चित्रपट कसा वाटला - ५

Submitted by ऋन्मेऽऽष on 12 December, 2021 - 15:18

चित्रपट कसा वाटला ५ व्या धाग्यात स्वागत

आधीचा धागा ईथे बघू शकता

https://www.maayboli.com/node/74596

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Acting जमणारा एखादा स्टार कीड एखादाच असतो किंवा एखादी

आलिया ला चांगला दिग्दर्शक मिळाला म्हणून नैतर बसली असती स्तुडेंट ऑफ द इयर सारखे कचरा सीनेमे करत

काहींना चांगले दिग्दर्शक देऊनही माती खातात
उदा सोनम कपूर

जान्हवी व खुशी ह्यांच्या मुळे त्यांच्या प्लास्टिक सर्जन ची करीअर उत्तम झाली आहे. केव्ढे ते चॅलेंज.

संधी असूनही नेपोटिझमला मनापासून विरोध करणारा एखादाच आर के फिल्म्स (राज कुंद्रा) असतो.

उगाच श्रीमंतांचा तो नेपोटिजम आणि स्वतःचा/ स्वताच्या पोरांचा तो टॅलन्ट, याला काही अर्थ नाही.>>+१
कोणतेही आई-वडील आपल्या मुलांनाच जे आपले आहे ते द्यायला बघणार. हुशार असतील तर त्यांच्यासाठी कोणते क्षेत्र योग्य आहे ते बघतील नाहीतर जोवर पैसा आहे तोवर लाड पुरवतील. मुलांना योग्यता नसताना संधी मिळणे ही त्यांच्या आई-वडिलांची पुण्याई.

विषय चाललाच आहे म्हणून..
एका दिवाळी अंकात ऋषी कपूरवरचा बाबूमोशाय यांचा लेख वाचला. सकारात्मक-नकारात्मक, गुण-दोष, दोन्ही गोष्टी त्यात त्यांनी लिहिलेल्या आहेत. त्यात एक उल्लेख असा आहे की ऋषी कपूर आणि नीतू सिंगची भांडणं व्हायची तेव्हा मुलं (रीधिमा आणि रणबीर) घराबाहेर बसून रहायची. हे वाचून वाईट वाटलं त्या दोघांसाठी. रणबीरला स्टारपुत्र असल्याचा फायदा झाला असणारच, पण त्याचबरोबर दारू पिऊन आईशी भांडण करणारे वडील 'लाभल्याचा' तोटाही किती तरी झाला असणारच की. अर्थात ऋषी कपूर स्टार नसता तरी तो अशी भांडणं करू शकला असताच, पण शेवटी फरक पडत असणारच. ऋषी कपूरलाही राज कपूरचा मुलगा असण्याचे अनेक फायदे आणि अनेक तोटे झाले असणार. इच्छा असो वा नसो, हे ओझं पाठीवर वागवायला लागतच असणार.

जान्हवी व खुशी ह्यांच्या मुळे त्यांच्या प्लास्टिक सर्जन ची करीअर उत्तम झाली आहे. केव्ढे ते चॅलेंज.>>> अगदी अगदी. काही नाही तरी सर्जन लोकांच्या बायोडेटावर नोंद करण्यात यशस्वी झाल्या म्हणून कोणत्यातरी गल्लीतील दादासाहेब फाळके अवार्ड मिळेलच

वावे, त्याच प्रसंगावरून रणबीर कपूरने मला रिलेशनशिपमध्ये राहायला आवडत नाही असं म्हटलं होतं एका मुलाखतीत.

जिथे सामान्य माणसाचे स्ट्रगल संपते तिथे स्टारकिड्स चे सुरु होते. हायला ! मायबोलीवर अन्यन्या पांडेने कधी सदस्यत्व घेतलं Biggrin Light 1

Happy Happy Happy

मुलगा असण्याचे अनेक फायदे आणि अनेक तोटे झाले असणार. इच्छा असो वा नसो, हे ओझं पाठीवर वागवायला लागतच असणार.
>>>>

वावे सहमत आहे.
नुकतेच आयपीएल ऑक्शन झाले. त्यानंतर मुंबई ईंडियन्सने अर्जुन तेंडुलकरला घेतले म्हणून नेहमीसारखे ट्रोलर्स फॉर्मात आले.
प्रत्यक्षात मला त्या मुलाचे फार कौतुक वाटते. कधीही त्याला वडीलांच्या नावाचा फायदा ऊचलत चमकोगिरी करताना पाहिले नाही. उलट त्या ग्लॅमरपासून दूर मैदानावर घामच गाळत असतो, आपली जी काही रक्तातूनच आलेली ऊपजत आवड आहे तिच्यावर प्रामाणिक मेहनत घेताना पाहिले आहे. तरी तो सचिनचा मुलगा असल्याने त्याला मुंबई ईंडियन्सवाले सोबत ठेवतात. जिथे त्यालाही खेळाचा अनुभव मिळतो आणि टीमलाही एक नेट गोलंदाज मिळतो. जिथे तो नक्कीच आपले १०० टक्के देत असेल. भले मग त्याला सचिनच्या नावामुळेच मुंबई ईंडियन्स घेत असेनात, पण तो हे टाळू कसे शकणार. या ट्रोलर्सचा तडफडता आत्मा शांत करायला, स्वत:ला पुर्णपणे स्वबळावर सिद्ध करायला वडिलांना सोडून, घर सोडून निघून जावे का त्याने?

नेपोटिझमद्दल बोलायच झाल्यास, अख्खी साऊथ फिल्म इण्डस्ट्री नेपोटिझमवरच उभी आहे. बॉलिवूड त्यामानाने काहीच नाही. अमक्याचा मुलगा, भाऊ, भाचा, जावई, पुतण्या असे सगळे घुसले आहेत तिकडे. प्रभाससारखे एक दोन कलाकार अपवाद आहेत तिकडे.

फर्दिन >>>>>>>> चान्गल काम करतो की तो.

जिथे सामान्य माणसाचे स्ट्रगल संपते तिथे स्टारकिड्स चे सुरु होते. हायला ! मायबोलीवर अन्यन्या पांडेने कधी सदस्यत्व घेतलं Biggrin Light 1
नवीन Submitted by जाई. on 2 March, 2022 - 10:40

>>>अभ्यास कमी पडतोय जाई - सिद्धांत चतुर्वेदी...

कायदेशीर नेपोटिझम असलेलं क्षेत्र म्हणजे शेती...
शेतकर्‍याच्या पश्चात शेती बाय डीफॉल्ट त्याच्या पोराबाळांमधे वाटली जाणार, पोराबाळांना शेतीतली जराही समज नसली तरी ते बाय डीफॉल्ट शेतकरी होणार... (हे इतरही बर्‍याच धंद्यांमधे लागू होतं)
(पण) जर तुमच्या बापजाद्यांमधे कुणाची शेती नसेल, तर तुम्हाला शेतजमीन विकत घेता येणार नाही...
म्हणजे सरळ सरळ आऊटसायडर्स आर नॉट अलाऊड...

इतर धंद्यांना टक्कर देणारी कंपनी सुरू करायला तुम्हाला कुणी आडवत नाही
पण इथे कायदाच तुम्हाला परवानगी नाकारतो...

जाऊदे... परत पडद्यावर येऊया...

पण लोकांचे वैयक्तिक उल्लेक कराच कशाला. पिक्च् र बघा अन बाहेर प डा.

ते जाउ द्या बाई. जेम्स बाँड नो टाइम टु डाय यु ट्युब मुव्हीज वर आला आहे १५० रु भाडे. मी घेतला कालच. बघत आहे तुकड्या तुकड्यात.

अभ्यास कमी पडतोय जाई - सिद्धांत चतुर्वेदी>> तुम्हाला sarcasm कळला नाही याबद्दल दिलगीर आहे चऱप्स .

लव्ह हॉस्टेल पाहिला आताच.
सानिया मल्होत्रा, विक्रांत मौसी आणि बॉबी डार्लिंग..
सैराटपेक्षा भारी !
पण लहान मुलांसमोर बघू नका..

मुलीची परीक्षा असल्याने आणि गडबड असल्याने झुंड सिनेमाहॉल मधे पाहून होईल असे वाटत नाही. मुलाला झुंड काय आहे हेच माहिती नाही. त्यांच्या सर्कलमधे बॅटमॅनची चर्चा आहे. गंगूबाई, बॅटमॅन, पावनखिंड या तीन सिनेमांनी भरपूर स्क्रीन्स पटकावलेले असल्याने झुंडचे शोज खूप कमी आहेत. महाराष्ट्रात तो चालला असता हे नक्की. महाराष्ट्राबाहेर उत्तर भारतात नागराज मंजुळे हे नाव माहिती नाही फारसं. अमिताभ बच्चन हेच त्यातल्या त्यात ओळखीचं नाव. ते ही आता हमखास गर्दी खेचणारं नाही. त्यातच झुंडची पब्लिसिटी उत्तर भारतात नीट झालेली नाही. त्यात निवडणुका चालू आहेत. वेडगळ मुहूर्तावर प्रदर्शित केलाय नागराज (किंवा निर्मात्या)ने.

ओटीटी वर आल्यावरच पाहता येईल.

गंगुबाई 100 करोड क्रॉस
झुंड एक करोड...

बच्चन .. ग्रेट ऍक्टर पण त्याच्या नावावर सिनेमा खपायचे दिवस गेले... युथ ला अपील होत नाही आता....

लगान
आजा नचले
चक दे इंडिया
आमीर खान कुस्ती कोणता तो ? फोगट
झुंड
राजकुमार राव चा कबड्डी की खोखोवरील एक मुवि
83 की 84 कपिल देव

खेळ बदलून बदलून असे बरेच पिक्चर येऊन गेलेत , फारसे नावीन्य उरले नाही.

बछनऐवजी सचिन खेडेकर हवा होता

लॉक डाऊननंतर भल्याभल्यांचे मागच्या सिनेमातले प्रॉफिट वाईप आउट झाले आहे.

ह्याचे 60 कोटी निघणं मुश्किल वाटत आहे

ह्याचा प्रोड्युसर संदीप सिंह आहे म्हणे , तोच ना सुशांत ड्रग केस , मोदी मुव्हीवाला ?

Submitted by शान्त माणूस on 6 March, 2022 - 14:52>>
सहमत. माझ्या मुलाला पण बॅटमॅन बघायचा होता. मंजुळेंनी जरा पॅटर्न बदलायला हवा. असो ओटीटीवर आल्यावर बघू.

बॅटमॅन मस्त आहे. स्टोरी कितीहि घिसिपिटी असेना, पडद्यावर सादर करण्याचं कौशल्य महत्वाचं. ट्वायलाइट आणि नंतरच्या काहि सिनेमांतुन पॅटिंसन गर्ली वाटला होता; पण यात त्याने चांगलं काम केलं आहे. मस्ट वॉच...

काळीमाऊ, अनचार्टॅड बघितला का? तो सिनेमा थोडा फसला आहे, आधिच्या गेम्सच्या तुलनेत. इंडी जोन्सचे सिनेमे आवडत असतील तर दोन तासांची निव्वळ करमणुक आहे...

त्याचे शो रोज कमी कमी होत चाललेत

नाही बघणार

11 तारखेला राधे श्याम , शिवाय एक मुलांसाठी कार्टून मुवि येतोय

शिवाय रविवारी विले पार्ले सही रे सही, 13 मार्च

आता एवढेच ऑप्शन ठेवले आहेत

अनचारटेड युट्युबवर 15 मिनिटात स्टोरी ऐकली , घरच्यांनीही ऐकली। Proud

झटका म्हणून एक मराठी सस्पेन्स मुवि आला आहे , ट्रेलर चांगला आहे

पण त्याचेही शो फार विचित्र टायमिंगचे आहेत

बछनऐवजी सचिन खेडेकर हवा होता
>>> म्हणजे अक्खा थेटर रिकामा... Happy

बच्चन ऐवजी आमिर बेस्ट ठरला असता कमर्शियली...
आयुष्मान , अक्षय किंवा जुबा केसरी पण चालला असता...

ह्याचा प्रोड्युसर संदीप सिंह आहे म्हणे , तोच ना सुशांत ड्रग केस , मोदी मुव्हीवाला ? >>>> Lol
चला म्हणजे काँग्रेस आणि संघाचे एकमत झाले मायबोलीवर हा सिनेमा न बघण्याबाबत. मोदीच्या निर्मात्याने सिनेमा प्रोड्युस करूनही शेफाली वैद्यसहीत सर्वांनी नागराज मंजुळेच्या विरोधात आघाडी उघडली आहे. काँग्रेसवाल्यांचे हे कारण आत्ता समजले. Lol

दादा, हा सिनेमा फुटबॉलविषयी नाही. फुटबॉल खेळणार्‍या झोपडपट्टीतल्या मुलांविषयी आहे. एका जगातून दुसर्‍या जगात येण्याचा संघर्ष आहे यात. यात मोदीजी नाहीत. Proud
महाराष्ट्रातच सिनेमाला शोज मिळालेले नाहीत हे कलेक्शन कमी असण्याचे कारण आहे. संदीप सिंग पाच सहा निर्मात्यांपैकी एक आहे. बाकीच्यांमधे टी सिरीज आणि दोन हिरेमठ आहेत. २२ कोटी बजेट आहे. त्यातच पुणे विद्यापीठातला सेट बच्चनच्या तारखा न मिळाल्याने वाया गेल्याने अमिताभने स्वतःचे मानधन कमी केले आहे. यालाही भाजपाचा ठरवा मग.

कुठेही कसे राजकारण घुसडता ?
या आधी दाऊद इब्राहीम ने फायनान्स केलेले कित्येक सिनेमे लोकांनी पाहिलेतच की. संजय दत्तचे तर संबंधच अंडरवर्ल्डशी होते. त्यावरून चित्रपट गुन्हेगार ठरत नाही. तसेच संदीप सिंह मुळे हा चित्रपट राजकारणावर असल्याचे ठरत नाही. बाकी तुमची मर्जी.

प्राईमवर सम ऑफ फिअर्स बघितला. छान आहे. हा नक्की बघा.
हाय क्राईम पण बघितला. मॉर्गन फ्रीमन ची ऍक्टिंग आवडते सो एकदा बघायला हरकत नाही.

प्राईमवर नो टाइम टू डाय बघतेय. अर्धा काल बघितला . दुसऱ्याच फ्रेममध्ये दिग्दर्शकाने केलेला बावळटपणा बघून ऑ झालं . तरीही रेटतेय . तसा action पट म्हणून बरा वाटतोय

सुशांत सिंग हा उल्लेख सहज केला

मला खेळ आवडतच नाहीत , त्या वरच्या यादीतील मी फक्त लगान स्वतः बघितला , चकदे आमच्या कम्पनीने दाखवला होता. बाकी 0

मी क्रीडा सिनेमे बघत नाही , मला समजतच नाहीत,

माझ्या अंदाजानुसार , मंजुळेना / निर्मात्यांना फटका बसेल

पुढचा नंबर राजमौलि आरारार असेल, एकदा रिलीज कँसल केल्याने त्याला आधीच 20 कोटींचा फटका बसलेला आहे.
https://www.news18.com/news/movies/rrr-makers-face-loss-of-rs-18-crore-o...

Pages