Submitted by ऋन्मेऽऽष on 8 January, 2022 - 10:41
कोरोनाचा प्रादुर्भाव तुलनेत कमी झाल्याने भरगच्च क्रिकेट आहे येत्या वर्षात. धाग्यावर चर्चाही तितकीच रंगू द्या 
क्रिकेटचा मागचा धागा ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/77883
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मुंबई सर्वबाद ३७४
मुंबई सर्वबाद ३७४
सरफराज १३४
पुरेसे आहेत वाटते. वेगवान गोलंदाज जिंकवतील ईथे..
सुर्या पहिल्याच बॉलला गेला.
सुर्या पहिल्याच बॉलला गेला. कसा खेळला तो. ईंग्लिश कंडीशन्स आहेत. बॉल थोडाफार स्विंग होणार हे विसरला वाटते.
हॅट्स ऑफ टू चंद्रकांत पंडित..
हॅट्स ऑफ टू चंद्रकांत पंडित...
नॅशनल कोच स्टाफमधे असायला पाहिजे हा.
पंडितांची कोचिंग स्टाईल बघता
पंडितांची कोचिंग स्टाईल बघता ते नॅशनल टीम मध्ये चालणे अशक्य आहे.
रोहित कॉवीड पॉसिटीव्ह आल्या
रोहित कॉवीड पॉसिटीव्ह आल्या मुळे एजबॅस्टन कसोटी सामन्यासाठी मोठा पेच तयार झाला आहे.
जर त्याची RTPCR नेगेटिव्ह आली नाही तर पंत हा कर्णधार असणार आहे.
आता ची परिस्थिती बघता पुजारा किंवा विहारी ला बकरा बनवून ओपनिंग पाठवतील असे वाटते.
"आता ची परिस्थिती बघता पुजारा
"आता ची परिस्थिती बघता पुजारा किंवा विहारी ला बकरा बनवून ओपनिंग पाठवतील असे वाटते." - मयंक ला घेतलंय टीममधे. त्याआधी मला भारत किंवा विहारी ओपन करतील असं वाटलं होतं.
मध्य-प्रदेश चं जोरदार अभिनंदन!! मुंबईसारख्या बलाढ्य टीमला फायनल मधे हारवणं सोपं नाहीये. चंद्रकांत पंडित ने विदर्भ, मध्य-प्रदेश सारख्या तुलनेनं दुबळ्या संघांना रणजी विजेते पदाची चव चाखवली हे त्याचं कौतुक आहे.
काल भारतीय संघ अपेक्षेप्रमाणे जिंकला. हूडाचं कौतुक आहे. सुरूवातीला चाचपडत असताना विकेट टाकली नाही आणि नंतर जम बसल्यावर मॅच जिंकून दिली. उम्रान मलिक ला एकच ओव्हर मिळाली. कदाचित पुढची मॅच पूर्ण २० ओव्हर्सची झाली तर त्याला जास्त अॅक्शन मधे बघता येईल.
"ईंग्लिश कंडीशन्स आहेत." - हे
"ईंग्लिश कंडीशन्स आहेत." - हे वाक्य वाचून मजा वाटली. स्विंगिंग कंडीशन्स ना सहजतेनं 'इंग्लिश कंडीशन्स' म्हटलं जातं. आयर्लंड आणी इंग्लंड मधे अहमदाबाद आणि कराची इतकं (लिटरली) अंतर आहे.
अहमदाबाद आणि कराची ते कोलंबो
अहमदाबाद आणि कराची ते कोलंबो आणि ढाका सगळ्याच कंडीशन्सना भारतीय उपखंडाखाली मोजले जाते
पंडितांची कोचिंग स्टाईल बघता
पंडितांची कोचिंग स्टाईल बघता ते नॅशनल टीम मध्ये चालणे अशक्य आहे. >> बरोबर, अगदी मुंबई मधे सुद्धा वाद झाले होते. पण अमेझिंग मेंटल कोचिंग असणार हे नक्कीच. एक पतिदार नि कार्तिकेयन वगळता माहित नसलेले खेळाडू ज्या जिगर मधे खेळलेत कि यंव. कदाचित अ टीम चे कोचिंग करायला हरकत नसावी.
मयंक ला घेतलंय टीममधे. त्याआधी मला भारत किंवा विहारी ओपन करतील असं वाटलं होतं. >> मूळात राहुल जाणार नाही कळल्यावर तिसरा ओपनर न नेणे हाच आचरट पणा होता. आता मयांक चा बकरा., त्यापेक्षा भारत ला ओपन करू दे. रोहित ने नेहमीप्रमाणे श्रीगणेशा करताना काही तरी घोळ होउन द्यायची प्रथा सुरूच ठेवली.
हूडाची कालची बॅटींग स्पेशल होती. सुरूवातीला स्वैग समोर चाचपडत होता ते सोडून दे. नं तरही मधेच बीट होत होता फुल पिच्ड बॉल वर पण त्याने कसलाही लोड न घेता मॅच काढली. स्विंग समोर हूडा, स्काय नि पांड्या पण चाचपडत होते. इशान किशन कंफरटेबल होता हा मजेशीर प्रकार म्हणायचा.
"मूळात राहुल जाणार नाही
"मूळात राहुल जाणार नाही कळल्यावर तिसरा ओपनर न नेणे हाच आचरट पणा होता. " - सहमत!! इंग्लंडला टेस्ट खेळायला जाताना अगदीच श्रीलंकेला गेल्यासारखे गेले आहेत.
भारत फर्स्टक्लासमधे नाही तरी लिस्ट ए मॅचेसमधे बर्यापैकी वरच्या क्रमांकावर बॅटींग करतो. प्रॅक्टीस मॅचमधे सुद्धा ओपनिंग ला आला होता. त्यामुळे तो चांगला कँडिडेट आहे ओपनिंगचा. पण तरिही मयंक जर फिट आणि अॅव्हेलेबल असेल, तर त्याला प्रॉपर ओपनर म्हणून भारतच्या आधी संधी मिळावी / मिळेल असं वाटतंय.
पंडितांची कोचिंग स्टाईल बघता
पंडितांची कोचिंग स्टाईल बघता ते नॅशनल टीम मध्ये चालणे अशक्य आहे. >> बरोबर, अगदी मुंबई मधे सुद्धा वाद झाले होते. पण अमेझिंग मेंटल कोचिंग असणार हे नक्कीच. एक पतिदार नि कार्तिकेयन वगळता माहित नसलेले खेळाडू ज्या जिगर मधे खेळलेत कि यंव. कदाचित अ टीम चे कोचिंग करायला हरकत नसावी. >>>>>
पंडित हे पूर्वी भारतीय U19 टीम चे हेड कोच आणि अ टीम चे चीफ सिलेक्टर होते (राहुल, मयांक, हर्षल इत्यादींची बॅच).
त्या कामात फारसा रम नसल्याने सोडून परत रणजी मध्ये कोचिंग करायला आले.
IRE v IND, 2nd T20I
IRE v IND, 2nd T20I
IRE 164-4 (15)
IND 225-7 (20)
Harry Tector*: 29 (21)
George Dockrell: 14 (4)
Umran Malik 3-0-31-1
Ireland need 62 runs in 30 balls
आज एव्हढे फुल टॉस का पडत होते
आज एव्हढे फुल टॉस का पडत होते ? लेंग्थ चुकणे समजू शकते पण आज प्रमाण जास्तच वाटले.
हूडा मोठी पंचाईत करून ठेवणार आहे निवड समितीची
“हूडा मोठी पंचाईत करून ठेवणार
“हूडा मोठी पंचाईत करून ठेवणार आहे निवड समितीची” - तो मध्यन्तरी कुठल्याश्या सिरीजमधे मिडल ऑर्डरमधे होता ना? सगळ्यात मोठी पंचाईत अय्यरची होईल. दोघंही एकाच स्पॉटसाठी स्पर्धेत आहेत.
आज शेवटी एकदाचं गंगेत घोडं न्हालं (संजू सॅमसन लौकिकाला साजेसं खेळला).
जिथे आयर्लंडने सुद्धा
जिथे आयर्लंडने सुद्धा सव्वादोनशे मारले तिथे कोणाचे आकडे फारसे काऊंट होतील असे वाटत नाही. हूडाला यातून कॉन्फिडन्स मिळू शकतो. पण त्याला वर्ल्डकपची ट्रेन पकडायची असल्यास पुढच्या संधीत स्वत:ला प्रूव्ह करावे लागेल. हेच सॅमसनलाही लागू. किंबहुना मोठ्या संघाविरुद्ध खेळतानाही सॅमसन ज्या नंबरवर खेळण्याची शक्यता आहे त्या नंबरवर टेस्ट होणे गरजेचे. विश्वचषक अंतिम एकादश जे काही असेल, प्रत्येकाला आपले रोल क्लीअर असावेत. पांड्या कार्तिक जोडीने आता कंपलसरी पुढचे सारे सामने ५-६ नंबरवर खेळावेत. अय्यर हूडा सुर्या सारे चौथ्या नंबरच्या स्पर्धेत आहेत. त्यात अय्यर मला आधीपासूनच शॉर्ट बॉल प्रॉब्लेम आणि ऑस्ट्रेलियात वर्ल्डकप असल्याने यांच्यात मागे वाटतोय. पण सुर्या देखील खेळून जमाना झाला असे वाटते आहे. जर कार्तिकला सहाव्यावर खेळवायचे ठरवले तर पंत देखील चौथ्या क्रमांकाच्या स्पर्धेत उभा राहील. आणि त्याने आपला ऑफ स्टंप लाईनचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला तर त्याचे लेफ्टी असणे त्यालाही स्पर्धेत पुढे ऊभे करते.
रोहित परत positive
रोहित परत positive
बुमारा कॅप्टन (कुंबळे नंतरचा पहिला बोलर कॅप्टन)
तो मध्यन्तरी कुठल्याश्या
तो मध्यन्तरी कुठल्याश्या सिरीजमधे मिडल ऑर्डरमधे होता ना? सगळ्यात मोठी पंचाईत अय्यरची होईल. दोघंही एकाच स्पॉटसाठी स्पर्धेत आहेत. >> त्याला एक निश्चित असा नंबर दिलेला नव्हता. आयपीलमूळे टॉप ऑर्डर मधे खेळला नि क्लिक झाला. स्किडी ऑफ स्पिन टाकू शकतो हा एक प्लस आहे. त्याला ह्या दोन सामन्यामधे १-२ ओव्हर्स दिल्या गेल्या असत्या तर बरे झाले असते. जर २-३ ओव्हर्स काढू शकला नि जर पहिले तिघे - राहुल, रोहित नि कोहली असणारच असे असेल तर ४,५,६,७ मधे पांड्या, स्काय्/अय्यर, कार्तिक, हूडा असा प्रयोग ही करता येऊ शकतो. अर्थात ह्यात हर्शद पटेल उडणार ( चहल, बुमरा, भुवी नि एक लेफ्टी बॉलर्/आवेश्/उमरान) . अय्यर ला पण फ्लोटर म्हणून वापरून स्पिनर्स विरुद्ध वापरता येऊ शकते. एक तर तो स्पिनर ची पिसे काढणार किंवा फास्ट बॉलर त्याच्या विरुद्ध वापरायला लागल्यामूळे स्पिनर चा कोटा नंतर उपलब्ध होईल.
इंग्लंड विरुद्ध
इंग्लंड विरुद्ध
१. जाडेजा, अश्विन कि स्पिनर, ठाकूर ?
२. ओपनर मयांक कि भरत कि पुजारा ?
पुजारा खेळणार की नाही हि चर्चा वाचली पण माझ्या साठीतरी हा मुद्दा व्यर्थ आहे. तो कसाही खेळला तरी ह्या संघात त्याच्या करंट फॉर्म नि परिस्थिती मधे त्याला तीन वर ह्या टेस्ट मधे पर्याय नाही.
"इंग्लंड विरुद्ध
"इंग्लंड विरुद्ध
१. जाडेजा, अश्विन कि स्पिनर, ठाकूर ?
२. ओपनर मयांक कि भरत कि पुजारा ?" - क्रिकइन्फोवर हा लेख वाचला. तुझं खरंय. पुजारा खेळणार आणि तिसर्याच नंबरवर खेळणार. तसंच मयंक ओपन करेल हे सुद्धा ऑलमोस्ट खरंय. तसं नसतं तर त्याला इतक्या तातडीनं इंग्लंडला पाठवलं नसतं. तसंच तो प्रॉपर ओपनर आहे. त्यामुळे
त्याला आधी संधी मिळेल हे बहुतांशी नक्की आहे.
अश्विन खेळेल हे सुद्धा मला बर्यापैकी निश्चित वाटतंय. ठाकूर आणि जडेजा पैकी मला जडेजा अधिक रिलायबल वाटतो. एजबेस्टन ला स्विंग बॉलर्स ना कितपत मदत मिळते ह्यावर ह्याचा निकाल लागेल.
मयांक ला इंग्लंड ला पाठवल्या
मयांक ला इंग्लंड ला पाठवल्या नंतर माझ्या मते तरी हि बॅटिंग ऑर्डर असेल.
गिल, मयांक, पुजारा, कोहली, विहारी, पंत, जडेजा/शार्दूल, अश्विन, बुमरा, शमी, सिराज/प्रसिद्द
जडेजा/शार्दूल आणि सिराज/प्रसिद्द हा चॉईस पिच आणि वातावरणा वर डिपेंड करतो.
किंवा बॅटिंग स्ट्रॉंग
किंवा बॅटिंग स्ट्रॉंग करण्यासाठी जडेजा, अश्विन आणि शार्दूल तिघा नाही खेळवू शकतात.
3 ऑल राउंडर आणि 2 स्पेशालिस्ट बॉलर
किंवा बॅटिंग स्ट्रॉंग
किंवा बॅटिंग स्ट्रॉंग करण्यासाठी जडेजा, अश्विन आणि शार्दूल तिघा नाही खेळवू शकतात. >> कोहली असेतो आपण नेहमी आक्रमक खेळत आलोय. द्रविड त्याच्या एव्हढा नसला तरी अॅग्रेसीव्ह आहे त्यामूळे २ स्पेशलिस्ट सीम बॉलर्स घेऊन खेळवणे कठीण वाटते. तीन सीमर्स तरी असतीलच असा माझा अंदाज आहे.
हो, मलाही वाटते कि आपण
हो, मलाही वाटते कि आपण मालिकेच्या दृष्टीने पुढे असल्याने आक्रमणावरच भर द्यावा.
पण हे मानावे लागेल कि हि बॅटिंग ऑर्डर अजिबात कॉन्फिडन्स देत नाही कि 300+ धावा बोर्डावर लावतील.
जडेजा, अश्विन आणि शार्दूल
जडेजा, अश्विन आणि शार्दूल
>>>
असे बिलकुल नाही होणार. ईंग्लंडने जसे तुडवलेय न्यूझीलंडला ते पाहता गोलंदाजीत व्हरायटी आणि दमखम हवा. जो रूटचा डिफेन्स भेदू शकतील आणि बेअरस्ट्रोला चकवू शकतील असा प्लान हवा. अन्यथा या ईंग्लंड टीमसमोर एक्स्ट्रा फलंदाजी शून्य कामाची आहे. तिसरा वेगवान मला तरी सिराजच दिसतोय. शार्दुल गेल्या वेळी चमकलेला. तो ही कायम राहील असे वाटतेय. जडेजा आश्विन पैकी एकाचा निर्णय व्हायचा आहे. मी आश्विनसोबत गेलो असतो.
गेल्यावेळी शमी बुमराह यांनीही मोक्याच्या वेळेला फलंदाजीत योगदान दिले होते.
हि बॅटिंग ऑर्डर अजिबात
हि बॅटिंग ऑर्डर अजिबात कॉन्फिडन्स देत नाही कि 300+ धावा बोर्डावर लावतील.
>>>>
गेल्यावेळचे टॉप स्कोअरर आणि जिंकलेल्या सामन्यातील सामनावीर शर्मा आणि राहुल एकाच वेळी नसणे आणि त्याजागी असलेले पर्यायही या कंडीशनमध्ये काही विशेष न केलेले असणे हा धक्का आहेच.
पण जिंकायचे असेल तर आता यांनाच जबाबदारी घेत खेळावे लागणार.
पंत या कसोटीत खेळेल असा एक सिक्स्थ सेन्स सांगतोय सरावसामन्यानंतर... ऑस्ट्रेलियातही त्याने सराव सामन्यात चमकल्यावर मग ईतिहास रचला होता..
माझा अंदाजः मयंक, गिल, पुजारा
माझा अंदाजः मयंक, गिल, पुजारा, कोहली, विहारी, पंत, अश्विन, जडेजा/शार्दूल, शामी, बुमराह, सिराज
बर्मिंगहॅम वरून वार्तांकन
बर्मिंगहॅम वरून वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांच्या पोस्ट्स वरून तरी वाटतंय कि जडेजा आणि अश्विन दोघेही खेळण्याचे चान्सेस आहेत.
हूडाला इंग्लंड च्या विरुद्ध
हूडाला इंग्लंड च्या विरुद्ध टी २० संघामधे ठेवून आयर्लंड मधल्या रन्स ला मह्त्व दिल्याचे निवड समितीने दाखवून दिलय.
बिचरा अर्शदीप, एकही सामना न खेळता बाहेर गेलाय. (पहिल्या सामन्यातही खेळेल असे वाटत नाही - भुवी, हर्शद, आयेऊन्नि उमरान च्या पुढे येऊन) फास्ट डावखुरा ही अॅसेट असायला हवे ना ?
हूडा पुढच्या मालिकेत आहे
हूडा पुढच्या मालिकेत आहे म्हणजे आयर्लंडमधील रन्सला महत्व दिले हे मजेशीर लॉजिक आहे
त्याला आयर्लंडला फलंदाजीची संधीही मिळाली नसती तरीही त्याला पुढच्या मालिकेत संधी द्यायला ठेवलेच असते ना..आधीच्या मालिकेतही तो होता ना..
त्याला आयर्लंडला फलंदाजीची
त्याला आयर्लंडला फलंदाजीची संधीही मिळाली नसती तरीही त्याला पुढच्या मालिकेत संधी द्यायला ठेवलेच असते ना.. >> भारतीय क्रिकेट फॉलो करण्यार्या माणासाने हा प्रश्न विचारावा हे मजेशीर लॉजिक आहे . आयर्लंड च्या सिरीजला तुझा देखील काडीचीही किम्मत नाही हे माहित आहे त्यामूळे तुझ्या द्रूष्टीने फिक्स्ड आयपील मधल्या विजया इतके मोल त्याला आहे असे समजू शकतोस. तू निवड समितीच्या आसपासही नाहीस ह्याचा मला आनंद वाटतो.
Pages