चित्रपट कसा वाटला - ५

Submitted by ऋन्मेऽऽष on 12 December, 2021 - 15:18

चित्रपट कसा वाटला ५ व्या धाग्यात स्वागत

आधीचा धागा ईथे बघू शकता

https://www.maayboli.com/node/74596

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जनम जनम पहिल्यांदा नाव ऐकलेय. गुंडाचे बरेच नाव ऐकलेय. त्यावरून तो बघायची बिलकुल ईच्छा होत नाही. नॉट माय टाईप Happy

का हो ? नावं ठेवताय का ? लॉजिक बघू नका. मॅजिक बघा. सिनेमा हा एक व्यवसाय आहे. त्यात लॉजिक बघून चालत नाही.
मी तर म्हणेन मिथुनपट सगळे बघूनच सोडा आता. लॉजिकची भानगडच नाही.

लॉजिक न आवडल्याने/पटल्याने काट मारलीय असे कुठे म्हटलेय त्यात Happy
आणि नावे कुठे ठेवली? नॉट माय टाईप म्हटलेय Happy

असो, मराठी भाषा दिन झाल्यावर यावर स्वतंत्र धाग्यात बोलूया ..

नॉट माय टाईप म्हणजे काय ? हे चित्रपट लॉजिक न ठेवता बनवले आहेत तर नॉट माय टाईप कसे ?
आणि इतरांना नॉट माय टाईप वाटत असेल तिथे दर वेळी लॉजिक बघू नका चे तुणतुणे वाजवत मागे लागायचे हे कशाला ?

असो, मराठी भाषा दिन झाल्यावर यावर स्वतंत्र धाग्यात बोलूया .. >>> नाही. बोलायचं तर आत्ताच आणि ते ही इथेच. स्वतंत्र धाग्यात रतिसाद द्यायला वेगळे प्रोफाईल काढा.

ओके Happy

गंगुबाई काठीयावाडी :
कामाठीपुरा म्हणजे पुठ्ठ्याचे सेट्स, कागदी गल्ल्या , खोटाखोटा कोठा !
मंडी सिनेमात कोठ्याचे जे रिअल चित्रिकरण केलय, अंगावर येतील असे डार्क रिअ‍ॅलिटी दाखवणारे सीन्स आहेत तशी ऑथेंटिसिटी कुठेही नाही !
ना धड आर्ट फिल्म ना धड कमर्शिअल फिल्म !
भन्सालीची फिल्म म्हणजे एन्टेरटेनिंग म्हणून पहाणार असाल तर जितके ट्रेलर्स , गाणी, झालच तर आलीयाच्या डॉयलॉग्जची इन्स्टा रिल्स वगैरे पहा!
गंगुबाईचा राजकारणी म्हणून प्रवास दाखवायचा होता तर अडीच तासाची फिल्म बनवण्याइतका कन्टेन्ट अजिबात नाही एखादी छोटीशी डॉक्युमेन्टरी बनवली असती तर जास्त इफेक्टिव झाली असती !
गंगुने वेश्यांचे गंभीर प्रश्नं हाताळले असतील / सोडवले असतील तर चांगलच आहे पण जर मुंबई डॉन करीमलालाचा हात डोक्यावर नसता तर यातलं बरच काही करु शकली नसती !
आलीयाचे संवाद खुसखुशीत टाळ्या घेणारे नक्कीच आहेत, डान्सेस चांगले केलेत , तिची बॉडी लँग्वेज, आवाज वगैरे बदलायचा तिने प्रयत्नं केलाय नक्कीच पण तिची पर्सनॅलिटी /मेकप पाहून शाळेतल्या मुलीने फॅन्सी ड्रेस केलाय असच वाटत राहिलं मला तरी ( आलीया मला आवडते तरीही .)
भन्सालीने केवळ आलीयाला नॅशनल अ‍ॅवॉर्ड मिळवून देणे या एकाच अँबिशनने बनवलाय सिनेमा, ऑलमोस्ट सगळ्या फ्रेम्स मधे आलीया आहे, विजयराज सारख्या गुणी कलाकाराला सुद्धा फारसे सीन्स दिलेले नाहीत , अजय देवगण गेस्ट अपिअरन्स मधे आहे त्याच्या पठडीतल्या रोलमधे !
इतर सहकलाकार तर अजिबात लक्षातही रहात नाहीत, थोडक्यात सबकुछ आलीया होईल याची काळजी घेतली आहे !
फिल्म संपतानाचे वाक्य तर फार विनोदीच वाटले ऐकताना. “ गंगुबाई महान नही थी, लेकिन वो शैतान भी नही थी ” Biggrin
भन्सालीबाबूने त्याच्या पठडीतल भव्यदिव्य, सालंकृत भरजरी बायका, हॅन्डसम हिरोज असेच सिनेमे बनवावे आणि म्युझिक वगैरे आता आउटसोर्स करावे !

मेकप पाहून शाळेतल्या मुलीने फॅन्सी ड्रेस केलाय
>>>
हाहा.. अगदी अगदी.. ट्रेलर पाहिलाय फक्त पण कर्रेक्टाय

पावनखिंड बघितला फायनली. ठिक वाटला, तांत्रिकदृष्ट्या सुमार आहे. अजून चांगल्या पद्धतीने युद्धाचे प्रसंग रंगवायला हवे होते. सतत लाल रंगाच्या पिचकार्‍या ऊडत होत्या ते अगदीच विचित्र वाटत होते.
बाकी अजय पुरकरने एकदम मस्त काम केलंय. आस्ताद काळेला शेवटपर्यंत ओळखता आले नाही. मृणाल कुलकर्णी, प्राजक्ता माळी यांना फारसं
काही काम नाहीये. चिन्मय मांडलेकर चा शिवाजी पण ठिकच, करारी राजा वगैरे नाही वाटला. प्राईमवर येईल बहुधा.

समोर चाल करुन आलेल्या धनुर्धारी गनिमांपुढे चिलखताविणा बच्चनइस्टाइल उभं राहून आव्हान देणं>>>>>>>>>> हो अगदीच. ते चल म्हणणं तर अगदीच काहीतरी. लोकं फार हसत होते त्या सिनला. सगळा सिरीअसनेस गेला.

गंगूबाई >> अरेरे. भन्साली ने २-३ वर्षे वायाच घालवली म्हणायची मग. आलियाच्या कास्टिंग बद्दल ट्रेलर बघातानाच शंका येत होती. फॅन्सी ड्रेस Lol प्रिचो ला घ्यायचे की.
भन्साली ने खरंच त्याच्या जॉनरामधलेच सिनेमे बनवावेत.

फॅन्सी ड्रेस>>>> :लोलः ++११ फॅन्सी ड्रेस स्पर्धेला काय की कोण जाणे वेषभूषा कोणतीही असो , टिकली मोठीच लावून द्यायच्या आया किंवा शिक्षिका.

ती आलिया एकदम शाळकरी पिटुकली मुलगीच दिसते.

डिजे धमाल रिव्ह्यु ! ट्रेलरमधेच ती मिस्फिट वाटत होती रोलसाठि , गन्गुबाई म्हणून कन्गना किवा विद्द्या जास्त सुट झाले असते, थोडा आतुनच असणारा बिनधास्त अ‍ॅटीट्युड वैगरे हवा होता.

भन्साळी फक्त डान्स, कॉशच्युम्स, नकली सेटस्, आणि त्याचं फेवरेट गरबा म्युझिक यासाठीच सिनेमे काढतो. बाकी कॅरॅक्टर, स्टोरी वगैरे साईड रोलला असतात. ज्यादा डीप नईच जानेका. अमांच्या भाषेत , रीस्क नई लेनेका.

हो कंगना, राधिका आपटे, प्रियांका चालल्या असत्या .. पण जाउदे, कोणीच नको .. ही फिल्मच नको होती अ‍ॅक्चुअली !

आलिया अभिनयात कमी नाही पडत मात्र कास्टिंग चुकले आहे..>>>>>> ++११ बेबीफेस आहे आलिया एकदम

दिद्या बालनने केला असता तर डर्टी पिक्चर २.० झाला असता , ती पण फार मोनोटोनस झाली आहे आता !

आलीयाचे संवाद खुसखुशीत टाळ्या घेणारे नक्कीच आहेत, डान्सेस चांगले केलेत , तिची बॉडी लँग्वेज, आवाज वगैरे बदलायचा तिने प्रयत्नं केलाय नक्कीच पण तिची पर्सनॅलिटी /मेकप पाहून शाळेतल्या मुलीने फॅन्सी ड्रेस केलाय असच वाटत राहिलं मला तरी ( आलीया मला आवडते तरीही .) >>>>>>>>>> आलियाचा अभिनय कसा होता डिजे?

आलिया म्हणजे खणखणीत अभिनय असतोच.. प्रश्न डीजे ला विचारलाय तरी राहवत नाही म्हणून बोललो...
आलिया एक नंबर अभिनय आहे...

आलियाने अ‍ॅक्टिंग भारीच केलय, फक्त जे तिच्या पर्सनॅलिटीला सुट होत नाही म्हणून ते (कास्टिंग) खटकलं !
तापसी पन्नुही चांगली वाटली असती .

संवेदनशील भन्साळी वेगळा आणि व्यापारी भन्साळी वेगळा. अझरुद्दीन किंवा लक्ष्मणची कलात्मक फलंदाजी बघण्यासाठी म्हणून तिकीट काढून स्टेडिअममधे जावं आणि त्यांनी लोकप्रियतेसाठी के श्रीकांतच्या शैलीत फलंदाजी करावी तसं वाटतं. भन्साळीची गणितं ठरलेली असतात. त्याला नावाला एक कथा किंवा एखादी ऐतिहासिक व्यक्तिरेखा लागते.

उद्या त्याला महात्मा गांधींवर चित्रपट बनवावासा वाटला तर तो कस्तुरबांचा रंगीबेरंगी वॉर्डरोब डिझाईन करेल. त्यांना भुजच्या दाखवेल. मग भुजचे भव्य राजवाडे, वाळवंट, तिथला गरबा, लोकगीतं , पारिवारिक गाणी. यातच बॅ. मोहनदास यांचा रिश्ता येतो. मग लग्नाचे विधी. छेडछाड. लडका (ऋत्विक / शाहीद इत्यादी पुरस्कारैच्छुक) शर्मिला है वगैरे वगैरे संवाद. मग दक्षिण आफ्रिकेचे दोन चार सीन्स. ज्यात ऐतिहासिक अशी वातावरणनिर्मितीच्या नावाखाली एक रेल्वेस्टेशन, ब्रिटीशकालीन बग्गी. रेल्वेगाडीचा सेट, त्यातून सामान फेकण्याचा सीन आणि दांडीयात्रेचा समूह सीन. त्यामागे एक अगम्य आवाजातले पार्श्वगीत. याची सुरावट इस्माईल दरबारच्या चार पाच गाण्यातल्या पाच सहा ओळींशी साधर्म्य दाखवणारी असणार.

दांडीयात्रेनंतर कर मागे घेतल्याच्या आनंदाप्रीत्यर्थ देशभरातले आनंदाचे वातावरण. रस्त्यावर गाणे गाणारे तरूण तरूणी आणि घरातून पाहणारे त्यांचे आईबाप ( हे दुस-या दुनियेतले असतात नेहमी) , पुन्हा भव्य सेट्स, उगीचच फिरणार्‍या घोडागाड्या आणि शेवटी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर झालेली रोषणाई. अशा मार्गाने गांधीजी उलगडले जातील. एकीकडे ब्रिटीश जाताना गांधीजींना कस्तुरबांच्या आठवणी येताना दाखवल्या जातील. यात पुन्हा गाणी, प्रेमप्रसंग अशा रितीने एका भव्य प्रेमकहाणीचा कपडेपट डिझायनर पंचासहीत बघायला मिळेल. चित्रपट पाहिल्यावर आपण नेमके काय पाहिले हे प्रेक्षकाला कधीच नेमके सांगता यायचे नाही. यात गांधीजींबद्दल शाळेतल्या मुलाला आपण काय दाखवले हे आईबापा पण समजायचे नाही. उत्तरपत्रिकेत एखाद्या मुलाने गांधीजी चांगले नृत्य करायचे, त्यांना ब्रिटीशांनी करू दिले नाही म्हणून त्यांनी मीठ उचलले असे लिहीले तर शिक्षक सुद्धा पूर्ण गुण देतील.

गन्गुबाई म्हणून कन्गना किवा विद्द्या जास्त सुट झाले>> कर्रेक्ट विद्या. ती असती तर भारी झाले असते कॅरॅक्टर. थोडी वयाची मॅचुरीटी लागते अशा रोल्स साठी.

मला तर ते ढोलीदा ची विचित्र स्टेप बघुनच यक्क झालेलं . त्या बायकांची देहबोली काय जमलेली नाही. पन प्रत्येक नटीस असा एक रोल करावा लागतो पोर्ट फोलिओत म्हणून केला असावा.

वयाच्या मॅच्युरीटीचा संबंध नाही इथे, गंगा मुंबईला पळून येते तेंव्हा विशीतलीच असते , विद्या बालन मोठी दिसते वयाने .
प्रॉब्लेम तिचा गेटप, मेकप, तिच्या ओव्हरॉल फॅन्सी ड्रेस पर्सनॅलिटी मधे, ‘गंगुबाई’ हे कॅरॅक्टर डेव्हलप करण्यात दिसतो !
अ‍ॅक्टिंग /बॉडी लँग्वेज मधे आलियाने मेहनत घेतली असली तरी तिचा बेबी फेस, सुखासीन आयुष्य जगणारी प्रिव्हिलेज्ड प्रिन्सेस दिसते ती , गंगुबाई नाही !
इथे अ‍ॅक्ट्रेस दुसरी हवीच होती पण मेकप साठी गायकवाड सारखा जाणकार माणुस असायला हवा होता, आलियाने तिची रेग्युलर पर्सनल मेकप अर्टिस्ट पुनीत सायनीच वापरली आहे गंगुसाठीही !

तिचा बेबी फेस, सुखासीन आयुष्य जगणारी प्रिव्हिलेज्ड प्रिन्सेस दिसते ती , गंगुबाई नाही !>> अगदी अगदी मला हेच्च म्हणा यचं असतं नेहमी ज्या लाइफ स्टेज मधून ती बाई जात आहे त्यातला त्रास अवकळा चेहर्‍यावर दाखविता आली पाहिजे तर तुम्ही त्या पात्राशी तादात्म्य पावलात नाहीतर काय पैसे घेउन शिफ्ट टाकून बांड्र्याला परत. आलिया साधारण जाहिरातीत जे अ‍ॅक्टिन्ग करते तेच व तेव्ढेच तिला येते.

>>>>>>आलिया साधारण जाहिरातीत जे अ‍ॅक्टिन्ग करते तेच व तेव्ढेच तिला येते.
अतोनात, अतिशय, फार, खूप, निव्वळ सहमत आहे.

चांगला अभिनय ओळखण्यात गल्लत होते का मायबोलीवर? गंगुबाई मध्ये आलिया ने एक नंबर ऍक्टिंग केली आहे कि न बघताच कमेंट्स..उडता पंजाब, बद्री कि दुल्हनिया, राजी , गली बॉय पाहिलेत का...
माधुरी किंवा मुक्ता बर्वे सारखी सुमार अभिनय करणारे इथे भारी असतात... थर्सडे मध्ये यामी ने पाट्या टाकल्या आहेत त्याचे कौतुक होते...
चांगला अभिनय ओळखा रे...

च्रप्स मी आलियाचे फार सिनेमे पाहीलेले नाहीत. इन फॅक्ट २ स्टेटसच पाहीलाय Sad
पण मला तिच्या अभिनयात तितकासा स्पार्क नाही वाटला. नाही, मी हे जाणते की तिची आत्ता सुरुवात आहे, अजुन ती खूप करु शकेल/ करेल. पण तिच्या लुक्स चे खूप लिमिटेशन्स आहेत.

Pages