Submitted by ऋन्मेऽऽष on 8 January, 2022 - 10:41
कोरोनाचा प्रादुर्भाव तुलनेत कमी झाल्याने भरगच्च क्रिकेट आहे येत्या वर्षात. धाग्यावर चर्चाही तितकीच रंगू द्या 
क्रिकेटचा मागचा धागा ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/77883
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
विकेटवर अन-इव्हन बाऊन्स आहे.
विकेटवर अन-इव्हन बाऊन्स आहे. जर भारतीय बॉलर्सना सीम मूव्हमेंटची जोड मिळाली तर इंग्लंडसाठी शेवटची बॅटींग सोपी नसेल. पण गेल्या काही दिवसांत मोठ्या धावसंख्येचा पाठलाग इंग्लंडने लीलया केलाय. त्यामुळे त्यांचा कॉन्फिडन्स वाढलेला आहे. एकंदरीत चौथी इनिंग चुरशीची होऊ शकते. पण त्यासाठी भारताला मोठी धावसंख्या उभारावी लागेल. उद्याचा दिवस मॅचच्या रिझल्टच्या दृष्टीनं खूप महत्वाचा आहे.
कोहलीची कीव येतीय आता . या
कोहलीची कीव येतीय आता . या वेळेस पुजारा ने शतक मारावे अशी अपेक्षा.
जिंकतोय आपण. काल दिवसाखेरीस
जिंकतोय आपण. काल दिवसाखेरीस पंतचे नाबाद असणे यानेच ईंग्लिश खेळाडूंना झोप आली नसेल.. आज फ्रेश नाही दिसणार ते जास्त. त्यामुळे आपल्या विकेट गेल्याच तर त्यांच्याही जातीलच. २५७ चे ३५७ झाले तरी पुष्कळ ठरू शकतील. आणि ते होतीलच. कारण पुज्जी पंत तर आहेतच, मागे जडेजा आणि झाल्यास अय्यरही आहे. हे ही कमी म्हणून शमी बुमराह शार्दुल यातला एकजण तरी बॅट फिरवत हात साफ करणार.
पंत आणि पुजारा चांगले खेळले.
पंत आणि पुजारा चांगले खेळले. श्रेयस आणि शार्दूल परत फेल.
आता फक्त जडेजा वर दारोमदार आहे 400 चा टप्पा गाठण्या साठी.
३७७ पुरे.
३७७ पुरे.
आता फक्त झेल सोडू नका.
वेळ भरपूर आहे, पाउस आला नाही तर.
ऑल आऊट झाले. 378 चं टार्गेट.
ऑल आऊट झाले. 378 चं टार्गेट.
इंग्लंड कडे रेसेन्ट फॉर्म कडे बघता आपल्या ला जबरदस्त बॉलिंग करावी लागणार आहे.
इंग्लंड ने वन डे मॅच सारखी
इंग्लंड ने वन डे मॅच सारखी स्टार्ट केली आहे. 6 चा रन रेट.
शेवटच्या ५-६ विकेट ५०-६०
शेवटच्या ५-६ विकेट ५०-६० धावांत गेल्या..
आणि ईंग्लडने त्या धावा बिनबाद दहा बारा ओवरमध्ये मारल्यात..
श्रेयस आणि शार्दूल परत फेल.
श्रेयस आणि शार्दूल परत फेल.
>>>>>
गिल कोहली विहारी हे सुद्धा...
पहिल्या डावात पंत जडेजाच्या शतकात कव्हर झाले. यावेळी ते न झाल्याने गोची झाली.
तरी पंत खेळपट्टीवर असेपर्यंत आपणच ड्रायव्हिंग सीटमध्ये वाटत होतो. तो बाद होताच ईंग्लंड खेळाडूंची बॉडी लँगवेज बदलली होती.. ३५०-४०० आपण चेस करतो हा विश्वास दिसत होता.. पण हे ओपनरच मारू लागले तर अवघड होईल
वेल प्लेड इंग्लंड. एखादा
वेल प्लेड इंग्लंड. एखादा चमत्कार सोडल्यास मॅच गेली आहे आता.
ईंग्लंड खेळाडूंची बॉडी लँगवेज
ईंग्लंड खेळाडूंची बॉडी लँगवेज बदलली होती.. ३५०-४०० आपण चेस करतो हा विश्वास दिसत होता..
>>
याच अनुषंगानी बझबॉल अॅप्रोच बद्दलचा उल्लेख खूप वाचला क्रिकिन्फो वर.
बझ (मॅक्कलम) कोच झाल्यानंतर त्यानी आणलेला Aggressive play strategy with positive mindset irrespective of the situation and target हा अॅप्रोच बझबॉल अॅप्रोच असावा असं माझं मत झालंय.
चूक का बरोबर ते माहिती नाही, तुम्हा कुणाला जास्ती माहिती असली तर कृपया प्रकाश टाका.
पहिल्या इनिंग्जचा लीड (अपेक्षेपेक्षा कमी) मिळाल्यावर आपली बॉडी लँग्वेज ढेपाळली होती.
आपल्या पहिल्या डावाचा रन रेट ४.९ होता तर इंग्लंडचा ४.६
दुसर्या डावात आपण २.९९ नी रन्स केल्या तर इंग्लंडनी ४.५४ नी
हा दुसर्या डावातल्या कमी रेटनी धावा करण्याचा फटका आपल्याला बसतोय, कारण आपला लीड इंग्लंडच्या रनरेट अन शिल्लक ओव्हर्सपेक्षा कमी ठरतोय.
अजून एक रोचक स्टॅट्सः
आपण २००६-७ नंतर १५० च्या वरचा स्कोअर चौथ्या डावात डिफेंड करताना फक्त २ वेळा हरलो आहोत.
२०२२ : जोहान्स्बर्ग (२४०)
२०२२ : केपटाऊन (२१२)
२०२२ : बर्मिंगहम (३७८) ची याच लिस्टमधे अॅडिशन होणार.
या सर्व सामन्यांमधे कॉमन गोष्टी:
अन इफेक्टिव बुमरा-शमी-शार्दुल+१ पेस अॅटॅक
मेकशिफ्ट कॅप्टन
सेम थिंक टँक
कुछ तो गडबड है दया...
आपण साऊथ आफ्रिके विरुदद 2 a
आपण साऊथ आफ्रिके विरुदद 2 a आता ही तिसरी चौथ्या इंनिंगला डिफेंड करू शकत नाही असे दिसतय . परदेशात जळद गोलंदाजांना परिस्थिती अनुकूल असताना . द्रविड साहेब काहीतरी चुकतय तुमच . काल अय्यर पंत आणि शार्दूलने विकेट टाकत्या .
शास्तीबुवांच्या खडूस अँप्रोच मधे हे झाले नसते आणि चालले नसते . कोचचा रोल असा दिसतो. .
आपण साऊथ आफ्रिके विरुदद 2 a
आपण साऊथ आफ्रिके विरुदद 2 a आता ही तिसरी चौथ्या इंनिंगला डिफेंड करू शकत नाही असे दिसतय . परदेशात जळद गोलंदाजांना परिस्थिती अनुकूल असताना . द्रविड साहेब काहीतरी चुकतय तुमच . काल अय्यर पंत आणि शार्दूलने विकेट टाकत्या .
शास्तीबुवांच्या खडूस अँप्रोच मधे हे झाले नसते आणि चालले नसते . कोचचा रोल असा दिसतो. .
जर तुम्ही पाच गोलंदाज + एक
जर तुम्ही पाच गोलंदाज + एक यष्टीरक्षक खेळवत असाल तर तसेही पाच फलंदाजांची जबाबदारी किंचित वाढते.
त्या पाचपैकी गिल, विहारी, कोहली, अय्यर हे चार फलंदाज दोन्ही इनिंगला फेल जात असतील, पुजाराचे एक अर्धशतक पकडले तर या पाच फलंदाजांच्या दहा ईनिंगमध्ये मिळून केवळ एकच अर्धशतक येत असेल तर आधी हे फलंदाजांचे अपयश आहे.
गेल्या काही काळात गोलंदाजांनीच विकेट मिळवून दिल्याने परदेश विजय आलेत. जिथे त्यांना ते जमले नाही तिथे लगेच त्यांना आरोपीच्या पिंजर्यात ऊभे करणे पटत नाही. दुसर्या इनिंगला विकेट आल्या नसतील तरी पहिल्या ईनिंगला त्यांनीच विकेट काढून सामन्यात ठेवलेलेच.
विहारी गिल कन्सिस्टनली परफॉर्म करत नाहीयेत. या ईंग्लिश कंडीशनला ते खेळले असते तर तो धक्का ठरला असता. पुजारा खराब खेळामुळे संघाबाहेर जाऊन परत आलाय. कोहली हा द ग्रेट किंग कोहली आहे म्हणून आतापर्यंत संघात आहे अन्यथा त्याचा सध्याचा खेळ पाहता तो देखील पुजारा-रहाणे सारखाच बाहेर जायला हवा होता. श्रेयस अय्यर शॉर्ट बॉल ट्रॅपवर जाणार, आणि दोन्ही इनिंगला जाणार हे आमच्या ईथल्या लहान पोरांनाही माहीत होते.
थोडक्यात काय, तर वर उल्लेखलेल्या टॉप ५ फलंदाजांच्या दहा ईनिंगमध्ये एकच अर्धशतक येणे यात काहीच आश्चर्य नाहीये. ते तर सामना सुरु व्हायच्या आधीच कागदावरच स्पष्ट लिहिले होते.
अच्छा अच्छा म्हणजे बॅटींग
अच्छा अच्छा म्हणजे बॅटींग बाबतीत कोचची काहीच जबाबदारी नसते का . जरा ऑस्टेलिया आणि गेल्यावषी इंग्लंडमधल्या विजयावर नजर टाका . कोण खेळल आणि कस जिंकलो ते कळेल .
काय त्रास आहे .
<<<शास्तीबुवांच्या खडूस
शास्त्री कोच नि धोनि संघनायक आता नाहीत. तसेच तेंडूलकर, झहिर खान हेहि आता संघात नाहीत. ते असायला पाहिजे होते, तसेच कोहली विहारि गिल फेल गेले नसते, बुमराह ने नि ठाकुरने नि शामीने पहिल्या डावातल्या इतकीच चांगली गोलंदाजी केली असती तर आपण सामना नक्कीच जिंकू शकलो असतो.
असे माझे क्रिकेट्तज्ञ न्हणून मत आहे.
गेल्यावषी इंग्लंडमधल्या
गेल्यावषी इंग्लंडमधल्या विजयावर नजर टाका . कोण खेळल आणि कस जिंकलो ते कळेल .
>>>>>
पहिला शर्मा दुसरा राहुल टॉप स्कोअरर होते मालिकेतील.
दोन विजयातील दोन सामनावीर होते दोघे.
ते आता नसल्याचा फटका बसला आहे.
आधीच मिडल ऑर्डरचा आनंद चालू आहे गेले दोन वर्षे. सलामीवीर आणि लोअर मिडल ऑर्डरवर जिंकतोय.
त्यात या सामन्यात सलामीवीरही गंडले.
अच्छा अच्छा म्हणजे बॅटींग बाबतीत कोचची काहीच जबाबदारी नसते का
>>>>
मी कोचबद्दल काहीच म्हटले नाहीये.
मी फक्त गोलंदाज-फलंदाज यांच्या यश अपयशाबद्दल भाष्य करत आहे.
आणि हो, भारतीय सिनिअर संघाचे
आणि हो, भारतीय सिनिअर संघाचे कोच म्हणून द्रविड कुंबळेपेक्षा शास्त्रीबुवा केव्हाही सरस हे माझेही मत आहे
तसेच कोहली संघात होता तर कप्तान तोच हवा होता. मुळात त्याला कसोटीत कर्णधार कायम ठेवायला हवे होते असेही मत आहे.
आपण साऊथ आफ्रिके विरुदद 2 a
आपण साऊथ आफ्रिके विरुदद 2 a आता ही तिसरी चौथ्या इंनिंगला डिफेंड करू शकत नाही असे दिसतय . परदेशात जळद गोलंदाजांना परिस्थिती अनुकूल असताना . >> एकदम बरोबर, पारस कोच झाल्यावर हा पॅटर्न झालेला दिसतोय. अशी तिसॠ टॅस्ट आहे जिथे आपण सहसा पोउरेसे असलेले स्कोअर्स डिफेंड करू शकलो नाहि आहेत. काल बर्याच टॅक्टिकल गोंधळ वाटले डावपेचांमधे. हे पॉप्युलर ओप्नियन नसेल पण कोहली चा कप्तान म्हणून असलेला 'वाट्टेल त्या किमती मधे जिंकलेच पाहिजे' नि शास्त्रीचा कोच म्हणून त्याला असलेला सपोर्ट गेल्यानंतर (मला कल्पना आहे की आफ्रिकेमधे हे दोघे होते पण मेंटली ते चेक्ड आउट झाले होते) प्लेयर्स थोडेसे रीलॅक्स झाले आहेत. गुणवत्ता अर्थातच आहे पण एका लिमिटनंतर अजून काहीतरी पुढे करायलाच हवे असे वाटत नाही. कदाचित रोहित सलग कॅप्टन राहिला तर फरक पडेल.
कोहली, विहारी, गिल, अय्यर ह्यांचे बॅटिंग अपयश बघूनही चौथ्या इनिंग मधे ह्या गुणवत्तेच्या बॉलिंग पुढे साडेतिनशे इतक्या सहजपणे चेस केलेत हा बॉलिंग युनिट चाच पराभव आहे.
सहमत. पण एकच करेक्शन कि
सहमत. पण एकच करेक्शन कि दक्षिण आफ्रिकेच्या टूर मध्ये द्रविड हाच कोच होता.
शास्त्री तो पर्यंत पाय उतार झाला होता.
द्रविड, पारस कंपनी ला हा
द्रविड, पारस कंपनी ला हा बेनेफिट ऑफ डाऊट दिला पाहिजे कि त्यांना स्टेबल कॅप्टन असा मिळालाच नाहीये.
दुखापतींमुळे असो किंवा कॉवीड मुळे असो दर सिरीस मध्ये कप्तान बदलतो.
पण एकच करेक्शन कि दक्षिण
पण एकच करेक्शन कि दक्षिण आफ्रिकेच्या टूर मध्ये द्रविड हाच कोच होता. >> धन्यवाद, मग माझा मुद्दा अधिक अधोरेखित झाला आहे. " कदाचित रोहित सलग कॅप्टन राहिला तर फरक पडेल." हे मीही म्हटलय पण तीन सामने त्याच प्रकारे हरणे चिंताजनक वाटते.
कोच बदलल्या नंतर मध्ये लाईन
कोच बदलल्या नंतर मध्ये लाईन आणि लेंग्थ मधला आणि फील्ड सेटिंग फरक अभ्यासला तर फार इंटरेस्टिंग असेल.
भरत अरुण ने सांगितले आहे कि तो कोच असताना गोलंदाजांना हि डिरेकशन होती कि कंडिशन आपल्या सपोर्ट मध्ये नसल्या तरी समोरच्या टीम च्या बॅट्समन ला शंभरी गाठण्या साठी मिनिमम दोनशे - अडीचशे बॉल लागले पाहिजेत.
"It's not easy to leave
"It's not easy to leave someone like Ash (Ashwin) out in a Test match but when we looked at the wicket on first day, it had a pretty even covering of grass, and we felt that there was enough in it for the fast bowlers," Dravid explained the team's position.
"Also, if you see, wicket hasn't spun much either for Jack Leach or Ravi Jadeja, who bowled through the match. Weather also played a part as for first three days, there wasn't long phases of sunshine. Probably, it didn't spin as much as we expected it to."
>> मग श्रेयस ला का खेळवले ? पुजारा ला ओपन करायला लावून ही अॅडजस्टमेंट केली गेली होती. मान्य आहे कि श्रेयस ने त्याच्या आधीच्या दोन टेस्ट मधे चांगला खेळ केला होता पण त्या नंतर आय्पील नि सराव सामन्यामधेही त्याचा शॉर्ट बॉल प्रॉब्लेम दिसत होता नि विकेट स्पिन ला कंड्युसिव्ह नाही हे अश्विन ला न घेऊन आपण मान्य केलेले होते. ह्यात पुजारा, विहारी नि श्रेयस तिघांनाही भूर्दंड पडलाय. मॅच हरलोय ती वेगळी. श्रेयस स्पिन जबरदस्त खेळतो नि पुढच्या सहा मॅचेस भारतीय उपखंडामधे आहेत पणस्त्याचे नाव चर्चेत असेल का तेंव्हा ?
कोच बदलल्या नंतर मध्ये लाईन आणि लेंग्थ मधला आणि फील्ड सेटिंग फरक अभ्यासला तर फार इंटरेस्टिंग असेल. >>मी अजूनही कुठे पारस ची मुलाखत वाचली नसल्यामूळे नक्की काय अॅप्रोच असतो हे कळाले नाहिये. असे समजून घ्यायला आवडेल.
मलाही जाणून घ्यायला आवडेल.
मलाही जाणून घ्यायला आवडेल.
पण ह्या 3 पराभवामध्ये जाणवलेली एक गोष्ट म्हणजे चौथ्या इंनिंग मध्ये विकेट मिळत नसताना आपण धावा ड्राय अप करण्याचा फारसा प्रयत्न केलेला दिसला नाही.
चौथी इनिंग, पाचवा दिवस म्हणजे
चौथी इनिंग, पाचवा दिवस म्हणजे पिच खराब झालाय असे सर्वसाधारणपणे गृहीतच धरले जाते. पण तसे नेहमीच नसते. ईथे तर या मैदानाचा रिसेंट पास्ट रेकॉर्डही काहीतरी चेसिंग सोपे असण्याचाच होता असे वाचले होते. किंबहुना ईंग्लंडने गेल्या काही सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध हेच केले होते. ही खेळपट्टीही पाच दिवस फलंदाजीला पोषकच होती. कंडीशन चेंज होत काही काळासाठी बॉल हरकत करू लागला की तो पिरीअड पेशन्स ठेवायचे आणि ते बंद झाले की वेगात धावा चोपून काढायच्या जेणेकरून पुन्हा नवीन बॉल वा ढगाळ वातावरण, गोलंदाजांना पोषक स्थिती व्हायच्या आधी तुम्ही गेममध्ये फार पुढे निघून गेले असाल. ईंग्लंड हेच करतेय सध्या. आपल्याकडे एक पुजाराचे अर्धशतक आले ते देखील दिडशे पावणेदोनशे चेंडू खेळून आलेले. बाकीचे फलंदाज तर असे होते की त्यांना बाद करायला त्यांचा ढासळलेला फॉर्म / तंत्राचा आणि अनुभवाचा अभाव हेच पुरेसे होते. दुसर्या इनिंगलाही अडीचशे धावात गुंडाळले जाणे कुठूनही तसा पिच नव्हताच.
आफ्रिकेतही हेच झालेले. दुसर्या इनिंगला आपल्यालाही कंडीशन तश्या चांगल्याच मिळाल्या होत्या, पण फलंदाजी गंडलीच आहे आपली जे धावा टाकता आल्या नाहीत. अखेरच्या सामन्यात पंत शतक मारतो, पण ईतर फलंदाजांना ऊभे राहणे जमत नाही जे २०० ला गुंडाळले जातो. शेवटच्या दोन्ही सामन्यात सव्वादोनशेच्या टारगेटमध्ये शंभरेक धावा जास्त असत्या तर कदाचित चित्र वेगळे असते, जे टारगेट देणे आपल्या फलंदाजांना दुसर्या इनिंगला शक्य होते. पण ते अपयशी ठरले. पिचमधून हवी तशी मदत नसताना सव्वादोनशेचे टार्गेट डिफेंड करायची अपेक्षा अन्यायकारकच आहे. कारण तो स्कोअर प्रेशर टाकायलाही पुरेसा नव्हता. विकेट काढायला जो एक प्रेशर फॅक्टरही महत्वाचा असतो तो असे मॉडरेट टारगेट असल्यास बाद होतो. ईनफॅक्ट उलटा बॉलर्सवर येतो. या सर्वात समोरचे फलंदाज त्यांच्या होम कंडीशनमध्ये खेळत असतात हे देखील विसरून चालणार नाही. त्यामुळे फॉरेन कंडीशन हा प्रकारही कोणा फलंदाजाला लागू होत नाही.
गोलंदाजांना आपला अॅप्रोच बदलून अजूनही चांगली कामगिरी करता आली असती, पण या सर्व सामन्यात आपल्याला फलंदाजांच्या अपयशानेच बॅकफूटवर ढकलले आहे.
It's not easy to leave
It's not easy to leave someone like Ash (Ashwin) out in a Test match but when we looked at the wicket on first day, it had a pretty even covering of grass, and we felt that there was enough in it for the fast bowlers," * चौथी इनिंग, पाचवा दिवस म्हणजे पिच खराब झालाय असे सर्वसाधारणपणे गृहीतच धरले जाते. * -
पीचवर पहिल्या दिवशी गवत असेल किंवा पाचव्या दिवशी पिच खराब होणार नसेल तर चांगला स्पेशल स्पीनर खेळवण्यात अर्थ नाही असं जर वरच्या विधानांतून सुचवायचं असेल, तर तें योग्य वाटत नाही. जर प्रभावी स्पीनर असेल तर तो बाऊनसी किंवा चांगल्या विकेटवरही प्रभावी ठरतो.. गोलंदाजीत त्यामुळे येणारं वैविध्य उलट त्याला सहाय्यभूतच ठरत असावं.
इंग्लंडच्या हवामानात एकाच कसोटीची मालिका खेळवणं म्हणजे यजमान संघाला खूपच फायदेशीर ठरणं हें नक्की. तेंच झालं असावं !
मी आधी म्हणलो होतो, आत्ताही
मी आधी म्हणलो होतो, आत्ताही तेच म्हणतो
टेस्ट टीम मधे सिलेक्षन साठी रणजी खेळणं कंपल्सरी करा. बॅटर लोकं लाँग फॉरमॅट चं टेंपरामेंट विसरल्यागत खेळताहेत.
तो गिल दोन्ही डावांमधे टी २० माईंडसेट नी खेळला. अरे लेका टेस्ट आहे, नजर तर सेट कर आधी.
अय्यरच्या खेळात सिरियसनेस दिसत नाही. पाट्या टाकल्यासारखा खेळतो.
टेस्ट असो वा टी२०,
काही ना काही कारणाने टीम कंपोझिशन खूप वरचेवर बदललं आहे. त्यानी प्लेअर्स ना स्वतः चा नक्की रोल काय, कुठल्या सीच्युएशनला काय एक्सपेक्टेशन्स असणार हेच क्लिअर वाटत नाही असं फीलिंग येतंय.
सिलेक्षन कमिटी काय खाऊन टीम
सिलेक्षन कमिटी काय खाऊन टीम सिलेक्षन करते कोण जाणे.
वेस्ट इंडिज विरुद्धच्या वन डे सिरीजासाठी धवन ला कॅप्टन केलंय.
मुळात २०२३ वर्ल्डकप च्या दृष्टीनी टीम बनवून त्यांना एकत्र खेळायची / जिंकायची सवय होण्यासाठी काहीही होताना दिसत नाही. नुसती संगीत खुर्ची चालू आहे.
आणि संघातले सो कॉल्ड मुख्य खेळाडू गेल्या काही वर्षांत जरा जास्तीच रेस्ट घ्यायला लागले आहेत असं वाटंत नाही का?
मी डोमेस्टिक खेळणार नाही
मी सेना सोडून बाकी टीम सोबत खेळणार नाही
मी सुट्ट्या मारणार
मी आयपीएल खेळणार
मी आयसीसी टुर्नामेंट च्या टीम मधे खेळणाराच
आणि मी ऐन वेळी परफॉर्म करणार नाही
हा प्रकार कधी थांबणार?
ओवरलॅप झालेले दौरे आहेत. अगदी
ओवरलॅप झालेले दौरे आहेत. अगदी दौरे नाही पण दोन दौर्यातील विश्रांतीचा टाईम जेमतेम. त्यामुळे अश्या संघनिवडीला पर्याय नाही.
दोन भिन्न देश सोडा, ईंग्लंडच्या ईंग्लंडमध्ये काल टेस्ट संपली उद्या २०-२० सुरु होतेय तर टेस्ट वाले कोणी तिथे उद्या हजर नसणार. पण कोणाला काही फरक पडत नाहीये. उलट जास्त खेळाडूंना खेळायची संधी मिळाल्याने ते खुशच असतील.
Pages