श्रावण मासी हर्ष मानसी..’ वगैरे सगळं लिहण्या-वाचण्या पुरतं ठीक आहे. पण आता कोणी मान्य करो अथवा न करो, श्रावणाची एंट्री ही समस्त महिला वर्गाच्या मनात धडकी भरवणारीच असते. आणि अशा दहशतीमागचा कर्ता-सवरता असतो तो ‘पुरणाचा स्वयंपाक’! श्रावण महिना म्हटलं की सणावारांची गडबड हे तर ठरलेलच असतं.. श्रावणातले शुक्रवार, नागपंचमी, श्रावणी सोमवार, राखी पौर्णिमा, गोकुळाष्टमी, पोळा.. इ.इ. आणि ही तर फक्त सुरुवात.. पुढचा भाद्रपद तर याहून अधिक डेंजर असतो. आणि यापैकी बहुतांश वेळेला करावा लागतो तो हा पुरणाचा स्वयंपाक! याला आपण स्वयंपाकातला ‘ड’ गट म्हणू शकतो. बरं, पुरणाचा स्वयंपाक म्हणजे केवळ पुरणपोळी असं समजणार्यांना आत्ताच सांगते, तुम्ही घोर अज्ञानात जगत आहात. यूपीएससी चा सिलॅबस जसा व्हास्ट असतो नं तसाच या पुराणा-वरणाच्या स्वयंपाकाचा सिलॅबस पण भल्या-भल्यांना घाम फुटायला भाग पाडतो. एखाद-दुसरी चटणी, कालवलेलं मेतकूट, पंचामृत, कोशिंबीर, एक फोडभाजी, एक पालेभाजी, तळलेले पापड, भजी, कुरवड्या, कटाची आमटी, कढी, साधं वरण, सुधारस, लिंबाची फोड इ.इ. सुग्रास दागिन्यांनी वर्तुळाकार ताट सजलं की मधोमध येऊन विराजते ती लुसलुशीत पुरणपोळी! आणि याला म्हणतात ‘पुरणाचा स्वयंपाक!’ आणि हा जिला जमतो ती असते खरी सुगरण!
असा हा पुरणाचा स्वयंपाक श्रावणात, चार शुक्रवार, नागपंचमी, पोळा इ धरून किमान 5-6 वेळा तरी होतोच होतो. म्हणजे किमान मराठवाड्यात तरी असं चित्र आहे. मोठ्या शहरांनी आता यातलं फारसं काही उरलेलं नाही.. बहुतांश ठिकाणी तो आऊट ऑफ सिलबस होण्याच्या मार्गावर आहे. पण मराठवाड्यात तरी अजून तसं नाही. आला सण की शिजवा पूरण ही पॉलिसी अजून तरी इथे अस्तित्वात आहे. मराठवड्यातल्या देवांना पुरणाशिवाय दूसरा नैवेद्य चालतच नाही यावर आता माझा ठाम विश्वास बसलेला आहे. पण त्यामुळे मला वाटतं सणांची authenticity अनुभवता येते. साध्या श्रीखंड, खीर वगैरे क्षुद्र पदार्थांवर इथे सणांची बोळवण अजिबात होत नाही. आणि असा चारी-ठाव स्वयंपाक करणार्या निष्णात बायका इथे घरोघरी सापडतात. म्हणजे अर्थातच मी आधीच्या पिढी विषयी बोलतेय. माझ्यासारखा तरुण वर्ग अजून तरी ट्रेनिंग फेज मध्येच आहे. एकवेळ नुसती पुरणपोळी वगैरे करणं जमू शकतं, पण समग्र ‘पुरणाचा स्वयंपाक’ अतिशय कुशलतेने करून, म्हणजे एकीकडे तर्हे-तर्हेच्या फोडण्या देत दुसरीकडे योग्य consistency मध्ये पूरण वाटणं (हो, consistency फार महत्वाची असते.. पोळ्यांची कणीक आणि पूरण ह्यांची consistency सारखी असली तरच पुरण सगळीकडे सम-प्रमाणात पसरून सुंदर पोळी तयार होते) किंवा एकीकडे भजी तळत दुसरीकडे लुसलुशीत पोळ्या लाटणं आणि वर प्रसन्न मुद्रेने सगळ्यांना आग्रह करत जेवायला वाढण यासाठी नेक्स्ट लेव्हल ची स्किल्स असावी लागतात. हे साक्षात अन्नपूर्णेचच काम आहे॰
बरं या अशा सगळ्या प्रकारच्या चवी आणि रंगांनी संपन्न अशा आर्टिस्टिक स्वयंपाकाचा आवडीने आस्वाद घेणार्या मंडळींचीही इकडे वानवा नाही. बसल्या बैठकीला 3-4 मध्यम आकाराच्या, तुपात थबथबलेल्या पुरणपोळया, सोबतचे सगळे पदार्थ तोंडी लावत, घासागणिक अन्नपूर्णेच कौतुक करत खाणे आणि वर कटाची आमटी पैज लावून ओरपणे यालाही स्किल्सच असावी लागतात. माझ्या लहानपणी सणावारांना एकावेळी 15-20 माणसांची पंगत बसलेली आणि पैजा लागलेल्या मी पाहिल्या आहेत. एक-दोघी जणी वाढायला उभ्या आणि आई किंवा आजी सर-सर गोल गरगरीत पोळ्या लाटत बसलेल्या आणि आम्ही सगळे मस्त चेष्टा-मस्करीसह जेवतोय हे मनावर कायमचं कोरलं गेलेलं चित्र आहे. या बायका हे सगळं तेव्हा कसं पेलायच्या याचं आता नवल वाटतं.
महालक्ष्म्यांचा (म्हणजे गौरीचा, मराठवाड्यात महालक्ष्मी म्हणतात) स्वयंपाक तर अतिशय क्लिष्ट! वर उल्लेखलेले सगळे पदार्थ प्लस सोळा प्रकारच्या भाज्यांचा compulsory वापर, साखरभात, मसालेभात, साधा भात, सोवळयातल वळवट, त्याची खीर, उडीदाचे पापड इ.इ.इ.
बहुतेक वेळा बायकांचा दिवस जातो यात.
सध्याच्या वेगवान जगात जिथे बायका-मुली बाहेर पडून इतरही कामं करतायत तिथे आता हे सगळं जमवण थोडसं कठीणच आहे. पण वर्षातून एकदातरी हा असा सुग्रास स्वयंपाकाचा घाट घालून तो चाखण्याचा आनंद सगळ्यांनी अनुभवायलाच हवा असं वाटतं. बाहेर तर्हे-तर्हेच्या थाळ्यांचा आस्वाद घेत असताना आपली ही परिपूर्ण, मराठमोळी, चविष्ट पुरणा-वरणाची थाळी आपण नक्कीच जपायला आणि पुढच्या पिढीपर्यंत पोचवायला हवी..:)
सांज
www.chaafa.com
निर्णयप्रक्रियेबाबत बरंय. अशा
भरत,
निर्णयप्रक्रियेबाबत बरंय. अशा गोष्टींचंही documentation झालेलं बरं असतं. मग वेगवेगळ्या वेळी वेगवेगळं सांगितलं असलं म्हणून काय झालं? तसं तर ते नेहमीचंच आहे.
>>>>>
@ भरत,
हे सुद्धा पुन्हा माझ्याबाबत असेल तर काय वेगवेगळे हे नमूद कराल का? उगाच हवेत तीर नको. स्पष्ट लिहा, सारे खोडून मिळेल
आणि ते नैवेद्याचे मला वाटते आपण सोडूनच देऊया,
कारण अश्या लेखांनी कुळाचारांचे डोक्युमेंटेशन आणि उदात्तीकरण होते पण नैवेद्याच्या स्पर्धां ठेवल्याने ते होत नाही हा डबल स्टॅन्डर्ड नाही का?
त्याला उत्तर म्हणून स्पर्धेतील नैवेद्य घरात सर्वांनी मिळून केला हे आणखी मजेशीर
आणि ते नैवेद्याचे मला वाटते
आणि ते नैवेद्याचे मला वाटते आपण सोडूनच देऊया,
कारण अश्या लेखांनी कुळाचारांचे डोक्युमेंटेशन आणि उदात्तीकरण होते पण नैवेद्याच्या स्पर्धां ठेवल्याने ते होत नाही हा डबल स्टॅन्डर्ड नाही का?
त्याला उत्तर म्हणून स्पर्धेतील नैवेद्य घरात सर्वांनी मिळून केला हे आणखी मजेशी >>
घरातील सर्वांनी मिळून केला तर त्याचे जरूर डॉक्युमेंटेशन करावे, जरा उदात्तीकरण केले तरीही काही हरकत नाही.
कारण चर्चेचा मूळ उद्देशच तो आहे.
एकटी वर सगळा भार पडू नये, आणि त्यात सोवळे पाळणे वगैरे कालबाह्य प्रथा नसाव्यात. हे कुळाचार वगैरे सोवळ्यातच करावे वगैरे, स्त्रियांनीच करावे वगैरे यामुळे तसे उदात्तीकरण नको असा मुद्दा आला.
जर सगळे मिळून करत असतील, सोवळे वगैरे अट नसेल तर तो मुद्दा बाद होतो. लेखात "आज काल बायका-मुली नोकरी बाहेर पडून इतरही कामं करतात, तेव्हा घरातील पुरुष मंडळींनी पुढे येऊन अशा स्वयंपाकात वाटा उचलून सगळ्यांनी मिळुन अशा साग्रसंगीत पुरण स्वयंपाकाचा आपला वारसा पुढे चालू ठेवण्यास मदत करावी" असे काही लिहिले असते तर त्यावरही आक्षेप आला नसता.
मुद्दा घरातल्या स्त्रीला
मुद्दा घरातल्या स्त्रीला एकटीने ते सगळे करायला लागण्याचा आहे.
>>>>>
मुद्दा तो नाहीये.
ॠन्मेष, मुद्दा तोच आहे. नेहमी तुला योग्य वाटेल तोच मुद्दा असतो असे नाही.
ं<आणि ते नैवेद्याचे मला वाटते
ं<आणि ते नैवेद्याचे मला वाटते आपण सोडूनच देऊया,> याचं उत्तर आधीच दिलं आहे. त्या सगळ्या प्रतिसादांतला , मूळ लेखातलाही एकट्या स्त्रीने किंवा फक्त स्त्रियांनी ते करावं हा भला मोठा मुद्दा नजरेआड करत रहा. नुसतंच जातं फिरवत रहा.
वेगवेग़ळं काय हे तुम्हांला स्वतःला बरोबर कळले आहे. काय खोडायचे ते स्वतःच्या मनाशी तपासावे..
असो. काही आठवडे झाले, तुमचे लेखन आणि प्रतिसाद न वाचण्याची सवय नी लावून घेतली आहे. या धाग्यापुरते तुमचे प्रतिसाद वाचून त्यावर लिहिले. आता पुन्हा टाटा बाय बाय.
ए नुसतंच काय दळताय मेल्यांनो.
ए नुसतंच काय दळताय मेल्यांनो. चला आता एकीकडे ओव्या म्हणायला घेऊया. मी करतो सुरवात.
पहिली माझी ओवी
पहिला माझा नेम
तुळशीखाली राम
पोथी वाची
घरातील सर्वांनी मिळून केला तर
घरातील सर्वांनी मिळून केला तर त्याचे जरूर डॉक्युमेंटेशन करावे, जरा उदात्तीकरण केले तरीही काही हरकत नाही.
>>>>>>>
नैवेद्याच्या स्पर्धेत तो घरातल्या सर्वांनी मिळून करावा असा नियम होता का? किंवा तसे करून डोक्युमेंटेशन व्हावे असा तिचा उद्देश होता का?
बिलकुल नाही. मग का उगाच डिफेंड करत आहात.
खालची लिंक बघा. स्पर्धेच्या धाग्याची. नियम बघा त्यातील
https://www.maayboli.com/node/75966
नियम-
१) पाककृती स्वत: तयार केलेली असावी.
३) नैवेद्याच्या पानात किमान 2 भाज्या, चटणी, मेतकूट, 2 कोशिंबीरी, भात, पोळी/ पुरी, तळणीचा पदार्थ, एखादे गोड पक्वान्न असावे. पानातील कमाल पदार्थ तुमच्या आवडीप्रमाणे कितीही असू शकतात. उकडीचे वा कोणत्याही प्रकारचे स्वत: केलेले मोदक असावेत.
४) नैवेद्याच्या पानात बाहेरून विकत आणलेला गोड ,तिखट,चटपटीत इत्यादींपैकी कोणताच पदार्थ नैवेद्यम च्या पानात नसावा.
मॉरल ऑफ द स्टॉरी - जर या लेखावर कुळाचार जपल्याचे आणि त्याचे डोक्युमेंटेशन केल्याचा आरोप होत असेल तर तिथेही तोच विचार मनात यायला हवा.
तो आला नाही कारण तिथे आपला बघण्याचा दृष्टीकोण वेगळा होता.
जोपर्यंत कोणी तुमच्या डोक्यात तो भरवत नाही तोपर्यंत ते तसे बघितले जात नाही.
@ भरत,
@ भरत,
आपले आधीचे प्रश्न -
<<<<<घरी राहणार्या स्त्रीला निर्णय प्रक्रियेत सहभाग मिळतो का? एखादी वस्तू घ्यायची तर नवर्याच्या तोंडाकडे पाहावं लागतं का? नवरा ही वस्तू माझ्या पैशांनी येणार / आली आहे, असं ऐकवतो का? असं असेल तर का?<<<<<<
ज्यांचा मूळ धाग्याशी काही संबंध नव्हता. म्हणून मी त्यावर काही लिहिले नाही. टाळून पुढे गेलो.
पण आपण ते प्रश्न मी टाळतोय म्हणून माझ्या मागे लागलात म्हणून मी अखेर उत्तर दिले.
त्यात असे लक्षात आले की आमच्याकडे तरी निर्णयप्रक्रियेत आणि वस्तूखरेदीत कमावणार्या पुरुषापेक्षा घर सांभाळणार्या बाईलाच जास्त महत्व आहे.....
तर आपल्याला आता माझे प्रतिसादच वाचायचे नाहीयेत
असो, तुमची चॉईस. मी मात्र मला एखाद्याच्या पोस्टमधील मुद्दा मला न पटल्यास तो खोडणारच. एखाद्याचा पटल्यास त्याला अनुमोदन देणारच. मग ती पोस्ट करणारा आयडी कोण आहे ही दुय्यम बाब झाली
पण मला तर तुमचा आक्षेप च कळत
पण मला तर तुमचा आक्षेप च कळत नाहीये स्पर्धेवर चा.. स्पर्धेत generally जे लोक स्वतःला eligible समजतात तेच भाग घेतात.. ती कोणावर लादलेली नाहीये भाग घ्याच compulsary म्हणून.. ऐच्छिक आहे ते.. ज्यांना आनंद वाटतो तेच जातील त्यात participate करायला.. whereas प्रथा या शक्यतो mandetory मध्ये मोडतात.. तुम्ही स्पर्धा आणि कुलधर्म कुलाचार का एकत्र करताय..
उदयाला कोणी triathalon, marathon etc compulsory केला तर जीव च जाईल की.. त्यात इंटरेस्ट असणारेच करणार ना participate.. saglech नाही जात मिलिंद सोमण व्हायला..
स्पर्धेत भाग घेतला नाही तर कोणी judge नाही करणारे.. तेच घरात नाहीये possible..
मला स्वतःला स्पर्धेवर आक्षेप
मला स्वतःला स्पर्धेवर आक्षेप घ्यायचा असता तर मी तेव्हाच तिथेच घेतला असता. ईथे नाही.
मला तर आवडलेली स्पर्धा.. मोदक, नैवेद्याचे ताट, गणपतीचे मखर आणि आरत्या म्हणजे एकदम माहौल
पण स्पर्धेत भाग घेणारा आपल्या मर्जीने घेत असला तरी त्याची प्रवेशिका ही कुळाचाराचे डोक्युमेंटेशन असते. - हे चुकत असेल तर कर्रेक्ट करा
वर हाच मुद्दा काही जणांनी उचलून अश्या लेखांना नको म्हटले आहे. मग त्यांनी अश्या स्पर्धेलाही नाही म्हणायला नको का?
स्पर्धेमध्ये स्त्री-पुरुष अट
स्पर्धेमध्ये स्त्री-पुरुष अट नव्हती. लेखात सुग्रण, साक्षात अन्नपूर्णा वगैरे फार पारंपारिक विचार आहेत. लेख आपल्या जागी योग्यच आहे. ज्यांनी आक्षेप घेतलेला आहे तो अशा लेखांना काउंटर अर्ग्युमेन्ट म्हणुन - स्वयंपाकघर ही स्त्रियांची मक्तेदारी राहीलेली नाही हे मांडण्याकरता फक्त घेतलेला आहे.
प्रवेशिका ही कुळाचाराचे
प्रवेशिका ही कुळाचाराचे डोक्युमेंटेशन असते.>> नाही नाही. सोवळ्याने केले, अजिबात चव न बघता केले, सवाष्ण बाईने केले असे काही हे असते तर ते कुळाचाराचे डॉक्युमेंटेशन झाले असते. स्पर्धेकरता ऑफिसमधून आल्यावर, किंवा एक दोन दिवस आधी पूर्वतयारी केलेले असं सगळं चाललं असतं. इन फॅक्ट पदार्थ कधी केले वगैरे काही नियम नव्हतेच.
रेसिपीचं , पाककृतींचं, नैवेद्याच्या ताटात काय काय पदार्थ असतात वेगवेगळ्या घरांमधे त्याचं डॉक्युमेंटेशन होतं.
अवांतर - स्पर्धेचा हेतू चूक की बरोबर हा मुद्दा इथे का लावून धरताय ? या लेखापुरती चर्चा मर्यादित ठेवा. उगाच जुनी उणी दुणी उगाळायचं बंद करा
स्पर्धेमध्ये स्त्री-पुरुष अट
स्पर्धेमध्ये स्त्री-पुरुष अट नव्हती
>>>>
स्पर्धेत स्त्रीपुरुष नसेना अट .. पण नैवेद्य कसा असावा याचे नियम आहेत. वर दिले आहेत. भले ते स्पर्धेसाठी का असेना, पण नैवेद्य म्हणजे किमान अमुकतमुक हवेच हा संदेश त्यातून जातोच.
त्यामुळे जेव्हा यानिमित्ताने समाजातील ईतर घरांमध्ये या नैवेद्य प्रथा परंपरा कुळाचाराचा प्रसार होणार तेव्हा तिथे स्वयंपाकाची जबाबदारी घेतलेल्या बायकांनाच तो करायला लागणार आणि नैवेद्य म्हटले की किमान तितके करावे अशी अपेक्षा धरली जाणार ...... असा साधारण मुद्दा आहे.
त्यामुळे जेव्हा यानिमित्ताने
त्यामुळे जेव्हा यानिमित्ताने समाजातील ईतर घरांमध्ये या नैवेद्य प्रथा परंपरा कुळाचाराचा प्रसार होणार तेव्हा तिथे स्वयंपाकाची जबाबदारी घेतलेल्या बायकांनाच तो करायला लागणार ...... असा साधारण मुद्दा आहे. >>
हे मायबोली स्पर्धेच्या आधी होत नव्हतं ? मायबोली माहित नसलेल्या घरांमधे कुळाचाराचा प्रसार कसा होतो ? तिथे घरच्या बायकांकडून अशा अपेक्षा होत नाहीत ? स्वखुशीने भाग घ्यायचा असतो अशा स्पर्धेमुळे 'कुळाचाराची' जबरदस्ती होणार ? हे लॉजिक आहे तुमचं ?
स्वयंपाकघर ही स्त्रियांची
स्वयंपाकघर ही स्त्रियांची मक्तेदारी राहीलेली नाही हे मांडण्याकरता फक्त घेतलेला आहे.>>
Exactly
@ऋन्मेश..(sorry नीट जमलं नाही तुमचं नाव) स्पर्धा न काय काय add karun मुद्दा भरकटवत आहात.. त्या स्पर्धेला कोणीही documentation म्हणलेला नाही.. rather ज्यांना आवडत नाही ते बघायला ही नसतील गेले.. documentation म्हणावं अशी तुमचीच इच्छा.. त्यावर आक्षेप घ्या हाच हट्ट धरून बसलाय तुम्ही..
आणि तुम्ही तुमचं उदाहरण दिलंय माझ्या घरी श्रावण पालन बंद केलं असं.. ते स्वतःच्या घरी करणं आणि सासरी करणं यात फरक आहे.. आता जमणार नाहीये next year पासून बंद कर गौरी बसवणं असं आईला सहज सांगून ओर प्रसंगी वाद घालून केलंय आम्ही पण.. पण सासरी लग्न झाल्या झाल्या अस म्हणायची सोय नसते.. आणि नंतर अंगवळणी पडतात गोष्टी..
हे मी स्वतःचं सांगितलं..बाकीच्यांचे अनुभव वेगळे असू शकतात..
मायबोली माहित नसलेल्या
मायबोली माहित नसलेल्या घरांमधे कुळाचाराचा प्रसार कसा होतो ? तिथे घरच्या बायकांकडून अशा अपेक्षा होत नाहीत ? स्वखुशीने भाग घ्यायचा असतो अशा स्पर्धेमुळे 'कुळाचाराची' जबरदस्ती होणार ? हे लॉजिक आहे तुमचं ?>> Exactly
मायबोली माहित नसलेल्या
मायबोली माहित नसलेल्या घरांमधे कुळाचाराचा प्रसार कसा होतो ?
>>>>>
मायबोली माहीत नसलेल्या घरांमध्ये हा वरचा लेखही वाचला गेला नसेल
त्यामुळे हा मुद्दा होऊ शकत नाही.
मुद्दा हा आहे की नैवेद्याचे ताट स्पर्धेची प्रवेशिका ही कुळाचाराचे डॉक्युमेंटेशन म्हणून पकडावे का?
मुद्दा हा आहे की नैवेद्याचे
मुद्दा हा आहे की नैवेद्याचे ताट स्पर्धेची प्रवेशिका ही कुळाचाराचे डॉक्युमेंटेशन म्हणून पकडावे का?>> नाही..
कारण अनेक आहेत..
स्त्री पुरुष अट नाही.. चव आधी घेण्याबद्दल काही specification नाही..
अंघोळ करून सोवळ्यात करा अशी अट नाही..
अंघोळ न केलेल्या व्यक्तीचा स्पर्श झाला तर परत अंघोळ करून येऊन सगळ करा असं लिहिलेलं नाही..
पदार्थ स्वतः केलेला असावा एवढंच imp वाटतंय मला
तुम्ही तुमचं उदाहरण दिलंय
तुम्ही तुमचं उदाहरण दिलंय माझ्या घरी श्रावण पालन बंद केलं असं.. ते स्वतःच्या घरी करणं आणि सासरी करणं यात फरक आहे.
>>>>
तो फरक मी कुठे अमान्य करतोय. पुरुषप्रधान समाजात जे स्त्री-पुरुष समानतेचे प्रॉब्लेम आहेत ते कुठे मी नाकारतोय.
उलट मी पहिल्या पोस्टलाही हेच म्हणत होतो की अश्या लेखांना डोक्युमेंटेशन म्हणत ईथे वाद घालण्यापेक्षा तो लढा योग्य जागी द्या.
जसे मी माझ्या घरी श्रावण पाळणे बंद केलेय तसे माझी आई तिचे नियम लाऊन श्रावण पाळते, तर बायको तिच्या मर्जीचे नियम बनवून पाळते. श्रावणच नाही तर एकूणच देवधर्म आणि कुळाचार आमच्याकडे कुटुंबाचा असा सामाईक नसून प्रत्येक जण आपल्या श्रद्धेनुसार आणि विचारानुसार वागते.
एकदा या कुळाचारांबाबत घरात प्रत्येकाला ते पाळायचे की नाही वा कसे पाळायचे याबाबतचे स्वतःपुरते निर्णयस्वातंत्र्य दिले की बाकी समाजात काय पाळले जातेय याच्याशी कोणाला काही घेणेदेणे उरणार नाही. आणि तुम्ही पाळता म्हणून मला माझी सासू पाळायला लावते म्हणून दुसर्याकडे बोट दाखवायची गरज ऊरणार नाही
आता ब्रेक घेतो. माझी चहा
आता ब्रेक घेतो. माझी चहा करायची वेळ झालीय. मला चपाती-भात-भाजी पुर्ण स्वयंपाक येत नसल्याने चहा कॉफी आणि मला जमणारे ठराविक फास्टफूड करायचे काम नेहमी माझ्याकडेच असते. ते चुकवले तर घरी आई आणि बायको फार घालूनपाडून बोलतात. या एका कामासाठी घरातल्या दोन्ही बायका एकत्र होतात. तर ईथल्या चर्चेच्या नादात त्यांच्या शिव्या खायच्या नाहीत. नंतरच भेटू
छान फिरवता तुम्ही वाक्य..
छान फिरवता तुम्ही वाक्य..
एकदा म्हणता लेखाला म्हणू नका documentation.. एकदा म्हणता स्पर्धेला म्हणा..
लेख प्रथांबद्दल च आहे.. सो तिथं नाही व्यक्त करायचं मात्र ऐच्छिक असलेल्या स्पर्धेवर जाऊन तिकडे निषेध व्यक्त करायचा..
>>तुम्ही पाळता म्हणून मला माझी सासू पाळायला लावते म्हणून दुसर्याकडे बोट दाखवायची गरज ऊरणार नाही >>
का नाही दाखवायचं बोट.. होतंच की असं.. पूर्वीच्या रिकाम्या बायांमुळे वाट्टेल त्या पडलेल्या प्रथा पाळत बसाव्या लागतात की..
Especially मंगळागौर.. weekday बरबाद अख्खा..
माझ्या नास्तिक होण्यात मोठ्ठा वाटा उचलणारी..
आता ब्रेक घेतो. >> yo मीपण..
आता ब्रेक घेतो. >> yo मीपण.. जेवायची वेळ झाली.. ttyl..
मूळ लेखात सोवळं ओवळ, चव न
मूळ लेखात सोवळं ओवळ, चव न घेणे , कुळाचार हे काही आलं आहे असं मला वाटत नाही. फक्त सोवळ्यातळ वळवट लिहिलं आहे बाकी कुठे सोवळ्याचा उल्लेख मला तरी दिसलेला नाही.
तुम्ही लोकांनी दिलेला twist आहे का किंवा तुमचं presumption आहे का हे ?
'आम्ही केले तर आमची
'आम्ही केले तर आमची स्वयंपाकाची आवड तुम्ही केले तर तुमच्यावर सोवळ्याचे जोखड' अशा आगाऊ पूर्वग्रहदुषित मानसिकतेतून नेहमीच्या झुंड मानसिकतेच्या यशस्वी कलाकारांनी एका निरागस आणि निरूपद्रवी लेखावर नेहमीसारखाच पॉलिटिकल करेक्टनेसच्या आरोपाचा वरवंटा फिरवला.
>>>>>>>त्यामुळे जेव्हा
>>>>>>>त्यामुळे जेव्हा यानिमित्ताने समाजातील ईतर घरांमध्ये या नैवेद्य प्रथा परंपरा कुळाचाराचा प्रसार होणार तेव्हा तिथे स्वयंपाकाची जबाबदारी घेतलेल्या बायकांनाच तो करायला लागणार आणि नैवेद्य म्हटले की किमान तितके करावे अशी अपेक्षा धरली जाणार ...... असा साधारण मुद्दा ................ दॅट इज युअर अॅझम्प्शन. प्रवेशपत्रिकेत कुठेच स्त्रियांनीच करावे असा आग्रह नव्हता. तुमच्या कडुन चूक मान्य करायची अपेक्षा नाही.
'आम्ही केले तर आमची
'आम्ही केले तर आमची स्वयंपाकाची आवड तुम्ही केले तर तुमच्यावर सोवळ्याचे जोखड' >>>

'आम्हाला नसेल स्वयंपाकाची आवड तरीही बळेच सोवळ्याचे जोखड' याला कुठल्या मानसिकतेत टाकणार तुम्ही..
Out of context : mi तयार आहे आळस, नास्तिकता, अनास्था, जगा आणि जगू द्या attitude म्हणवून घ्यायला..
आम्हाला नसेल स्वयंपाकाची आवड
आम्हाला नसेल स्वयंपाकाची आवड तरीही बळेच सोवळ्याचे जोखड' याला कुठल्या मानसिकतेत टाकणार तुम्ही....... स्पष्ट नाही म्हणायला शिका की!
मनापासून बोलतेय.जेव्हा आपल्याला पटत नाही किंवा जमत नाही,त्यावेळी नाही म्हणा.
म्हणू की जमेल तेव्हा... or
म्हणू की जमेल तेव्हा... or सुरू आहे जमेल तस... ईथे सगळे details नाही लिहू शकत..तोपर्यंत आहे की बळजब्रीचा रामराम.. आणि हे कोणीतरी चालू केलं,ठेवलं, देवा धर्माच्या नावाखाली उदात्तीकरण केलं..म्हणूनच सुरू आहे की.. परंपरा प्रतिष्ठा आणि अनुशासन च्या नावाखाली..
स्पष्ट नाही म्हणणे प्रत्येक
स्पष्ट नाही म्हणणे प्रत्येक बाईला जमले असते तर.. हम्म. ग्यानबाची मेख.
स्पष्ट नाही म्हणणे जमले तरी
स्पष्ट नाही म्हणणे जमले तरी नंतर जो आफ्टरमॅथ होईल तो सोसण्याची हिंमत असेलच असे नाही. 'हिला कसली आवडच नाही' ह्या शेजार-पाजारी केलेल्या जननिंदेला सातत्याने तोंड देणे सोपे नसते. मुलांना तिच्याविरूद्ध चिथवणे (अमक्या ढमक्याची आई करते, तुमच्या आईला झेपतच नाही इ इ), माहेरच्यांना अपमानास्पद बोलणे (कसं बाई असतं एकेका घरात! इइइइइ.) इ इ तिचा पूर्ण सोशल स्फियर तिच्याविरूद्ध जाईल (काय तरी सासर तुझं... इतकी कटकट पेक्षा एक दिवस कर नि हो मोकळी...) इतके ड्रामे घडतात.

कॉलेजात रॅगिंगला स्पष्ट नाही कुणी कुणी म्हणलं?
म्हणू की जमेल तेव्हा.>>>> मग
म्हणू की जमेल तेव्हा.>>>> मग घरात नाही म्हणायला जमत नाही म्हणुन सगळा राग ऋन्मेषवर?
त्याला का झोडपुन काढताहात? 
Pages