Submitted by ऋन्मेऽऽष on 8 January, 2022 - 10:41
कोरोनाचा प्रादुर्भाव तुलनेत कमी झाल्याने भरगच्च क्रिकेट आहे येत्या वर्षात. धाग्यावर चर्चाही तितकीच रंगू द्या 
क्रिकेटचा मागचा धागा ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/77883
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
माझ्या आठवणीप्रमाणे अशीच
माझ्या आठवणीप्रमाणे अशीच वानवा योहाना, संगा, अमला ह्यांच्याबाबत पण झाली होती, जेंव्हा ते पर्पल पॅचमधे होते. २-३ वर्षांचा असा पर्पल पॅच पुढे ५-६ वर्षे कायम ठेवणे येराबगाळ्याचे काम नाही. परत इंग्लंड मधे वापरले जाणारे सिलेक्शन लॉजिक बघता ८ -१० वर्षांचा रोप त्याला मिळणे अशक्य आहे. कोहली नि स्मिथ बद्दल अनुमोदन.
भारताच्या मिडल ऑर्डर मधे
भारताच्या मिडल ऑर्डर मधे भलतीच दंगल होणार आहे. - कोहली , पंत, स्काय, श्रेयस, पांड्या, हूडा, कार्थिक. ३-४ जागांसाठी दुप्पटी ने प्लेयर्स आहेत. एक जागा पांड्या किंवा हूडा साठी राखीव ठेवावी म्हणजे एक स्पेअर बॉलर नेहमीच उपलब्ध असेल.
असामी,
असामी,
इंग्लिश बॅटिंग ची सध्याची ओव्हरऑल अवस्था बघता माझ्यामते तरी रूट (फिटनेस कॉन्सर्न्स असाइड) अजून 6-7 वर्षे तरी टेस्ट क्रिकेट नक्की खेळेल.
त्यांचे नव्या फळीचे फलंदाज अतिशय सुमार दर्जाचे आहेत (क्रॉवली, हमीद, सिबली इत्यादी) आणि बटलर, बेअरस्टो यांनी वेळोवेळी प्रूव्ह केले आहे कि टेस्ट क्रिकेट हा त्यांचा गेम नाहीये.
रूट किती वर्ष टेस्ट खेळेल
सचिनच्या विक्रमासंदर्भात, रूट किती वर्ष टेस्ट खेळेल हें महत्वाचं नसून त्याचा फाॅर्म, फिटनेस व reflexes अशा उच्चतम स्तरावर तो किती काळ टिकवून ठेवूं शकेल हा आहे. सचिन याबाबतीत यशस्वी ठरला हेंच खरं तर त्याच्या 15000+ मागचं अनुकरण करण्यास कठीण असं वौशिषठय आहे !!
असामी आणि भाऊंशी सहमत. सलग ६
असामी आणि भाऊंशी सहमत. सलग ६-७ वर्षं फॉर्म आणि फिटनेस टिकवून सातत्याने धावांचा रतीब घालणं अवघड आहे. त्यातून जर रूट ते करू शकला तर तो most deserving candidate असेल त्या विक्रमावर आरूढ होण्यासाठी.
*तर तो most deserving
*तर तो most deserving candidate असेल त्या विक्रमावर आरूढ होण्यासाठी * - 100% सहमत.
रणजी क्वार्टर फायनल्स सुरू
रणजी क्वार्टर फायनल्स सुरू झाल्या आहेत. मुंबईच्या सुवेद पारकरने पदार्पणातच २५०+ रन्स केल्या. व्वा!
कर्नाटक - यूपी चौथ्या इनिंगला चुरशीची होईल असं वाटतंय.
सरफराज ने हि धावांचा रतीब
सरफराज ने हि धावांचा रतीब चालू ठेवला आहे.
ह्याच रेट ने स्कोर करत राहिला तर भारतीय सेलेक्टर्स ना त्याला या पुढे टेस्ट सिलेक्शन साठी डावलणे कठीण असेल.
सरफराजकडे वरच्या लेव्हलला
सरफराजकडे वरच्या लेव्हलला खेळायचा कॉन्फिडन्स अजून दिसत नाही. पण सुधारणा खूप झालीय. येडेचाली शॉट कमी खेळेल तितके चांगले.
सरफराजकडे वरच्या लेव्हलला
सरफराजकडे वरच्या लेव्हलला खेळायचा कॉन्फिडन्स अजून दिसत नाही. >> ह्या वाक्याचा अर्थ काय रे ? त्याने गेल्या सीझन पासून धावांचा रतिब घातला आहे रणाजीमधे जो आयपील नंतरही परत सुरू केला आहे.
रणजी मधई एक मॅच वगळता उरलेल्या तिन्ही पहिल्या डावच्या लीडवर निघणार असे दिसतेय. कर्नाटक - यूपी मधे सगळे अनसंग हिरो आहेत. नेहमीच्या घोड्यांनी पाट्या टाकल्या आहेत.
त्याचे रणजीचे कौतुक माझे
त्याचे रणजीचे कौतुक माझे व्हॉटसपग्रूपवर फार शेअर करून झालेय. आजही दिल्ली कॅपिटल्स फेबू ग्रूपवर त्याची तिसरी १५०+ इनिंगचे कौतुक झालेय ते ही लाईक करून झालेय.
पण तिथे काय दर्ज्याची गोलंदाजी फेस करतोय किंवा किती टेकनिक आणि टेंपरामेंटचा कस लागतोय हे माहीत नाही. कारण ते बघितले नाही.
आयपीएलमध्ये मात्र एवढा भारी फॉर्म पाठीशी घेऊन आला तरीही आश्वासक वाटला नाही. आधी संघात येऊन बाहेर गेला. नंतर एक फिफ्टी मारली पण त्या खेळीतही प्रत्येक बॉलला मारायला जात होता. एकदोन लाईफ मिळून मग बाद झाला. असे तर स्वत:च्या डिफेन्स आणि शॉट सिलेक्शनवर विश्वास नसलेले खेळतात. रणजीत ईतके धावा टाकणाऱ्याकडून हे अपेक्षित नाही. त्यातल्या त्यात आधीच्या सीजनसारखे येडे शॉट न खेळता यंदा प्रॉपर क्रिकेटींग शॉटवर भर होता ही जमेची बाजू. मागे कधीतरी बेंगलोरला कोहलीसोबत असताना असे फटके खेळून त्याने एक सामना जिंकवून दिलेला. पण नंतर निराशाच केलेली.
लाँग फॉर्मॅट मधे काढलेल्या
लाँग फॉर्मॅट मधे काढलेल्या धावा नि वीस ओव्हर्स मधल्या सामन्यामधल्या धावा - त्या मागचा अॅप्रोच - त्यामागे असलेले डावपेच ह्यात फरक असणार ना ? पुजारा दणकून फॉर्ममधे आहे पण आफ्रिकेविरुद्ध टी २० मधे खेळवणार नाही ना त्याला ? कार्तिक ने पाच-सहा क्रमांका वर आयपील मधे धुमाकूळ घातलाय पण त्याला म्हणून टेस्ट मधे पंत्/विहारी/श्रेयस च्या जागी खेळवणार का आपण ? "भारतीय सिलेक्टर्स ना त्याला या पुढे टेस्ट सिलेक्शन साठी डावलणे कठीण असेल." ह्यातल्या टेस्ट ह्या शब्दाकडे लक्ष दे.
त्या मागचा अॅप्रोच
त्या मागचा अॅप्रोच
>>>>
ॲप्रोचच गंडलेला वाटला मला तेच तर सांगतोय.
राहुल, रहाणे, अग्रवाल, कोहली हे सारे कसोटी दर्ज्याचे प्लेअर आहेत. त्यांचा २०-२० खेळण्याचा ॲप्रोच बघा. क्वालिटी बॉलिंग खेळायचा कॉन्फिडन्स त्यात दिसतो. तोच मिसिंग वाटला. त्याचे फटके अटॅकिंग वाटण्यापेक्षा अटॅक ईज द बेस्ट वे ऑफ डिफेन्स वाटले जे टेस्ट क्वालिटी बॅटरला बिलकुल शोभत नाहीत.
ॲप्रोच तसा आहे कारण त्याला
ॲप्रोच तसा आहे कारण त्याला दिलेला रोल (शेवटच्या 2-3 मॅच मध्ये तरी) शॉ ची रिप्लेसमेंट हा होता.
शॉ ने ऍडमिट केलय कि त्याचा रोल पॉवरप्ले मध्ये जाऊन प्रत्येक बॉल कुटणे हाच आहे.
टीम मॅनॅजमेण्ट त्यांच्या कडून T20 मध्ये इंनिंग बिल्डिंग वगैरे अपेक्शा ठेवत नाही.
छे, सरफराजला बेंगलोरपासून बघत
छे, सरफराजला बेंगलोरपासून बघत आलोय. त्याचा आयपीएलमध्ये ॲप्रोच कधीच क्लासिकल बॅटरसारखा वाटला नाही मला . त्यामुळे खरे तर मला आश्चर्याचा धक्का बसतो त्याचे रणजी स्टॅटस बघून. त्यामुळे मी कौतुकाने ते ईथे तिथे शेअर करून झालेत.
अर्थात क्लास खरेच असेल तर तो कॉन्फिडन्स येऊही शकतो. तुर्तास जाणवत नाही ईतकेच. येत्या काळात बघूया
तू रणजी मॅचेस बघतोस का ? न
तू रणजी मॅचेस बघतोस का ? न बघता आयपील मधे वेगळ्या रोल मधे तो कसा खेळतो हे बघून तू आधी कॉन्फिडन्स नि मग क्लास वगैरे असे छातिठोकपणे म्हणतोस हे नेहमीप्रमाणे माझ्या समजेपलीकडचे आहे. क्वालिटी बॉलिंग खेळायचा कॉन्फिडन्स लिहिलेले प्लेयर किती वर्षे टेस्ट खेळत आहेत ते बघ. राहुल पहिल्या आयपील मधे कसा खेळला होता ते आठव. मयांक आयपील मधे कधी दणकून खेळू लागला ते बघ. सर्फराज चे रणजी स्टॅट्स हे अशक्य कॅटेगरी मधले आहेत (छोटिशी कारकिर्द असली तरी) रणजी मार्जिनलाईज होण्याच्या काळातल्या दिग्गजांच्या तुलने मधे ही अबब करायला लावणारे आहेत. सोमी वर शोध - सापडतील.
सर्फराज ने पहिल्यांदा इंप्रेस
सर्फराज ने पहिल्यांदा इंप्रेस केलं होतं इंडिया वि. वेस्ट ईंडीज अंडर-१९ वर्ल्डकप फायनल मधे. रिषभ पंत ओपनिंग ला आला होता आणि पहिल्याच ओव्हरमधे फास्ट बॉलरला स्टंप-आऊट (बोल्ड नाही, स्टंपिंग) झाला होता. बॉल मिस झाला आणि क्रीझ बाहेर उभा होता.. नंतर इशान किशन आणि वॉशिंग्टन सुंदर ने पण निराशा केली होती. तेव्हा सर्फराज ने प्रेशर अॅब्सॉर्ब करत हाफ सेन्च्युरी केली होती. भारत ती फायनल हरला होता (१५० च्या आसपासच ऑल-आऊट झाला होता). पण सर्फराज ची मॅच्युरिटी भावली होती. पण नंतर कुठेतरी माशी शिंकली. मुंबईकडून यूपीकडे गेला, परत मुंबईकडे आला. रन्स तर काढतोय तो. लीग स्टेजला इंज्युरीमुळे उशीरा येऊनसुद्धा बिग डॅडी सेंच्युरीज मारून मैदान गाजवलं होतं. पण सर्वोच्च पातळीवर खेळण्यासाठी फिटनेसवर थोडी मेहनत घ्यायला हवी असं वाटतं.
स्कोरकार्ड बघून तरी वाटतंय कि
स्कोरकार्ड बघून तरी वाटतंय कि ऑस्ट्रेलिया ने श्रीलंके विरुद्ध पहिली T20 हसतखेळत खिशात टाकली.
वॉर्नर गेली 2-3 वर्षे T20 इंटरनॅशनल मॅचेस मध्ये तुफान फॉर्मात आहे.
येत्या वर्ल्ड कप च्या दृष्टीने बघायचा झाल तर ऑस्ट्रेलिया साठी खुप चांगली गोष्ट.
येत्या रविवारी पुढल्या
येत्या रविवारी पुढल्या वर्षांच्या IPL मीडिया राईट्स ची ऑक्शन होणार आहे.
हॉटस्टार, झी,रिलायन्स व्हायाकॉम आणि सोनी सोबतच या वेळी सगळे अमेरिका बेस्ड मोठे प्लेयर्स (गूगल, ऍपल, अमेझॉन) मैदानात उतरले आहेत.
कोणीही जिंको पण BCCI चाळीस ते पन्नास हजार करोड ने श्रीमंत होईल असा अंदाज आहे.
सरफराजचे हे प्रथम श्रेणी
सरफराजचे हे प्रथम श्रेणी कारकिर्दीतील सातवे शतक आहे आणि या सातही वेळा त्याने १५० धावांपेक्षा मोठी खेळी केली आहे. अशी कामगिरी करणारा तो प्रथम श्रेणी क्रिकेटमधील पहिला खेळाडू ठरला आहे. या सात शतकी खेळींमध्ये त्याच्या एका तिहेरी शतकांचा आणि ३ द्विशतकांचाही समावेश आहे.
सरफराजाने आता प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये स्वतःच्या २००० धावा पूर्ण केल्या आहेत. या धावा त्याने ८० पेक्षा अधिकच्या सरासरीने केल्या आहेत. ही डॉन ब्रॅडमन (Don Bradman) नंतर दुसरी सर्वोत्तम सरासरी आहे. ब्रॅडमन यांनी ९५.१४च्या सरासरीने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये २००० धावा पूर्ण केल्या होत्या. विजय मर्चंट यांनी ७१.६४, जॉर्ज हेडली यांनी ६९.८६ आणि बहिर शाह यांनी ५९.०२च्या सरासरीने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये २००० धावा केल्या होत्या.
प्रथम श्रेणीमध्ये सर्वोत्तम सरासरीने असणारे फलंदाज (पहिल्या २००० धावा करताना)
डॉन ब्रॅडमन – ९५.१४
सरफराज खान – ८० हून अधिक
विजय मर्चंट – ७१.६४
जॉर्ज हेडली – ६९.८६
बहिर शाह – ६९.०२
भारतीय टीम ला दक्षिणआफ्रिके
भारतीय टीम ला दक्षिणआफ्रिके विरुध्द ची मालिका सुरु होण्यापूर्वीच धक्का बसला आहे.
राहुल आणि कुलदीप दोघेही दुखापती मुळे बाहेर झाले.
पंत हा भारतीय संघाचा नवा कर्णधार असणार आहे.
चुम्मा कप्तान
चुम्मा कप्तान
पांड्या उपकर्णधार आहे
शर्मा, कोहली, राहुल, बुमराह
शर्मा, कोहली, राहुल, बुमराह
हे चार वर्ल्डकप ११ मध्ये खेळतीलच असे प्लेअर संघासोबत नसतील.
साधारण असा संघ असेल आता -
रुतुराज
ईशान किशन
अय्यर / हूडा
पंत
पांड्या
दिनेश कार्तिक
युझी चहल
अक्षर पटेल / बिश्नोई
हर्षल पटेल
भुवनेश्वर कुमार
अर्शदीप / उमरान मलिक
द्रविडचे कमेंट वाचून हा संघ
द्रविडचे कमेंट वाचून हा संघ असेल असे वाटते आहे
रुतुराज
ईशान किशन
अय्यर
पंत
पांड्या
दिनेश कार्तिक
युझी चहल
अक्षर पटेल
हर्षल पटेल
भुवनेश्वर कुमार
अर्शदीप
सर्फ राज च्या वडलांनी जे त्याचे कोच आहेत त्यांनी त्यांच्या घरासमोर मॅत टाकून ते संध्याकाळी भिजवून ठेवायचे नि सकाळी सराव करायचा म्हणजे स्विंग नि सीम बॉलिंग चा सराव होईल हे केले असे वाचले. लॉक डाऊन सुरू व्हायच्या आधी त्याची कुणकुण लागताच, दीड वर्षे दोन्ही पोरांना उत्तराखंड मधे गावोगाव फिरवून त्यांची प्रॅक्टीस सुरू राहील हे पाहिले. नो वंडर तो एव्हढा टच मधे वाटतो आहे. फिटनेस काळाजी घेतईळ तर बरे होईल. शाम्स मुलानी ने पण यंदा दणक्यात विकेट्स घेतल्या आहेत. दुर्दैवाने तो जाडेजा, अक्षर, सौरभ कुमार नंतर रांगेत आहे. सौरभ कुमार भलताच कंसिस्टंट आहे. अश्विन नंतर कोण चे उत्तर तो असेल असे असे वाटते.
असामी
असामी
हो, सौरभ कुमार आणि मुलाणी दोघेही भारी परफॉर्मन्स देत आहेत.
पण हे सगळेच (अक्षर आणि जडेजा ला धरून) लेफ्ट आर्म ऑर्थोडॉक्स स्पिनर आहेत. मग टीम कॉम्बिनेशन बांधताना व्हेरिएशन चा अभाव दिसतॊ.
प्रॉब्लेम असा आहे कि येणाऱ्या फळी मध्ये रेड बॉल क्रिकेट साठी कोणीच भारी ऑफस्पिनर किंवा रिस्ट स्पिनर (कुलदीप वगळल्यास )दिसत नाही.
माझ्या माहिती प्रमाणे चहल आणि बिष्णोई दोघेही फक्त व्हाईट बॉल क्रिकेट खेळतात आणि सुंदर हा काही विकेट टेकिंग ऑपशन वाटत नाही.
मिथाली राज रिटायर झाली.
मिथाली राज रिटायर झाली. लिजंडरी करियर आहे मिथालीचं.
मिथाली रिटायर झाल्यावर जेमिमा रॉड्रिग्ज चा कमबॅक झाला. होपफुली जेमिमा खेळेल. तुफान बॅटर आहे ती.
"प्रॉब्लेम असा आहे कि येणाऱ्या फळी मध्ये रेड बॉल क्रिकेट साठी कोणीच भारी ऑफस्पिनर किंवा रिस्ट स्पिनर (कुलदीप वगळल्यास )दिसत नाही." - खरंय. किंबहूना टॉप-१० मधे सुद्धा असा कुणीही नाहीये. बरेचसे तर लेफ्ट आर्म ऑर्थोडॉक्स आहेत (मुलाणी, बाच्छाव, कार्तिकेय, सरवटे). एकदम खाली गौथम (ऑफ-स्पिनर) किंवा श्रेयस गोपाल (लेग-स्पिनर) आहेत. इंडियाचे बेस्ट चान्सेस चहल ला टेस्टसाठी ग्रूम करणे आणि कुलदीप चा फॉर्म, फिटनेस आणि कॉन्फिडन्स मेंटेन होईल हे बघणं हे आहेत.
प्रॉब्लेम असा आहे कि येणाऱ्या
प्रॉब्लेम असा आहे कि येणाऱ्या फळी मध्ये रेड बॉल क्रिकेट साठी कोणीच भारी ऑफस्पिनर किंवा रिस्ट स्पिनर (कुलदीप वगळल्यास )दिसत नाही. >> हो बहुधा आपण परत मनिंदर सिग नि राजू इरा मधे जाऊ जेंव्हा मुख्य स्पिनर लेफ्ट आर्म ऑर्थोडॉक्स असे नि इतर सपोर्ट अॅक्टर्स. राहुल चहर जर व्हाईट बॉल मधे येऊ शकला नाहि तर कदाचित चांगला रेड बॉल स्पिनर होउ शकेल. " कुलदीप चा फॉर्म, फिटनेस आणि कॉन्फिडन्स मेंटेन होईल" हे पटतय.
बाबर आझम वरच्या दर्जाचा क्लास
बाबर आझम वरच्या दर्जाचा क्लास प्लेअर आहे.
त्याची सध्याची बॅटिंग इज अ ट्रीट फॉर द आईज.
*मिथाली राज रिटायर झाली. * -
*मिथाली राज रिटायर झाली. * - तिच्या दिर्घ व यशस्वी करिअरचा भारतीय महिला क्रिकेट उंचीवर आणण्यात सिंहाचा वाटा होता. तिला सलाम व शुभेच्छा. !!
काळाचा महिमा!
काळाचा महिमा!
एक काळ होता जेव्हा बुधी कुंदरन मुळे नरेन ताम्हाणे चं करियर संपलं. फरूख इंजिनियरमुळे कुंदरन च्या संधी आटल्या. किरण मोरेमुळे चंद्रकांत पंडितला मर्यादित संधी मिळाल्या.
आज भारताच्या संघात पंत, किशन आणि कार्थिक - तिघंही खेळतायत (२०१९ च्या वर्ल्डकपला पण खेळले होते, पण नको त्या दु:खद आठवणी).
Pages