चित्रपट कसा वाटला - ५

Submitted by ऋन्मेऽऽष on 12 December, 2021 - 15:18

चित्रपट कसा वाटला ५ व्या धाग्यात स्वागत

आधीचा धागा ईथे बघू शकता

https://www.maayboli.com/node/74596

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्राइमच सर्च इन्जिन सगळ्यात भन्गार आहे तिथे नविन मुव्हि आले हे इथे अनाउन्स झाल की कळत मग शोधुन बघायच
त्याउलट नेटफ्लिक्स इतका आग्रह असतो की हे बघा,हे आवडेल, याआधी ते बघितल होत तसच हे आहे, बघुन तर बघा

शॉन ऑफ द डेड (तिसऱ्यांदा) बघितला. अजूनही खळखळून हसायला लावले. बेष्ट झोंबी पट !

काल असंच बघायचं म्हणून कोकणस्थ पाहीला. मुळात ते कोकणस्थच का दाखवलेत, दुसरे कोणी असते तरीही हे असं होऊच शकतं ना?
आणि त्यांचा मुलगा तर मला कोणी फॉरेनरच वाटला आधी, मराठी वाटतच नाही तो.
मग जरा वेळाने ट्युब पेटली, हा तर अमिताभ चाच कुठल्या तरी सिनेमाचा रिमेक आहे बहुतेक. मग पळवत पाहीला, सगळं काही आपलं चौकटीत च,,, मोजून मापून आश्चर्य ( पोराच्या परस्पर लग्नाचं) , मोजून मापून भानगडी, मोजून मापून बदला, आणि शेवटी सगळे परत आपले पूर्वीप्रमाणे सेट. झाला सिनेमा.
गाडगीळांच्या मोजून मापून कोकणस्थ या लेखाची आठवण झाली.

Weekend ला A Thursday पाहण्याचा बेत आहे. कृपया स्पॉयलर्स देऊ नयेत ही नम्र विनंती.

Weekend ला A Thursday पाहण्याचा बेत आहे. कृपया स्पॉयलर्स देऊ नयेत ही नम्र विनंती. >>> Biggrin

A Thursday- पाहिला. श्वास रोखून धरायला लावणारा आहे. यामी गौतमी, अतुल कुलकर्णी टॉप. डिंपल कापडियाचा वावर सफाईदार आहे. नेहा धुपिया नसती तरी चाललं असतं.
शेवटच्या दहा मिनिटांपर्यंत ओलीसनाट्य रंगले आहे. शेवट भडक वाटू शकतो. दक्षिणेचा रिमेक असेल कदाचित. या विषयावर अनेक चर्चा झालेल्या आहेत. तरीही चित्रपटामुळे कदाचित नव्याने चर्चेला तोंड फुटू शकते. इथे नवीन धागाही निघू शकतो. स्पॉईलर्स नकोत म्हणून इतकेच.

यामी गौतमीसाठी मला बघायचाच आहे..
जे बघतील त्यांनी लगेच ईथे कसाय ते सांगा. म्हणजे चांगला असेल तर सहकुटुंब बघता येईल.

यामी गौतमीने १६ मुलांना ओलीस धरलेले असते. एका तासाने एका मुलाला मारण्याची धमकी तिने दिलेली असते. सुरूवातीला पाच कोटी रूपये आणि फक्त इन्स्पेक्टर जावेद खान (function at() { [native code] }तु ल कुलकर्णी) याच्याशीच बोलणी करायची अट असते.नंतर तिच्या अटी वाढत जाऊन दोन इसमांना पकडून आणणे आणि थेट पीएम शी समोरासमोर , ते ही तिच्या घरात बोलण्यापर्यंत अटी वाढत जातात. पीएम ला का भेटायचे असते हे सांगणे स्पॉयलर होईल.

पाहिला आताच थर्सडे. खूप आवडला. शेवट विशेष आवडला. दिल कुछ और कहता है दिमाग कुछ और असे झाले शेवटी. जरूर बघा. आवडेलच. आमच्याकडे सर्वांना आवडला. कॉफी ब्रेक घ्यायचेही लक्षात राहिले नाही. आता घेतोय. आणि शेवटाचीच चर्चा करतोय...

अरे हो, यामीनेही बिलकुल निराश केले नाही. ब्यूटी विथ ॲक्टींग..

बुधवारी पाहा नासिरचा वेन्सडे
>>>>
अरे हा ओटीटीवर कुठे बघायला मिळेल का? आता शोधला पण सापडला नाही.

अरे हो, यामीनेही बिलकुल निराश केले नाही. ब्यूटी विथ ॲक्टींग.. >>> + ७८६
एक तर ब्युटी असते नाहीतर अ‍ॅक्टींग असते. ब्युटी विथ अ‍ॅक्टींग हा प्रकार दुर्मिळ आहे. उदा. सई Happy

ब्युटी विथ अ‍ॅक्टींग हा प्रकार दुर्मिळ आहे.
>> येस .. उदा. झानवी कपूर किंवा वहिदा रेहमान

ब्युटी विथ अ‍ॅक्टींग हा प्रकार दुर्मिळ आहे.
>> येस .. उदा. अनन्या पांडे किंवा टिना मुनीम

Thursday हाॅटस्टारवर आहे, बघायचाय, पण आत्ता the great indian murder बघतेय, बराच जांगडगुत्ता आहे, त्यामुळे सगळे एपिसोडस बघितल्यावरच सुटका आहे.

श्याम सिंगा रॉय मलाही आवडला. त्यातली देवदासी व नायकाची प्रेमकथा तरल होती , तो भाग खूप आवडला.

Pages