श्रावण आणि पुरण!

Submitted by सांज on 10 August, 2021 - 00:31

श्रावण मासी हर्ष मानसी..’ वगैरे सगळं लिहण्या-वाचण्या पुरतं ठीक आहे. पण आता कोणी मान्य करो अथवा न करो, श्रावणाची एंट्री ही समस्त महिला वर्गाच्या मनात धडकी भरवणारीच असते. आणि अशा दहशतीमागचा कर्ता-सवरता असतो तो ‘पुरणाचा स्वयंपाक’! श्रावण महिना म्हटलं की सणावारांची गडबड हे तर ठरलेलच असतं.. श्रावणातले शुक्रवार, नागपंचमी, श्रावणी सोमवार, राखी पौर्णिमा, गोकुळाष्टमी, पोळा.. इ.इ. आणि ही तर फक्त सुरुवात.. पुढचा भाद्रपद तर याहून अधिक डेंजर असतो. आणि यापैकी बहुतांश वेळेला करावा लागतो तो हा पुरणाचा स्वयंपाक! याला आपण स्वयंपाकातला ‘ड’ गट म्हणू शकतो. बरं, पुरणाचा स्वयंपाक म्हणजे केवळ पुरणपोळी असं समजणार्‍यांना आत्ताच सांगते, तुम्ही घोर अज्ञानात जगत आहात. यूपीएससी चा सिलॅबस जसा व्हास्ट असतो नं तसाच या पुराणा-वरणाच्या स्वयंपाकाचा सिलॅबस पण भल्या-भल्यांना घाम फुटायला भाग पाडतो. एखाद-दुसरी चटणी, कालवलेलं मेतकूट, पंचामृत, कोशिंबीर, एक फोडभाजी, एक पालेभाजी, तळलेले पापड, भजी, कुरवड्या, कटाची आमटी, कढी, साधं वरण, सुधारस, लिंबाची फोड इ.इ. सुग्रास दागिन्यांनी वर्तुळाकार ताट सजलं की मधोमध येऊन विराजते ती लुसलुशीत पुरणपोळी! आणि याला म्हणतात ‘पुरणाचा स्वयंपाक!’ आणि हा जिला जमतो ती असते खरी सुगरण!

असा हा पुरणाचा स्वयंपाक श्रावणात, चार शुक्रवार, नागपंचमी, पोळा इ धरून किमान 5-6 वेळा तरी होतोच होतो. म्हणजे किमान मराठवाड्यात तरी असं चित्र आहे. मोठ्या शहरांनी आता यातलं फारसं काही उरलेलं नाही.. बहुतांश ठिकाणी तो आऊट ऑफ सिलबस होण्याच्या मार्गावर आहे. पण मराठवाड्यात तरी अजून तसं नाही. आला सण की शिजवा पूरण ही पॉलिसी अजून तरी इथे अस्तित्वात आहे. मराठवड्यातल्या देवांना पुरणाशिवाय दूसरा नैवेद्य चालतच नाही यावर आता माझा ठाम विश्वास बसलेला आहे. पण त्यामुळे मला वाटतं सणांची authenticity अनुभवता येते. साध्या श्रीखंड, खीर वगैरे क्षुद्र पदार्थांवर इथे सणांची बोळवण अजिबात होत नाही. आणि असा चारी-ठाव स्वयंपाक करणार्‍या निष्णात बायका इथे घरोघरी सापडतात. म्हणजे अर्थातच मी आधीच्या पिढी विषयी बोलतेय. माझ्यासारखा तरुण वर्ग अजून तरी ट्रेनिंग फेज मध्येच आहे. एकवेळ नुसती पुरणपोळी वगैरे करणं जमू शकतं, पण समग्र ‘पुरणाचा स्वयंपाक’ अतिशय कुशलतेने करून, म्हणजे एकीकडे तर्हे-तर्‍हेच्या फोडण्या देत दुसरीकडे योग्य consistency मध्ये पूरण वाटणं (हो, consistency फार महत्वाची असते.. पोळ्यांची कणीक आणि पूरण ह्यांची consistency सारखी असली तरच पुरण सगळीकडे सम-प्रमाणात पसरून सुंदर पोळी तयार होते) किंवा एकीकडे भजी तळत दुसरीकडे लुसलुशीत पोळ्या लाटणं आणि वर प्रसन्न मुद्रेने सगळ्यांना आग्रह करत जेवायला वाढण यासाठी नेक्स्ट लेव्हल ची स्किल्स असावी लागतात. हे साक्षात अन्नपूर्णेचच काम आहे॰

बरं या अशा सगळ्या प्रकारच्या चवी आणि रंगांनी संपन्न अशा आर्टिस्टिक स्वयंपाकाचा आवडीने आस्वाद घेणार्‍या मंडळींचीही इकडे वानवा नाही. बसल्या बैठकीला 3-4 मध्यम आकाराच्या, तुपात थबथबलेल्या पुरणपोळया, सोबतचे सगळे पदार्थ तोंडी लावत, घासागणिक अन्नपूर्णेच कौतुक करत खाणे आणि वर कटाची आमटी पैज लावून ओरपणे यालाही स्किल्सच असावी लागतात. माझ्या लहानपणी सणावारांना एकावेळी 15-20 माणसांची पंगत बसलेली आणि पैजा लागलेल्या मी पाहिल्या आहेत. एक-दोघी जणी वाढायला उभ्या आणि आई किंवा आजी सर-सर गोल गरगरीत पोळ्या लाटत बसलेल्या आणि आम्ही सगळे मस्त चेष्टा-मस्करीसह जेवतोय हे मनावर कायमचं कोरलं गेलेलं चित्र आहे. या बायका हे सगळं तेव्हा कसं पेलायच्या याचं आता नवल वाटतं.

महालक्ष्म्यांचा (म्हणजे गौरीचा, मराठवाड्यात महालक्ष्मी म्हणतात) स्वयंपाक तर अतिशय क्लिष्ट! वर उल्लेखलेले सगळे पदार्थ प्लस सोळा प्रकारच्या भाज्यांचा compulsory वापर, साखरभात, मसालेभात, साधा भात, सोवळयातल वळवट, त्याची खीर, उडीदाचे पापड इ.इ.इ.

बहुतेक वेळा बायकांचा दिवस जातो यात.

सध्याच्या वेगवान जगात जिथे बायका-मुली बाहेर पडून इतरही कामं करतायत तिथे आता हे सगळं जमवण थोडसं कठीणच आहे. पण वर्षातून एकदातरी हा असा सुग्रास स्वयंपाकाचा घाट घालून तो चाखण्याचा आनंद सगळ्यांनी अनुभवायलाच हवा असं वाटतं. बाहेर तर्हे-तर्हेच्या थाळ्यांचा आस्वाद घेत असताना आपली ही परिपूर्ण, मराठमोळी, चविष्ट पुरणा-वरणाची थाळी आपण नक्कीच जपायला आणि पुढच्या पिढीपर्यंत पोचवायला हवी..:)

सांज
www.chaafa.com

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आमच्या इथे गवताचं एक पातं जरी मर्यादा सोडून वाढलं तरी खपवून घेतलं जातं नाही..!
>>
हे सुद्धा शक्य आहे. कदाचित त्याच्या बायकोला हे चालत नसावे आणि त्याला करावे लागत असावे. पुरुषप्रधान संस्कृतीचा हा एक साईड ईफेक्ट आहे. जिथे पुरुषांना मनाविरुद्ध कामे पडतात, वा त्यांचा काही मानसिक वा शारीरीक छळ होतो तेव्हा त्यांना पुरेशी सहानुभुती वा सपोर्ट समाजाकडून लवकर मिळत नाही. असो, हा संपुर्णपणे वेगळ्या धाग्याचा विषय आहे. मी काढणार नाही. कारण तिथे चार प्रतिसादही मिळणार नाहीत Happy

बरं त्या माणसाला आवड आहे म्हणून करतो की त्याच्या सासरची परंपरा आहे म्हणून इच्छा नसताना, प्रसंगी करिअर/छंद सोडून लाॅन मो करतो? देअर यु हॅव द आन्सर टु योर इल्लाॅजिकल आर्ग्युमेंट.

काही गोष्टी बायकोला आवड आहे म्हणूनही कराव्या लागतात. नाहीतर ती मानसिक छळ करते. किटकिट करते. सुखी संसाराला दुखी संसार करते. नवऱ्याला त्रास द्यायला सासूशी मुद्दाम वाईट वागते.
अर्थात हे मान्य होणार नाही की अश्याही केसेस असतात. आणि मान्य झाले तरी सहानुभुती वा सपोर्ट सहजी मिळणार नाही हे मी वर लिहिले आहेच. त्यामुळे याला इलॉजिकल कोणी म्हणत असेल तर त्यात आश्चर्य नाही Happy

पण माझ्याच ऑफिसमध्ये असे काही जण आहेत जे घरी बायको आईची किटकिट नको म्हणून ऑफिसातच जास्त पडीक राहतात. जे लॉकडाऊनमध्येही आम्हाला ऑफिसला येऊ द्या म्हणून गयावया करत होते.

म्हणजे "पुरणाचा साग्र संगीत स्वयंपाक आवड आणि निवड आहे म्हणुन तर करतात" पासून आता "हो' होतो त्रास करावा लागतो मनाविरुद्ध, मग काय झालं? काही/बऱ्याच स्त्रिया नाही का त्यांच्या मनाविरुद्ध झालं की खिटपिट करत बसतात आणि मग नवऱ्याला ते बायकोला आवडते म्हणून करावे लागते" इथ पर्यन्त आलोय का आपण? असल्यास प्रगती आहे असे म्हणावे लागेल.

सासर - माहेर बाबत:
आई बाबांसोबत मुलगा/मुलगी एकत्र रहाते त्याला माहेर म्हटलं, तर अनेक गोष्टी घरची परंपरा आहे, किंवा जगाची रीत आहे म्हणून माझ्यावर आणि माझ्या बहिणींवर माहेरीच लादल्या गेल्या. हां, मला सासरी जाऊन रहावं लागलं नाही, पण बहिणींना राहावं लागलं. माहेरी सगळं आलबेल असतं, सासरी मात्र नसत्या परंपरा पाळाव्या लागतात असं सरसकट नसावं. कराव्या लागणाऱ्या गोष्टी वेगळ्या असू शकतात, पण एक समाज, संस्कृती म्हणुन बघितलं तर हे सासरी माहेरी दोन्ही कडे असेलच. आपल्या माहेरीही सून आलेली असते आणि ती पण सासरी परंपरा लादल्या जातात म्हणत असेल तर वर्तुळ पूर्ण होतं.
तेव्हा या विषयात सासर-माहेर वळण खटकते, समस्या दोन्हीकडे असेल ना.

हो हो, मी ही अनुमोदनच दिले. जी कुणी खपते, करते तिला जरा बरं वाटल्याशी कारण. म्हणजे आपला पुरणपोळ्यांचा ओघ कसा व्यवस्थित राहतो, नाही? आपण तिला म्हणायचं 'हे रिग्रेसिव्ह आहे' आणि ती तिच्या मजबूरीचा राग/स्वतःच्याच आवडीचा संताप आपल्यावर काढायची. मग आपल्याला खपून पुरणपोळी करणं आलं. त्यापेक्षा धोरणाने रहावं. >>>

अगदी अगदी.
मी अनू काही पोस्ट पटल्या.
"काही" लोकांच्या पोस्ट म्हणजे खरंच कहर आहेत, पूजे ला आरती च्या ताटा ला हात लाऊन आपला मोलाचा सहभाग व्यक्त करणारे प्रोग्रेसिव लोक हे. यांचा स्टँड आधीच लक्षात येतो.

कोथिं बीर वड्या कथेतलं घरी राहणार्‍या बायकांबद्दलचं एक वाक्य - "ना पुरेसा मान मिळतो ना निर्णयप्रक्रियेत सहभाग. वर वाट्याला येतं ते परावलंबित्व. स्वत:साठी कधी काही घ्यावंसं वाटलं तर परवानग्या काढत बसावं लागतं.. "

खरंय ना हे?

तिथे स्वतःच्या परि स्थितीबद्दल खंत आणि कारुण्य वाटून नोकरी करणार्‍या स्त्री बद्दल ईर्ष्या वाटत होती. तिला टोमणे मारले जायचे.

आता चित्र बदललं. आता पुरणावरणाचा स्वैपाक एकटीने करू शकणार्‍या स्त्रीबद्दल असूया वाटू लागली?

बरेचदा वन डायमेंशनल आणि रिजिड विचार करतो आपण.
जणू ईतर शक्यता लक्षातच घ्यायच्या नाहीत वा त्या अस्तित्वातच नाहीत.

गेल्यावर्षी मायबोली गणपती स्पर्धात नैवेद्याचे ताट हि स्पर्धा होती. तेव्हा कोणाला हा अँगल आढळला नाही आणि त्या स्पर्धेला या जाचक चालीरीतींचे उदात्तीकरण म्हणून विरोध केला गेला नाही. कारण बरेचदा आपण एखाद्या गोष्टीकडे कसे बघतो, वा त्रयस्थ व्यक्ती आपल्याला त्याकडे कसे बघायला सांगते त्यानुसार आपले विचार बदलतात. अर्थात त्यात काही गैर नाही. पण विचार सर्वांगीन आणि सर्व बाजूंनी व्हावा ईतकीच माफक अपेक्षा. सक्ती मुळीच नाही Happy

>>कदाचित त्या शेजाऱ्यालाच तुमचा मत्सर वाटत असेल.<<
हा हा. नाव यु स्टार्टेड गेटिंग माय पॉइंट. फक्त साइड फ्लिप करा... Happy

गेल्यावर्षी मायबोली गणपती स्पर्धात नैवेद्याचे ताट हि स्पर्धा होती. तेव्हा कोणाला हा अँगल आढळला नाही आणि त्या स्पर्धेला या जाचक चालीरीतींचे उदात्तीकरण म्हणून विरोध केला गेला नाही.
>>>>>>>

विरोध करावा अशी माझी अपेक्षा नव्हती. मी फक्त ते उदाहरण म्हणून दिले की आपण कसे विचार करतो.
प्लीज चर्चा थांबवू नका. पुढे चालू ठेवा. हा मुद्दा मी मागे घेतो Happy

नेहमीची लबाडी सुरू आहे. मुद्दा घरातल्या स्त्रीला एकटीने ते सगळे करायला लागण्याचा आहे.

गेल्या वर्षीच्या स्पर्धेचा मुद्दा आलाच आहे तर नैवेद्य स्पर्धेत ४ प्रवेशिका आल्या होत्या. तेच मोदक, फास्ट फूड स्पर्धांतील प्रवेशिकांची संख्या याच्या काही पट होती.
मोदक स्पर्धेत विजेती प्रवेशिका पुरुष आयडीची होती. तो नैवेद्य नवरा बायको दोघांनी मिळून केला होता
मी आणखी एक प्रवेशिका पाहिली. त्यात प्रतिसादांत -" बापरे! एवढं सगळं तुम्ही एकटीने केलंत? असा एक प्रतिसाद आहे आणि त्याला बरेच +१ मिळाले आहेत. स्पर्धक आयडीने, " मुलाने मदत केली," असं उत्तर दिलं.

बरं . आता माझा एक मुद्दा अनुत्तरित राहिला आहे. घरी राहणार्‍या स्त्रीला निर्णय प्रक्रियेत सहभाग मिळतो का? एखादी वस्तू घ्यायची तर नवर्‍याच्या तोंडाकडे पाहावं लागतं का? नवरा ही वस्तू माझ्या पैशांनी येणार / आली आहे, असं ऐकवतो का? असं असेल तर का?

बरं . आता माझा एक मुद्दा अनुत्तरित राहिला आहे. घरी राहणार्‍या स्त्रीला निर्णय प्रक्रियेत सहभाग मिळतो का? एखादी वस्तू घ्यायची तर नवर्‍याच्या तोंडाकडे पाहावं लागतं का? नवरा ही वस्तू माझ्या पैशांनी येणार / आली आहे, असं ऐकवतो का? असं असेल तर का?>>>>>

घरी राहणार्या पुरूषांचीही काही संख्या आहे असे ईथेच वाचले आहे. त्यानाही हे ऐकावे लागते का? जस्ट एक शंका.

मुद्दा घरातल्या स्त्रीला एकटीने ते सगळे करायला लागण्याचा आहे.
>>>>>
मुद्दा तो नाहीये. मुद्दा त्याला जबाबदार असे लेख आहेत, अश्या गोष्टीचे डोक्युमेंटेशन करणे, कौतुक करणे, या सो कॉलड कुळाचारांचे उदात्तीकरण करणे आहे.
जर हे असे असेल तर नैवैद्य स्पर्धा ठेवण्यावरही हाच आक्षेप असायला हवा होता. त्यानंतर मुलाने मदत केली, नवर्‍याने मदत केली वगैरे या केस बाय केस उदाहरणांना अर्थ नाही. ईथे कोणी लोकांच्या घरात जाऊन बघत नाही.
असो, राहू द्या आता. पण यापुढे अशी कुळाचार जपणारी स्पर्धा ठेवल्यास तेव्हाच्या तेव्हा आक्षेप घेत जा.

घरी राहणार्या पुरूषांचीही काही संख्या आहे असे ईथेच वाचले आहे. त्यानाही हे ऐकावे लागते का? जस्ट एक शंका.
>>>>>
त्यांना तर बाहेरही बरेच ऐकावे लागत असेल. बायकोची कमाई खाणारा म्हणून समाजातही हिणवले जात असेल. बायकोच कश्याला, अविवाहीत पुरुषही शिक्षणानंतर काही काळ बेकार असेल तर त्याला आईवडील अजून पोसताहेत म्हणून ऐकावे लागते. आपल्या समाजात पुरुषांवर कमवायचे आणि कमावत राहायचे दडपण असतेच.
चर्चा ईथे बघू शकता. https://www.maayboli.com/node/72167

मी पहिली तीन पानं पुन्हा नजरेखालून घातली.
वा वा छान छान पेक्षा वेगळा सूर लावणाऱ्या प्रत्येक प्रतिसादात बाईचा स्पष्ट उल्लेख आहे.

लेखातल्या पहिल्याच वाक्यात महिलावर्गाला धडकी भरते म्हटलंय. पुढे सुगरणीचा गुणवर्णन आहे.

बाईवर पडणाऱ्या भाराचा मुद्दा नजरेआड करायचं कारण मी समजूच शकतो.

दुसरं - मायबोलीवर स्पर्धेत भाग घेणाऱ्यांवर संशय घेतलाय.
आणखी किती खाली पडणार?

{बरं . आता माझा एक मुद्दा अनुत्तरित राहिला आहे. घरी राहणार्‍या स्त्रीला निर्णय प्रक्रियेत सहभाग मिळतो का? एखादी वस्तू घ्यायची तर नवर्‍याच्या तोंडाकडे पाहावं लागतं का? नवरा ही वस्तू माझ्या पैशांनी येणार / आली आहे, असं ऐकवतो का? असं असेल तर का?}

याला उत्तर नाही. पण त्यावर आलेल्या प्रतिक्रियेची सविस्तर दखल. छान छान.

माझ्याकडून ऊत्तर हवे होते का? सॉरी मला वाटले ईनजनरल आहे. आणि या विषयाशी ते संबंधित वाटले नाही.
तरी तुम्हाला यावर सविस्तर उत्तर काय स्वतंत्र धागा काढून ऊत्तर देऊ शकतो.
कारण आमच्या घरातच मी कमावता तर बायको घर सांभाळणारी अशी प्रश्नात विचारलेलीच केस आहे.

आता तुमचे प्रश्न -

घरी राहणार्‍या स्त्रीला निर्णय प्रक्रियेत सहभाग मिळतो का?
एखादी वस्तू घ्यायची तर नवर्‍याच्या तोंडाकडे पाहावं लागतं का? नवरा ही वस्तू माझ्या पैशांनी येणार / आली आहे, असं ऐकवतो का? असं असेल तर का?
>>>>>>>

आमच्याकडे निर्णय प्रक्रियाच बायकोपासून सुरू होते. आणि बरेचदा तिथेच संपते. म्हणजे ज्या निर्णयाशी माझा संबंध नसतो तिथे मला विचारलेही जात नाही. जसे मुलांच्या शाळेचे निर्णय तिनेच घेतले आहे. आमचे घर घ्यायच्या निर्णयातही मोठा वाटा तिचाच होता. माझ्या तर बजेटबाहेर गेलेय घर. पण तिला मोठे घर हवे होते. मग पुढे त्या घरातल्या वस्तूही काय हव्यात काय नाही हे तिनेच ठरवलेय. चॉईस करताना मात्र दोघांना आवडेल असेच केलेय.
ईतर छोट्या मोठ्या घरगुती वस्तू घ्यायचे म्हणाल तर सगळे शॉपिंग अ‍ॅप्स बायकोच्या फोनवर आहेत. तीच ऑर्डर करते. मग ती कपडेखरेदी असो, राशनपाणी असो वा वस्तू खरेदी असो, एकूण एक बारीक वस्तू. दर दिवसाला किमान तीन पार्सल येतात. काय आलेय काय नाही मी बघायलाही जात नाही. जे मला दाखवण्यासारखे असते ते पार्सल तेवढे फोडून बायकोच दाखवते.

राहिला प्रश्न यासाठी लागणार्‍या पैश्यांचा तर मला अ‍ॅक्चुअली माझ्या फोन बँकीगचा पासवर्डही माहीत नाही. माझे बँक अकाऊंट बायकोच हँडल करते. माझा पगार आला की बायकोच तो होमलोनपुरते पैसे ठेऊन तिच्या अकाऊंटला ट्रान्सफर करून घेते. बँकेच्या कस्टमर केअरचा कॉल आला तरी मी तिच्याच हातात देतो. आणि त्यावर ती म्हणजे मी तुझी पर्सनल असिस्टंट आहे का Happy हे अ‍ॅक्चुअली खरे आहे हा. ईथे कोणाच्या फेसबूक फ्रेंडलिस्टमध्ये माझी बायको असेल त्याने बिनधास्त तिला हे विचारून खरे खोटे करा आणि ते उत्तर ईथे द्या Happy

सस्मित अगदी Biggrin
बाय द वे सेपरेट धागा निघालाच नाही का अजून???पुरणाच्या धाग्यावर दळण दळून दळून चिकट्ट झालं हो जातं Wink

निर्णयप्रक्रियेबाबत
बरंय. अशा गोष्टींचंही documentation झालेलं बरं असतं. मग वेगवेगळ्या वेळी वेगवेगळं सांगितलं असलं म्हणून काय झालं? तसं तर ते नेहमीचंच आहे.

मानवदादा, अजून तर जातं चिकट्ट पूर्ण झालं नाही. एकूणातच अगदी अटकायला झाल्याशिवाय धुवायचं नाही असचं एकूण जनमत असतंय... वेळीच बदल करा की पुढे धुणे, बडवणे टळेल हे जरा सिलबस बाहेरच आहे इथे....

अस्मिता, मीम टाकायला परवानगी मागतेस???? Wink Happy

Pages