कोविड १९ : आव्हान Omicron चे

Submitted by हेमंतकुमार on 2 December, 2021 - 09:07

शेवटचे अद्यतन : ३१/१२/२०२१
मागचा धागा इथे : https://www.maayboli.com/node/78680?page=19
……..
चालू महासाथीचा मागचा धागा काढताना मनोमन अशी इच्छा व्यक्त केली होती की, तो शेवटचा धागा ठरावा आणि लवकरच आजार पूर्ण गाडला जावा. दुर्दैवाने तसे काही होण्याची चिन्हे नाहीत.
गेल्या काही आठवड्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेतून Omicron नावाच्या करोना विषाणूच्या नव्या उपप्रकाराने तोंड वर काढले आहे. त्याचे नाव ग्रीक वर्णमालेच्या पंधराव्या अक्षरानुसार दिलेले आहे.
( Omicron च्या उच्चाराबाबत भाषातज्ञांमध्ये मध्ये मतभेद आहेत. खुद्द ऑक्सफर्ड शब्दकोशानुसार सुद्धा त्याचे चार उच्चार असून त्यावर एकमत नाही ! इंग्लिश उच्चारानुसार बऱ्याच ठिकाणी "OH-my-kraan असे दिलेले दिसते).

हळूहळू Omicron चा जगभर प्रसार होत आहे. सुरुवातीस दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या काही रुग्णांच्याबाबत डॉक्टरांची निरीक्षणे अशी होती :
१. ज्या लसवंतांना नवा संसर्ग झाला आहे त्यांची लक्षणे सौम्य आहेत. अशांवर घरीच उपचार चालू असून परिस्थिती नियंत्रणात आहे.
२. असे अधिकतर रुग्ण तरुण वयातील आहेत
३. जे बाधित रुग्णालयात दाखल झाले आहेत त्यापैकी 90 टक्के बिगर लसवाले आहेत.

अलीकडील बातमीनुसार त्यांच्याकडील रुग्णसंख्येचा आलेख आता कळसबिंदू पार होऊन होऊन खाली खाली येत आहे. एकंदरीत विचार करता हा आजार सौम्य होण्याकडे झुकत आहे.
विषाणूचा Omicron व आधीचा डेल्टा प्रकार यांची पाश्चिमात्य देशांतील एकंदरीत तुलना खालील चित्रातून चांगली समजेल.

omic and delta.jpg

सार्स 2 च्या भावी उत्क्रांतीबद्दल वैज्ञानिकांचे अंदाज :
१. एक तर तो सामान्य सर्दीच्या विषाणूप्रमाणे सौम्य होईल किंवा इन्फ्लूएंजाच्या विषाणू प्रमाणे घातकही राहील.
२. विषाणूच्या उत्क्रांतीगणिक तो सौम्य होतो ही एक समजूत आहे. पण काहींच्या मते ते मिथक आहे. वास्तव अधिक गुंतागुंतीचे असते.
३. या विषाणूचे प्राणिजन्य साठे वाढतेच आहेत. मिंक व हरणाच्या एका जातीत त्याचे सातत्यपूर्ण वास्तव्य आणि भ्रमण चालू आहे. त्यातून नवी उत्परिवर्तने होण्याचा संभव राहतो. ही आपल्या दृष्टीने डोकेदुखी ठरते.
नव्या घडामोडींची भर जशी माहिती मिळेल तशी घालत राहू.

* जशी Omi बाधितांची संख्या वाढते आहे तशी काही उपयुक्त माहिती मिळते आहे. यामुळे बाधित असलेल्या काही रुग्णांमध्ये खालील वैशिष्ट्यपूर्ण लक्षणे दिसून आली आहेत:

* मळमळ
* भूक खूप मंदावणे
* रात्री प्रचंड घाम येणे, अगदी शरीर निथळून निघेल इतका.
या रुग्णांमध्ये वास व चव संवेदनेवर परिणाम झालेला नव्हता.

उपचारांच्या आघाडीवर अद्यापही रामबाण असे विषाणूविरोधी औषध मिळालेले नाही. संशोधन चालू आहे.
१. Molnupiravir या तोंडातून घ्यायच्या औषधाला मध्यंतरी इंग्लंडने आणि नुकतीच अमेरिकी औषध प्रशासनानेही आपात्कालीन वापराची मान्यता दिली आहे. वय 18 वर्षावरील लोकांसाठी ते वापरायचे आहे. पाठोपाठ भारतीय औषध प्रशासनानेही याला आपात्कालीन वापराची मान्यता दिली आहे.
गरोदर स्त्रियांसाठी त्याचा वापर अत्यंत काळजीपूर्वक करण्यात यावा. त्याचे संभाव्य दुष्परिणाम जुलाब, मळमळ व चक्कर येणे असे आहेत.

2. Paxlovid या नव्या गोळीस आपत्कालीन मान्यता मिळाली आहे. हे २ औषधांचे मिश्रण असून त्या बद्दल अजून काही माहिती:
हे औषध फक्त खालील रुग्णांसाठी वापरायचे आहे :
१. rt-pcr चाचणी होकारात्मक आलेली.
२. ज्यांचा आजार गंभीर होण्याचा धोका आहे त्यांनी.
रोग निदान झाल्यावर हे औषध लगेच चालू करायचे आहे.
संभाव्य दुष्परिणाम :
चव-संवेदना कमी होणे, जुलाब, रक्‍तदाबवाढ आणि स्नायूदुखी.

नव्या लसी
भारतात नुकतीच दोन नव्या लसीना आपात्कालीन वापराची मान्यता मिळाली आहे. त्या लसी याप्रमाणे :

१. Corbevax : ही प्रोटीन सबयुनिट प्रकारातील स्वदेशी निर्माण झालेली आहे.
२. Covovax : यात नॅनोकणांचा वापर केलेला आहे.

आता भारतात सध्या एकूण आठ लसीना वापरासाठी मान्यता मिळालेली आहे.

नेहमीचे प्रतिबंधात्मक उपाय म्हणजेच त्रिसूत्री अजून बराच काळ चालू ठेवणे हे आपले एक महत्त्वाचे लढण्याचे अस्त्र असेल.
एकंदरीत जगभरात हा संसर्ग वाढत असल्यामुळे विविध प्रशासनांनी लोकांवर काही प्रमाणात संचार निर्बंध लावले आहेत. नाताळच्या दिवशी जगभरात मिळून ६००० विमान उड्डाणे रद्द केली गेली.
…….
लसीकरण : नवे संशोधन
डीएनए प्रकारची लस भारतात लवकरच उपलब्ध होईल असे अलीकडील बातमीवरून दिसते. त्या प्रकाराची शास्त्रीय माहिती :
१. सध्या जगभरात या प्रकारातील बारा लसी प्रयोगाधीन आहेत. त्यातली पहिली ( ZyCoV-D) भारतात उपलब्ध होईल.
२. ही लस सुईविरहित उपकरणाने दाबतंत्राचा वापर करून त्वचेखाली दिली जाते. हे पारंपरिक इंजेक्शन नसल्यामुळे संबंधित व्यक्तीस वेदना खूप कमी होते.
३. भारतातील लस तिच्या प्रयोगादरम्यान २८,००० लोकांवर वापरण्यात आली. त्यादरम्यान विषाणूचा डेल्टा प्रकार जोरात होता. त्या वातावरणात लसीने 67% परिणामकारकता दाखवली आहे.
४. तिचे उत्पादन तंत्रज्ञान सोपे आहे.
५. आरएनए लसींच्यापेक्षा ही लस अधिक टिकाऊ स्वरूपाची आहे.
६. मात्र तिचा पुरेसा परिणाम दिसून येण्यासाठी किमान तीन डोस द्यावे लागतील असे दिसते.
...................................................

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तरीही नाकावर घट्ट N95 मास्क, संपूर्ण अंगावर PPE kit घालून प्रचंड उकाड्यातही ८ ते १२ तास रुग्णसेवा करणारे सर्व डॉक्टर, नर्सेस आणि इतर स्टाफ, ambulance ड्रायव्हर, स्मशानभूमीतील कर्मचारी इ. यांचे कितीही आभार मानले तरीही ते कमीच आहेत. >>+११

<< https://www.lokmat.com/photos/national/omicron-was-circulation-india-muc...>>
नेहमी सारखेच " नरोवा कुंजरोवा"
Happy Happy

भारतामध्ये मागील ५५८ दिवसांमध्ये म्हणजेच मागील दीड वर्षांमध्ये पहिल्यांदाच सर्वात कमी रुग्ण आढळून आल्याचं आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीमध्ये म्हटलं आहे.
https://www.loksatta.com/desh-videsh/india-reports-6822-new-cases-lowest...

सर्व शास्त्रज्ञ एका प्लॅटफॉर्म वर येऊन एकमुखी का बोलत नाहीत म्हणजे या वार्ताहरांची बोलती बंद होईल!

खरं आहे.
परस्परविरोधी वक्तव्यामुळे गोंधळ वाढतो.

जगात अनेक साथी आल्या आणि गेल्या .
Corona ha अतिशय किरकोळ आजार आहे.
प्लेग पासून अत्यंत भयानक रोग आले नी गेले .
निसर्ग नियम नुसार च प्रतेक गोष्ट घडते
आता प्रसार मध्यम,संशोधक,मोठं मोठ्या औषध निर्मिती करणाऱ्या कंपन्या ,काही सरकार, ह्यांचे आर्थिक संबंध आहेत
लोकांना येणारे खरे अनुभव पण लोकांनी कुठे शेअर करू नयेत म्हणून अफवा पसरवणे हा गुन्हा आहे असा दम सरकार देत आहेत.
लोकांनी औषध कंपन्या,लस निर्मिती करणाऱ्या कंपन्या,संशोधन करणाऱ्या कंपन्या ह्यांचे share खरेदी करावेत
हे फायद्याचे अशें.
बाकी सोडून ध्या मरण तर येणार च आहे
आज नाही तर उद्या
आताचे संशोधक हे कोणत्या तरी उद्योग पती चे लाचार असतात.
कोणत्याही व्यावसायिक कंपनी शी संबंधित नसणार हाडाचा संशोधक ही जमात आईन्स्टाईन नंतर नष्ट झाली

Dr कुमार ह्यांना विनंती आहे covid सोडून बाकी सर्व विषयावर त्यांनी लेखन करावं
Covid हे प्रकरण अंतर राष्ट्रीय महाकाय कंपन्या जे रोग पण निर्माण करतात आणि उपचार काय हे पण ठरवतात ह्यांच्या हातात आहे.
इलेक्शन मध्ये funding ha pan पॉइंट आहे.

हा धागा काढण्याची सूचना वाचकांकडूनच आलेली आहे हे तुमच्या माहितीसाठी सांगत आहे :

ओमिक्रॉनची चर्चा दिवसेंदिवस वाढत आहे. नवनवीन खुलासे होत आहेत. मला वाटतंय कुमार सरांनी कोविड१९ मालिकेत पुढचा धागा ओमिक्रॉनवर काढून अद्यायवत माहिती सर्वाना दिली तर उपयुक्त होईल.

महाराष्ट्र टाईम्स मधली कालची बातमी:
तब्बल 32 म्यूटेंटने मिळून बनला कोरोनाचा नवा भयंकर B.1.1.529 व्हेरिएंट

Submitted by अतुल. on 30 November, 2021 - 10:58

कुमार दुर्लक्ष करा अशा कॉमेंट्स कडे.
इतरत्र उलट सुलट आणि गोंधळ निर्माण करणारी माहिती पसरत असताना सम्पूर्ण कोव्हीड काळात तुम्ही योग्य, अधिकृत माहिती दिलीत आणि देत आहात.

इतरत्र उलट सुलट आणि गोंधळ निर्माण करणारी माहिती पसरत असताना सम्पूर्ण कोव्हीड काळात तुम्ही योग्य, अधिकृत माहिती दिलीत आणि देत आहात. <<< + १००%

कुमार दुर्लक्ष करा अशा कॉमेंट्स कडे.
इतरत्र उलट सुलट आणि गोंधळ निर्माण करणारी माहिती पसरत असताना सम्पूर्ण कोव्हीड काळात तुम्ही योग्य, अधिकृत माहिती दिलीत आणि देत आहात. >>> खरय.

नवीन Submitted by मानव पृथ्वीकर on 7 December, 2021 - 14:23>>>>>
+१००
इतर कुठल्याही कोरोनासंबंधीत बातम्या वाचल्या/ऐकल्या जात नाहीत. पण कुमार सरांच्या कोविड धाग्यावरंची उपयुक्त माहिती आवर्जून वाचली जाते.

वरील सर्व हितचिंतकांचे आभार !
सध्या ओ मायक्रोन बद्दलचा शास्त्रीय अभ्यास अनेक पातळ्यांवर चालू आहे. दोन ते तीन आठवड्यानंतरच आपल्याला त्याचं खरं स्वरूप कळणार आहे.
तोपर्यंत माध्यमे त्यांच्या धंद्यासाठी उलट-सुलट काहीतरी लिहीत बसणारच.
चांगला अधिकृत संदर्भ मिळाल्यावरच मी योग्य ती भर घालेन. तोपर्यंत मी देखील वाट पाहत आहे.

लोकांची आता तयारी झाली आहे जे होईल ते होईल .
त्या मुळे लोक कोणालाच गंभीर घेत नाहीत..पोलिओ नष्ट झाला ,देवी नष्ट झाली
,कुष्ठ रोग नष्ट झाला
जगात किती लोकांची टेस्ट केली?
कोणाचीच नाही
शरीरात विषाणू नक्की सापडेल टेस्ट केली तर किती तरी लोकात.
पण निष्क्रिय
तसेच covid चे आहे विषाणू शरीरात असणार च पण निष्क्रिय .
त्याचे भांडवल करून अब्ज रुपये छापू नका.

हेमंत३३ वेगळा धागा काढा त्या षड्यंत्राबद्दल, आणि जुन्या साथींबद्दल आणि तुमचे विचार माहिती मांडा.

डॉ कुमार दुर्लक्ष करा अशा कॉमेंट्स कडे.
इतरत्र उलट सुलट आणि गोंधळ निर्माण करणारी माहिती पसरत असताना सम्पूर्ण कोव्हीड काळात तुम्ही योग्य, अधिकृत माहिती दिलीत आणि देत आहात. >>>+100

Omicron निर्माण होताना मूळ विषाणूमध्ये काही जनुकीय बदल झालेत. त्यातला एक रोचक आहे.
काही बाधित पेशींमध्ये सार्स 2 आणि सामान्य सर्दीचा एक करोना विषाणू एकत्र नांदत होते. त्या वास्तव्यादरम्यान सार्स 2 ने त्या सर्दीच्या विषाणूचा एक छोटासा जनुकीय तुकडा स्वतःमध्ये घुसवला. अशाप्रकारे जो उपप्रकार तयार झाला तो माणसाच्या जैविकते जवळ जाणारा ठरला (more human).

आता जेव्हा Om माणसावर हल्ला करतो तेव्हा तो आपल्या प्रतिकार यंत्रणेला फारसा परका वाटत नाही. त्यामुळे तो शरीरात पटकन बस्तान बसवतो. यातून त्याची प्रसारक्षमताही वाढते. मात्र याच बरोबर त्याच्यामुळे होणारा आजार हा बऱ्यापैकी सौम्य राहण्याची शक्यता असते

तूर्त असे प्राथमिक संशोधन वाचनात आले.

म्हणजेच
वाण नाही पण गुण लागला....
हे चांगल्या अर्थाने घ्यायचे ! Happy

असे असो आणि आजार सौम्यच राहो ही मनोमन इच्छा !

कुमार सर,
करोना म्हणायचे की कोरोना, याबद्दल तुमची कमेंट वाचल्याचे आठवते. म्हणून सांगावेसे वाटते की 'वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन' नुसार याचे नाव ओमिक्रोन आहे, ओमायक्रॉन न्हवे.

https://youtu.be/ZynquSAUVdw

उपाशी बोका
अशी शंका उपस्थित होईल याची कल्पना होती. म्हणून मी तीन-चार शब्दकोश पाहून व ऐकून आधीच खात्री करून घेतली होती . खुर्द ऑक्सफर्ड शब्दकोशनुसार सुद्धा त्याचे चार उच्चार असून त्यावर एकमत नाही !

इथे प्रत्यक्ष ऐकता येईल : https://dictionary.cambridge.org/pronunciation/english/omicron

इंग्लिश उच्चारानुसार बऱ्याच ठिकाणी "OH-my-kraan असे दिलेले दिसते

https://public.oed.com/blog/on-the-pronunciation-of-omicron/ :
On the British side, OED’s entry for omicron gives 4 pronunciations, 2 with the stress on the middle syllable (oh-MY-kron and oh-MY-kruhn) and 2 with the stress on the first syllable (OM-uh-kron and OM-uh-kruhn).
On the US side, the stress falls only on the first syllable, with two possible initial vowel sounds (OM-uh-kron or OH-muh-kron).

कोव्हिशिल्ड या लशीच्या निर्मितीत महत्वाचा वाटा असलेले सीरम इन्स्टिट्यूटचे दिवंगत कार्यकारी संचालक डॉ. सुरेश जाधव यांचा परिचय इथे :
https://www.loksatta.com/sampadkiya/vyakhtivedh/profile-doctor-suresh-ja...

"लसनिर्मितीच्या क्षेत्रातील जगातील ५० अग्रणी शास्त्रज्ञांमध्ये डॉ. जाधव यांचे नाव सातव्या क्रमांकावर घेतले जाते."

सार्स 2 च्या भावी उत्क्रांतीबद्दल वैज्ञानिकांचे अंदाज :

१. एक तर तो सामान्य सर्दीच्या विषाणूप्रमाणे सौम्य होईल किंवा इन्फ्लूएंजाच्या विषाणू प्रमाणे घातकही राहील.

२. विषाणूच्या उत्क्रांतीगणिक तो सौम्य होतो ही एक समजूत आहे. पण काहींच्या मते ते मिथक आहे. वास्तव अधिक गुंतागुंतीचे असते.

३. या विषाणूचे प्राणिजन्य साठे वाढतेच आहेत. मिंक व हरणाच्या एका जातीत त्याचे सातत्यपूर्ण वास्तव्य आणि भ्रमण चालू आहे. त्यातून नवी उत्परिवर्तने होण्याचा संभव राहतो. ही आपल्या दृष्टीने डोकेदुखी ठरते.

(https://media.nature.com/original/magazine-assets/d41586-021-03619-8/d41...)

कोविडविरोधी तोंडाने घ्यायच्या गोळीचे संशोधन चालू आहे पण अद्याप समाधानकारक उत्तर मिळालेले नाही.

Molnupiravir या औषधाबाबत अजूनही साशंकता आहे. म्हणून त्याला पर्याय म्हणून nirmatrelvir या औषधाचेही रुग्णप्रयोग पूर्ण झालेले आहेत आणि त्याचे निष्कर्ष आत्ता तरी समाधानकारक वाटत आहेत.

Pages