Submitted by ऋन्मेऽऽष on 8 January, 2022 - 10:41
कोरोनाचा प्रादुर्भाव तुलनेत कमी झाल्याने भरगच्च क्रिकेट आहे येत्या वर्षात. धाग्यावर चर्चाही तितकीच रंगू द्या 
क्रिकेटचा मागचा धागा ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/77883
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
गायकवाडच्या जागी राहुल असता
गायकवाडच्या जागी राहुल असता तर चौकडी झाली असती.
२१२ टारगेट
१३ वा विक्रमी विजय.....?
मॅच हातातून गेली आहे.
मॅच हातातून गेली आहे.
श्रेयस ने सोडलेला गोळा महागात पडला आहे.
बॉलिंग युनिट एक टीम म्हणून
बॉलिंग युनिट एक टीम म्हणून वाटलेच नाही.
अर्शदीप हवा होता. बुमराहच्या अनुपस्थितीत.
त्याने फरक पडला असता का पण
त्याने फरक पडला असता का पण खरच ? ओव्हर ऑल बॉलिंग ओक होती असं वाटत राहिले. स्लॉट नि फुल टॉसेस नेहमीपेक्षा जास्तीच होते. मधल्या ओव्हर्स मधे चहल ला का वापरले नाहि देव जाणे. २०० डिफेंड करताना विकेट टेकिंग बॉलर न वापरणे विचित्र वाटते.
मिलर आणि व्हॅन डर दुसन ने
मिलर आणि व्हॅन डर दुसन ने तुफान फटकेबाजी केली. वेल प्लेड साऊथ आफ्रिका.
अर्थात आपल्या सगळ्याच बॉलर्स ने गरजेच्या वेळी केलेली अति भिकार बॉलिंग हि इग्नोर करू शकत नाही.
हो ना
हो ना
चहलला पहिली ओवर पॉवरप्लेमध्ये दिली.
आणि ते पाहून नंतर त्यावर फुल्ली मारली.
अवघडेय..
एका विकेटवर मॅच होती. मागे नवोदीत आणि गोलंदाज होते
पण ती विकेट आलीच नाही
विकेट आली होती पण अय्यर ने
विकेट आली होती पण अय्यर ने अति कॅज्युअली एप्रोच मध्ये कॅच टाकला.
क्रिकइन्फो च्या सौजन्या ने -
The runs cost to India due to Shreyas Iyer dropping van der Dussen in the 16th over. He was then on 29 off 30, and finished on 75 off 46, scoring 46 off 16 after the drop (including the run he scored off the ball he was dropped). According to Luck Index, the other batters would have scored 32 off 15 had the chance been taken
"मधल्या ओव्हर्स मधे चहल ला का
"मधल्या ओव्हर्स मधे चहल ला का वापरले नाहि देव जाणे." - टोटली अॅग्रीड! ओव्हरऑलच बॉलिंगच्या वेळी अॅटॅक कमी वाटला. बहुदा स्कोअरबोर्डचं प्रेशरच द. अफ्रिकेची बॅटींग कोलमडवायला पुरेसं आहे असं वाटलं असावं. (राजस्थानला 'हा' ड्युसेन हवा होता).
लंका ऑस्ट्रेलिया बघतेय का
लंका ऑस्ट्रेलिया बघतेय का कोणी?
३ ओवर ५९ हवे होते आणि १०८- ६ विकेट गेलेल्या.
लास्ट ओवर १९ हवे होते.
दसुन शनाकाने एकहाती काढली.
१२ बॉल ६ वर खेळत होता
२५ बॉल ५४* झाले
१३ बॉल ४८ मारले.. जबरदस्त
हेजलवूड, झाय रिचर्डसन, केन रिचर्डसन.. तिन्ही बॉलर फोडले
दुसऱ्या सामन्यात आपली बिकट
दुसऱ्या सामन्यात आपली बिकट अवस्था झाली आहे.
शेवटच्या 5-6 ओव्हर मध्ये जर DK आणि अक्षर नि हाणामारी केली तरच जरा रेस्पेक्टबल स्कोर लागेल.
पंतने टेस्ट मॅचेसवर फोकस
पंतने टेस्ट मॅचेसवर फोकस करावं क? लिमिटेड ओव्हर्स क्रिकेटमधे तो खूप प्रेडिक्टेबल खेळतो. दोन वर्षांपूर्वी त्याची अपरिपक्वता त्याच्या youthful exuberance च्या नावानं डिफेंड करता यायची, पण त्याला एक-दोन पर्याय (किशन?) तयार ठेवायला हरकत नाही. आजचं त्याचं शॉट सिलेक्शन शॉकिंग होतं.
ही ‘फिनीशर’ एक ओव्हररेटेड
ही ‘फिनीशर’ एक ओव्हररेटेड कल्पना वाटते मला. कार्थिक एक प्रॉपर बॅट्समन आहे, इंडियाचा टेस्ट ओपनर होता. अक्षर पटेल च्या ऐवजी त्याने यायला हवं होतं.
हो. अक्षर ला आधी पाठवायचा
हो. अक्षर ला आधी पाठवायचा डिसिजन खूप विचित्र वाटला.
कार्तिक नकोय का संघाला?
कार्तिक नकोय का संघाला?
गेल्या सामन्यात पांड्याने तो टेलेंडर असल्यासारखे त्याला स्ट्राईक दिला नाही.
आज अक्षर पटेलला त्याच्या आधी पाठवले.
त्याला खेळवून पण जास्त संधी न देता त्याचा पत्ता कापायचाय का असे वाटले या दोन गोष्टी बघून.
असो
असो
१४९ टारगेट
आज भुवीने वर विकेट काढाव्यात दोन..
पहिली काढली भुवीने..
पहिली काढली भुवीने..
वाटतच होते काढणार...
गेम ऑन..
दवामुळे विकेट फारशी बदलली
दवामुळे विकेट फारशी बदलली नाही आणि इंडियाने डिसिप्लिन्ड बॉलिंग आणि फिल्डींग केली तर हा स्कोअर काँपिटीटीव्ह ठरू शकतो.
दवाचीच भिती आहे. त्यामुळे
दवाचीच भिती आहे. त्यामुळे अटेक करा आणि विकेट काढा.
दुसरी आली भुवीची.
भुवीला तिसरी ओवर दिली. त्याने
भुवीला तिसरी ओवर दिली. त्याने तिसरी विकेट काढली. चुम्मा कप्तानी.
आजचा लॉस पंतचा आहे परत.
आजचा लॉस पंतचा आहे परत. त्याचे शॉट सिलेक्शन सुमार होते. अय्यर सुटायला सुरू झाली होती स्पिनर्स समोर नि पंत ने सगळा मोमेंटम विकेट ने घालवला. कार्थिकला अक्षर च्या खाली पाठवण्याचे कारन तो १६ ओवह्स्र नंतर आला तर जास्त चांगला खेळतो. (विचित्र आहे पण तसे आहे). नंतर चहल दहा ओव्हर्स मधे डेंजर वाटत होता तर त्याला ब्रेक देउन मधेच अक्षर ला बॉलिंग दिली. क्लासेन एव्हढा सेट झालाय म्हटल्यावर नि रन रेट बघता चाल ला चौथी ओव्हर देणे विशेषतः तुमचे त्या दिवशीचे तीन बॉलर्स भुवी, आवेश नि हर्शद - ह्यातल्या दोघांच्या तिघांच्याही एक एक ओव्हर्स बाकी ठेवून असताना ( आवेश ची आदली ओव्हर असल्यामूळे दोघे असे म्हणू शकतो) चहल ला नि ते ही तिसर्या ओव्हर मधे त्याला मारण्याचे इंटेंट क्लीयर झाले असताना - चौथी ओव्हर दिलेली कळलीच नाही. कप्तान म्हणून असा काहीही स्पार्क यंदा आयपील नि आत्ताही जाणवत नाहीये.
काय हो असामी, कार्तिकला
काय हो असामी, कार्तिकला पोलार्डच्या पंक्तीत बसवलात
पंतबाबत सहमत. आधीच तो संघातील जागेबाबत असुरक्षित आणि फलंदाजीतील भुमिकेबाबत गोंधळलेला असताना त्याला कप्तानी देणे गरजेचे नाही. अर्थात आताची कप्तानीही अपघाताने आली आहे. शर्मा आणि राहुल दोघेही अनुपस्थित असल्याने. हार्दिक पांड्यालाही देता आली असती पण कदाचित त्याने संघात पुनरागमन केल्याकेल्या त्याला कप्तान केले असे नको व्हायला म्हणून पंतला पुढे केले असावे.
बाकी त्याचे शॉट सिलेक्शन जब तक सूरज चांद रहेगा चर्चेचा विषय राहणार आहे. त्यामुळे मी कधी डोक्याला त्रासच करून घेत नाही. सुखी राहतो
असो, या स्थितीत शर्माची कारकिर्द जास्तीत जास्त मोठी व्हावी अशी प्रार्थना, जेणेकरून पुढचे दोन तीन वर्षे तरी त्यानेच कप्तानी सांभाळावी हे उत्तम होईल.
कार्तिकला पोलार्डच्या पंक्तीत
कार्तिकला पोलार्डच्या पंक्तीत बसवलात >> मी नाही बसवलय, तोच जाऊन बसलाय. १६ ओव्हर्स नंतर केलेले प्रताप अमेझिंग आहेत त्याचे.
*....स्थितीत शर्माची कारकिर्द
*....स्थितीत शर्माची कारकिर्द जास्तीत जास्त मोठी व्हावी अशी प्रार्थना, जेणेकरून...* - पण शर्मा तर ' non- batting captain ' व्हायचाच हट्ट धरून बसलाय !
रूट च्या फॉर्म बद्दल कोणीच
रूट च्या फॉर्म बद्दल कोणीच बोलत नाही येथे
One more century
१६ ओव्हर्स नंतर केलेले प्रताप
१६ ओव्हर्स नंतर केलेले प्रताप अमेझिंग आहेत त्याचे.
>>>
हो पण १६ च्या आधी न खेळायच्या क्षमतेबद्दल बोलत आहोत ना आपण.. पोलार्ड जसा लवकर आला की क्वालिटी स्पिनरसमोर चाचपडतो वा त्याला मिडल ओवरला स्ट्राईक रोटेट करून खेळता येत नाही त्याबद्दल पोलार्डच्या पंक्तीत बोलतोय. न की पॉवरहिटींगबद्दल..
रूट च्या फॉर्म बद्दल कोणीच
रूट च्या फॉर्म बद्दल कोणीच बोलत नाही येथे
>>>>
रोज मारे त्याला कोण ओरडे
पण शर्मा तर ' non- batting
पण शर्मा तर ' non- batting captain ' व्हायचाच हट्ट धरून बसलाय
>>>
हे ही दिवस जातील. म्हणूनच तर त्यासाठी प्रार्थना करायची आहे..
बाकी वर्ल्डकप ऑस्ट्रेलियाला आहे. तिथे खेळणारा आहे तो. रेकॉर्ड चांगला आहे तिथला. सूर गवसला तर चढून बसेल..
हो पण १६ च्या आधी न खेळायच्या
हो पण १६ च्या आधी न खेळायच्या क्षमतेबद्दल बोलत आहोत ना आपण.. >> नाही रे. मी फक्त कार्थिक १६ नंतर जास्त चांगला खेलतो त्याबद्दलच बोलत होतो. अगदी बंगलोर ने त्याला दहा नि तेराव्या ओव्हर मधे पाठवल्यावर त्याचा खेळ ढेपाळला होता. इनिंग बिल्ड करणे ह्यापासून तो बराच दूर गेल्यासारखा वाटतोय. खरा फिनिशर झाला आहे.
बंगलोर ने त्याला दहा नि
बंगलोर ने त्याला दहा नि तेराव्या ओव्हर मधे पाठवल्यावर त्याचा खेळ ढेपाळला होता. इनिंग बिल्ड करणे ह्यापासून तो बराच दूर गेल्यासारखा वाटतोय.
>>>>
ओके, हे चेक करायला हवे असे कितीदा झाले. पण फिनिशर म्हणून येतो त्या नंबरवरच विकेट लवकर गेल्याने पुढे यावे लागले होते का, कारण यात त्याचा रोल फिनिशरचाच राहतो. पण फलंदाजीत प्रमोशन देत पुढे आणले असेल तर ते वेगळे झाले. कारण त्यात रोल बदलतो. मेंटेलिटी बदलते.
भारतीय संघात पंत पांड्या अय्यर वगैरे शिल्लक असताना कोणी त्याला मुद्दाम चौथ्या पाचव्यावर पाठवणार नाही. त्याचा रोल फिनिशरचाच राहील हे बघणार. पण अक्षरला त्यापुढे पाठवावे लागत असेल तर काहीतरी चुकतेय. कारण त्यात क्षमता आहे कधी लवकर विकेट गेल्यास अजून चार ओवर आधी येत खेळायची. अक्षरच्या मागे त्याला लपवायची गरज नाही. आणि याच्या सरावालाच म्हणून तर या सामन्यात निर्माण होणाऱ्या संधी / सिच्युएशन वापरल्या गेल्या पाहिजेत.
तुला इतरांचे अॅनालिसिस
तुला इतरांचे अॅनालिसिस चालणार असेल तर हे वाच.
https://www.espncricinfo.com/story/ind-vs-sa-2022-why-india-should-not-t...
Pages