एक गुरूवार (अ थर्सडे ) : थ्रिलिंग हिंदी चित्रपट

Submitted by गारंबीचा शारूक on 23 February, 2022 - 11:56

थर्सडे - हिंदी चित्रपट

थर्सडे हा हिंदी चित्रपट हॉटस्टार डिस्नेवर आलाय. थिएटरला आला असेल तर मला तरी माहिती नाही. नुकताच झिम्मा थिएटरमधे जाऊन पाहिला आणि कोरोनाचे सगळे नियम पाळत तीन तास बसलो. त्यानंतर लगेच आता थिएटरला जाणं तसंही अवघड होतं. त्यातच आमचं मुंबईतलं माझगावचं घर साफसफाई करणे, रंगरंगोटी करणे अशी कामे चालू आहेत. मग थिएटरला काय जातोय ? एव्हढ्या धावपळीत ओटीटी हाच काय तो आपला आधार कार्ड नंबर. सांगायला विशेष आनंद वाटतो कि झिम्मा या सर्वात आनंद देणार्‍या मराठी चित्रपटानंतर हिंदीत पण एक जबरदस्त चित्रपट बघायला मिळाला. कसला खतरनाक चित्रपट बनवलाय ! अ थर्सडे पण या चित्रपटासमोर पानी कम वाटतो. हॉलीवूड या चित्रपटाची कॉपी करेल कि काय हीच धास्ती वाटते.

एकसे एक कलाकार आहेत. यामी गौतम खूप सुंदर दिसते. ब्युटी विथ गन हे टेरर काँबिनेशन कोणताही चित्रपट सुपरहिट करतंच. त्यातच तीच व्हिलन म्हटल्यावर ब्युटीफुल व्हँप ऑन रँप असं झालं.

या चित्रपटावर चर्चा करण्यासाठी हा धागा काढला आहे. खूप लिहायचं आहे पण स्पॉयलर्स फोडले म्हणून बोलणी खावी लागतील. म्हणून थोडंक्यातच आटोपतो.

ट्रेलर पण खूप भारी आहे.
https://www.youtube.com/watch?v=lc-y0T94mZE

हॉटस्टार वर हा चित्रपट तुम्ही हिंदी शिवाय फ्रेंच, इंग्लिश, तमिळ आणि मराठी या भाषेत पण बघू शकता. मला इंग्लिश मधे कसा वाटतो हे बघायचं होतं पण घरच्यांचा विचार करून हिंदी मधेच पाहिला. आपण एकट्याने इंग्रजीत बघायचा तर बाकीच्यांचा शो वाया गेला असता. सर्वांना आवडला. आईवडील सुद्धा खूष झाले.

गर्लफ्रेण्डस पण खूष आहेत या चित्रपटावर.

क्राईम थ्रिलर का काय अशी कॅटेगरी आहे असे लिहीलेय. स्टोरी तशी सिंपल आहे. पण गुंतागुंतीची आहे. यामी दिसते तेव्हां चित्रपट सुंदरच दिसतो. वयस्कर लोकांसाठी नेहा धुपिया आहे आणि वृद्धांसाठी डिंपलला घेतले आहे. पत्र्येकाचा विचार केला आहे. मुंबईचा कोणताही भाग असू शकतो हा. तो मस्त टिपलाय. कॅमेरे भारी लावलेत. अँगल पण सही आहेत,

व्यक्तिरेखा दमदार आहेत. त्यातल्या त्यात यामी , अतुल कुलकर्णी , डिंपल, बस ड्रायव्हर यांच्या व्यक्तिरेखा दणदणीत झाल्या आहेत. त्यांना या कलाकारांनी फुल्ल न्याय दिला आहे. नैना जैस्वाल म्हणजे यामीच वाटते. मुलांची कामं पण छान आहेत. गाणी होती कि नाही लक्षात नाही. पण पार्श्वसंगीत भारी होतं. पाऊस वातावरण निर्मितीसाठी घेतलाय.

कॅमेरा भारी. पटकथा पण एक नंबर आहे. संवाद नाट्यमय आहेत. वेगवान घडामोडी आहेत. त्यामुळे सगळ्या आघाड्यांवर एक नंबर आहे.

अशा गेम असलेल्या चित्रपटात चुका काढायच्या तर भिंग घेऊन काढाव्या लागतील. पण काही जण त्या काढतील यात शंका नाही. मी नेहमॉ सांगतो लॉजिक नही मॅजिक देखो. पण यात मॅजिक सोबत लॉजिक पण आहे. आता लॉजिक दोन लोकांचं कधीच एकमेकांशी जुळत नाही. एखादा म्हणाला की दाराला आपण गोल कडी बसवू तर दुसरा म्हणणार नको चपटी बसवू.

अरे हो, मी मासेखाऊ असून माशाचा घास हातात घेतलेला तो दोन तास तसाच राहिला. हाताला रग लागली तेव्हां समजलं की अरे आपण खाल्लाच नाही पीस. इतकं खिळवून ठेवतो हा चित्रपट. मी काही समीक्षक नाही हे कबूल केलेलंच आहे. पण मायबाप प्रेक्षक म्हणून त्याला कसं वाटलं हे त्याच्या वतीने सांगणारा एक रसिकलाल पंतप्रतिनिधी आहे.

धन्यवाद,
तुमचा लाडका ,
गा शा

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>>>>>>>वयस्कर लोकांसाठी नेहा धुपिया आहे आणि वृद्धांसाठी डिंपलला घेतले आहे. पत्र्येकाचा विचार केला आहे.
माझीही हसून हसून मुरकुंडी वळालीये.

जिंदगी ऊस पडाव पे आ गयी है के यामी भी अच्छी लगती है और नेहा धुपिया भी अच्छी लगती है.. और अगर डिंपल को देखो, तो भी जांबाज की याद आती है

स्पॉयलर्स सहीत
चित्रपटाची विभागणी दोन भागात केली तर ९०% चित्रपट हा ओलीस थरारनाट्य आहे. १०% चित्रपट हा त्यामागचे कारण आहे.
स्पॉयलर वॉर्निंग
शेवटी हे सर्व बलात्कार्‍याला फाशी देण्यासाठीच्या कायद्याबद्दल चाललेय हे समजते. यात तिने १६ मुलांना ओलीस धरले होते. प्रत्यक्षात अण्णांनी स्वतःला ओलीस ठेवून संपूर्ण देशाला, संसदेला वेठीस धरले होते. दक्षिणेला अनेक चित्रपटात राज्यघटनेत, व्यवस्थेत त्यांच्या कल्पनेप्रमाणे असणार्‍या चुका दुरूस्त करण्यासाठी अशा भडक माथ्याच्या कल्पना असणारे चित्रपट येतात. त्याला गुन्हेगारी, थरार आणि वेगवान अ‍ॅक्शनचा तडका असतो. त्या फ्लो मधे अनेक गोष्टींचा चुथडा होत असतो.

कायदे असे करायचे नसतात. बंदूकीच्या टोकावर किंवा कुणाच्या तरी जिवाला ओलीस ठेवून ते करणे ही कल्पनाच चुकीची आहे. वेगवेगळ्या मतांचे एकमत होत नसेल तर तो कायदा होणार नाही. पण आम्हाला वाटेल तसाच कायदा हवा असा अट्टाहास असणार्‍यांनी तो लोकांच्या गळी उतरवण्यासाठी चित्रपटाचा वापर केला आहे. शेवटच्या दहा मिनिटात त्यामुळेच पूर्णपणे रसभंग झाला. जरी दिग्दर्शकाचे स्वातंत्र्य मान्य केले तरीही या बाबींचा विचार अशा चित्रपटा का होऊ नये ?

संसदेतले एक एक विधेयक बनताना किती प्रदीर्घ चर्चा झाल्या हे त्या वाचल्यानंतर समजते. हे डिबेट्स उपलब्ध आहे. एक एक गोष्ट किती बारकाईने लक्षात घेतलेली आहे, प्रत्येक विधेयकामागे काय उद्देश आहेत याचे शिक्षण व्हायला पाहीजे. पण ते शिक्षण न करताच अशा अनेक
गल्लाभरू चित्रपटांनी संशयनिर्मितीचे काम केलेले आहे. आता याच्या विरोधातच चित्रपट बनायला हवेत.

संसदेतले एक एक विधेयक बनताना किती प्रदीर्घ चर्चा झाल्या हे त्या वाचल्यानंतर समजते. हे डिबेट्स उपलब्ध आहे. एक एक गोष्ट किती बारकाईने लक्षात घेतलेली आहे, प्रत्येक विधेयकामागे काय उद्देश आहेत याचे शिक्षण व्हायला पाहीजे. पण ते शिक्षण न करताच अशा अनेक गल्लाभरू चित्रपटांनी संशयनिर्मितीचे काम केलेले आहे. आता याच्या विरोधातच चित्रपट बनायला हवेत. >>> हल्ली असे होत नाही, आवाजी मतदानात विधेयक मंजूर होऊन पुढे कायदा बनवायला पाठवून देतात. कथा लेखकाची काही चूक नाही हो, त्याने गेली काही वर्षे हेच बघितले आहे. आता विधेयकं कुठली ते सूज्ञांस सांगणे न लगे.

अनेक वर्षांनी बॅक टू बॅक बरेच सिनेमे बघितले.

१. बधाई दो : थोडा आवडला. बाकी या सिनेमात समलैंगिक लोक असे कोणीही आवडले की त्यांच्याकडे टक लावून बघतात, त्यांना प्रेमाचे सिग्नल्स देतात असे दाखवले ते विचित्र वाटले. समजा ते टक लावून बघत आहे ती व्यक्ती स्ट्रेट निघाली तर? असे त्यांच्या मनात जराही कसे येत नाही देवजाणे.

२. गेहराईया: चित्रपट / पटकथा खरीच वाटली नाही. हे असं सगळं कोणत्या जगात होतं असं वाटलं. बहुतेक हे सगळं साऊथ बॉम्बे कल्चर असावं. मला नुसती कल्पना म्हणून पण त्यातलं का ही ही झेपलं नाही. माबुदो.

३. झिम्मा : फार तोकडा आणि नीट हाताळला नाही. एकदम abruptly संपतो असं वाटलं. अजून गंमत आणता आली असती सिनेमात.

४. कारखानीसांची वारी : बोरिंग.

५. चंदिगढ करे आशिकी: ओकेओके

६. इंडिया - स्वीट्स अँड स्पायसेस - मनीषा कोईराला चा मुव्ही. बराच टीपी आहे. अमेरिकन देसी सिनेमा. शेवट गुंडाळ्या सारखा वाटला.

७. मीनाक्षी सुंदरेश्वर : बोरिंग

८. हेल्मेट : लॉजीकच्या नावाने बोंब.