क्रिकेट - ७

Submitted by ऋन्मेऽऽष on 8 January, 2022 - 10:41

कोरोनाचा प्रादुर्भाव तुलनेत कमी झाल्याने भरगच्च क्रिकेट आहे येत्या वर्षात. धाग्यावर चर्चाही तितकीच रंगू द्या Happy

क्रिकेटचा मागचा धागा ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/77883

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हूडा पुढच्या मालिकेत आहे म्हणजे आयर्लंडमधील रन्सला महत्व दिले असे जर तुम्ही म्हणत असाल तर आता काय पुढे बोलणार Happy

चला शुभरात्री Happy

उद्यापासून धमाल आहे..
आयपीएल आणि २०-२० ने उबग आलेला. उद्यापासून रिअल क्रिकेट ओवरसीज टेस्ट क्रिकेटचा थरार सुरू होईल. वर्षभर वाट बघितलीय या सामन्याची Happy

हूडा पुढच्या मालिकेत आहे म्हणजे आयर्लंडमधील रन्सला महत्व दिले असे जर तुम्ही म्हणत असाल तर आता काय पुढे बोलणार >> तू जरा कष्ट घेतले असतेस तर लक्षात आले असते की, हूडाच्या आधीपासून ईअर मार्क केलेले संजू, गायकवाड , वेंकटेश अय्यर पहिल्या सामन्यानंतर बाहेर आहेत. हूडा त्यांच्या नंतर येऊनही टिकून राहिला आहे. तो ह्या दोन सामन्यांमधे जिथे खेळला त्या क्रमांकांचे प्रथम दावेदार येऊनही त्याला रीटेन केले आहे. त्यापलीकडे जाऊन श्रेयस, स्काय, इशान किशन हि नावे ३-५ मधे फिरू शकत असतानाही त्याला ठेवलय. आता त्या रन्स ना मह्त्व दिले की नाही हे तू ठरव.

आयपीएल आणि २०-२० ने उबग आलेला. >> प्रत्येक सामन्यामधे अधे मधे येईन इथे कमेंट्स टाकण्याएव्हढा सामना बघतो नि वर परत उबग आला वगैरे म्हणायचे. लॉजिक लॉजिक म्हणतात ते हेच का रे भाऊ Happy

ईंग्लंडनी टॉस जिंकला, आपली पहिली बॅटिंग.
गिल, पुजारा, विहारी, कोहली, अय्यर, पंत, जडेजा, ठाकुर, शमी, सिराज, बुमरा (कॅप्टन)

ऑल द बेस्ट

असामी, संजू सॅमसन सुद्धा आयर्लंडविरुद्ध चांगला खेळलेला . पण त्याला केवळ पहिल्या २०-२० ला घेतले आहे. आणि दुसर्‍या तिसर्‍याला पंत परत येताच बाहेर ठेवले आहे. हूडाला तिथे नेले आहे ते काय केवळ आयर्लंडचा सामना खेळवून बाहेर करायला नाही. की ईथून काही नवीन प्लेअर नेणार नव्हते दोन शेजारच्या देशात खेळायला. जे आहे त्यातच सिलेक्शन होते. वा कदाचित ते आधीच डोक्यातही असेल की हूडाला आयर्लंड नंतर ईंग्लंड समोरही संधी द्यावी, वा बॅक अप म्हणून संघात ठेवावे वगैरे..

आयर्लंडच्या सामन्यांना किती महत्व द्यायचे हे त्या निवडसमितीलाच ठाऊक असेल. ना तुम्हाला ना मला. पण हूडाला ईंग्लंड २०-२० मध्ये कायम ठेवलेय म्हणजे महत्व दिलेय हे लॉजिक गंडलेले वाटत आहे.
संजूवर अन्याय झाला म्हणावे मग..

२४ बॉल्स मधे ४ चौके मारून १७ रन्स करून गिल परतला
>>>>>
तो कधीही परतेल असेच वाटते. टेस्ट खेळायला जो ठेहराव जे टेंपरामेंट लागते ते त्याच्याकडे अजून तरी दिसलेच नाही. बाकी टॅलेंटवर बिलकुल शंका नाही.

बिकट परिस्थिती.

पावसा मुळे आलेल्या व्यतंत्रानंतर विहारी आणि कोहली दोघेही आऊट.

कोहलीला तर हल्ली मी मोजतच नाही. बोनस पकडतो. पंत खेळणार हि कसोटी असे माझा सिक्स्थ सेन्स बोलत होता.. बघूया काय होते.. दोन ईनिंग आहेत पंत माझा शब्द खरा करायला..

श्रेयस अपेक्षेप्रमाणे शॉर्ट बॉल वर गेला.

शॉर्ट बॉल विरुद्व त्याचे प्रॉब्लेम असेच चालू राहिले तर त्याच्या कडे लॉन्ग टर्म इन्व्हेस्टमेंट म्हणून बघणं कठीण आहे.

प्रॉब्लेम असा आहे की तो सुधरायचा प्रयत्न करत नाहीये. लिमिटेडमध्येही क्रीजमध्ये नाचून खेळतो. मला तर ते फास्ट बॉलिंगला घाबरून कव्हर सोडून खेळणारी गल्ली क्रिकेटमधली पोरे आठवतात त्याला तसे खेळताना बघून. चार फटके यात बसतातही. पण एका प्रॉपर फलंदाजाला हे शोभत नाही.
स्पिनरसमोर त्याचा क्लास ऊच्च दर्जाचा आहे. भारतात तो चमकणारच. त्याने हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला तर त्याचा नंबर पक्का होईल.

तुझ्याशी सहमत.

सध्या त्याच्या कडे शॉर्ट बॉल विरोधात बचाव किंवा आक्रमण दोन्हीचाही अभाव दिसतो.

चुम्मा आज चुम्मा खेळतोय.
आफ्रिकेत शेवटच्या कसोटीत वन मॅन शो करत शतक मारताना जसा कंट्रोलमध्ये होता तसाच वाटत आहे.
नजर लागू नये. बाद होऊ नये. साथ मिळू दे, त्याचे आज शतक लागू दे..
आमीन !

हूडाला तिथे नेले आहे ते काय केवळ आयर्लंडचा सामना खेळवून बाहेर करायला नाही. की ईथून काही नवीन प्लेअर नेणार नव्हते दोन शेजारच्या देशात खेळायला. जे आहे त्यातच सिलेक्शन होते. वा कदाचित ते आधीच डोक्यातही असेल की हूडाला आयर्लंड नंतर ईंग्लंड समोरही संधी द्यावी, वा बॅक अप म्हणून संघात ठेवावे वगैरे.. >> तुला लॉजिकल फलॅसी नावाचा प्रकार माहित नाही का ? तुझ्या वाक्यातच तू हूदा बद्दल माझे वाक्य सिद्ध करतोयस. हूदाच्या आधीपासून ईयर मार्क केलेले सॅमसन नि गायकवाड ह्यांना बाजूला ठेवून हूडाला ठेवलेले आहे हे वाक्य १०० वेळा लिहून घे म्हणजे कदाचित समजेल मी काय म्हणतो आहे ते., संजूला तू कीपर म्हणून धरत असलास तरी पंत नंतर किशन किंवा भरत (नि आधी साहा कडे कीपर) म्हणून बघत आलेले आहेत. त्यामूले पंत आला म्हणून संजू बाहेर हे चुकीचे आहे. संजू एका सामन्यात खेळला पण त्याला आधी दिलेला रोप लांब आहे - इथेही गायकवाड इंजर्ड झाल्यावर संजू ला आत आणले. आफ्रिकेविरुद्ध गायकवाड नि किशन संजू च्या आधी उचललेले गेले होते. म्हणून संजू बद्दल अन्याय झाला हे वाक्य धाडसी आहे.

अय्यर ला आत आणले कारण तो स्पिनर समोर चांगला खेळतो ह्याच न्यायाने मग एकच स्पिनर का खेळवला हे कळत नाही.

चुम्माची आजची फलंदाजी म्हणजे निव्वळ नेत्रसुख आहे.... टी नंतर तर आणखी वेगळ्या लेव्हलला नेऊन गेलाय.. चालत राहू दे भावा

ते बाझबॉल टॉक चुकून पंत ला दिले असावे असा खेळला Happy इंग्लंड निगेटिव्ह बॉलिंग का करत नाही इथवर आर्थर्टन नि पीटर्सन गेले म्हणजे कसला दणका होता ते कळतेय. बाकी पिच अजून १-२ दिवस बॅटींग ला चांअग्ले असेल असे वाटते. फॉर अ चेंज इंग्लंड ची बॅटींग सुरू व्हायच्या आधी थोडाफार पाऊस पडावा नि मग इंग्लंड बॅटींग काय करते बघायला मजा येईल.

निर्णायक सामना आणि पंत
ऑस्ट्रेलियाला गाब्बाला ईतिहास रचत सामानवीर झाला.
ईंग्लंड भारतात आलेली तेव्हा निर्णायक सामन्यात ११२-५ अश्या स्थितीत शतक मारून सामनावीर पुरस्कार पटकावला.
आफ्रिकेत निर्णायक कसोटीत निर्णायक डावात एकट्याचे झुंजार शतक आले. पण सामना जिंकता आला नाही.
श्रीलंकेचे आव्हान काही खास नव्हते. पण निर्णायक सामन्यात फटकेबाजी करत मालिकावीर पुरस्कार पटकावले.
आणि आता पुन्हा ईंग्लडमध्ये या रखडलेल्या निर्णायक सामन्यात चुम्मा आपले जलवे बिखरतोय

बुमरा टेस्ट मॅच च्या एका ओव्हर मधे सर्वाधिक धावा करणारा बॅटर बनला आहे.
ब्रॉड च्या एका ओव्हाराला ३५ रन निघाल्या

वेल प्लेड पुज्जी
चुम्माकडून तर उद्या आपल्याला पुन्हा एक शतक हवेय. फेकून द्या ईंग्लंडला सामन्याच्या बाहेर

पुजारा कडूनही एक मोठी खेळी पाहिजे. अजून पावणे दोनशे - दोनशे धावा गरजेच्या आहेत.

तीन गोलंदाजांच्या जोरावर आपण तीनशे - सव्वा तीनशे डिफेन्ड करू शकत नाही.

Pages