क्रिकेट - ७

Submitted by ऋन्मेऽऽष on 8 January, 2022 - 10:41

कोरोनाचा प्रादुर्भाव तुलनेत कमी झाल्याने भरगच्च क्रिकेट आहे येत्या वर्षात. धाग्यावर चर्चाही तितकीच रंगू द्या Happy

क्रिकेटचा मागचा धागा ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/77883

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वॉर्न कसला शॉकिंग आहे राव. त्याचे एकेक स्पेल नि अ‍ॅटीट्यूड आठवतो - आफ्रिकेविरुद्ध वर्ल्ड कपमधला तर खाशा स्पेल होता. त्याचे तेंडूलकरला मनापासून दाद देणे आठवते. काय प्लेयर होता काय पर्सनॅलिटी होती.

शेनला श्रद्धांजली . खरोखरच महान गोलंदाज . अप्रतीम नियंत्रण, इतके की अस वाटाव हा स्वतः अदृष्य रित्या चेंडू घेऊन फलंदाजा पर्यंत जातोय, हवी तशी उंची देतोय,पाहिजे तिथे टप्पा पा पाडतोय, आणि हवा तसा चेंडू .
मला एकदा त्याने तेंड्याला पायचित केल्या वेळेच आठवतेय, अगदी जाळ्यात ओढल्या सारख, चांगल्या फलंदाजां बरोबर माईंड गेम्स खेळायचा तो . पण खूप वेळेस इतरांबरोबर त्याला येवढा विचार करायला लागत नसेल . समजायचच नाही बऱ्याच जणांना . समालोचनही फार छान करायचा .

शेन वॉर्न म्हणजे एक ‘पर्सनॅलिटी’ होती, एक अ‍ॅटीट्यूड होता. त्याचा मैदानावरचा आणि मैदानाबाहेरचा वावर तितकाच लक्षवेधी होता. लेगस्पिनचा तर तो जादूगार होता आणि खेळाची त्याची समज असामान्य होती. विनम्र श्रद्धांजली!!

शेन वॉर्न हा हाताच्या बोटावर मोजता येऊ शकणार्‍या आवडत्या कांगारू खेळाडूत अग्रणी होता.
आपल्या मनगटाच्या जोरावर भल्या भल्या फलंदाजाना बोटावर नाचविणारा गोलंदाज होता.

महिलांच्या वर्ल्ड कप मध्ये आज पाकिस्तान आणि भारत खेळत आहे .
भारताच्या महिलांनी 244 रण 7 विकेटच्या बदल्यात 50 ओव्हर्स मध्ये केले , आणि पाकिस्तानच्या महिलांनी 132 /9 ओव्हर्स 41 मध्ये केले आहेत . थोडक्यात भारतीय महिलांनी बाजी मारलेली दिसतेय !
मुख्य म्हणजे आश्चर्य याचे वाटते पाकिस्तान च्या एकाही महिला खेळाडूने बुरखा घातलेला नव्हता Happy

बुरखा घालून क्रिकेट!!
गेल्या कित्येक सामन्यांत रविंद्र जडेजा नव्हता. मग एकदम आला नि १७५ नाबाद नि दोन्ही डाव मिळून ९ बळी!

https://www.lokmat.com/cricket/photos/mcc-new-code-of-laws-change-in-law...>>

घ्या! ह्या क्रिडा पत्रकारांना MCC चे पुर्ण रूप ठाऊक नाही.. मेलबर्न क्रिकेट क्लब म्हणे!

असो पण काही नियम बदलले आहेत. मुख्य म्हणजे ओव्हरच्या मध्ये झेलबाद होताना क्रॉस झाले तरी नविन फलंदाजाला स्ट्राईक घ्यावा
लागणार.

खेळाचे नियम कालानुरूप बदलले जातात, तसंच खेळाच्या टिव्ही प्रक्षेपणाबाबतही कांहीं नियम आयसीसीने आखणं आवश्यक आहे, असं वाटतं. विशेषतः , निदान निर्णायक षटकांमधे तरी जाहिराती व काॅमेंटरी इत्यादींच्या अतिरेकामुळे टिव्ही प्रेक्षकांच्या प्रत्यक्ष खेळ पाहण्याच्या आनंदाचा रसभंग होणार नाहीं , याची दक्षता घेणे आवश्यक आहे.

अरे बाबांनो आपल्या महिलांनी आपल्या परंपरागत शत्रूला विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात दणक्यात हरवलं . जरातरी दखल घ्या .
मीआपली बॅटींग पाहिली . तिथेसुद्धा सहाव्या सातव्या आठव्या फलंदाजांनी फलंदाजी करून १२५ - ६ वरून २४४ पर्यंत धावा फलकावर लावल्या . गेल्या वेळेस आपण जिंकू असे वाटत असताना अंतिम सामन्यात फक्त आठ धावांनी हरलो होतो . यावेळेस बघू काय होते .
आपल्या खेळाडूंचा पाकिस्तानी कर्णधार आणि तिच्या ६ महिन्याच्या बाळाबरोबरचा फोटो जालावर खूप गाजला . खिलाडूवृतीचेही खूप कौतुक झाले .

ऑस्ट्रेलिया खूप स्ट्राँग वाटत आहे बायकांमध्ये. जसे पुरुषांचे तीन वर्ल्डकप सलग मारलेले तशीच टीम वाटत आहे. त्यांना सेमी किंवा फायनलला कोण मात देऊ शकते हे बघणे रोचक.
ऑस्ट्रेलिया सेमीला फिक्स आहे. आफ्रिकेसोबत भारतही पोहोचेल असे मन बोलतेय. बाकी ईंग्लंड न्यूझीलंड विंडीजपैकी कोण पोहोचतेय बघूया. ईंग्लंड वाटत होती. पण आता विंडीजने ईंग्लंडला हरवून स्पर्धा रोचक केलीय. उद्या न्यूझीलंडशी आपला महत्वपूर्ण सामना आहे. कारण वर उल्लेखल्याप्रमाणे तो सेमीच्या स्पर्धेतील संघ आहे.

<<<ओव्हरच्या मध्ये झेलबाद होताना क्रॉस झाले तरी नविन फलंदाजाला स्ट्राईक घ्यावा>>>
हा नियम होण्यापूर्वी, एका सामन्यात धोनीने बाद होताना रनरला लवकर क्रॉस करायला सांगितले, त्या मुळे नविन फलंदाजा ऐवजी जुनाच खेळाडू खेळला व त्याने सामना जिँकून दिला. नविन खेळाडू कदाचित् बाद् झाला असता.असे युट्युबवरील एका विडिओत पाहिले.

*मंकडींग आणि झेलबाद नंतर स्ट्राईकचेंज
दोन्ही गोलंदाजांवर अन्यायकारक असलेले नियम बदलणे योग्य वाटत आहे. * - शिवाय, विनू मंकडसारख्या प्रतिभावान खेळाडूचं नांव एका अखिलाडू वृत्तीशी जोडलयाचा अन्यायही अधिकृतपणे दूर होईल !

क्रीज सोडून पुढे गेलेल्या नॉन स्ट्रायकरला बोलरनी रन-आऊट करण्याला कायदेशीर मान्यता मिळाली हे फार बरं झालं
(मंकडिंग शब्द रिटायर करा, इट्स जस्ट अनदर वे ऑफ टेकिंग अ विकेट)
फक्त याची नोंद कशी होणार हे पहायला पाहिजे.
इट्स अ बोलर्स विकेट आणि त्याला ड्यू क्रेडिट मिळायला हवं. नुसतं रन-आऊट म्हणून ते टीमच्या खात्यात जायला नको.
'कॉट & बोल्ड' सारखं 'स्टंप्ड & बोल्ड' म्हणून नोंद करता येईल म्हणजे बोलरला विकेटचं क्रेडिट मिळेल

आता फक्त कर्णधारांनी अती-उदारमतवादी-खिलाडूवृत्ती दाखवून याप्रकारे बाद झालेल्या फलंदाजाला परत वगैरे बोलवू नये म्हण़जे झालं.

बाकी आज न्यूझिलंड विरुद्ध २६१ चेझ करताना १० ओव्हर्समधे आपल्या २६/२ आहेत.
मितालीकडून एका धडाकेबाज खेळीची अपेक्षा...

*फक्त याची नोंद कशी होणार हे पहायला पाहिजे.* - 'रन आऊट ' अशीच नोंद होणार, असं वाचलं व तें योग्यही वाटतं. कारण त्यांत गोलंदाजीचं कसब नसून नॉन स्ट्रायकरचा आगाऊपणा व क्षेत्ररक्षक म्हणूनच गोलंदाजाचा सहभाग असतो.

तें योग्यही वाटतं. कारण त्यांत गोलंदाजीचं कसब नसून नॉन स्ट्रायकरचा आगाऊपणा व क्षेत्ररक्षक म्हणूनच गोलंदाजाचा सहभाग असतो
>>
पुढे सरसावलेल्या बॅट्समनच्या दांड्या विकेटकीपरनी उखडणं हे ही साधारण याच कॅटेगरी मधे येतं
त्याला पेसर च्या विरुद्ध रन-आऊट अन स्पिनर च्या विरुद्ध स्टंप्ड म्हणतोच ना आपण, शिवाय स्टंपिंगचं क्रेडिट कीपरलाही मिळतं अन बोलरलाही

रन अप च्या मधे नॉन स्ट्रायकर पुढे जातोय हे लक्षात घेऊन, रन अप थांबवून दांडी उडवणं हे ही कुठल्या कसबाशिवाय कमी नाहीये
शिवाय हे बोलर एकटा एक्झिक्यूट करणार आहे
त्यामुळे त्याला क्रेडिट मिळावं असं मला वाटतं

आणि म्हणूनच सध्याच्या इतर नियमांच्या फार टँजंट न जाता त्याला 'स्टंप्ड & बोल्ड' कॅटेगरीमधे टाकावं असं मला वाटतं
(जसा कीपर हा बॅटर साईडला स्टंपिंग करणार हे गृहित धरतो, तसंच बोलर हा नॉन स्ट्रायकर साईडलाच स्टंप करेल हे गृहित धरता येईल)

अरे मस्त. या प्रवीण तांबेचा सख्खा भाऊ आमच्या ऑफिसमध्ये आहे. आमच्या ऑफिस क्रिकेट टीमला टिप्स द्यायला हा यायचा. आयपीएलमध्ये चमकला की आमच्या ऑफिसमध्येही याच्या कौतुकाचा मेल फिरायचा. मर्यादीत गुणवत्ता पण पॅशन आणि डेडीकेशन या गुणांमुळे वय ऊलटूनही याने दाखवलेली चिकाटी काबिले तारीफ.

*..... गुणांमुळे वय ऊलटूनही याने दाखवलेली चिकाटी काबिले तारीफ.* +1. द्रविडने त्याची उपयुक्तता ओळखून त्याला आयपीएलमधे सःधी दिली हेही कौतुकास्पद !
श्रेयस तुळपदे हा देखील ' इकबाल' मधल्या परफाॅर्मनसमुळे या सिनेमाच्या संघात आला ! Wink

न्यूझिलंड जिंकलं
हरमनला मितालीच्या वर पाठवायला हवं होतं असं स्कोअर कार्ड बघून वाटतंय

अँकी, पेसरच्या विरूद्ध रन आऊट आणि स्पिनरच्या विरुद्ध स्टंप्ड असा फरक नाहीये. if a batsman is attempting a run, it’s a run-out असा नियम आहे. त्या लॉजिकने नॉन-स्ट्रायकर क्रीझ सोडून पुढे जातो तो रन काढण्याच्या उद्देशानंच असल्यामुळे ते रन-आऊटच्या व्याख्येशी अधिक संलग्न आहे. (he is not deceived in flight or lost his balance to step out).

रन अप च्या मधे नॉन स्ट्रायकर पुढे जातोय हे लक्षात घेऊन, रन अप थांबवून दांडी उडवणं हे ही कुठल्या कसबाशिवाय कमी नाहीये
शिवाय हे बोलर एकटा एक्झिक्यूट करणार आहे
त्यामुळे त्याला क्रेडिट मिळावं असं मला वाटतं >> रन आऊट चे क्रेडीट फिल्डर ला मिळते तसेच हे पण बॉलर ला अ‍ॅस अ फिल्डर म्हणून मिळेल असे मला वाटलेले.

वाईडचा नियम बदलला हे पण मस्त झाले. फारच आचरटपण सुरू असायचा आजकाल. बोलर ला बिचार्‍यांना फारच बंदिस्त केले होते.

त्या लॉजिकने नॉन-स्ट्रायकर क्रीझ सोडून पुढे जातो तो रन काढण्याच्या उद्देशानंच असल्यामुळे ते रन-आऊटच्या व्याख्येशी अधिक संलग्न आहे.
>>
रन आऊट चे क्रेडीट फिल्डर ला मिळते तसेच हे पण बॉलर ला अ‍ॅस अ फिल्डर म्हणून मिळेल असे मला वाटलेले.>>
दोन्हीला अग्रीड...

काल केएससीए नी दुसर्‍या टेस्टला १००% प्रेक्षकांना प्रवेश असल्याचं जाहीर केलं म्हणून परत एकदा तिकिटं मिळण्याच्या आशेनी उचल खाल्ली...

पण हाय कर्मा
पुन्हा एकवार पी सेगमेंट तिकिटं संपल्याचा मेसेज थोबाडावर आपटला

जाऊ दे
आता तिकिटं आणि दुर्बिण अशा दुहेरी बजेटला वापरून मस्त खाणं ऑर्डर करावं अन घरीच टीव्हीसमोर बसून काऊच उबवावा...

अय्यरने आज त्याचा स्पिन गोलंदाजी खेळायचा क्लास दाखवला.
कोहलीने त्याच्याकडून धडे गिरवायची गरज असे खेदाने म्हणावेसे वाटते.
पंत गधड्या बाद झाला नसता तर धमाल करत होता ..

. जर त्यांची पहिली फलंदाजी असती तर सामना लवकर संपला असता. आता आपल्याला दोन्ही डाव पुर्ण खेळावे लागल्याने सामना लांबेल .. पण तरीही सामना तिसऱ्या दिवशी संपतोय

Pages