क्रिकेट - ७

Submitted by ऋन्मेऽऽष on 8 January, 2022 - 10:41

कोरोनाचा प्रादुर्भाव तुलनेत कमी झाल्याने भरगच्च क्रिकेट आहे येत्या वर्षात. धाग्यावर चर्चाही तितकीच रंगू द्या Happy

क्रिकेटचा मागचा धागा ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/77883

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

“ कोहलीने त्याच्याकडून धडे गिरवायची गरज असे खेदाने म्हणावेसे वाटते.” - गूड लेंथवर पडून जेमतेम घोट्याइतपत उडलेल्या बॉलवर एलबीडब्ल्यू झालेल्या कोहलीपेक्षा टर्न कव्हर न करता आल्यामुळे आऊटसाईड एज लागून क्लोज-इन फिल्डरच्या हातात कॅच गेलेल्या शर्मा किंवा टर्न आणि बाऊन्स चा अंदाज चुकून कट करायला गेलेल्या पंतविषयी सुद्धा इतकाच खेद / खंत वाटायला हवा. पण आपला तो बाब्या…. नाही का सर?

फेरफटका, मुळात मी हे गेल्या वर्ष दिड दोन वर्षांना डोळ्यासमोर ठेऊन लिहीले होते.
तरी कालच्या सामन्याबद्दलच बोलायचे झाल्यास आपण कदाचित टेस्ट असल्याने फक्त हायलाईटस पाहिल्या असाव्यात वा फक्त विकेट पाहिल्या असाव्यात. कोहली बाद होतानाचा बॉल खाली राहिला असला तरी आधीही तो स्पिनरना खेळताना "त्याच्या स्टॅण्डर्डला" काही कम्फर्टेबल वाटत नव्हता. आणि साधारण असेच चित्र गेले काही काळ कित्येक सामन्यात दिसतेय.

याऊलट कालचे अय्यरचे फूटवर्क.. आहाहा.. बरेच दिवसांनी एखाद्या भारतीय फलंदाजाला स्पिनरसमोर असे खेळताना पाहिले.

पंतचे म्हणाल तर त्याचे बाद होणे सोडा. काहीतरी वेगळे करायला गेला आणि बाद झाला. त्या आधी तो तुडवत होता. गेल्या सामन्यातही हेच करत होता. किंबहुना स्पिनर्ससमोर तो हेच करतो. त्याच्या खेळीत तंत्र शोधून त्याची तुलना कोहलीशी करणे हे अफाट आहे.

पंत काय शर्मासुद्धा अगदी कालपरवापर्यंत माझ्या कसोटी संघात नव्हता. पण कारकिर्दीच्या या टप्प्यावर देखील स्वत:ला कसोटी फलंदाज म्हणून सिद्ध करायच्या त्याच्या डेडीकेशनचे कौतुक वाटते. त्याचेच फळ त्याला मिळून तो कसोटीतही कर्णधार झालाय.

कोहलीला आपण रूट, स्मिथ, विल्यमसन, लाबुशान यांच्या पंक्तीत बघतो. त्याच्या तुलनेला शर्मा आणि पंत ऊतरवू नका.

मी शर्मा आणि पंत यांचा चाहता आहे म्हणून मी कोहलीच्या फॉर्म आणि तंत्राबद्दल चिंता केली तर लगेच कार्टे शिक्का मारायची घाई कश्याला

गंमत बघा,
मागे अय्यरने विंडीजविरुद्ध वनडेत छान खेळी केली होती पण तरीही त्यात शॉर्ट बॉलवर तो कम्फर्टेबल नव्हता. तेव्हा त्याचा उल्लेख मी ईथे केला. तेव्हा अय्यरला माझे कार्टे ठरवले गेले होते Happy

आजच्या कोहलीच्या बाद होण्याला काय म्हणाल.. पुन्हा बॉल खाली राहिला.. की या पिचवर चुकीची खेळायची पद्धत.. तर हो !
तो प्रॉपर टेस्ट क्रिकेट खेळतोय असे आजही वाटत नव्हते जे त्याच्या क्लासच्या फलंदाजाने खेळायला हवे.

.
फास्टेस्ट फिफ्टी ईन टेस्ट फॉर ईंडिया
ऋषभ पंत !

हा माणूस जेव्हा फलंदाजीला येतो तेव्हा मी हातातले सारे काम बाजूला ठेऊन मॅच बघतो मग फॉर्मेट कुठलाही असो.
ईतकेच नाही तर मस्तपैकी हिंदी कॉमेंटरी लावतो आणि वॉल्युम फुल करतो. कारण याची अतरंगी फटकेबाजी बघून कॉमेंटेटरना बोलायलाही मजा येते आणि आपल्याला ऐकायलाही.
जोपर्यंत हा खेळणार तोपर्यंत हा चर्चेचा विषय राहणार. कोणाला त्याचे बिनधास्त खेळणे रुचो न रुचो पण त्याने आपली खेळायची शैली कधी बदलू नये. मजा त्यातच आहे Happy

IMG_20220313_181555.jpg

पंत गधड्या बाद झाला नसता तर धमाल करत होता ..
>>
आजही हेच...
रिषभ पंत महान आहे वरून रिषभ पंत बावळट आहे, in space of two balls ...

Pant is the first Player to make 30+ runs at a 150+ strike rate in both innings of a test match.

हे एक अजून Happy

महिला वर्ल्डकपमधे बांगलादेशनेही पाकिस्तानला हरवलं

तर कराची टेस्टमधी ऑसीजनी ख्वाजा, स्मिथ अन कॅरीच्या बॅटिंगच्या जोरावर साडेपाचशे धावा जमवल्या आहेत.
कॅप्टन कमिन्सला अर्धशतकाची संधी होती, तो स्वतः चांगल्या फ्लो मधे बॅटिंग करत होता, तरीही (शेवटच्या विकेटसाठी ५० धावांची पार्टनरशिप झाल्यावर) ५५६/९ वर डाव घोषित केला...

ऋषभ पंतचा अजून एक किर्तीमान !

आज कसोटी सामन्यांमध्ये मालिकावीर पुरस्कार मिळवणारा पहिला भारतीय विकेटकीपर बनला आहे ऋषभ पंत Happy

बाबर आझमची अद्वितीय खेळी, सुंदर, लाजवाब.
खरोखर पुढचा सुपर स्टार वाटला आज.
द्विशतक व्हावे ही इच्छा.

गेला बाबर १९६
शफिक ९६ ला गेलेला..
शतक द्विशतकाचे प्रेशर

आशा करूया ईथून सामना पलटू नये..

पोस्ट टाईप करेपर्यंत नवीन आलेला शून्यावर गेला..
६ विकेट झाल्या आता.. १२ ओवर शिल्लक.. रिझवान खेळतोय सेट होऊन.. मजा आहे पण मॅचला..

आणि नवीन बॉल सुद्धा आला..

सामना हरू नये म्हणून पाकिस्तान ने बनवलेले पिचेस बघून 'कालचा दिवस बरा होता' असे भारतीय पिचेस बद्दल म्हणायला लागतेय.

टेस्ट चँपियनशिप चा फॉर्म्युला टोटल गंडलेला आहे राव.

पाकिस्तान - ऑस्ट्रेलिया मॅचमधे केव्हढे रन्स झाले!! बापरे!! इतक्या रन्स मधे गरीब टीम्स दोन मॅचेस खेळल्या असत्या.

काल इंडियन - women टीम फारच वाईट पद्धतीनं हारली इंग्लंडविरूद्ध.

टेस्ट चँपियनशिपचे ते पॉइंट्स कसे कॅल्क्युलेट करतायंत हे कुणीतरी सोपं करून सांगेल का? ते पर्सेंटेज कसं काढतायत ते माझ्या नीट लक्षात येत नाहीय.

@ फेरफटका
प्रत्येक सामन्याला १२ पॉईंट आहेत.
जिंकेल त्याला १२
हरेल त्याला ०
टाय झाले तर ६-६
ड्रॉ झाली तर ४-४

आता % कॅलक्युलेशन फार सिंपल आहे
ऑस्ट्रेलिया ७ सामने खेळली आहे. म्हणजे सर्वच्या सर्व जिंकले असते तर एकूण १२ x ७ = ८४ पॉईंट ते मिळवू शकले असते.
पण ते ४ जिंकले आणि ३ ड्रॉ झाले. म्हणजे त्यांना ४ x १२ + ३ x ४ = ६० पॉईंट मिळाले.

८४ पैकी ६० पॉईंट म्हणून ६०/८४ = ७१.४२ टक्के मिळाले.

आता यात ओवर रेट कमी झाला तर एका ओवरला एक पॉईंट पेनल्टी सुद्धा ठेवली आहे ज्याने आपले पॉईंट कमी केलेत.

आपण ११ सामने खेळलोत म्हणजे एकूण ११ x १२ = १३२ पॉईंट मिळवू शकलो असतो.
जिंकलो ६ आणि ड्रॉ २ .. आपले पॉईंट ६ x १२ + २ x ४ = ८० यातून ३ पेनल्टीचे गेले म्हणजे ८० - ३ =७७ पाँईंट

मग आपले % पाँईट झाले ७७ / १३२ = ५८.३३

*इतक्या रन्स मधे गरीब टीम्स दोन मॅचेस खेळल्या असत्या.* - पण गरीब टिम्ससाठी आतां हा खेळ नाहींच राहिला ना ! Wink

*टेस्ट चँपियनशिपचे ते पॉइंट्स कसे कॅल्क्युलेट करतायंत हे कुणीतरी सोपं करून सांगेल का? * - ऋन्मेऽऽष, धन्यवाद.
( डकवर्थ - लुईस फाॅरमुला व त्यामागचं लाॅजिक मला कुणीतरी समजावून सांगेल का , हा प्रश्न विचारायचं डेअरिंग मला अजून झालं नाहीं! Wink )

डकवर्थ लुईसचे कॅलक्युलेशन फार सरळसोट नाहीये.
तिथे एखादे टारगेट चेस करणार्‍या टीमसमोर ५० ओवर आणि १० विकेट असे दोन प्रकारचे रिसोर्सेस असतात असे गृहीत धरले जाते. हे दोन्ही रिसोर्सेस ते किती वापरतात यावर लक्ष्य ठरते.

चेस करतेवेळी सुरुवातीला तुमच्याकडे हे दोन्ही रिसोर्सेस १०० टक्के असतात. सामना मध्येच थांबून ३५ ओवरचाच झाला तर याचा अर्थ ७० टक्के ओवर वापरल्या, पण त्याच सोबत १० पैकी विकेट किती वापरल्या हे सुद्धा लक्षात घेतले जाते. म्हणूनच जर विकेट फक्त २ पडल्या असतील तर विकेट २० टक्केच वापरल्या गेल्या म्हणत त्यावेळचे लक्ष्य कमी राहते. जर ४ पडल्या असतील तर तुम्ही विकेट्स ४० टक्के वापरल्याने तुम्ही जास्त धावा करणे अपेक्षित असते..
बहुधा विकेटचे वेटेज पहिल्या पाच आणि अखेरच्या पाच यांचे सेम नसावे. म्हणजे पहिल्या ६ विकेटची वॅल्यू कॅलक्युलेशनमध्ये ६० टक्के नसून कदाचित जास्त असावी.

बाकी यात अध्येमध्ये सामना थांबणे, पुन्हा पुन्हा कमी ओवर होत चालू होणे, मुळातच कमी ओवरचा होणे, वगैरे बरेच प्रकार आहेत. ते सगळे प्रकार याच संकल्पनेवर फॉर्म्युलाबद्ध केले आहेत.

डकवर्थ लुईसमधे आता स्टर्नलाही जोडा.. >> त्याने अजून चांगली पॅरीटी आली आहे. मला जयदेवन अधिक आवडला होता त्यात समोअरच्या टीम चे रिलेटिव्ह तत्कालीन स्ट्रेंग्थ पण धरली जातेय हे मस्त होते. चार विकेट्स असताना लंकेविरुद्ध १० ओव्हर्स मधे पन्नास काढणे नि ऑस्ट्रेलियाविरुद्ध काढणे ह्यात फरक आहे तो धरला जाणे मह्त्वाचे आहे.

आता % कॅलक्युलेशन फार सिंपल आहे >> त्यात ड्रॉ जिंकण्यापेक्षा नेहमी कमी धरलाय हे नेहमीच खटकत आले आहे. भारताने लंकेत जाऊन जिंकणे नि लंकेने ऑस्ट्रेलियामधे जाऊन सामना ड्रॉ करणे ह्यात दुसरे निर्विवाद पणे अधिक गुण मिळवणारे आहे (माझ्या मते)

"भारताने लंकेत जाऊन जिंकणे नि लंकेने ऑस्ट्रेलियामधे जाऊन सामना ड्रॉ करणे ह्यात दुसरे निर्विवाद पणे अधिक गुण मिळवणारे आहे (माझ्या मते)" - तुझं म्हणणं क्रिकेटींग सेन्स च्या दृष्टीनं बरोबर आहे, पण त्यात खूप सब्जेक्टीव्हीटी आहे, जी आकडेवारीत बसवणं कठीण आहे असं मला वाटतं.

पण त्यात खूप सब्जेक्टीव्हीटी आहे, जी आकडेवारीत बसवणं कठीण आहे असं मला वाटतं. >> हो समजू शकतो. फक्त सध्याचा तक्ता बघितला तर लंका ज्या स्थानावर आहे ते बघून धका बसतो. जयदेवन (पुन्हा तोच) त्याने बनवलेले फॉर्मुले बघितले होते ज्यात समोरच्या संघाची रिलेटिव्ह स्ट्रेन्घ्त, करंट फॉर्म, कुठे खेळला जातोय वगैरे बघून मिळलेल्या गुणांना एका फॅक्ट ने गुणून नॉर्मलाईझ केले जात असे. डकवर्थ ची रिप्लेसमेंट म्हणून सुरू करून ही आकडेवारी संघांना क्रमांक देण्यासाठी बनवलेली होती . मला वाटते त्यानी डकवर्थ च्या जागी त्यांचा फॉर्म्युला हे वापरावा म्हणून पिच पण केले होते . बीसीसीआय ने बॅकिंग केले नाही दुर्दैवाने Sad

त्यात ड्रॉ जिंकण्यापेक्षा नेहमी कमी धरलाय हे नेहमीच खटकत आले
>>>>>
ड्रॉ झाल्यास ४-४ पॉईंट हे गणितही कळले नाही. ६-६ असायला हवे. % काढताना १२ पॉईंटपैकी काढत असल्याने ४ पाँईंट तुला न मला घाल कुत्र्याला असे होते हे अन्यायकारक वाटते. स्पेशली जे कालच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाशी झाले. परदेशात जाऊन ड्रॉ केले, ते सुद्धा डॉमिनेटींग पोजिशनला आणि मिळाले ४ च पॉईंट.

माझ्यामते पुर्ण वा किमान ४ दिवसांचा सामना झाला आणि ड्रॉ झाला तर होम टीमला ४ पॉईंट मिळायला हवे आणि पाहुण्यांना ८.. जर पावसाने गोची करत दोनेक दिवस वाया जाऊन ड्रॉ झाला तर ६-६ ठिक आहे..

"फक्त सध्याचा तक्ता बघितला तर लंका ज्या स्थानावर आहे ते बघून धका बसतो. " - लंका काही दिवसांपूर्वी टॉपला होती. Happy

होम टेस्ट्स जास्त खेळल्याचा फायदा सुद्धा होऊ शकतो ह्यात. कदाचित होम आणि अवे कॅटेगरीज करून पॉईंट्स दिले (अवे ला जास्त वेटेज) तर कदाचित थोडं फेअर असू शकेल.

होम टेस्ट्स जास्त खेळल्याचा फायदा सुद्धा होऊ शकतो ह्यात
>>>>
तीन सिरीज होम आणि तीन सिरीज अवे खेळायच्या आहेत. म्हणजे होम अवे समसमान आहे. फक्त गोची अशी आहे की ज्यांच्या अवे सिरीज कमजोर संघाशी असतील त्यांना ॲडवांटेज मिळू शकतो.
मुळात असे प्रॉब्लेम बरेच राहणार. कारण ही स्पर्धा जे सर्व देशांचे शेड्यूल असते त्यातच मॅनेज केली गेली आहे. त्यामुळे कोणी कोणाशी खेळावे हे एका मर्यादेपलीकडे हस्तक्षेप करत ठरवू शकत नाही.

दोन ऐवजी चार संघ काढून सेमी आणि फायनल असे खेळले तर एखादा चांगला संघ टॉप टू मधून निसटला तरी तिसरा चौथा येत स्पर्धेत राहील. फक्त त्या जास्तीच्या दोन मॅचेस पुन्हा शेड्युलमध्ये एडजस्ट कराव्या लागतील. हे अवघड आहे.

>>आणि ड्रॉ झाला तर होम टीमला ४ पॉईंट मिळायला हवे आणि पाहुण्यांना ८..

असे केले तर यजमानांकडून स्पोर्टींग पीचेसची जी थोडीफार अपेक्षा सध्या असते ती तर विसरुनच जायला लागेल Wink

जयदेवन (पुन्हा तोच)
>>

जयदेवनच्या रँकिंग सिस्टिमबद्दल ऐकलं होतं पण डकवर्थ-लुईसला पर्यायी सिस्टिमबद्दल नव्हतं...

नामसाधर्म्यावरून अचानक 'जयकर' ची आठवण आली
क्रिकेटमधे नसले तरी पुणे युनिव्हर्सिटीच्या मार्किंग सिस्टिममधे यांच्या काँट्रिब्यूशनमुळे कित्येक लोकांची असाध्य विषयांमधून सुटका झालेली आहे...

*पण त्यात खूप सब्जेक्टीव्हीटी आहे, * - क्रिकेटमधे फार्म्यूला तयार करण्यात हीच मोठी गोची आहे. 'सब्जेक्टीव्हीटी' व 'अनसर्टनटी' हे तर क्रिकेटची ओळख आहेत व त्याना तर फार्म्यूलात बसायचो ॲलरजीच आहे ! Wink

जयदेवनच्या रँकिंग सिस्टिमबद्दल ऐकलं होतं पण डकवर्थ-लुईसला पर्यायी सिस्टिमबद्दल नव्हतं... >> जयदेवनची पर्यायी पद्धत इथे वाचता येईल. https://www.rediff.com/cricket/2005/may/30bhogle.htm रेडीफ च्या क्रिकेट च्या भरभराटीचा काळ होता तो. भोगले नि पण्णिकर ह्यांनी थैमन घातले होते. अजूनही मागे जाऊन वाचायला मस्त वाटते. पन्निकर विशेषतः तेंडूलकर, मॅक्ग्राथ, वॉर्न , लक्ष्मण बद्दल जे लिहून गेलाय ते फ्रेम करून ठेवायच्या लायकीचे आहे.

Pages