि इंटरनॅशनल सहज पकडला ह्या लोकांनी, रांगत, सरपटत, हाहाहा.

होना, काहीही चालु आहे !
त्या भोसलेला ‘चिकू’ म्हणणारे त्याचे आई बाबा तरी कशाला अ‍ॅड झालेत ?

आता तो किलवर फक्त दहा लाख कशाला मागेल, तो तर नताशाने अब्जावधी रुपये कुठे ठेवलेत, हे सावनीकडून जाणून घेण्यासाठी उत्सुक आहे ना.

आज तर अभयवर संशय येईल अशा हालचाली दाखवल्या, वरुन ते नाना आजोबा फोन करून व्यंकटला तुझा जावई चांगला आहे सांगतात, हे सर्व अभयवर फोकस का केलंय. ते लिमये आजोबा नेहेमी का दाखवतात.

आता तो किलवर फक्त दहा लाख कशाला मागेल....
हे डोक किल्वरच नसावकारण ती साऊबरोबर असलेली मुलगी तिचा मेकअप करून साऊबरोबर फोटो काढताना म्हणते की पोरगी हवी तर दहा लाख द्या.
किल्वरपेक्षा ही पोरगीच हुशार आहे.

Pages