
शेवटचे अद्यतन : ३१/१२/२०२१
मागचा धागा इथे : https://www.maayboli.com/node/78680?page=19
……..
चालू महासाथीचा मागचा धागा काढताना मनोमन अशी इच्छा व्यक्त केली होती की, तो शेवटचा धागा ठरावा आणि लवकरच आजार पूर्ण गाडला जावा. दुर्दैवाने तसे काही होण्याची चिन्हे नाहीत.
गेल्या काही आठवड्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेतून Omicron नावाच्या करोना विषाणूच्या नव्या उपप्रकाराने तोंड वर काढले आहे. त्याचे नाव ग्रीक वर्णमालेच्या पंधराव्या अक्षरानुसार दिलेले आहे.
( Omicron च्या उच्चाराबाबत भाषातज्ञांमध्ये मध्ये मतभेद आहेत. खुद्द ऑक्सफर्ड शब्दकोशानुसार सुद्धा त्याचे चार उच्चार असून त्यावर एकमत नाही ! इंग्लिश उच्चारानुसार बऱ्याच ठिकाणी "OH-my-kraan असे दिलेले दिसते).
हळूहळू Omicron चा जगभर प्रसार होत आहे. सुरुवातीस दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या काही रुग्णांच्याबाबत डॉक्टरांची निरीक्षणे अशी होती :
१. ज्या लसवंतांना नवा संसर्ग झाला आहे त्यांची लक्षणे सौम्य आहेत. अशांवर घरीच उपचार चालू असून परिस्थिती नियंत्रणात आहे.
२. असे अधिकतर रुग्ण तरुण वयातील आहेत
३. जे बाधित रुग्णालयात दाखल झाले आहेत त्यापैकी 90 टक्के बिगर लसवाले आहेत.
अलीकडील बातमीनुसार त्यांच्याकडील रुग्णसंख्येचा आलेख आता कळसबिंदू पार होऊन होऊन खाली खाली येत आहे. एकंदरीत विचार करता हा आजार सौम्य होण्याकडे झुकत आहे.
विषाणूचा Omicron व आधीचा डेल्टा प्रकार यांची पाश्चिमात्य देशांतील एकंदरीत तुलना खालील चित्रातून चांगली समजेल.
सार्स 2 च्या भावी उत्क्रांतीबद्दल वैज्ञानिकांचे अंदाज :
१. एक तर तो सामान्य सर्दीच्या विषाणूप्रमाणे सौम्य होईल किंवा इन्फ्लूएंजाच्या विषाणू प्रमाणे घातकही राहील.
२. विषाणूच्या उत्क्रांतीगणिक तो सौम्य होतो ही एक समजूत आहे. पण काहींच्या मते ते मिथक आहे. वास्तव अधिक गुंतागुंतीचे असते.
३. या विषाणूचे प्राणिजन्य साठे वाढतेच आहेत. मिंक व हरणाच्या एका जातीत त्याचे सातत्यपूर्ण वास्तव्य आणि भ्रमण चालू आहे. त्यातून नवी उत्परिवर्तने होण्याचा संभव राहतो. ही आपल्या दृष्टीने डोकेदुखी ठरते.
नव्या घडामोडींची भर जशी माहिती मिळेल तशी घालत राहू.
* जशी Omi बाधितांची संख्या वाढते आहे तशी काही उपयुक्त माहिती मिळते आहे. यामुळे बाधित असलेल्या काही रुग्णांमध्ये खालील वैशिष्ट्यपूर्ण लक्षणे दिसून आली आहेत:
* मळमळ
* भूक खूप मंदावणे
* रात्री प्रचंड घाम येणे, अगदी शरीर निथळून निघेल इतका.
या रुग्णांमध्ये वास व चव संवेदनेवर परिणाम झालेला नव्हता.
उपचारांच्या आघाडीवर अद्यापही रामबाण असे विषाणूविरोधी औषध मिळालेले नाही. संशोधन चालू आहे.
१. Molnupiravir या तोंडातून घ्यायच्या औषधाला मध्यंतरी इंग्लंडने आणि नुकतीच अमेरिकी औषध प्रशासनानेही आपात्कालीन वापराची मान्यता दिली आहे. वय 18 वर्षावरील लोकांसाठी ते वापरायचे आहे. पाठोपाठ भारतीय औषध प्रशासनानेही याला आपात्कालीन वापराची मान्यता दिली आहे.
गरोदर स्त्रियांसाठी त्याचा वापर अत्यंत काळजीपूर्वक करण्यात यावा. त्याचे संभाव्य दुष्परिणाम जुलाब, मळमळ व चक्कर येणे असे आहेत.
2. Paxlovid या नव्या गोळीस आपत्कालीन मान्यता मिळाली आहे. हे २ औषधांचे मिश्रण असून त्या बद्दल अजून काही माहिती:
हे औषध फक्त खालील रुग्णांसाठी वापरायचे आहे :
१. rt-pcr चाचणी होकारात्मक आलेली.
२. ज्यांचा आजार गंभीर होण्याचा धोका आहे त्यांनी.
रोग निदान झाल्यावर हे औषध लगेच चालू करायचे आहे.
संभाव्य दुष्परिणाम :
चव-संवेदना कमी होणे, जुलाब, रक्तदाबवाढ आणि स्नायूदुखी.
नव्या लसी
भारतात नुकतीच दोन नव्या लसीना आपात्कालीन वापराची मान्यता मिळाली आहे. त्या लसी याप्रमाणे :
१. Corbevax : ही प्रोटीन सबयुनिट प्रकारातील स्वदेशी निर्माण झालेली आहे.
२. Covovax : यात नॅनोकणांचा वापर केलेला आहे.
आता भारतात सध्या एकूण आठ लसीना वापरासाठी मान्यता मिळालेली आहे.
नेहमीचे प्रतिबंधात्मक उपाय म्हणजेच त्रिसूत्री अजून बराच काळ चालू ठेवणे हे आपले एक महत्त्वाचे लढण्याचे अस्त्र असेल.
एकंदरीत जगभरात हा संसर्ग वाढत असल्यामुळे विविध प्रशासनांनी लोकांवर काही प्रमाणात संचार निर्बंध लावले आहेत. नाताळच्या दिवशी जगभरात मिळून ६००० विमान उड्डाणे रद्द केली गेली.
…….
लसीकरण : नवे संशोधन
डीएनए प्रकारची लस भारतात लवकरच उपलब्ध होईल असे अलीकडील बातमीवरून दिसते. त्या प्रकाराची शास्त्रीय माहिती :
१. सध्या जगभरात या प्रकारातील बारा लसी प्रयोगाधीन आहेत. त्यातली पहिली ( ZyCoV-D) भारतात उपलब्ध होईल.
२. ही लस सुईविरहित उपकरणाने दाबतंत्राचा वापर करून त्वचेखाली दिली जाते. हे पारंपरिक इंजेक्शन नसल्यामुळे संबंधित व्यक्तीस वेदना खूप कमी होते.
३. भारतातील लस तिच्या प्रयोगादरम्यान २८,००० लोकांवर वापरण्यात आली. त्यादरम्यान विषाणूचा डेल्टा प्रकार जोरात होता. त्या वातावरणात लसीने 67% परिणामकारकता दाखवली आहे.
४. तिचे उत्पादन तंत्रज्ञान सोपे आहे.
५. आरएनए लसींच्यापेक्षा ही लस अधिक टिकाऊ स्वरूपाची आहे.
६. मात्र तिचा पुरेसा परिणाम दिसून येण्यासाठी किमान तीन डोस द्यावे लागतील असे दिसते.
...................................................
म्हणजे आता ओमायक्रॉन मध्ये
म्हणजे आता ओमायक्रॉन मध्ये ओम असल्याने देवाची लस असे व्हॉट्सॲप फॉरवर्ड फिरायला हरकत नाही
यवतमाळला माझ्या मित्राला झाली
यवतमाळला माझ्या मित्राला झाली लागण कोव्हीडची. तो डॉक्टर आहे. Omicron असण्याचा अंदाज आहे, पण ते नक्की नाही, त्यासाठी सॅम्पल पुण्याला पाठवावे लागते म्हणे.
(उद्या मी त्याला भेटायला जाणार होतो.)
तर, तो घरी ट्रीटमेंट घेउ शकत नाही कारण आता नव्या नियमाप्रमाणे रुग्णालयात भरती व्हावेच लागते. तो आता भरती होणार आहे.
असा नियम आहे हे माहीत नव्हते. हा राज्य सरकारचा नियम आहे की केंद्र सरकारचा देशभरात माहीत नाही, बहुतेक राज्य सरकारचा असावा.
---
हा यवतमाळ नगरपालिकेचा नियम सुद्धा असू शकतो.
वय, सहव्याधी पाहून ठरवतात
वय, सहव्याधी पाहून ठरवतात
कोविडवर जगातील पहिलं DNA
कोविडवर जगातील पहिलं DNA व्हॅक्सीन भारतात
https://maharashtratimes.com/india-news/india-will-soon-have-nasal-vacci...
डीएनए प्रकारची लस भारतात
डीएनए प्रकारची लस भारतात लवकरच उपलब्ध होईल असे बातमीवरून दिसते. त्या प्रकाराची शास्त्रीय माहिती :
१. सध्या जगभरात या प्रकारातील बारा लसी प्रयोगाधीन आहेत. त्यातली पहिली ( ZyCoV-D) भारतात उपलब्ध होईल.
२. ही लस सुईविरहित उपकरणाने दाबतंत्राचा वापर करून त्वचेखाली दिली जाते. हे पारंपरिक इंजेक्शन नसल्यामुळे संबंधित व्यक्तीस वेदना खूप कमी होते.
३. भारतातील लस तिच्या प्रयोगादरम्यान २८,००० लोकांवर वापरण्यात आली. त्यादरम्यान विषाणूचा डेल्टा प्रकार जोरात होता. त्या वातावरणात लसीने 67% परिणामकारकता दाखवली आहे.
४. तिचे उत्पादन तंत्रज्ञान सोपे आहे.
५. आरएनए लसींच्यापेक्षा ही लस अधिक टिकाऊ स्वरूपाची आहे.
६. मात्र तिचा पुरेसा परिणाम दिसून येण्यासाठी किमान तीन डोस द्यावे लागतील असे दिसते.
आज धाग्याचे अद्यतन करून त्यात
आज धाग्याचे अद्यतन करून त्यात नवे संशोधन आणि भरत यांच्या प्रतिसादातील तक्ता यांची भर घातली आहे.
धन्यवाद !
भारतात नुकतीच दोन नव्या लसीना
भारतात नुकतीच दोन नव्या लसीना आपात्कालीन वापराची मान्यता मिळाली आहे. त्या लसी याप्रमाणे :
१. Corbevax : ही प्रोटीन सबयुनिट प्रकारातील स्वदेशी निर्माण झालेली आहे.
२. Covovax : यात नॅनोकणांचा वापर केलेला आहे.
आता भारतात सध्या एकूण आठ लसीना वापरासाठी मान्यता मिळालेली आहे.
https://www.ndtv.com/india-news/coronavirus-2-more-vaccines-covovax-and-...
साधारण ३ आठवडे झाले ओमिक्रॉन
साधारण ३ आठवडे झाले ओमिक्रॉन येऊन..... त्या मुळे एव्हाना त्याचा मृत्यूदर आणि इस्पितळात दाखल व्हावे लागण्याची टक्केवारी भ यावह आहे की नाही हे कळायला हवे होते... भारतीय व जागतिक स्तरावर~~ काहीच उलगडा होत नाही... फक्त लागणाचे आकडे येत आहेत
इंग्लंडचा सविस्तर अहवाल इथे
इंग्लंडचा सविस्तर अहवाल इथे आहे :
https://assets.publishing.service.gov.uk/government/uploads/system/uploa...
20 डिसेंबर पर्यंत अशी परिस्थिती :
Omi खात्रीशीर निदान झालेले रुग्ण 132
त्यापैकी 27 बिगर लसवाले
आजार झालेल्यांपैकी मृत 14 (वयोगट 52 ते 96)
भारतात अजुन डेल्टा जास्त
भारतात अजुन डेल्टा जास्त प्रभावी आहे
https://timesofindia.indiatimes.com/india/183-omicron-cases-analysed-87-...
आमच्याइथे मिडवेस्टमधल्या लहान
आमच्याइथे मिडवेस्टमधल्या लहान गावांतून पुन्हा एकदा परीस्थिती वाईट आहे. आकडे खूप वेगाने वाढत आहेत . पुन्हा एकदा हॉस्पीटलमधे जागा नाही अशी परीस्थिती आहे .इसेंशिअल स्टाफचे शॉर्टेज आहे. कोविडच्या टेस्ट्सचे देखील शॉर्टेज आहेच. अगदी फार्मसीमधेही अपुरा स्टाफ अशी परीस्थिती आहे. कोविडच्या वाढत्या रुग्णामुळे इतर रुग्णांना उपचार मिळवणे कठीण असे आहे. माझ्या नर्स म्हणून रिटायर झालेल्या मैत्रीणी लसिकरण आणि टेस्टिंगच्या ड्युटीवर सेवा म्हणून थॅक्सगिविंगच्या सुमारासच रुजू झाल्या होत्या. नॅशनल गार्डच्या लोकांना हॉस्पीटल ड्युट्या लागल्यात त्यामुळे ते जे नेहमीचे जॉब करायचे तिथे पुन्हा शॉर्टेज असे झाले आहे. एकंदरीत काम करणार्या हातांचे शॉर्टेज प्रचंड आहे.
*पुन्हा एकदा हॉस्पीटलमधे जागा
*पुन्हा एकदा हॉस्पीटलमधे जागा नाही अशी परीस्थिती आहे
>>>
अरेरे, वाईट वाटले वाचून
जपून राहा.
असे का होत असावे काही समजत
असे का होत असावे काही समजत नाही गेल्या वर्षी ही आधी अमेरिका uk चे आकडे वाढले होते आणि म भारतात ही एप्रिल मध्ये 2 री लाट आली. तसेच आता झाले तर आताही मार्च मध्ये भारतात तिसरी लाट येणार असे वाटत आहे ..
पुन्हा एकदा हॉस्पीटलमधे जागा नाही अशी परीस्थिती आहे <<< काळजी घ्या .. ही परिस्थिती या वर्षी भारतात येऊ नये प्रचंड मानसिक त्रास होतो.. सगळे बघून.
मुंबईतही केसेस झपाट्याने
मुंबईतही केसेस झपाट्याने वाढताहेत.
२०-२०४
२१-३२७
२२ -४९०
२३ -६०२
२४ -६८३
२५ -७५७
२६ डिसेंबर -९२२
२७ डिसेंबर -८०९
टेस्ट कोण करतेय हा सर्वात
टेस्ट कोण करतेय हा सर्वात महत्त्वाचा कळी चा प्रश्न आहे.
जे परदेशातून आले त्यांची टेस्ट कम्पल्सरी झाली त्या नंतर त्यांचे नातेवाईक अशी टेस्ट करणाऱ्या लोकांची साखळी आहे
जितके जास्त लोक परदेशातून असेल तितके जास्त टेस्ट झाल्या.
आणि दुसरा वर्ग आहे ज्यांना प्रवास करायचा आहे त्यांना टेस्ट करणे कम्पल्सरी आहे .
त्या मधून ह्या covid positive केस चा आकडा आहे.
लक्षण दिसतात म्हणून टेस्ट करणारे अगदी दुर्मिळ .
सर्रास सर्वांच्या टेस्ट केल्या तर आज पण हजारो covid poditive सापडतील.
कसलीच लक्षण नसलेल्या पण बाधित असलेल्या लोकांची संख्या अती प्रचंड असावी .
अगदी सुरवातीला 2019 पासून आज पर्यंत.
भारतामधे एकंदरीतच असलेली
भारतामधे एकंदरीतच असलेली लोकसंख्या / गर्दी बघता वावरताना अंतर पाळणे, पूर्ण लसिकरण हे मोठेच आव्हान आहे. मात्र लोकं त्यांच्या बाजूने बर्यापैकी सहकार्य करत आहेत. आमच्या इथे तिथेच समस्या आहे. मास्कच्या वापरावरुन वाद, लसिकरणाला विरोध अजूनही सुरुच आहेत. लोकं दहा वेळा कोविड टेस्टिंगला जातील पण लस घ्यायला तयार नाहीत असे आहे. माझा बागकामाचा प्रोजेक्ट होता त्याच लोकेशनला हेल्थ डिपार्टमेंटचे मोफत टेस्टिंग-लसिकरण केंद्र होते. लस घ्यायला चार लोकं आणि टेस्टिंगसाठी गाड्यांची रांग अशी परीस्थिती.
एकंदरीत जगभरात संसर्ग वाढतो
एकंदरीत जगभरात संसर्ग वाढतो आहे हे खरे. अर्थात गतवर्षीच्या तुलनेत आजाराची तीव्रता बरीच कमी आहे. प्रतिबंधात्मक उपायांच्या पातळीवर जमेल तेवढे प्रयत्न सर्वत्र चालू आहेतच. हळूहळू आजार सौम्य होईल असे काही वैज्ञानिकांनी मत व्यक्त केलेले आहे. आपणही आशावादी राहू.
पण मुळात महासाथ लवकर आटोक्यात न येण्यामागे नक्की काय गोम आहे, हा प्रश्न अस्वस्थ करतो.
म्हणून थोडे संदर्भ चाळून काही जीवशास्त्रीय वाचन केले. त्याचा सारांश असा आहे :
या विषाणूचे प्राणीजन्य साठे >>त्याचा माणसातील प्रवेश, संसर्ग आणि लांबणारी महासाथ >> वाढता संसर्ग >> पुन्हा इतर सस्तन प्राण्यांमध्ये प्रवेश >> विषाणूच्या जनुकीय घडामोडी आणि त्यातून त्याची नवी अधिक त्रासदायक उत्परिवर्तने >> पुन्हा नवा मानवी संसर्ग.
असे हे दुष्टचक्र आहे.
माझ्या परिचयातल्या सध्या
माझ्या परिचयातल्या सध्या अमेरिकेत असलेल्या व्यक्तीला बूस्टर डोस (तिसरा?) घेऊन दोन आठवडे झाल्यावर आताच कोव्हिड झालाय.
जगात जो डेटा आहे तो खरा असेल
जगात जो डेटा आहे तो खरा असेल बिलकुल वाटत नाही.
मुळात लक्षण दिसल्या शिवाय कोणीच टेस्ट करत नाही.
*अमेरिकेत असलेल्या व्यक्तीला
*अमेरिकेत असलेल्या व्यक्तीला बूस्टर डोस (तिसरा?) घेऊन दोन आठवडे झाल्यावर आताच कोव्हिड झालाय.
>>
बलवर्धकामुळे मिळणारे संरक्षण हे फारसे टिकाऊ नाही. सुमारे 10 आठवड्यात त्याचा प्रभाव उतरतो, असे इंग्लंडमधील विदा सांगतो:
https://assets.publishing.service.gov.uk/government/uploads/system/uploa...
त्याला दोन आठवड्यांपूर्वीच
त्याला दोन आठवड्यांपूर्वीच बूस्टर डोस मिळालाय. तरीही आता दोन दिवसांपासून कोव्हिडचा त्रास होतोय. घसादुखी, चव जाणे, नाक वाहणे. पॉझिटिव्ह आहे.
मी दोन आठवड्यापूर्वी बुस्टर
मी दोन आठवड्यापूर्वी बुस्टर घेतला तेव्हा मला सांगितले की यामुळे संरक्षण मिळायला ८-१० दिवस लागणार तेव्हा मास्क वापरणे , गर्दी टाळणे, इनडोअर सेटिंगमधे विशेष काळजी घेणे करत रहा. नंतरही वायरल लोड जास्त असेल अशा ठिकाणी शक्यतो जाणे टाळाच.
राज्यात गेल्या आठवडय़ात
राज्यात गेल्या आठवडय़ात दैनंदिन रुग्णसंख्येने हजाराचा टप्पा पार केला होता. या आठवडय़ाच्या सुरुवातीलाच दैनंदिन रुग्णसंख्येने दोन हजाराचा आकडा पार केल्यामुळे जवळपास आठ ते नऊ दिवसांतच राज्यातील करोना रुग्णांचे प्रमाण दुपटीने वाढले आहे. राज्यात सर्वाधिक झपाटय़ाने करोनाचा प्रसार मुंबईत होत असून राज्यातील एकूण रुग्णसंख्येत सुमारे ६३ टक्के रुग्ण हे मुंबईत आढळले आहेत.
इंटरनॅशनल फ्लाईट ह्या वेळी
इंटरनॅशनल फ्लाईट ह्या वेळी पण योग्य वेळी बंद केल्या नाहीत .
त्याचाच हा परिणाम आहे
एक मराठी मध्ये मस्त म्हण आहे
काम नाही घरी आणि सांडून भरी.
कारोना कसा वाढेल ह्या साठी पाहिले प्रयत्न करायचे आणि वाढला की बोंब ठोकायची .
परवा लेक मैत्रीणी शी
परवा लेक मैत्रीणी शी पंधरामिनिटे बोलुन आली. ती मैत्रीण पॉझिटिव्ह आली आहे. म्हणून ही आता घरी आहे. उद्या टेस्ट करून घेइल परत एकदा.
रविवारी पण एक टेस्ट केले ली ती निगेटिव्ह आली होती लेकीची. आता एवढ्यात होईल का परत इन्फेक्षन.
दोन आठवड्या मागे मी जिथे काम करते तिथली एक मुलगी ताप येउन लवकर घरी गेलेली. तिला आधी कोविड होउन गेला आहे. पहिल्या लाटेत.
हे पूर्ण बंद एसी हपीस आहे. मग तिच्या समोर बसून मी इमेल्स करत असल्याने मला पण बारीक ताप येउन गेला. एक संध्याकाळ ताप नेक्स्ट डे वीकनेस किस्सा खतम . हा दुसरा ओमि क्रोन टाइप असावा का काय असे मला वाट्ते. आता लेक पॉझिटिव्ह आली तर मी ही टेस्ट करून घेइन. क्वारंटाइन झाले तर बरेच आहे १५ दिवस घरी पडून राहता येइल.
अमेरिका युरोप मधील परिस्थ्ती रोज वाचते आहे.
ऑफैसत पण मास्क देणे सॅनिटायझेशान प्रोसिजर परत कडक झाल्या आहेत.
पूर्वी ज्यांना कोविड होऊन
पूर्वी ज्यांना कोविड होऊन गेलेला आहे त्यांना जर आता नव्याने Omi ची बाधा झाली तर आजार सौम्य असणार आहे. अशा रुग्णांबाबत आता रुग्णालयात भरती होण्याची शक्यता 50 ते 60 टक्क्यांनी कमी आहे.
या संदर्भात तीन आरोग्यसंस्थांनी मिळून प्रसिद्ध केलेला एक अहवाल इथे आहे:
https://www.imperial.ac.uk/mrc-global-infectious-disease-analysis/covid-...
वय, सहव्याधी पाहून ठरवतात
वय, सहव्याधी पाहून ठरवतात
submitted by भरत. on 25 December, 2021 - 23:39
>>
त्याचे वडील व भाऊ दोघांनाही काही महिन्यांपूर्वी कोव्हीड झाला तेव्हा त्याने स्वतःच्याच घर कम हॉस्पिटलमध्ये त्यांना ठेवले. वडिलांचे वय 87, सहव्याधी बऱ्याच, भावाला डायबेटीस.
याला सहव्याधी नाहीत, वय ५४ घरच्या हॉस्पिटलमध्ये विलगिकरण शक्य आहे पण नाही म्हणाले. कोव्हीड हॉस्पिटलमध्येच जायचे. सरकारी/खाजगी कुठलेही.
लोक घरचे विलगिकरण नीट पाळत नाहीत, ओमायक्रॉन पसरू शकतो या करता हा नियम. जो पर्यंत रुग्णालयात जागा आहे तो पर्यंत. झालीच लाट मोठी, रुग्णालये भरत आली की घरी ट्रिटमेंट /विलगीकरणं करू देतील, तेव्हा तसे करणे गरजेचे असेल. तो पर्यंत ही काळजी घेऊन लाट आटोक्यात ठेवता येते का बघणे असा विचार असावा यामागे.
हो. घरी विलगीकरण पाळत नाहीत
हो. घरी विलगीकरण पाळत नाहीत असं मुंबैतही दिसलं. कुटुंबाच्या कुटुंब पॉझिटिव्ह होतात.
एक महिन्या पेक्षा जास्त झाले
एक महिन्या पेक्षा जास्त झाले आहेत श्री ओमायक्रॉन येऊन..... कोणताही विदा विश्वासार्ह नाही...... नेहमी प्रमाणे तीर सोडताहेत... वैद्यकीय आणि अवैद्यकीय दोघेही....... लोक पण सुसाट सुटलेत.... पहिली गोष्ट ही की नुसत्या सर्दी तापाचा बाऊ करायचा का?
अवांतर -
अवांतर -
माझा बागकामाचा प्रोजेक्ट होता त्याच लोकेशनला हेल्थ डिपार्टमेंटचे मोफत टेस्टिंग-लसिकरण केंद्र होते. लस घ्यायला चार लोकं आणि टेस्टिंगसाठी गाड्यांची रांग अशी परीस्थिती.
Submitted by स्वाती२ on 28 December, 2021 - 18:54
तो swab नाकात घातल्यावर येणाऱ्या झिणझिण्या पाहता मी तर म्हणेन की दोनच्या जागी दहा डोस (इंजेक्शन) द्या पण टेस्टिंग नको!!!
अवांतर समाप्त!
Pages