Submitted by ऋन्मेऽऽष on 8 January, 2022 - 10:41
कोरोनाचा प्रादुर्भाव तुलनेत कमी झाल्याने भरगच्च क्रिकेट आहे येत्या वर्षात. धाग्यावर चर्चाही तितकीच रंगू द्या 
क्रिकेटचा मागचा धागा ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/77883
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हो, पटण्यासारखे आहेत मुद्दे.
हो, पटण्यासारखे आहेत मुद्दे. स्पेशली स्पिन आणि पेस विरुद्धच्या आकड्यातील फरक बोलका आहे.
पण यात प्रश्न हा राहणार की जर पंतला आपण किपर म्हणून बघतोय आणि पांड्या ऑलराऊंडर म्हणून आहे. तर १५ ओवरनंतरच उपयुक्त अश्या टॅगखाली असलेला कार्तिक हा पंत पांड्यासह कॉम्बिनेशनमध्ये येतो का?
शर्मा कोहली राहुल यांनी टॉप थ्री काबीज केल्यावर कार्तिकला संघात घेत पंत पांड्या चार पाचला ठेवावेत की चार नंबरवर श्रेयस/सुर्या यापैकी एक डावाला स्थिरता देणारा असावा. जो पॉवरप्लेमध्ये लवकर दोन विकेट जाता येऊ शकेल. शर्मा कोहलीचा फॉर्म पाहता दोन विकेट लवकर जाणे फारच शक्य आहे.
मग अश्या स्थितीत कार्तिकला पंतची जागा घ्यावी लागेल.
पण पाच-सहा क्रमांकावर पंत आणि पांड्या येणार असतील तर ते ही १५ ओवरनंतर येऊन मारू शकतात.
वर्ल्डकपला जे आपले कॉम्बिनेशन बनेल ते त्याआधी एकत्र खेळणार का ही शंकाच वाटते. पण हे फार गरजेचे आहे.
ENG v NZ, 2nd Test
ENG v NZ, 2nd Test
NZ 224-7 & 553
ENG 539
Matt Henry*: 8 (8)
Daryl Mitchell: 32 (95)
Matty Potts 15-6-32-2
Day 4: Stumps - New Zealand lead by 238 runs
आज यांची मॅच धमाल आहे
आज भारी ओपनिंग पार्टनरशिप
आज भारी ओपनिंग पार्टनरशिप मिळाल्या नंतर मधल्या फळीने साफ निराशा केली आहे.
अरे आपली मॅच सोडा.
अरे आपली मॅच सोडा.
तो बेअरस्ट्रो बघा तिकडे काय करतोय..
पण यात प्रश्न हा राहणार की जर
पण यात प्रश्न हा राहणार की जर पंतला आपण किपर म्हणून बघतोय, शर्मा कोहली राहुल यांनी टॉप थ्री काबीज केल्यावर >> माझ्या मते ही दोन्ही गृहितके चुकीची आहेत. शर्मा किंवा कोहली ह्यातला एकच राहुल बरोबर असावा कारण तिघेही एकाच प्रकारे खेळतात. अर्थात शर्मा ट्रंप्स कोहली. पंत ने असे काहीच केलेले नाहीये कि त्याची टी २० मधली जागा फिक्स्ड असावी. (बॅतस्मन म्हणून तो तीन डावांमधे एकाच प्रकारे बाद झाला आहे
) जोवर कार्थिक ला पूरेशी संधी देऊन पक्का निर्णय होत नाही तोवर पंत कि किंवा आणी कार्थिक हा प्रश्न ओपनच ठेवावा.
तो बेअरस्ट्रो बघा तिकडे काय
तो बेअरस्ट्रो बघा तिकडे काय करतोय.. >> जेमिसन बाहेर म्हटल्यावर ह्या विकेट वर किवी अॅटॅक उघडा पडणार हे उघड होते. बेअरस्ट्रो ने पुरेपूर फायदा उठवला. ( बेअरस्ट्रो ला इंग्लंड निवड समिती ने धरसोड पण आ दाखवत नेहमीच सापत्न भाव दाखवला आहे असे माझे मत आहे. त्याच्या जागी आलेल्या कित्येक अनेक खेळाडूंपेक्षा तो नक्कीच अधिक डीसर्व्हिंग आहे. ) आता जोषात असलेल्या इंग्लंड संघाविरुद्ध आपल्याला प्रेषा सरावा अभावी खेळायचे आहे. हॅव फन. !
शर्मा किंवा कोहली ह्यातला एकच
शर्मा किंवा कोहली ह्यातला एकच राहुल बरोबर असावा कारण तिघेही एकाच प्रकारे खेळतात.
>>>>
हि चर्चा गेल्या २०-२० वर्ल्डकपलाही झालेली. मी सुद्धा याच मताचा होतो. पण यंदाही कुठलाही धाडसी निर्णय न घेता हे तिघे एकत्र खेळणारच हे नक्की वाटत आहे. त्यामुळे हे नाकारून विचार करण्यात काय अर्थ आहे.
पंतने अजून काही विशेष केले नसले तरी त्याला स्पर्धा द्यायलाही कोणी काही विशेष केले नाही.
पांड्याची जागा अष्टपैलू म्हणून पक्की वाटत असूनही या मालिकेत पांड्याआधी पंतचा कर्णधार म्हणून विचार केला गेला यातून असे वाटते की हा वर्ल्डकप त्यासोबतच आपण राहणार. मोठे बदल या २०-२० वर्ल्डकपनंतर घडतील. तीन सामन्यात अर्शदीप आणि ऊमरान मलिक यांनाही संधी देण्यात आली नाही. वर्ल्डकपचा कोअर फिक्स आहे असे वाटते.
हि चर्चा गेल्या २०-२०
हि चर्चा गेल्या २०-२० वर्ल्डकपलाही झालेली. मी सुद्धा याच मताचा होतो. पण यंदाही कुठलाही धाडसी निर्णय न घेता हे तिघे एकत्र खेळणारच हे नक्की वाटत आहे. त्यामुळे हे नाकारून विचार करण्यात काय अर्थ आहे. >> होईलही पण त्याचा अर्थ ते योग्य आहे असे नाही नि तसे नमूड करण्यामागे मला काहीही चुकीचे वाटत नाही. ह्या अशा विचारसरणीमूळेच आपण ह्यावेळीही अडकणार आहोत. मूळात प्रॉब्लेम काय आहे हे दिसत असतानाही ते नाकारण्यामागे मला प्रयोजन दिसत नाही. बाकी सगळे संघ तुफानी सुरूवाल, ऑल राऊंडर्स नि एक्स्प्लोसिव्ह फिनिशर ह्या बांधणी मधे आहेत नि आपण वन डे टीम चे संक्षिप्त स्वरूप बनवण्यामधे.
असामी
असामी
बेरस्टो बाबत अंशतः असहमत.
त्याला 20-25 नव्हे तर 85 टेस्ट मॅचेस खेळवले आहे आणि मेजॉरिटी सामने हे मधली ऑर्डर मध्येच खेळला आहे. .
अजूनही त्याच्या तंत्रामधले दोष आहे तसेच आहेत (इन स्विंग विरुद्धचा विकनेस) आणि तो अजूनही भरवशाचा फलंदाज वाटत नाही .
बरोबर आहे फक्त त्याच्या जागी
बरोबर आहे फक्त त्याच्या जागी आलेल्यां चेही तेच प्रॉब्लेम होते/आहेत. तो त्यांच्यापेक्षा अधिक कंसिस्टंट परर्फॉर्मर आहे. त्यामूळे त्याला दिलेली वागणूक जास्त जाणवली. शेवटी गाडी वळून त्याच्यावरच येत जाते १-२ दौर्यानंतर.
कामावरून परत आल्या वर
कामावरून परत आल्या वर ऑस्ट्रेलिया आणि लंके मधल्या पहिल्या वन डे चे हायलाइट्स पहिले.
ऑस्ट्रेलिया आज हरता हरता वाचले. मॅक्सवेल ने जवळपास एक हाती मॅच काढली.
हो, हसरंगाने त्याच्या लास्ट
हो, हसरंगाने त्याच्या लास्ट ओवरला दोन विकेट काढून सामना फिरवला तिथपासून मी मॅक्सवेल काय करतो या उत्सुकतेपोटी लाईव्ह पाहिला. क्लीन हिटींग फॉर्ममध्ये असला की बेक्कार खेळतो तो. रिव्हर्स स्वीपचे चौके ईतके सहज मारत होता की जणू स्ट्राईक रोटेट करायला सिंगल घ्यावे. फार सहज फिनिश केला त्याने सामना.
आपल्याला प्रेषा सरावा अभावी
आपल्याला प्रेषा सरावा अभावी खेळायचे आहे. हॅव फन. !
>>
स्टीव खेळला की काऊंटी, आणि झक्कास फॉर्म पण दाखवला की. आता बाकी लोकांना त्याच्यावर अवलंबून रहायला बरं.
बाकी आपली टी२० टीम पहिल्या वर्ल्डकप नंतर कधीच टी२० स्पेशल प्लॅन असलेली वाटली नाही.
वन-डे मधले दिग्गज + आयपीएल मधे चमकलेले यांची भेळ आपण दरवर्षी उतरवतो, अन मागाहून पस्तावतो.
केवळ इंग्लंड / विंडीज / ऑसीजच नाही तर श्रीलंका सुद्धा स्पेसिफिक टी२० मेंटॅलिटीवर स्ट्रॅटेजी ठरवती आहे, पण आपण सुधारायला तयार नाही.
द्रविड कडून होप्स होत्या (जसं अंडर १९ ला १ वर्ल्डकप खेळल्यावर परत चान्स देणं बंद करण्याचं बोल्ड डिसीजन घेतलं होतं तसं इथे ही काहीतरी बोल्ड डिसीजन येईल असं वाटलं होतं) पण सेलेब्रेटी इमेज ही फॉर्म अन परफॉर्मन्स पेक्षा अजूनही मोठीच आहे
स्टीव खेळला की काऊंटी, >>
स्टीव खेळला की काऊंटी, >> पुजारा म्हणायचे आहे का तुला ? एकटा किती पुरणार रे पण. परत आपल्या बॉलिंग ला लिमिटेड क्रिकेट च्या मोड मधून बाहेर यायला वेळ लागला तर अजूनच बोंबलू.
द्रविड कडून होप्स होत्या >> दर सामन्यानंतर धरसोड रीअॅक्टिव्ह बदल न करणे हा एकमेव मोठा बदल दिसतो आहे. कदाचित संधी देण्याच्या लंबकाचे दुसरे टोकही गाठले जात असेल. पण ठीक आहे
पांड्या आयर्लंड मधे कप्तान म्हणून चमकला तर मोठी धमाल होईल.
आयर्लंडमधील सामने आयर्लंडशी
आयर्लंडमधील सामने आयर्लंडशी खेळायचे असल्याने कितीही मोठे विजय मिळू दे काही धमाल नाही होणार. किंबहुना हरला तर उलटे होईल.
कप्तान म्हणून चमकणे म्हणजे
कप्तान म्हणून चमकणे म्हणजे फक्त जिंकणे एव्हढेच अपेक्षित असेल तर .. जाऊ दे.
राहुल इंग्लंड दौर्यामधून गळला म्हणे. गिल ओपन करणार. गिल नसेल तर पुजारा करणार असे सांगण्यात आले आहे. नगाला नग असण्याशी मतलब आहे. मयांक नावाचा एक ओपनर राहुल-रोहित एकत्र येण्या आधी- आल्यावर - नि आल्यावरही वेगवेगळ्या कारणास्तव आट्यापाट्या खेळात असताना होता - मधे बॅकप म्हणून उचलेला प्रियांक पांचाल वगैरे लोक इतिहासजमा झाले का ? गिल ला मधल्या फळीत खेळवण्याबद्दल द्रविड ने केकेल्या सूतोवाचाचे काय झाले ?
कप्तान म्हणून चमकणे म्हणजे
कप्तान म्हणून चमकणे म्हणजे फक्त जिंकणे एव्हढेच असे कोण म्हणाले..
पण कप्तानाचे डावपेच तेव्हाच टेस्ट होतात जेव्हा समोरचा संघ तितकाच तुल्यबळ असेल..
आणि पांड्या आधीच आयपीएलमध्ये चमकला आहे.. त्यानंतर आफ्रिकेसमोर कप्तान असता तर ती नेक्स्ट लेव्हल ठरली असती. आयर्लंड दौरा नेक्स्ट लेव्हल नाही झाली.
आयर्लंड चा दौरा आयर्लंड मधे
आयर्लंड चा दौरा आयर्लंड मधे आपल्या ब टीम बरोबर आहे ह्यात बरेच काही येतेय असे नाही वाटत तुला ? हा सहज वॉक ईन असेल का वाटण्याचे कारण काय ?
पुजारा म्हणायचे आहे का तुला ?
पुजारा म्हणायचे आहे का तुला ? एकटा किती पुरणार रे पण
>>
हो रे... काऊंटी टीममेट्सना त्याचं नाव उच्चारता येत नसल्यानी त्यांनी त्याचा 'स्टीव' केला असं वाचलं होतं.
तो एकटा आजिबात पुरणार नाही हे माहिती आहे, पण आपल्या टीम मधे इतर प्लेअर्स टेस्ट टेंपरामेंटपासून कोसो दूर असल्यासारखं वाटल्यानी (काहीशा उपरोधानी) ती पोस्ट केली होती. तुला जी काळजी वाटते आहे एक्झॅक्टली तीच मलाही वाटते आहे.
पांड्या आधी कितीही डोक्यात गेला असला तरी त्याची '२२ आयपीएलमधली कप्तानी बघता तो आयर्लंडमधे अॅज अ कॅप्टन चमकावा असंच वाटतंय. निदान त्यानी टी२० ला एक नवा कप्तान अन नव्या माईंडसेटचा संघ बनायची काहीतरी शक्यता वाटते.
त्रिपाठीला टीम मधे जागा मिळाल्याचं पाहून बरं वाटलं, देर आए दुरुस्त आए...
रच्याकने...
वन टीम वन कॅप्टन वन कोच पॉलिसी ऐवजी ३ टीम्स, ३ कॅप्टन्स आणि ३ कोच ट्राय करून बघितलं पाहिजे.
काही प्लेअर्स तीन्ही फॉर्मॅट खेळतील, पण कॅप्टन अन कोच हा त्या त्या फॉर्मॅटचा स्पेशलिस्ट असावा.
पांड्या आधी कितीही डोक्यात
पांड्या आधी कितीही डोक्यात गेला असला तरी त्याची '२२ आयपीएलमधली कप्तानी बघता तो आयर्लंडमधे अॅज अ कॅप्टन चमकावा असंच वाटतंय. निदान त्यानी टी२० ला एक नवा कप्तान अन नव्या माईंडसेटचा संघ बनायची काहीतरी शक्यता वाटते.
त्रिपाठीला टीम मधे जागा मिळाल्याचं पाहून बरं वाटलं, देर आए दुरुस्त आए... >> +१००
३ टीम्स, ३ कॅप्टन्स आणि ३ कोच ट्राय करून बघितलं पाहिजे. >> अनुमोदन - थोडा ओव्हरलॅप असला तरी चलील. उदा : बुमरा टेस्ट नि टी २० खेळतोय वगैरे. परत एव्हढे नवे नवे खेळाडू येत आहेत वर त्यांनाही संधी मिळत जाईल. रणजी मधे चमकलेल्या खेळाडूंना टेस्ट मधे त्यांच्या आय्पील कामगिरी कडे न बघता रीझर्व्ह कोटा देण्याची वेळ आली आहे
ईंग्लंड आणि बटलर नेदरलँडची
ईंग्लंड आणि बटलर नेदरलँडची पिसे काढत आहेत...
४३ ओवर ३४५-२
बटलर ५६ बॉल १२९ वर खेळतोय...
NED v ENG, 1st ODI
NED v ENG, 1st ODI
ENG 498-4 (50)
Jos Buttler*: 162 (70)
Liam Livingstone: 66 (22)
Logan van Beek 10-0-82-1
Netherlands opt to bowl
कार्तिक ठोकराय रे बाबा! मस्त!
कार्तिक ठोकराय रे बाबा! मस्त!
थोडी उशिरा सुरु झाली पण फटकेबाजी. पंत इज सच अ वेस्ट! किती दिवस चालून घेणार त्याचे लाड काय माहित.
पिच खूप अतरंगी प्रकार करत
पिच खूप अतरंगी प्रकार करत होता सेकंड ईनिंगला. मध्येच एखादा बॉल रपक्कन ऊसळत होता. बवुमा तर एक दोन फटके खाऊन आत पळाला. उमरान मलिक आज असता तर एकदोघांना फोडला असते नवीन बॉलवर..
पुन्हा हार्ड लेंथवरून खानाचा
पुन्हा हार्ड लेंथवरून खानाचा बॉल उसळला. एवढा ताडमाड ऊंच मार्को फुटला आता.. फालतूगिरी. थांबवा खेळ
अफ्रिकेने कंडिशन्स टोटली
अफ्रिकेने कंडिशन्स टोटली मिसरीड केल्या शेवटच्या ५ ओव्हर्समधे आणि मोमेंटम शिफ्ट झाला. इंडियन बॉलर्सचं आणि पंड्या - कार्थिकचं कौतुक आहे.
अफ्रिकेने कंडिशन्स टोटली
अफ्रिकेने कंडिशन्स टोटली मिसरीड केल्या शेवटच्या ५ ओव्हर्समधे आणि मोमेंटम शिफ्ट झाला. इंडियन बॉलर्सचं आणि पंड्या - कार्थिकचं कौतुक आहे. >> +१. पहिल्या दहा - बारा ओव्हर्स आफ्रिके ची बॉलिंग टॉप नॉच होती. विकेट तेंव्हाही टू पेस्ड होतीच. पांड्या नि कार्थिक ने जबरदस्तच बॅटींग केली. आफ्रिके च्या बॅट्स्मन ना असा बाउन्द हँडल करता आला नाही हे नवल आहे. ते टु पेस्ड वर अधिक भेदरलेले वाटले.
८७ ला सर्वबाद
८७ ला सर्वबाद
अंदाज आलेला सुरुवातीलाच ईथे काही टिकत नाहीत. मी आफ्रिकेचा कप्तान असतो तर सामना फारसा न लांबवता भारताला देऊन टाकला असता. उगाचच्या एंज्युरी टाळल्या असत्या..
सरफराज खान काय कडक खेळतोय..
सरफराज खान काय कडक खेळतोय.. कमालीची कन्सिस्टन्सी.. पाचव्या ऐवजी चौथा यायला हवा होता हा
आज आपला सराव सामना
आज आपला सराव सामना
पुज्जी बूमबूम कृष्णा आणि चुम्मा समोरच्यांकडून खेळणार आहेत.. या आधी कधी असे झाले होते?
Pages