क्रिकेट - ७

Submitted by ऋन्मेऽऽष on 8 January, 2022 - 10:41

कोरोनाचा प्रादुर्भाव तुलनेत कमी झाल्याने भरगच्च क्रिकेट आहे येत्या वर्षात. धाग्यावर चर्चाही तितकीच रंगू द्या Happy

क्रिकेटचा मागचा धागा ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/77883

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

महिलांनी बांगला देश विरुद्धचा सामना जिंकल्या सारखाच आहे . आता दक्षिण आफ्रिके विरुध्द जिंकायला हवा उपांत्य फेरीत प्रवेशासाठी . पण तो सोपा असणार नाही .

आता दक्षिण आफ्रिके विरुध्द जिंकायला हवा उपांत्य फेरीत प्रवेशासाठी . पण तो सोपा असणार नाही .
>>>
न जिंकताही जाऊ शकतो सेमीला.
कारण विंडीजसमोर सुद्धा तेच आव्हान आहे.
आपला रनरेट भारी आहे ही जमेची बाजू. आजही मोठा विजय आहे

कारण विंडीजसमोर सुद्धा तेच आव्हान आहे.>>>
आणि विंडीज जिंकले आणि इंग्रज त्यांचे दोन्ही सामने जिंकले तर( जी शक्यता जास्त आहे कारण पाकिस्तान आणि बांग्ला आहे समोर त्यांच्या)?

ईंग्लंड दोन्ही जिंकायची शक्यता आहे त्यामुळे ते पार होतील हे गृहीत धरूनच आहे.
विंडीज आफ्रिका उद्याच आहे, त्यामुळे आपल्याला आफ्रिकेशी जिंकावे लागेल की नाही हे उद्याच समजेल.

आफ्रिका विंडीज विरुद्ध जिंकले तर आपण चौथे असू
>>>
मग आपल्यालाही आफ्रिकेविरुद्ध जिंकावे लागेल
अन्यथा ईँग्लंड सेमीला जाऊ शकते पाक-बांग्लाला हरवून जे नक्कीच शक्य आहे.

83 हॉटस्टारवर आलाय
ज्यांचा बघायचा बाकी असेल वा पुन्हा बघायचा असेल Happy

बांग्लादेशच्या अफ्रिक दौर्‍यात काल बांग्ला नी ३र्‍या वनडेमधे अफ्रिकेला हरवलं अन २-१ लीड घेतला
पहिल्या वनडे मधे ३१५ सक्सेसफुली चेझ केल्यावर दुसर्‍या सामन्यात पहिली बॅटिंग करताना बांग्ला नी माती खाल्ली अन १९५ चं टार्गेट दिलं.
पण काल मात्र अफ्रिकेला १५४ मधे गुंडाळून साडेतेवीस ओव्हर्स अन ९ गडी राखून थाटात विजय मिळवला.

अजून २ सामने बाकी आहेत. पण बांग्ला स्ट्राँग दिसताहेत.

अजून २ सामने बाकी आहेत.>>> त्या टेस्ट आहेत.. मालिका जिंकले बांग्ला. झाला कालच नागीन डान्स Happy

आज वेस्ट इंडीज आणि आफ्रिकेचा सामना संपला नाही . १ -१ गुण मिळाला तर ? >>>

एकेक गुण दिला देखिल! आता भारतीय महिलांना जिंकणे आवश्यक! कारण आता पाचव्या क्रमांकावर आहे!

आफ्रिका - आफ्रिका - ऑस्ट्रेलिया
असे सलग तीन सामने जिंकावे लागतील आता वर्ल्डकप ऊचलायला

भारत आफ्रिका सामना देखील पावसाने अनिर्णित राहिला तर तो एक सेमीचा चान्स आहे.
पण त्या केसमध्ये सेमी ऑस्ट्रेलियाशी खेळावी लागेल.

धोनी कप्तान नाही हे तर आधीच ठरलेले ना.. जडेजाबाबत आता आली का ऑफिशिअल स्टेटमेंट.. धोनी असतानाच जडेजाला कप्तानीचा अनुभव देणे. योग्य निर्णय सीएसकेचा..

ऑस्ट्रेलियाने ३५१ धावांचे टारगेट दिले. पाकिस्तान दिवसाखेरीस ७३/०
आता एका दिवसात हवेत २७८ आणि १० विकेट हातात..
ऑस्ट्रेलिया कसोटीचा रोमांच नेहमीच जिवंत ठेवते..

हो, मागेच खबर वाचलेली. बहुधा सूत्रांमार्फत असावी. ऑफिशिअल डिक्लेअर केले नसावे. पण अश्या बातम्या लपत नाहीत वा असे निर्णय एका रात्रीत होत नाहीत. बहुधा रिटेंशनच्या वेळीच खबर होती. म्हणून जड्डूला १६-१७ करोड दिले.

बहुधा रिटेंशनच्या वेळीच खबर होती. म्हणून जड्डूला १६-१७ करोड दिले. >> त्याचा कप्तान असण्याशी संबंध नसून संघात असण्याशी होता. जर भर सीझनमधे धोनी संघातून बाहेर निघाला तर कमी पैसे अडकतील. हे खुद्द धोनीनेच सांगितले होते.

चौथ्या दिवशी वॉर्नरला पिच वर चालू नको अशी ताकीद मिळाली. तो क्रीजबाहेर गारड घेऊन खेळत होता नि फ्रंट फूट्वर कमीत करून दोन पावले पुढे येत बॉल तटवून मग मागे चालत जात असे. कमीट होताना जिथे पाय येत असे तो नो मॅन'स लँड असतो - अगदी क्रिजबाहेर स्टान्स घेतला तरी. मला हे माहित नव्हते.

त्याचा कप्तान असण्याशी संबंध नसून संघात असण्याशी होता.
>>>
ते ही होते आणि हे ही प्लानिंग होते.
म्हणून तर म्हटले आतली खबर होती Happy

*दोन पावले पुढे येत बॉल तटवून मग मागे चालत जात असे. * - मला वाटतं, अंपायरने पुढे येवून खेळण्याला आक्षेप घेतला नव्हता तर मागे जातांना पीच खराब न करतां जाण्याचा आग्रह धरला होता. वॉर्नरने उगीचच त्याचा एवढा बाऊ केला, असं माझं तरी मत झालं.

यंदा आजच्या तारखेला तरी आयपीएलबद्दलची उत्सुकता कमी वाटतेय.
पहिले कारण धोनी कप्तान नाहीये. अन्यथा पाचवी ट्रॉफी मिळवतो का ही उत्सुकता पुर्ण आयपीएल राहिली असती.
दुसरे म्हणजे शर्मा भारताचा कप्तान झाल्यापासून जो विजयाचा धडाका लावलाय त्यासमोर आता त्याचे आयपीएल जिंकणे फिके वाटू लागलेय. लवकर आयपीएल संपावी आणि शर्माच्या कप्तानी ईंटरनॅशनल सामने सुरु व्हावेत असे वाटतेय.
तिसरे म्हणजे चुम्मा. त्याने आयपीएलमध्ये जीव काढण्यापेक्षा पुढच्या आंतरराष्ट्रीय महत्वाच्या सामन्यांसाठी फिट राहावे असे वाटतेय.

अर्थात हे आज वाटतेय. कदाचित आयपीएल सुरू झाल्यावर रोज सवयीनेच बघितले जातील एकूण एक सामने...

*.....आयपीएलबद्दलची उत्सुकता कमी वाटतेय.* -
उत्सुकता वाढेल असंही एक कारण - राष्ट्रीय संघात स्थान मिळवण्यासाठी आधी आयपीएलमधे केलेली धडपड व राष्ट्रीय संघात स्थिरावल्यानंतरचा त्याच खेळाडूचा आयपीएल मधला आताचा खेळ, यातील बरा/वाईट फरक अभ्यासणे.

दोन नावे चमत्कारीक आहेत Happy

Sachin Tendulkar’s Playing XI:

Virender Sehwag, Sunil Gavaskar, Brian Lara, Viv Richards, Jacques Kallis, Sourav Ganguly, Adam Gilchrist, Shane Warne, Wasim Akram, Harbhajan Singh, and Glenn McGrath.

https://thecricketlounge.com/2022/01/sachin-tendulkar-didnt-include-vira...

जो रूट च्या जीवावर इंग्लंड ने न्यूझीलंड विरुद्ध पहिली टेस्ट मॅच काढली.

सध्याचा फॉर्म बघता रूट हाच सचिन च्या टेस्ट मॅच रेकॉर्ड (15900+ धावा) च्या जवळपास पोचेल असे वाटते.

विराट आणि स्मिथ यांचे वय आणि सध्याचा फॉर्म (विराट च्या बाबतीत) ते 10000 धावा हि क्रॉस करतील असे वाटत नाही.

Pages