चित्रपट कसा वाटला - ५

Submitted by ऋन्मेऽऽष on 12 December, 2021 - 15:18

चित्रपट कसा वाटला ५ व्या धाग्यात स्वागत

आधीचा धागा ईथे बघू शकता

https://www.maayboli.com/node/74596

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

च्रप्स सर मोठ्या मनाने क्षमा करावी पामरास. मोठाच अपराध झाला. आपण याच धाग्याच्या मागच्या भागात जाह्नवी कपूर सर्वश्रेष्ठ अभिनेत्री असल्याच्या पोस्ट्स टाकल्ञा आहेत त्यापेक्षा दहापट पोस्टी या धाग्यावर टाकाव्यात. इतरही प्रत्येक धाग्यावर टाकाव्यात. आपणास आम्ही पामर कोण सांगणार सर ? आपण साक्षात द सर आहात सर. सर म्हटले की लोक इरीटेट होतात म्हणून इतकेच. आपण म्हणाल ती अभिनेत्री ग्रेट आहे, आपण म्हणाल तो अभिनेता ग्रेट. आपण म्हणाल तोच सिनेमा ग्रेट आहे सर. आपल्यासमोर सपशेल शरणागती मागेही स्विकारलेली आहे. दिव्य व्यक्तींसमोर शरणागती पत्करण्याने आपल्याचा ज्ञानात भर पडते. Happy

थर्सडे - अगदीच फडतूस बकवास वगैरे. विषय सेन्सिटिव पण त्याची हाताळणी, प्रेझेन्टेशन, फार फार उथळ आणि बालिश.
अ‍ॅक्टर्स पण एक से एक दगड नि धोंडे. एवरीथिंग प्रेडिक्टेबल. ट्रेलर बघूनच वाटलेच होते पण त्याहून बंडल निघाला.

मै + 1
Thursday खूपच डिसअपॉईंटिंग होता... थ्रिलर देखील म्हणता येणार नाही... यामी ला अभिनय कधी जमणार कोणास ठाऊक...
अतुल आणि नेहा ने देखील पाट्या टाकल्या आहेत.. एकदम प्रेडिक्टेबल आहे सगळेच...

ओह्ह... आम्ही काल चालू केला आणि पोरगा आला म्हणून बंद करुन उद्या बघू ठरवलं. आता वेळ मिळाला की बघूच अर्थात. पण हवा गेली ना!

चांगला आहे थर्सडे. फक्त बहुतेकांनी वेडनसडे बघितल्याने धक्कातंत्राचा बळी गेलाय.

थर्सडे ९०% मला आवडला. क्लायमॅक्सचा अंदाज आला होता. पण ज्यासाठी केला अट्टाहास ते पटण्यासारखे नाही असे वाटले. कारण इथे त्यावर खूप चर्चा झालेल्या आहेत. संसदेत झाल्या आहेत. समजा त्या वेळी जरी आला असता तरी लक्ष वेधून घेतले म्हणून कौतुक करणारा एक वर्ग असता आणि एका संवेदनशील प्रश्नाचं भजं केलं म्हणून नाराज होणारा वर्ग असता. शेवटामुळे रसभंग झाला. वेन्सडेचं टायमिंग ही सही होतं आणि परिणामकारकता पण. रहस्यभेद सुद्धा अजिबात निराश करणारा नव्हता.

‘थर्सडे’ काय नवीन वेगळा विषय वाटत नाही, हॉलीवूडमधे, हिंदीमधे ३-४ तरी पाहिलेत यावर त्यामुळे पहाणार नाही. ट्रेलर पण सामान्य आहे. यामी खूप सुंदर आहे.

IMG-20220225-WA0010.jpg

थर्सडे बद्द्ल च्रप्स, मै ला +१
अगदीच बंडल प्रकार आहे. यामी पूर्वी कधीतरी बरी वाटलेली, इथे डोक्यातच गेली. तिला अभिनय जमतच नाही.
बाकी ती हे करत असल्याचं कारण समजल्यावर ऑपरेशन करुन गोळ्या का नाही घातल्या तिला? आणि पंतप्रधान बरे मुंबईत माथेफिरूला गन पॉईंटवर भेटायला जातात.
जरातरी पटकथेवर श्रम करा रे.

मेन म्हणजे डायरेक्ट पंतप्रधानाना असे इन पर्सन भेटायला बोलवायचेच का? काम धंदे नाहीत का त्यांना? ती डिंपल तिथे जाते तर ऐन वेळी जावेद खान ठरवतो मी जाईन तिच्यासोबत आत. पंतप्रधानांच्या सिक्युरिटी गार्ड्स इ. ला काही से नाहीच यात? नैनाकडे गन आहे तरी तिला गन बाजूला ठेवायला पण कुणी सांगत नाही पंतप्रधान भेटायला जाण्यापूर्वी! खुशाल गोळीबार चालू आहे आणि पंतप्रधान मधे उभ्या! इतके सगळे कॅजुअल! हास्यास्पद हा शब्द ही कमी आहे.
जावेद खान चे कॅरेक्टर इतके पोकळ का आहे? तो नुसता येतो आणि सिगारेटी फुंकत उभा असतो सारकॅस्टिक कमेन्ट्स करत. काहीच परिस्थिती ताब्यात घेत नाही की शेजारी पाजारी, यामीचा बॉफ्रे, मुलांचे आई बाप कुणाचीच चौकशी करत नाही, की बाबा कोण आहे ही नैना, कशी आहे इ. नंतर मग नैनाच्या आईला भेटून स्वतःच रडतो काय. मेन्टली अनस्टेबल वाटतो तोच. त्याच्या आणि नेहा धुपियामधे काय हिस्टरी आहे त्याचा संबंध काय कथेशी? नी नेहा प्रेग्ननट असते त्याला तरी अर्थ काय ? उगीच काहीतरी.

ओह येस वावे... वाचले आत्ता Happy
सो सो च वाटतोय की... तिकीट काढावं की नाही :विचारात पडलेली बाहुली:

तिकीट काढावं की नाही :विचारात पडलेली बाहुली:
>>>>
आमच्या दोन्ही घरातली सगळी लोकं पोराबाळांसह बघायला जाताहेत. मी सोडून. मागे तानाजी बघून बोअर झाल्यापासून मनच उठले असे वीएफएक्स सुपरहिरो स्टाईल रंगवलेले मर्द मावळे बघायचे.. त्यापेक्षा तानाजी अन बाजीप्रभू म्हटले की ज्या प्रतिमा डोळ्यासमोर येतात त्या तसेच राहू देणे उत्तम वाटते..

आमची पण काढली तिकिटं Happy बघू.. अरे पण वेबसाईट वर ४ तासाचा मुव्ही आहे असं दाखवत आहेत रिअली ? Uhoh

माझ्या सासू सासऱयांना पावनखिंड आवडला.. त्यांना झिम्माही फार आवडलेला.
बाय द वे, एखाद्याने ताटातलं गोड कसं बाजूला ठेवावं आणि मन लावून अगदी शेवटी खावं, तसा हा चित्रपट मी कालपर्यंत ‘थर्सडे’ बाजूला ठेवलेला.. पण फारच ओके वाटला.. मला यामीचा भूत पोलिस जास्त आवडलेला

त्यांना झिम्माही फार आवडलेला. >>> सासू सासरे आणि एकूणच त्या पिढीतल्या कोणाला झिम्मा न आवडतो तर ते नवल झाले असते.. असे मला वाटते.

नेटफ्लिक्स झालं एकदाचं चालू. समोर एव्हढे ऑप्शन्स आले कि काय बघायचं ठरतंच नाही.
गेम ओव्हर झाला म्हणून त्याच नावाचा चित्रपट पाहिला. इथेही तापसी, इथेही लूप.
पूर्ण होईपर्यंत पाहिला म्हटल्यावर नंतर आठवलेल्या चुका नाही लिहीत आता. तेव्हढा वेळ तर गेला मजेत.

गेल्या दोन महीन्यात पाहिलेल्या सर्व चांगल्या चित्रपटांवर उतारा म्हणून युट्यूबवर जनम जनम पाहिला आणि माणसात आलो.
या चित्रपटाला गुंडा प्रमाणे आपण ठरवलं तर कल्ट क्लासिक बनवू शकतो.

थर्सडे आवडला मला. वेनस्डेशी तुलना होणं शक्यच नाही. तो फारच भारी होता.
इथे आधीपासूनच अंदाज असतो की यामी गौतम कुठल्यातरी चांगल्या कारणाने हे करतेय त्यामुळे नेमकं काय, तेवढाच सस्पेन्स आहे. ड्रायव्हरच्या बाबतीतला ट्विस्ट अनपेक्षित आहे. यामीचं काम तसं बरं आहे, अतुल कुलकर्णीचं चांगलंच आहे. नेहा धुपियाचंही आवडलं मला. नेहा धुपिया आणि अतुल कुलकर्णी आधी नवराबायको असावेत कारण तो तिला म्हणतो की आपल्याला मूल झालं नव्हतं ते बरंच झालं. आता तू प्रेग्नंट आहेस तर जरा संवेदनशीलता दाखव वगैरे वगैरे.
अतुल कुलकर्णी करतो की चौकशी त्या मीरचंदानीची.
कदाचित इथे बरीच नावं ठेवलेली वाचून मग बघायला घेतला त्यामुळे अपेक्षाच कमी निर्माण झाल्या आणि त्यामुळे आवडला असं असू शकतं Lol

स्पॉयलर अ‍ॅलर्ट :
बलात्कार्‍याला फाशी याबाबत स्त्रीसंघटनांची मतं ही फारशी अनुकूल नाहीत. महिला वकील, न्यायाधीश पण म्हणतात कि जर फाशीच्या शिक्षेची मागणी झाली तर न्यायालये पुरावे काटेकोर पाहतात. नैसर्गिक न्यायाचे तत्त्व पण पाहतात त्यामुळे आरोपी सुटण्याच्या शक्यता निर्माण होतात. शिक्षा होणे महत्वाचे. ओलीस धरण्यामागे तपासात राहणार्‍या चुका, हलगर्जीपणा यावर बोट ठेवले असते आणि तसे होऊ नये यासाठी कारवाई करण्याचे आश्वासन मिळवले असते तर शेवट सुसह्य झाला असता.

बलात्कार्‍याला फाशीसाठी पीएमला बोलावणे हा सनसनाटीपणा दाखवण्याचा मोह नडला.

उद्या अन चार्टरड बघणार

कुठेही असेल तरी बघून येणार

अनचार्टर्ड

मग जुरासिक वर्ड

मग हरी पॉटर , दम्बलदोर सिक्रेट येणार आहे

मला चित्रपटाच्या पॉईंट ऑफ व्यू ने कर्रेक्ट वाटले ते पीएमला बोलावणे.आणि पीएमचे येणे सुद्धा. पोलिस आणि जवान आपला जीव धोक्यात घालून आपले कर्तव्य निभावत असतातच ना. मग प्रधानमंत्री ईतक्या मुलांचा जीव वाचवायला जीवाची रिस्क घेऊ शकत नाही का.. असा विचार करणारी बरीच जनता असते. त्या जनतेच्या भावना लक्षात घेत बरोबर हे कॅश केलेय.

चित्रपट हा व्यवसाय आहे. तिथे आर्थिक गणिते सांभाळणे गरजेचे हे लक्षात घ्यायला हवे. त्यांनी समाज प्रबोधन करावे वा कायद्याच्या भानगडी क्लिष्ट करून दाखवाव्यात ही अपेक्षाच चुकीची आहे. आपण लॉजिकल चुका काढण्यात धन्यता मानतो आणि तिथे चित्रपट बॉक्स ऑफिसवर यश मिळवतो जो त्यांचा मूळ हेतू असतो. चित्रपट हा तसेच फील घेऊन पाहिल्यास रुचेल आणि आवडेल असाच आहे.

Pages