चित्रपट कसा वाटला - ५

Submitted by ऋन्मेऽऽष on 12 December, 2021 - 15:18

चित्रपट कसा वाटला ५ व्या धाग्यात स्वागत

आधीचा धागा ईथे बघू शकता

https://www.maayboli.com/node/74596

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आज 'पावनखिंड' पाहिला. दोन तीन वर्षांनंतर पहिल्यांदा थिएटरमध्ये जाताना छान वाटलं.
चित्रपट बरा आहे, पण भावनाप्रधान संवाद, नाट्यमयता जरा जास्तच झाली आहे. मुळातली घटना इतकी नाट्यमय असताना आणखी वरून नाट्य पेरण्याची तशी काही गरज नसली पाहिजे खरंतर. शिवाय सतत सगळेजण वक्तृत्वस्पर्धेत भाषण केल्यासारखे बोलत आहेत असं वाटलं.

अभिनय चांगले आहेत, विशेषतः अजय पुरकरने बाजीप्रभूंचं काम उत्तम केलंय. चिन्मय मांडलेकर शिवाजी महाराज म्हणून शोभून दिसतो, पण सतत एकाच आविर्भावात वावरलाय. सिद्दी जौहर म्हणून समीर धर्माधिकारी आहे. त्याचंही काम चांगलं झालंय. आस्ताद काळे सिद्दी मसूद आहे, तो सतत नाकातून फूत्कार टाकतो. Uhoh

काही काही चुका मात्र Uhoh अशा आहेत. बाजीप्रभूंचं घर दाखवलंय, त्यात स्वैपाकघरात मागे डबे आहेत ते चक्क स्टीलचे वाटले! रायाजीने जे चामड्याचं चिलखत टाईप घातलंय, त्याला चक्क आपल्या बेल्टला असतं तसं आधुनिक बक्कल आहे!!

Thursday पाहिला.. बोअर झाला
एवढा सगळा अट्टाहास करून पण तो कुठेतरी अपील झाल्यासारखा वाटला नाही.... सोशल मीडिया चा प्रभावी वापर करून पण ती हवी ती गोष्ट साध्य करू शकली असती असं वाटलं..
जाऊदेत जास्त लिहू शकत नाही..Spoiler दिल्यासारखे होईल.

वावे, मी काही दिवसांपूर्वीच फत्तेशिकस्त पाहीला. महाराजांचा चित्रपट म्हणून जरा अपेक्षा होत्या, पण खरंतर इतका नाटकीपणा जाणवला की हसावं का रडावं कळेना. सगळंच वरवरचं आणि नाटकी. आणि आता यातही तेच सगळे कलाकार आहेत मोजून, फक्त भूमिका बदलल्यात, हे बघून तर माझी घोर निराशा झाली.

बाकी तुमच्या प्रतिसादाशी सहमत. ओटीटीवर आला की बघेन कदाचित. तरी ट्रेलर चांगला वाटला.

देवगण फॅमिलीचा तानाजी सुद्धा बंडल होता. स्पेशल ईफेक्टस आणि स्टंटस असे की एका मराठमोळ्या योद्ध्याचे बाहुबलीछाप चित्रण झाल्याचे फिल आले..
त्यावर धागाही काढावासा वाटलेला तेव्हा.
https://www.maayboli.com/node/73073
तेव्हा जे वाटलेले कर्रेक्ट होते. पुन्हा चुकूनही एकही सीन बघणे झाले नाही.

ब्युटी विथ अ‍ॅक्टींग हा प्रकार दुर्मिळ आहे.
>> येस .. उदा. झानवी कपूर किंवा वहिदा रेहमान >>>>>>>>> वहिदा रहमान बरोबर आहे. पण जान्हवी कपूर? अनन्या पाण्डे सुद्दा बरी आहे की.

बुधवारी पाहा नासिरचा वेन्सडे
>>>>
अरे हा ओटीटीवर कुठे बघायला मिळेल का? आता शोधला पण सापडला नाही. >>>>>>>> एमेझॉन प्राईमवर आहे.

>>ब्युटी विथ अ‍ॅक्टींग हा प्रकार दुर्मिळ आहे.
>> येस .. उदा. झानवी कपूर किंवा वहिदा रेहमान
>> येस .. उदा. अनन्या पांडे किंवा टिना मुनीम <<
प्लीज, प्लीज, प्लीज कंफर्म इट्स ए सार्कॅस्टिक कामेंट. ..

वहिदा रेहमान - फक्त विज्युअलाय्ज करा "काटोंसे खिंच..", "पिया तो से.." बिइंग रेंडर्ड बाय जान्हवी कपूर, अनन्या पांडे, टीना मुनीम ऑर इवन माधुरी फॉर दॅट मॅटर. दे कॅनॉट इवन गेट क्लोज टु व्हॉट वहिदा रेहमान डिड एफिंग फिफ्टि इयर्स अ‍ॅगो...

नविन जॉनरं म्हणा, कांटेंट्सचा भडिमार म्हणा, अथवा सिनेमा मेकिंगने टाकलेली कात - अभिजात सौदर्य पारखण्यात कुठेतरी चूक होतेय असं हल्ली वाटायला लागलंय...

>>थुर्सडे पाहिला ... डिस्पोईंटेड ...<< +१
हा सिनेमा साधारण १० वर्षांंपुर्वि रिलीज व्हायला हवा होता. कॅपिटल पनिशमेंट फॉर कान्विक्टेड रेपिस्ट - हा कायदा निर्भया प्रकरणानंतर लागु झाला ना? आणि ते कल्प्रिट्स यमसदनाला पोचले, मग हे वराती मागुन घोडे का...

सी Lol

वहिदा म्हणजे टोटल ग्रेस. मला सर्वात आवडते ती गाता रहे मेरा दिल मधे. तोपर्यंत एरव्ही लूज पळत सुटणार्‍या देव आनंदलाही विजय आनंदने एकदम डिग्निफाइड करून टाकला होता त्यात.

लूज पळत सुटणार्‍याLol
वहिदा फार सुंदर पण वयापेक्षा खूप मोठी किंवा फार गंभीर वाटायची नेहमी. चौदवी का चांद गाण्यात २२ वर्षांचीच होती पण मोठीच वाटली. काय माहिती का ती कधी खळखळून हसणारी वाटली नाही. तरीही मला आवडते म्हणा.

आता सगळे सन्दर्भ बदललेत, चित्रपट कथा बदललेल्या आहेत. आताच्या कथान्च्या मानाने आताच्या मुली फिट असतील. आता मेकपच्या साहाय्याने लुकवर मेहनत घेतली जाते. त्त्यामुळे सगळ्याजणी सारख्याच वाटतात. ज्या पिढीने तेव्हाचे चित्रपत पाहीले नसतील, तेव्हाच्या नायिका माहित नसतिल त्याना आताच्या ग्रेट वाटणारच.

तेव्हाचे अभिजात सौन्दर्य मात्र आता राहिले नाही. वहिदा, वैजयन्ती, हेमा ह्या जात्याच सुन्दर होत्या . वहीदामध्ये असलेली ग्रेस आजही तिच्या ८० व्या वर्षी कायम आहे. (ती कायम मोठी वाटली याच्याशी सहमत). आशा पारेख तेव्हाच्या कटी पतन्ग वगैरे मध्ये बेढब दिसलेली पण आता खुप
सुरेख म्हातारी झालेली आहे.

आज सौन्दर्याच्या व्याख्या बदललेल्या आहेत, त्यामुळे तुलना होउ शकणार नाही. आजच्या नायिका अजुन २० वर्षान्नी कशा दिसतील देव जाणे.

पावनखिंडी च्या सिनेमात असंख्य ऐतिहासिक प्रमाद आहेत
ट्रेलर मधेच इतके आहेत की प्रत्यक्ष चित्रपटात किती असतील याचा विचार करवत नाही

समग्र विचार करुन चित्रपट बनवाय्ला हे काही हॉलिवुड नाही. इथे आदर्श म्हणुन नावे घ्यायला हॉलिवुड आठवते, चित्रपट बनवताना बॉक्स ऑफिस व हिरोची इमेज विचारात घेतली जाते. त्यात भर बनवणार्यान्च्या पोलिटिकल इन्क्लिनेशनची. Happy

A Thursday- पाहिला. नेहा धुपिया नसती तरी चाललं असतं.

>>>> मला उलट वाटलं, डिंपल नसती तरी चाललं असतं. Wink

एकदा बघण्यासारखा आहे.

***** स्पॉयलर *****

शेवटचा ट्विस्ट आवडला. इंटरव्हलनंतर जरा ट्रॅकवरून घसरत चाललाय असं वाटत असतानाच त्या ट्विस्टमुळे परत जरा स्टोरीत जान आली. शिवाय यामीचे चेहर्‍यावरचे, डोळ्यांतले हावभाव क्षणार्धात बदलतात, त्यामुळेही सीन्स परिणामकारक झालेत.

स्कूल बसमध्ये एक महिला अटेंडंट असायलाच हवी असा नियम आहे ना? २००७ सालीही होता ना?

माझा मुलगा मुलीपेक्षा चार वर्षांनी लहान आहे. पण माईण्ड रीडींगमधे तल्लख आहे. ती म्हणाली फुलपाखरू क्युट असतं की हा लगेच पाल क्युट असते असं म्हणतो. ती चिडली कि दुसर्‍या रूममधे जाऊन येस्स येस्स करत सेलिब्रेट करतो. मुलीला कितीदा तरी सांगितलं कि तुझं चिडणं हीच त्याची कमाई. नादाला लागू नकोस. पण तिला ते समजतच नाही. त्याचा पॉइण्ट चुकीचा कसा आहे हे प्रूव्ह करत बसते आणि हा वेड घेऊन पेडगावला जात असतो.

काल पावनखिंड पाहिला. काही चुका आहेत आणि ड्रामा थोडा जास्त वाटला. पण भन्साळी सारखा फालतूपणा नाहीये, तानाजी, sorry, तान्हाजी सारखे ग्राफिकचे घोडे नाहीयेत. त्यामुळे बरा वाटला. कलाकारांची कामं चांगली आहेत. स्त्री पात्रांचे मेकप जरा सौम्य असते तर चांगलं झालं असतं.

नेहा धुपिया नसती तरी चाललं असतं.
>>>
हो, वेस्ट घालवले तिला नंतर. अतुल कुलकर्णीनेच तिकडची आघाडी सांभाळली..

ऐतिहासिक चित्रपटात जर देसाईं कला गिग्दर्शक असतील तर दगडाऐवजी फायबर वापरलं आहे हे दिसून येतं. सिंहगडच्या दगडाच्या भिंतींचे नैसर्गिक रंग आणि तानाजी मधे वापरलेले फासलेले रंग यामुळे सेट तकलादू वाटतो. बाजीराव मस्तानी मधे शनिवारवाडा खटकला होता. शिवाय व्हीएफएक्स चा अंधुक प्रकाश असतो. त्याचे कलर व्हीलच वेगळे वाटते. अजिंठा चित्रपटात पण खटकलं होतं. लेटेस्ट अमिताभ आमिरचा कुठलासा हिंदुस्तान के ठग का काहीतरी होता त्यातला किल्लाही बनावट वाटला होता.

काय माहिती का ती कधी खळखळून हसणारी वाटली नाही. >>>>>>>>> ऑ? सीआयडीच ' कहि पे निगाहे कही पे निशाना' किव्वा ' खोया खोया चान्द' बघितला नाही का?

मला ती हया गाण्यात कवायत टाईप नाचताना दिसली तेव्हा आश्चर्य वाटल. जोडीला कोण तर राजेन्द्रकुमार.

https://www.youtube.com/watch?v=_lw6RDIcdwQ

राज माझी कमेंट सरकास्टिक नव्हती... वहिदा आहेच ब्युटी विथ ऍक्टिंग... आणि जहनवी देखील... सी.. धन्यवाद त्या लिंक बद्धल...
आणखी एक अभिनेत्री जी मला प्रचंड सुंदर वाटते ती म्हणजे तनुजा... रॉयल ब्युटी...

पावनखिंड
>>नाट्यमयता जरा जास्तच झाली आहे. मुळातली घटना इतकी नाट्यमय असताना आणखी वरून नाट्य पेरण्याची तशी काही गरज नसली पाहिजे खरंतर << +१
अती झालं अन हसू आलं म्हणतात तसं आहे युध्दात काहि ठिकाणी. रक्ताच्या शेकडो पिचकार्‍या आहेत. तलवार , बाण एवढच काय घोड्याची टाप कपाळाला लागली.. पिचकारी !
समोर चाल करुन आलेल्या धनुर्धारी गनिमांपुढे चिलखताविणा बच्चनइस्टाइल उभं राहून आव्हान देणं .. शत्रु फिरला असं गृहित धरुन मस्त त्याच्या कडे पाठ करुन निवांत चालणं .. छातीतुन आरपार भाला जाऊन डायलॉग मारणं.. छातीत गोळी घुसल्यानंतर परत उठुन युध्द सुरु करणं.. अन गनीम सैनिकाला उगाच तीन वेळा तलवारीने आरपार भोकसणं ( ते ही एका हाताने मुंडीला उचलुन) . . !!
त्यापेक्षा मला जुने black white चित्रपटातील युध्दे जास्त परिणामकारक वाटतात.

अवांतरः जाह्नवी असे लिहीतात, जान्हवी नाही. ह ला न जोडायचा, न ला ह नाही. जह्नु ऋषिंनी प्राशन करून मग मुक्त केली म्हणून गंगा नदीस जाह्नवी म्हणतात.

च्रप्स, अवांतर थांबवाल का प्लीज ? मागच्या धाग्यावर पण बरंच दळण दळून झालेलं आहे यावर. वेडाचे सोंग घेतलेले समजूनही गंमत म्हणून घ्यायची वेळ निघून गेली आहे. आता इरीटेट होतेय. वेगळा धागा किंवा पोल काढा हवा तर.

शांत माणूस - वरती बाकीचे कमेंट्स वाचा... मी एकटाच नाही भरपूर लोकांनी एक्टरेससेस बद्धल लिहिले आहे... आणि धागा चित्रपटाचा आहे तर हे अवांतर कसे?

नाही सिरियसली विचारतोय.. धागा चित्रपटाचा आहे... एक्टरेस बद्धल लिहिणे चित्रपटाच्या धाग्यावर अवांतर कसे?
याचे उत्तर मला इतर लोकांकडून मिळालेले आवडेल... इथे भरपूर अभिनेत्री , अभिनेते, दिग्दर्शक बद्धल चर्चा झाली आहे...
मीच कसे अवांतर केले??
साडा कुत्ता कुत्ता त्वडा कुत्ता टॉमी Happy

Pages