क्रिकेट - ७

Submitted by ऋन्मेऽऽष on 8 January, 2022 - 10:41

कोरोनाचा प्रादुर्भाव तुलनेत कमी झाल्याने भरगच्च क्रिकेट आहे येत्या वर्षात. धाग्यावर चर्चाही तितकीच रंगू द्या Happy

क्रिकेटचा मागचा धागा ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/77883

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओवरलॅप झालेले दौरे आहेत. अगदी दौरे नाही पण दोन दौर्‍यातील विश्रांतीचा टाईम जेमतेम.
>>
इतर कुठलाही संघ असं करताना दिसत नाही
याचा भारताला एकस्ट्रा ऑर्डीनारी फायदा झाल्याचं ही दिसत नाही
शर्मा टेस्ट खेळला नाही
आयर्लंड मधे ही नव्हता

आता 3 वनडे आणि 3 टी20 खेळून तो इतका थकाणार आहे का की त्याला अजून एक वनडे सिरीज खेळता येणार नाही??
जर ऑलरेडी त्याच्या काही सिरीज मिस झाल्या आहेत तर तीन्ही फॉरमॅट चा रेग्युलर कॅप्टन म्हणून संघासोबत अधिकाधिक मॅच खेळणं ही त्याची रिस्पॉन्सीबिलिटी ठरत नाही का?

रेस्ट केलेले प्लेअर्स फॉर्म ऑफ लाईफ मध्ये आहेत का, की ते परत येऊन मॅच विनिंग परफॉर्मन्स देतील?
आणि नसले, तर त्यांना जास्तीत जास्ती मॅच प्रॅक्टिस आणि फॉर्म मधे यायची संधी मिळणं योग्य नाही का?
की या प्लेअर्स ना परफॉर्मन्स रीझन मुळे बाहेर बसवलं आहे? तसं असेल तर फॉर्म मधे येण्यासाठी ते काही कंस्ट्रक्टीव एफर्ट घेणार आहेत की फॅमिली सोबत सुट्टीवर जाणार आहेत? जर एफर्ट घेणार नसले तर पुढल्या खेपेला कशाच्या जोरावर त्यांचं परत टीम मधे सिलेक्षन होणार?
अजून किती वेळा हरल्यावर आपण नॉन परफॉर्मर लोकांचं सेलेब्रिटी स्टेटस इग्नोर करून जस्ट प्लेअर म्हणून त्यांना जज करणार??

द्रविड कडून असलेल्या अपेक्षा पूर्ण होण्यासाठी लागणारा इंटेंट अजून तरी दिसत नाही आहे
ना त्याचा
ना प्लेअर्स चा
ना सिलेक्षन कमिटीचा
ना बोर्डाचा

अगदी दौरे नाही पण दोन दौर्‍यातील विश्रांतीचा टाईम जेमतेम. त्यामुळे अश्या संघनिवडीला पर्याय नाही. >> बरोबर पण टेस्ट मधे आयपील ला किती वेटेज द्यायचे नि रणजी सारख्या ५ दिवसाच्या स्प्रधेला किती हे ठरवायची वेळ आलेली आहे. बाझबॉल वगैरे सगळे सध्या ठीक वाटते पण स्पाइसी पिचेस वर ड्यूक बॉल नसला किते तेव्हढेच चालेल कि नाही ह्याचे उत्तर अजून मिळायचे आहे. भाउ म्हणतात तसे एकमेव सामना खेळणे ही मूळात घोडचूक होती.

“ बाझबॉल वगैरे सगळे सध्या ठीक वाटते पण स्पाइसी पिचेस वर ड्यूक बॉल नसला किते तेव्हढेच चालेल कि नाही ह्याचे उत्तर अजून मिळायचे आहे” - सौं टके कि बात हैं| मला बर्याच दिवसांपासून हे वाटतंय. स्वतः मॅक्कलम काही ह्या पद्धतीने फार मोठं यश मिळवू शकला नव्हता. किंबहूना २०१५ च्या वर्ल्डकपला फायनलमधे ही आक्रमक पद्धत त्याचा डाऊनफॉल ठरली होती. आक्रमक टेस्ट प्लेयर्स ह्याआधीही आले होते आणि ह्यापुढेसुद्धा येतील. पण वैय्यक्तिक पातळीवर आक्रमक खेळून यश मिळवणं (उदा. सेहवाग) आणि सातत्यानं आक्रमक पद्धतीनं सगळ्या टीमने खेळणं ह्यात फरक आहे.

आत्ता बाझ बॉल म्हणून कितीही नाचत असला तरी हाच इंग्लिश मीडिया उद्या मॅकलम च्या जिवा वर उठेल जर ऍशेस मध्ये हार मिळाली.

मॅच सुरू झालीय.
शर्मा गेला १४ बॉल २४ मारून
किशन गेला काही न करता
हूडा पुन्हा बेक्कार सुरू झालाय
सुर्याने पहिल्याच बॉलला चौका आणि तिसऱ्या बॉलला छक्का मारून ईण्टेंशन क्लीअर केलेत.
आपले प्लेअर सध्या वर्ल्डकपच्या जागेच्या स्पर्धेत खेळणार असे वाटते..

उल्लू बनवला बटलरला...
सगळे बॉल बाहेर जात होते. बटलर नॉनस्ट्राईकर एंडवरून बघत होता.
बटलर स्ट्राईकला येताच पहिलाच बॉल आत. दांडका !

आपल्या इनिंग्च्या शेवटच्या काही ओव्हर्स बघणे त्रासदायक होते. इंग्लंड ने पुढे तोच आनंद मिळवून दिला Happy अर्धदीपला आधी का खेळवला नाही असा विचार नक्की करायला लावला असणार आज त्याने द्रविडला. बाकी इंग्लिश बॅटस्मनना स्विंग झेपत नाही हे बघून बाझबॉल च्या नावाखाली फ्लॅट पिच बनवली का असा प्रश्न पडला Wink

अक, त्या लेंग्थ च्या मुद्द्यावरून शेवटच्या मॅच मधे दोन डावांमधे गूड लेंग्थ बॉल नि फुल लेंग्थ्+शॉर्ट बॉल ह्यांचे प्रमाण दोन्ही डावांमधे इंटरचेंज झाले होते असे कार्थिकेयनच्या डेटा मधे वाचले.

"अर्धदीपला आधी का खेळवला नाही असा विचार नक्की करायला लावला असणार आज त्याने द्रविडला." - नाही लावला. ह्या आधीच्या दौर्यावर आणि आजच्या मॅचला लक्ष्मण कोच होता, पुढच्या मॅचपासून द्रविड आहे (पण अर्शदीप संघात नाही - हे म्हणजे अ‍ॅनलिटीकल थिंकिंगच्या प्रॉब्लेमसारखं झालंय Happy ). Happy

आजची आपली फिल्डींङ - स्पेसिफिकली कॅचिंग गचाळ होतं. ५ कॅचेस सोडले (त्यातले तीन कार्थिकने). Sad

टेस्टाचा शेवटचा दिवस फारसा पाहिला नसल्यामुळे (आणि निकालामुळे खुदाई खिन्नता आल्यामुळे) त्या विषयावर काही लिहीलं नाही.

असामी, डेटा शोधून सांगितल्या बद्दल धन्यवाद.

आता पंत, श्रेयस, बुमरा आणि कोहली आल्यावर दुसऱ्या सामन्यात कोणाला बसवणार हे इंटरेस्टिंग असेल.

जडेजा अक्षर च्या ऐवजी 100% टीम मध्ये येतो.

अ‍ॅनलिटीकल थिंकिंगच्या प्रॉब्लेमसारखं झालंय >> Happy त्यावरून टेस्ट नि लिमिटेड क्रिकेट साठी वेगळे कोच असावेत का ? त्यामूले अ‍ॅप्रोअच वेगळा असेल नि संघ पण वेगवेगळ्या प्रकारे बनवले जातील.

इंग्लंड ने तरी हा एप्रोच वापरायचं ठरवलं आहे.

टेस्ट क्रिकेट आणि लिमिटेड ओव्हर क्रिकेट मध्ये वेगळे कोच आणि कर्णधार.

रोहित शर्मा सलग 13 T-२० आंतरराष्ट्रीय सामने जिंकणारा जगातील पहिला कर्णधार बनला आहे..

आजचा १४ वा सामना जिंकून मालिका खिश्यात टाकणार का..
आज मोठा संघबदल अपेक्षित आहे..

आजची आपली फिल्डींङ - स्पेसिफिकली कॅचिंग गचाळ होतं. ५ कॅचेस सोडले (त्यातले तीन कार्थिकने).
>>>>

एक स्टंपिंगही ऑलमोस्ट सोडलेलीच.
चुका होतात. त्याचे काही नाही. पण ओवरऑल बॉल पकडतानाही काही चार्म दिसत नव्हता. स्पेशली चुम्मा जे कसोटीत सुपरमॅनसारखे उड्या मारून बॉल अडवत होता त्या पार्श्वभूमीवर हे ऊठून दिसले. त्यामुळे जर कार्तिकला फिनिशर म्हणून फिट करायला कीपर म्हणून संघात घेतले तर तिथे फटका बसेल.

शर्मा आणि पंत ने तुफानी स्टार्ट दिली होती पण आता 2 ओव्हर्स मध्ये कोलॅप्स झाला आहे.

नवोदित बॉलर ग्लीसन ने तीन झटके दिले आहेत. कोहली परत एकदा फेल.

171 च टार्गेट. जडेजा ची खूप इम्पॉर्टन्ट इंनिंग.

चांगली बॉलिंग केली तर मॅच जिंकू शकतो. पीच ची फास्ट बॉलर्स ना मदत मिळतेय.

फेरफटका

हो, फॉर्मात असलेल्या बॅट्समन ला बसवणे नेहमीच टफ डिसिजन असतो.

माझ्या मते तरी जो पर्यंत सिलेक्टर्स कोहली ला पिक राहतील तो पर्यंत त्याला बसवणार नाहीत.

अजून सामना संपला नाही पण जिंकूच Happy

शर्मा बाप कप्तान आहे हे पुन्हा पुन्हा तो दाखवून देतोय. काश कसोटीत असता तर जिंकायचीच होती ती..

चुम्माला या फॉर्मेटमध्ये ओपनिंगला पाठवायची केव्हापासून वाट बघत होतो मी. देर आये दुरुस्त आये. त्याच्यासोबत राहतील कायम तर मजा येईल. आज किपींगला तो मागे असल्याचा फरकही लगेच जाणवून आला. वर्ल्डकपला कीपर म्हणून पंतच हवा. तसेच जर तो पुढे येऊ लागला तर सध्या जो त्याचा ऑफस्टंप बाहेरच्या लाईनचा ईश्यू चालू आहे तो देखील तुर्तास सुटेल.

कार्तिकला आज पुढे यावे लागले तसे तो थोडा गडबडला. त्याचे पण दुर्दैव्य असे की जेव्हा सामना त्याच्या स्लॉटला गेला तेव्हा तो धावबाद झाला.

जडेजा पांड्यासोबत दुसरा अष्टपैलू म्हणून पर्रफेक्ट बसत आहे या फॉर्मेटमध्ये असे वाटते.

कोहलीने आता पुर्ण फ्लॉप जावे असे वाटू लागलेय. जेणेकरून कसलाही संभ्रम न ठेवता त्याला बाहेर ठेवता येईल. चाहतेही आरडाओरडा करणार नाही.
आजच्याच टीममध्ये कोहलीला बाहेर काढा, आणि राहुल किंवा हूडाला त्या जागी टाका, जवळपास वर्ल्डकपची प्लेईंग ईलेव्हन दिसू लागेल.

मालिका जिंकलो. वेल डन टू कप्तान रोहित आणि टीम.

होपफुली आपण हा बॅटिंग मध्ये ऑल आऊट अटॅक एप्रोच कायम ठेऊ.

भुवनेश्वर ने परत एकदा नव्या बॉल ने तुफान स्विंग बॉलिंग केली. पंत ने क्लोज इन उभा राहून बटलर चा घेतलेला कॅच हि झकास होता.

बुमरा ने लिविंगस्टन ची उडवलेली दांडी पण एकदम भारी वाटली .

आजच्याच टीममध्ये कोहलीला बाहेर काढा, आणि राहुल किंवा हूडाला त्या जागी टाका, जवळपास वर्ल्डकपची प्लेईंग ईलेव्हन दिसू लागेल. >> असे काही होणार नसल्यामूळे ...... जोवर कोहली सिलेक्ट केला जाईल तोवर तो संघात खेळेलच असे मलाही वाटते. डीके जर सतत फ्लॉप गेला तर त्याची जागा पण हूडाला देता येईल. तो ५-६ वर पण खेळलाय मस्त यंदा. एक स्पेअर बॉलर पण मिळेल. उद्या आपल्याला चेस करायला लागावा म्हणजे तो पण सराव होईल.

भुवी ची बॉलिंग बघून तो रेड क्रिकेट मधे खेळू शकत नाही ह्याचे वाईट वाटत राहते. कदाचित कदाचित पाचवी टेस्ट ........

भुवनेश्वर आणि इतरही स्विंग बॉलर्स च्या बाबत माझ्या डोक्यात एकाच शंका आहे.

वर्ल्ड कप च्या वेळी जेव्हा ऑस्ट्रेलियन उन्हाळा सुरु झाला असेल तेव्हा अंडर द लाईट्स बॉल कितपत मूव्ह होईल.

“ भुवी ची बॉलिंग बघून तो रेड क्रिकेट मधे खेळू शकत नाही ह्याचे वाईट वाटत राहते. कदाचित कदाचित पाचवी टेस्ट” - अगदी, अगदी.. आजच एका मित्राशी बोलताना हेच बोलणं झालं.

*भुवनेश्वर आणि इतरही स्विंग बॉलर्स च्या बाबत माझ्या डोक्यात एकाच शंका आहे.* - माझीही एक शंका आहे. भुविसारखा गुणी गोलंदाज अनुकूल अशा इंग्लंडमधील वातावरणात व पिचेसवर आत्तापर्यंत अनेक वेळा खास प्रभावी कां ठरला नाहीं ?

भाऊ, त्याच्या सततच्या दुखापतींमुळे तो इंग्लंड आणि इतर देशात एकूणच खूप कमी कसोटी सामने खेळलाय. न्यूझीलंड मध्ये तर तो अजून एकही सामना खेळला नाही.

त्या मर्यादित कसोटी सामन्यताला इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेतला रेकॉर्ड खूप चांगला आहे.

पण हे नाकारता येणार नाही कि त्याचा मर्यादित षटक सामान्यातला रेकॉर्ड खूप चांगला नाही.

भुविसारखा गुणी गोलंदाज अनुकूल अशा इंग्लंडमधील वातावरणात व पिचेसवर आत्तापर्यंत अनेक वेळा खास प्रभावी कां ठरला नाहीं ? >> तो फार कमी मॅचेस खेळलाय असे मला आठवतय त्याप्रमाणे. दुखापत हे मुख्य कारण. स्विंग होत असलेल्या ठिकाणी तो फेल गेल्याचे क्वचितच आठवते.

त्याचा मर्यादित षटक सामान्यातला रेकॉर्ड खूप चांगला नाही. >> नुसते आकडे बघितले तर हे बरोबर आहे पण जनरली बॅट्समन धार्जीण्या खेळांमधे नि तो जिथे मुख्यत्वे जिथे बॉलिङ करतो - पॉवरप्ले, फिल्डींग रेस्ट्रिक्शन असलेले ओव्हर्स नि स्लॉग ओव्हर्स हे बघता ......

उमरान मलिक जर अचू़क राहू शकत नसेल तर एव्हढा पेस लायेबिलिटी ठरत जाणार असे वाटू लागलय. पॉवर प्ले मधे तर नक्कीच नको असे वाटण्याएव्हढा पसरतोय तो.

लोकहो ही मॅॅच पहा.
गुजरात मधल्या एका गावात फेक IPL खेळवली गेली. राशिअन पंटर्स साठी. फेक हर्षा भोगले कॉमेंटरी
करत होता. पहा टाईम्स ऑफ इंडिया मधील बातमी . गुगल " FAKE IPL in गुजरात"
हहपुवा!!
एक कॉमेंट --- नाहीतरी "खरी IPL" म्हणजे तरी काय आहे ?

Pages