श्रावण मासी हर्ष मानसी..’ वगैरे सगळं लिहण्या-वाचण्या पुरतं ठीक आहे. पण आता कोणी मान्य करो अथवा न करो, श्रावणाची एंट्री ही समस्त महिला वर्गाच्या मनात धडकी भरवणारीच असते. आणि अशा दहशतीमागचा कर्ता-सवरता असतो तो ‘पुरणाचा स्वयंपाक’! श्रावण महिना म्हटलं की सणावारांची गडबड हे तर ठरलेलच असतं.. श्रावणातले शुक्रवार, नागपंचमी, श्रावणी सोमवार, राखी पौर्णिमा, गोकुळाष्टमी, पोळा.. इ.इ. आणि ही तर फक्त सुरुवात.. पुढचा भाद्रपद तर याहून अधिक डेंजर असतो. आणि यापैकी बहुतांश वेळेला करावा लागतो तो हा पुरणाचा स्वयंपाक! याला आपण स्वयंपाकातला ‘ड’ गट म्हणू शकतो. बरं, पुरणाचा स्वयंपाक म्हणजे केवळ पुरणपोळी असं समजणार्यांना आत्ताच सांगते, तुम्ही घोर अज्ञानात जगत आहात. यूपीएससी चा सिलॅबस जसा व्हास्ट असतो नं तसाच या पुराणा-वरणाच्या स्वयंपाकाचा सिलॅबस पण भल्या-भल्यांना घाम फुटायला भाग पाडतो. एखाद-दुसरी चटणी, कालवलेलं मेतकूट, पंचामृत, कोशिंबीर, एक फोडभाजी, एक पालेभाजी, तळलेले पापड, भजी, कुरवड्या, कटाची आमटी, कढी, साधं वरण, सुधारस, लिंबाची फोड इ.इ. सुग्रास दागिन्यांनी वर्तुळाकार ताट सजलं की मधोमध येऊन विराजते ती लुसलुशीत पुरणपोळी! आणि याला म्हणतात ‘पुरणाचा स्वयंपाक!’ आणि हा जिला जमतो ती असते खरी सुगरण!
असा हा पुरणाचा स्वयंपाक श्रावणात, चार शुक्रवार, नागपंचमी, पोळा इ धरून किमान 5-6 वेळा तरी होतोच होतो. म्हणजे किमान मराठवाड्यात तरी असं चित्र आहे. मोठ्या शहरांनी आता यातलं फारसं काही उरलेलं नाही.. बहुतांश ठिकाणी तो आऊट ऑफ सिलबस होण्याच्या मार्गावर आहे. पण मराठवाड्यात तरी अजून तसं नाही. आला सण की शिजवा पूरण ही पॉलिसी अजून तरी इथे अस्तित्वात आहे. मराठवड्यातल्या देवांना पुरणाशिवाय दूसरा नैवेद्य चालतच नाही यावर आता माझा ठाम विश्वास बसलेला आहे. पण त्यामुळे मला वाटतं सणांची authenticity अनुभवता येते. साध्या श्रीखंड, खीर वगैरे क्षुद्र पदार्थांवर इथे सणांची बोळवण अजिबात होत नाही. आणि असा चारी-ठाव स्वयंपाक करणार्या निष्णात बायका इथे घरोघरी सापडतात. म्हणजे अर्थातच मी आधीच्या पिढी विषयी बोलतेय. माझ्यासारखा तरुण वर्ग अजून तरी ट्रेनिंग फेज मध्येच आहे. एकवेळ नुसती पुरणपोळी वगैरे करणं जमू शकतं, पण समग्र ‘पुरणाचा स्वयंपाक’ अतिशय कुशलतेने करून, म्हणजे एकीकडे तर्हे-तर्हेच्या फोडण्या देत दुसरीकडे योग्य consistency मध्ये पूरण वाटणं (हो, consistency फार महत्वाची असते.. पोळ्यांची कणीक आणि पूरण ह्यांची consistency सारखी असली तरच पुरण सगळीकडे सम-प्रमाणात पसरून सुंदर पोळी तयार होते) किंवा एकीकडे भजी तळत दुसरीकडे लुसलुशीत पोळ्या लाटणं आणि वर प्रसन्न मुद्रेने सगळ्यांना आग्रह करत जेवायला वाढण यासाठी नेक्स्ट लेव्हल ची स्किल्स असावी लागतात. हे साक्षात अन्नपूर्णेचच काम आहे॰
बरं या अशा सगळ्या प्रकारच्या चवी आणि रंगांनी संपन्न अशा आर्टिस्टिक स्वयंपाकाचा आवडीने आस्वाद घेणार्या मंडळींचीही इकडे वानवा नाही. बसल्या बैठकीला 3-4 मध्यम आकाराच्या, तुपात थबथबलेल्या पुरणपोळया, सोबतचे सगळे पदार्थ तोंडी लावत, घासागणिक अन्नपूर्णेच कौतुक करत खाणे आणि वर कटाची आमटी पैज लावून ओरपणे यालाही स्किल्सच असावी लागतात. माझ्या लहानपणी सणावारांना एकावेळी 15-20 माणसांची पंगत बसलेली आणि पैजा लागलेल्या मी पाहिल्या आहेत. एक-दोघी जणी वाढायला उभ्या आणि आई किंवा आजी सर-सर गोल गरगरीत पोळ्या लाटत बसलेल्या आणि आम्ही सगळे मस्त चेष्टा-मस्करीसह जेवतोय हे मनावर कायमचं कोरलं गेलेलं चित्र आहे. या बायका हे सगळं तेव्हा कसं पेलायच्या याचं आता नवल वाटतं.
महालक्ष्म्यांचा (म्हणजे गौरीचा, मराठवाड्यात महालक्ष्मी म्हणतात) स्वयंपाक तर अतिशय क्लिष्ट! वर उल्लेखलेले सगळे पदार्थ प्लस सोळा प्रकारच्या भाज्यांचा compulsory वापर, साखरभात, मसालेभात, साधा भात, सोवळयातल वळवट, त्याची खीर, उडीदाचे पापड इ.इ.इ.
बहुतेक वेळा बायकांचा दिवस जातो यात.
सध्याच्या वेगवान जगात जिथे बायका-मुली बाहेर पडून इतरही कामं करतायत तिथे आता हे सगळं जमवण थोडसं कठीणच आहे. पण वर्षातून एकदातरी हा असा सुग्रास स्वयंपाकाचा घाट घालून तो चाखण्याचा आनंद सगळ्यांनी अनुभवायलाच हवा असं वाटतं. बाहेर तर्हे-तर्हेच्या थाळ्यांचा आस्वाद घेत असताना आपली ही परिपूर्ण, मराठमोळी, चविष्ट पुरणा-वरणाची थाळी आपण नक्कीच जपायला आणि पुढच्या पिढीपर्यंत पोचवायला हवी..:)
सांज
www.chaafa.com
मुळ लेख खुप आवडला. पुण्यात
मुळ लेख खुप आवडला. पुण्यात एका घरी मी खाल्लेली अफलातून पुरणपोळी आठवली. ते घर नक्की देशस्थांचे असणार. ती पुरणपोळी खाल्ल्यावर ऊमजले की मी आजवर पुपो म्हणुन जे खाल्ले होते ते पुरण भरलेले पराठे होते. गौरीच्या भरपेट जेवणानंतरच्या शिळोप्याच्या गप्पांतून मला कळले की त्या पोळ्या व इतर पदार्थ यजमानीन बाईंच्या मोठ्या दिरांनी बनवले होते. हे कौतुक नव्हते तर गप्पांच्या ओघात बोलले गेले होते. ते कुठल्याशा मठाशाी का संस्थेशी संलग्न होते पण सणावारी घरी येऊन सगळी कामे करत. अजुन बर्याच गोष्टी ऐकल्या गेल्या. सुरेख जेवणासोबत भरपुर द्न्यानबोधही झाला. मी निघतांना त्यांच्या पाया पडले.
बाकी इतर ज्यांच्याघरी हे सगळे करवुन घेतले जाते त्यांना दुरून नमस्कार.
इतर चर्चा नेहमीची असली तरी मला ती होणे गरजेचे वाटते... आपले विचार परत परत तपासता येतात, चुकीचे सुधारता येते. ही हळुहळू होणारी गोष्ट आहे. आज वाचले आणि लगेच बदलले असे होत नाही.
मात्र एक गोष्ट अजुनही कळत नाही. बाईच्या गळ्यात दमवणारे घरकाम लादले गेले आणि सणवार तसेच डिझाईन होत गेले हे मान्य. पण आज स्वातंत्र्य कमावलेली एखादी बाई ‘मला चारी ठाव सैपाक करायला व घरच्याना वाढायला आवडतो‘ म्हणाली तर ते रीग्रेसीव कसे? ती असे करते म्हणुन इतर बायांवर ते करण्याचे प्रेशर येते/घातले जाते म्हणुन तिने मन मारायचे?
बायांनी घरच व बाब्यांनी बाहेरचेच सांभाळा अशी विभागणी मोडुन ज्याला जे जास्त चांगले जमते ते सांभाळा असे व्हायला हवे. ते होताना बाईने घर निवडले तर ती रीग्रेसीव हे कसे? पुरूषांनी बाहेरचे निवडले तर ते रिग्रेसिव नाही मग बाईवरच
अन्याय व तो आजही असे का? घराबाहेर पडुनू नाव कमावणे हीच मानव जन्माची सार्थकता हे कोणी ठरवले माहीतनाही पण ते सगळ्यानी लादुन घ्यायचे आणि याला स्वातंत्र्य म्हणायचे हे मला पटत नाही.
साधना जियो
साधना जियो
रिग्रेसिव्ह बद्दल बर्याच
- पुरूषांनी बाहेरचे निवडले तर ते रिग्रेसिव नाही असे नाही. पुरूषांनी फक्त बाहेरचे काम निवडले तर ते ही रिग्रेसिव्ह कारण जेव्हा विज्ञानाची जोड नव्हती तेव्हा पुरूष बाहेरचे काम व स्त्री घरातले/गुहेतले सांभाळणार अशी विभागणी होती. तिच विभागणी आज विज्ञान जोडीला असताना चालू ठेवायची म्हणजे कालचक्र थोडेफार उलट जात आहे किंवा स्टॅटस क्वो सांभाळतोय.
- बाईने घर निवडले ह्यात खरंच तिची "निवड" किती नि मजबूरी किती हे तपासून बघायची वेळ आहे. भारतात महिला साक्षरतेत व पुरूष साक्षरतेत १६% गॅप आहे. ह्या पेक्षा जास्त गॅप आफ्रिकी देशात आहे, इतर प्रगतीशील देशांपेक्षा आपण मागास आहोत. आरक्षण इ असूनही फक्त २१% स्त्रिया पगारी काम करतात. जेव्हा एवढ्या मोठ्या प्रमाणावर संख्येत तफावत येते तेव्हा एक एक पांडा जसा वाचवतो तशी एक एक नोकरी करणारी बाई नोकरीत टिकवणे बरे पडेल. कशासाठी विचाराल तर विविध निर्णयात सहभाग मिळण्यासाठी. (उदा: तिहार जेल मध्ये अनेक अधिकारी होते, किरण बेदी यांनी वेगळा अप्रोच आणला. हे प्रत्येक पातळीवर घडले पाहिजे.). तिला निवड करायचे "स्वातंत्र्य" घरात आहे नाही पेक्षा समाजात तिला नोकरी/अर्थार्जन किती शक्य आहे ह्याची चर्चा करण्याची वेळ आहे किंवा बदल घडवायची वेळ आहे. प्रत्येक बाईला तिच्या परिस्थितीसकट नोकरी करता येईल अशी परिस्थिती निर्माण झाली तर ती काय निवडते ह्याला महत्त्व येईल. सध्या "मजबूरी का नाम... " आहे का ह्याचे प्रामाणिक परिक्षण व्हावे एवढंच सुचवायचे आहे.
- घराबाहेर पडून अर्थार्जन करणे ह्यात जन्माची सार्थकता असे कुणीच म्हणत नाही. पण आपले 'वेल-बिईंग' किंवा हितकर आयुष्य हे अध्यात्मिक, शारिरीक, मानसिक, आर्थिक, बौद्धिक, सामाजिक, व पर्यावरण अशा ७ घटकांवर अवलंबून असते. नोकरी किंवा अर्थार्जन करण्याने बरेच वेळा केवळ आर्थिकच नव्हे तर बौद्धिक, सामाजिक, मानसिक अशा इतर डोमेन्सही सांभाळल्या जातात. हे स्त्री-पुरूष दोघांना लागू आहे. एखाद्या बाईला शारिरीक बळ नसेल तर तिला फिजिकल थेरपी इ साठी २ तास घरातून मुभा मिळेल का? हो, बर्याच घरात मिळेल. मग दोन तास आर्थिक बळ येण्यासाठी दिले तर काय हरकत आहे??
पण आपण जे वाचतो ऐकतो त्यातून
पण आपण जे वाचतो ऐकतो त्यातून कॉन्शस/सबकॉन्शस लर्निंग होतंच.>>>>सहमत.>>>मी पण सहमत. मी तर खुपच माबोवर अवलंबून असते. जरी मी इथे लिहीत नसले, फार व्यक्त होत नसले तरी इकडचे विचार ,पध्दती मला खुप मॅटर करतात. बोलण्यात माझ्या फार वेळा माबो येत असल्याने घरचे चिडवतात पण "आलं हिचं मायबोली"
साधना अगदी पटलं तुझं
नोकरी किंवा अर्थार्जन
नोकरी किंवा अर्थार्जन करण्याने बरेच वेळा केवळ आर्थिकच नव्हे तर बौद्धिक, सामाजिक, मानसिक अशा इतर डोमेन्सही सांभाळल्या जातात. >>>>अगदी
सी,पूर्ण प्रतिसादच छान.
मूळ लेख बरा चुरचुरीत चटपटीत
मूळ लेख बरा चुरचुरीत चटपटीत आहे. घाट घालण्याचं समर्थन वगैरे नाही आहे पण थोडी स्मरणविव्हलता जाणवली. देशस्थ कोंकणस्थांच्या निर्विष कोपरखळ्या नेहमीच गंमतीच्या वाटतात. अगदी फर्गसन किंवा डेक्कनच्या विद्यार्थ्यांमधल्या आणि आ. अत्रे यांनी त्यांच्या आत्मचरित्रातून फेमस केलेल्या "स्वस्तात स्वस्त आणि अस्ताव्यस्त" टोमणेबाजीपासून ते आजच्या सुधारित विनोदांपर्यंत. [ह्यात बिचारे कऱ्हाडे, देवरुखे कधीच दिसत नाहीत. नाही म्हणायला शेजवलकरांनी त्यांच्या पुस्तकांतून पेशव्यांचे " चारित्र्यहनन" (!) केल्याची कुजबूज गाजली होती एके काळी.]
तर अशा सुंदर लेखाला जरा अधिकच चुरचुरीत आणि खमंग
प्रतिसादांमुळे थोडी झणझणीत चव आली तेही बरेच झाले. गोडाच्या जेवणात तिखट ठेचा किंवा खरडा (लसूण विरहित) असला की दोन किंवा कितीही घास अधिकच जातात.
लेख आणि प्रतिसादांचा फुलोरा मस्तच आहे.
सी, +११
सी, +११
एक निरीक्षण आहे. ज्यांना या
एक निरीक्षण आहे. ज्यांना या लेखावरच्या स्त्रियांना स्वयंपाकघराशी बांधणे अयोग्य या वा तत्सम अर्थाच्या प्रतिक्रिया खटक्ल्या. त्यांच्या लेखनातून या आधी स्वयंपाकघराला स्त्रियांशीच जोडण्याचे प्रकार दिसले आहेत. पुरुषांच्या 'मदती'बद्दल सहजतेने लिहिले नाही.
सांज यांच्या याच धाग्यावरील प्रतिसादातले या अर्थाचे वाक्य हायलाइट केले गेले आहे.
अवल यांचा एक जुना धागा आहे. स्वयंपाकाचे व्यवस्थापन . त्यातही पुरुष मदत करत असतील तर फुटकळ कामे त्यांना सांगितली आहेत.
तुमच्याच डोक्यात स्त्री आणि स्वयंपाकघर हे समीकरण फिट आहे का ?
इथे स्वयंपाक आवडीने करून तसे सांगणार्यांना कोणी रिग्रेसिव्ह म्हटलेले दिसले नाही. पण स्वयंपाक आणि स्त्रीला एकमेकांशी बांधणारा स्टिरियोटाइप खूप जुना आहे. लोक आज तो मोडण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा लेखनाने तो रिइन्फोर्स होतो. जुन्याच कंडिशनिंगला पूरक ठरतो.
आपण आवडीने स्वयंपाक करतो हे लिहितानाही लिंगनिरपेक्ष भूमिका ठेवता येईल का? बदल होतोय म्हणताय तर वरच्या लेखातला पुरुषांचा सहभाग पैजा लावून खाण्यापुरताच का आहे? पुरुषांची 'मदत' मिळाली तर घ्या असं का?
एक्झाक्टली भरत.
एक्झाक्टली भरत.
अपेक्षित
अपेक्षित
पण स्वयंपाक आणि स्त्रीला
पण स्वयंपाक आणि स्त्रीला एकमेकांशी बांधणारा स्टिरियोटाइप खूप जुना आहे. लोक आज तो मोडण्याचा प्रयत्न करत आहेत.
>>>>
कोण लोकं मोडायचा प्रयत्न करत आहेत?
या मोडायच्या प्रयत्नात ज्या बाईला स्वयंपाकाची आवड आहे तिलाही ही लोकं का उगाच खेचून स्वयंपाकघरातून बाहेर काढत आहात?
स्वयंपाकघर म्हणजे बाईसाठी तुरुंगच या मानसिकतेतून बाहेर येण्याची प्रचंड गरज आहे. स्पेशली या स्त्री-पुरुष समानतेच्या बदलाच्या काळात याचे भान ठेवणे गरजेचे आहे.
माझाच एक किस्सा सांगतो, बायकोला केक बनवायची आवड आहे. त्याचे फोटो मी स्टेट्सला टाकत राहतो. ते बघून नात्यातली एक बाई सारखी मला मेसेज टाकत राहते की काय हे, वहिनींना किती कामाला लावाल?
मी फक्त एक स्माईली टाकतो. अश्या लोकांना समजवण्यात काही अर्थ नाही.
मित्र, नातेवाईक, आधी रहात
मित्र, नातेवाईक, आधी रहात होतो ती सोसायटी, आता राहतो ती सोसायटी, माझ्या बरोबरीची पिढी, नंतरची पिढी यात स्त्री नोकरी करणारी असूनही काही हौशी म्हणून केव्हातरी पदार्थ बनवणारे, स्त्री आजारी असेल तेव्हा जमेल तसा स्वयंपाक करणारे वगळता जबाबदारी म्हणुन स्वयंपाकघर सांभाळणारे अथवा ते काम जबाबदारीने विभागून घेणारे पुरुष हातावर नव्हे तर एका बोटावर मोजण्या एवढेच सापडतील. बाकी सर्व घरातील ( जवळपास ९५% ) स्त्रियांनी आवडीने व निवडीने ती जबाबदारी उचलली हा विलक्षण योगायोग म्हणावा लागेल.
तसेच, हे ९५ % घरात पाहून अजूनही स्वयंपाकघर म्हणजे स्त्रीचीच जबाबदारी हे समाजात मानल्या जातेय असा भयंकर एककल्ली व चुकीचा निष्कर्ष मी काढत आहे.
या मोडायच्या प्रयत्नात ज्या
या मोडायच्या प्रयत्नात ज्या बाईला स्वयंपाकाची आवड आहे तिलाही ही लोकं का उगाच खेचून स्वयंपाकघरातून बाहेर काढत आहात?>>>
हे जरा जास्तच exaggeration नाहीये का... इथे वाचून or in general च आवडीने स्वैपाक करणाऱ्या स्त्रिया regressive असं कोण categorise करायला चाललंय or आजपासून तू स्वैपाक करायचा नाहीस मी करीन or बाई लावू असा म्हणणारे..की नावडीने करणाऱ्यांना हाताला धरून खेचणारे बाहेर... कै च्या काय...
कंडिशनिंग , सुपर वुमन
कंडिशनिंग , सुपर वुमन सिंड्रोम, लोक काय म्हणतील? आमच्या ह्यांना साधा चहा सुद्धा करता येत नाही म्हणताना उगाचच सुखावणारा स्वतःचा इगो अशा अनेक गोष्टी असतात.
सर्व्हेमध्ये ही तुमची आवड आहे का असा स्पेसिफिक प्रश्न विचारला का? तुमचा जोडीदार स्वैपाकघरात तुमच्याइतकीच किंवा जास्त जबाबदारी उचलू शकतो ही माहिती त्यांना निवड करताना दिली गेली होती का?
सणावाराचं जेवणाचा घाट फक्त सासरीच असतो, माहेरी नसतो असाही एक निष्कर्ष तुम्ही काढला होता
भरत, वरची पोस्ट आणि सासर
भरत, वरची पोस्ट आणि सासर-माहेर दोन्ही उपहासात्मक लिहिलंय. (अर्थात माहितीतल्या ~ ९५% घरात स्त्री वर एक हाती स्वयंपाकघर संभाळायची जबाबदारी आहे हे खरे आहे.)
तुम्ही वर लिहिलेल्या मुद्यांव्यतिरिक आवड असणे आणि ती गोष्ट आयुष्यभर जबाबदारी म्हणुन करणे यात खूप फरक आहे. शिवाय अनेकदा पर्याय हे समोरच्या व्यक्तीने काय स्वीकारले पाहिजे या खुबीनेही दिले जातात.
ओह! बरं.
ओह! बरं.
आज नागपंचमी!
आज नागपंचमी!
दणकावून पुरणपोळी खाल्ली. सासरेबुवांनी पुरणपोळीवर तुपासोबत लिंबू पिळण्याची कल्पना सुचवली. त्यामुळे ती सुपाच्य तर होतेच पण आंबटगोड चव जर अशी भन्नाट लागली म्हणून सांगू.. आधी काहीही! वाटलं पण चव पाहिल्यावर आहाहा!! झालं
सासूबाईंनी गरमागरम पुरणपोळ्या आग्रह करून खाऊ घातल्या.. आणि मग त्या जेवायला बसल्यावर मीही त्यांना त्यांच्याइतक्या लुसलुशीत नसल्या तरी गरमागरम पुरणपोळ्या करून वाढल्या.. मला अजिबात सोवळं कळत नाही असं जरी त्यांचं मत असलं (ज्याने मला फरक पडत नाही ;)) तरी, पोळ्या कशा का असेनात पण आपली सून आपल्याला गरम-गरम करून वाढतेय याचं त्यांना कौतुक जरूर वाटलं..
(तसा त्यांचा आग्रह अजिबात नव्हता.. सो माझ्यावर पुरणपोळी करणं कोणीही लादलं वगैरे नाही! चांगली पुरणपोळी करता येणं ही मला वाटतं एक कला आहे, जी माझ्या आईला, आजीला, सासूबाईंना अवगत आहे. आणि त्यांनी ती जरूर मिरवावी असंही वाटतं. मला पुरणपोळी प्रचंड आवडते सो स्वत:च्या जीभेचे चोचले पुरवण्यासाठी ती कला अवगत असणं मला तरी गरजेचं वाटतं सो मी शिकुन घ्यायला मागे-पुढे पाहत नाही.. अधून-मधुन ती करून पहायला खूप आवडेल. हे अधुन-मधुन एखाद्या सणादिवशी जमवून आणण्यातही काही गैर वाटत नाही. माझं ज्यांच्यावर प्रेम आहे त्या माझ्या घरच्यांना त्यातून समाधान मिळणार असेल तर त्यात काही कमीपणाचं आहे किंवा माझ्या स्त्री स्वातंत्र्यावर त्याने गदा येते असंही मला वाटत नाही!)
सर्वांना नागपंचमीच्या पुरणभर शुभेच्छा

हे जरा जास्तच exaggeration
हे जरा जास्तच exaggeration नाहीये का... इथे वाचून or in general च आवडीने स्वैपाक करणाऱ्या स्त्रिया regressive असं कोण categorise करायला चाललंय or आजपासून तू स्वैपाक करायचा नाहीस मी करीन or बाई लावू असा म्हणणारे..की नावडीने करणाऱ्यांना हाताला धरून खेचणारे बाहेर... कै च्या काय...
>>>>
ईथे वाचून एक बाजू होऊ शकते त्याच्या दुसरी बाजू होऊ शकत नाही हे भारी आहे
मस्त लेख. नॉस्टॅल्जिक केलेत.
मस्त लेख. नॉस्टॅल्जिक केलेत.
मला फार हौस आहे ह्या सगळ्याची. सणावाराचं वातावरण मला फार नॉस्टॅल्जिक बनवतं. ह्यात देवाधर्माचं करण्यावर माझा विश्वास नाही, पण ती गडबड, माणसं, उत्तम जेवण हे सगळं फार फार आवडतंच. आजकाल ऑफिस च्या धबडग्यात एखादा सण रविवारी आला तरच केला जातो. बाकी सणावारांना काट मिळते. त्यातूनही सोवळं पण आम्ही बुडवलेलंच आहे. त्यामुळे सोवळं, नैवेद्य ह्यातल्या कुठल्याच प्रकाराचं लोड न घेता माणसांना जेवायला बोलवून साग्र-संगीत करायला आवडतंच मला.
आमच्याकडे सासूबाईंचा कुठल्याही प्रकारचा आग्रह नसतो. कधी इनिशिएटिव्ह पण नसतंच. मोदक, गूळपोळी, नारळीभात, दिवाळी फराळ ह्यातले कोणतेही पदार्थ त्या-त्या सणाला व्हावेत ही घरात माझीच हौस असते. त्यामुळे मला एकटीलाच ओढून न्यावी लागते. मी नाही केलं, तरी चालतंच त्यामुळे. मी माझ्या सवडीने, सुट्टी असेल तर करते अन्यथा नाही.
ह्यात इतका वाद का व्हावा हेच कळत नाहीये मला!!
>>मला अजिबात सोवळं कळत नाही
>>मला अजिबात सोवळं कळत नाही असं जरी त्यांचं मत असलं (ज्याने मला फरक पडत नाही ;))
सोवळ्या बद्दल "मला फरक पडत" नाही हा सुर खटकला. आपल्या पुर्वजांनी काही योग्य कारणांसाठीच नियम बनवले असतील ना.
पुर्वजांच्या सांगण्यानुसार अंगावरच्या मळापासुन बनलेला, माणसाच्या जागी हत्तीचं तोंड असलेला आणि तरीही उंदरावरुन फिरणारा देव मानतो ना आपण? मग सोवळ्याच्या नियमांना (आणि मासिक पाळीशी संबंधित नियमांना) का शिरोधार्य मानायचं नाही?
मला वाटतं आज या ठिकाणी या
मला वाटतं आज या ठिकाणी या व्यासपीठावरून ज्या एका महत्वाच्या विषयाला वाचा फोडण्यात आली आहे त्याचं या ठिकाणावरून या व्यासपीठावर मला कौतुक वाटतं. घरात वडीलधार्या मंडळींसमोर हूं की चू करायची डेरिंग नसलेल्या अनेक महिलांना आज या निमित्ताने या ठिकाणाहून इंटरनेटवरच्या कुणा लेखिकेवर फ्रस्टेशन काढायला मिळाले ही निश्चितच उल्हासकारक आणि आनंददायक गोष्ट आहे. तसेच काही पुरुषांना या निमित्ताने आपल्या लिबरल क्रेडेन्शियल्स वर फडका मारून चकचकीत करायची संधी मिळाल्याबद्दल आज या व्यासपीठावरून मी या ठिकाणी आभार मानतो. सणासुदीच्या दिवशी काही च्यालेंजिंग गोडधोडाचे प्रॉजेक्ट्स हाती घेऊन ते यशस्वी करून आपल्या घरातल्या पोराबाळांना ते खाताना पाहण्यात आनंद मानणार्या रिग्रेसिव्ह ॲटिट्टूड चा निषेध व्हायलाच हवा. त्या कुठल्याशा मल्लू सिनेमावरून या ठिकाणी या व्यासपीठावरून बरंच दळण दळण्यात आलं होतं परंतु त्या वेळी पडलेले सर्व पीठ चपात्यारोट्याकेक मध्ये संपून गेल्याने आज या ठिकाणी पुन्हा नवे दळण दळण्याची संधी उपस्थितांना दिल्याबद्दल संबंधितांचे या व्यासपीठावरून आभार मानत आहे. पूर्वीच्या काळी ऑनलाईन दळण दळण्याची सोय नसल्याने वेळ जाण्यासाठी बायका एकत्र जमून खरोखरची दळणे दळण्याचा व्याप घालत त्यातून रिग्रेसिव्ह प्रथा जन्माला आल्या. आता दळणे दळण्याची मोठीच सोय इंटरनेटवर उपलब्ध झाल्याने नवनवीन धाग्यांच्या गरमागरम ऑनलाईन पुरणपोळ्या खायला मिळणे ही उदाहरणार्थ स्वागतार्ह गोष्ट आहे याबद्दल या ठिकाणी माननीय श्री. बिल गेट्स, श्री. झुकरबर्ग, श्री. ॲडमिन आणि श्री. ऋन्मेष यांचे आभार मानत आहे. या ठिकाणी मला एकच वैगुण्य जाणवतं ते म्हणजे अजूनपर्यंत हिंदुत्व, संघोटे, अनाजीपंतुंचे वंशज इथपर्यंत या चर्चेचा प्रवास होऊ शकला नाही. संबंधितांनी हे वैगुण्य लवकरच दूर करून चर्चा सुफळ संपूर्ण करावी ही या ठिकाणी विनंती करून मी या व्यासपीठावरून उतरतो.
गंमत आहे सगळी. कुणीच
गंमत आहे सगळी. कुणीच पुरणाच्या स्वयपाकाला, हौसेला अन मुलाबाळांना किंवा अन्य कुणाला प्रेमाने कौतुकाने खाऊ घालण्याला नावे ठेवलेली नाहीत. रीग्रेसिव म्हटलेले नाही. आक्षेप फक्त सोवळ्याच्या नावाखाली एकट्या/फक्त बाईने राबण्याला होता आणि आहे. मग "आवडीने करणार्यांना स्वयपाकघराच्या बाहेर का ओढता" "विरोधासाठी विरोध" "स्त्रीस्वातंत्र्याच्या नावाखाली..." "लेखिकेला झोडपले" " स्वयपाक करणे रीग्रेसिव कसे" असली स्ट्रॉमॅन अर्ग्युमेन्ट करून काय होणार? की मुद्दा समजलेलाच नाहीये अजून?

maitreyee, खरेच आहे. न
maitreyee, खरेच आहे. न लिहिलेले शब्द अनेकांच्या तोंडी कोंबण्यात आले आहेत.
की मुद्दा समजलेलाच नाहीये
की मुद्दा समजलेलाच नाहीये अजून?
>>>
जर या लेखावर कुळाचार आणि प्रथांचे उदात्तीकरणाचा आरोप केला गेला आहे तर केला गेला आहे. असे लेख लिहून डॉक्युमेंटेशन करण्याला विरोधही केला गेला आहे मागच्या प्रतिसादांत. मग आता का ते नाकारायचे?
म्हणजे तुम्ही आपल्या घरी स्वयंपाक करा, पण त्याचे कौतुकाने लेख पाडू नका असे आहे का?
पुर्वजांच्या सांगण्यानुसार
पुर्वजांच्या सांगण्यानुसार अंगावरच्या मळापासुन बनलेला, माणसाच्या जागी हत्तीचं तोंड असलेला आणि तरीही उंदरावरुन फिरणारा देव मानतो ना आपण? मग सोवळ्याच्या नियमांना (आणि मासिक पाळीशी संबंधित नियमांना) का शिरोधार्य मानायचं नाही?>>>
हा धागा १८ व्या शतकात चालला आता.. कळावे लोभ असावा.. अलविदा..
हा धागा १८ व्या शतकात चालला
हा धागा १८ व्या शतकात चालला आता.. >> देश गेलेला चालतो, पण धागा नाही?
>>कुणीच पुरणाच्या स्वयपाकाला,
>>कुणीच पुरणाच्या स्वयपाकाला, हौसेला अन मुलाबाळांना किंवा अन्य कुणाला प्रेमाने कौतुकाने खाऊ घालण्याला नावे ठेवलेली नाहीत. रीग्रेसिव म्हटलेले नाही. आक्षेप फक्त सोवळ्याच्या नावाखाली एकट्या/फक्त बाईने राबण्याला होता आणि आहे. <<
तसं नाहि ते. एकट्या बाईला साग्रसंगीत स्वैपाक करता येणं हि असुयेची बाब ठरु शकते. नवर्यांच्या बाबतीतलं उदाहरण देतो. मला यार्डवर्कचा प्रचंड कंटाळा. एचओएची नोटिस आल्यावर मी बाक्स्वुड ट्रीम करायला घेतो. याउलट माझा (हलकट) शेजारी दर पंधरा दिवसांनी मेनिक्युर्/पेडिक्युर करावं तसं यार्ड मेंटेन करतो. हे सगळं पाहुन, वीकेंडला गॉल्फ खेळण्याऐवजी यार्ड मेंटेन करणं, हे मला तरी एन्वियस्ली रिग्रेसिव वाटतं...
एकट्या बाईला साग्रसंगीत
एकट्या बाईला साग्रसंगीत स्वैपाक करता येणं हि असुयेची बाब ठरु शकते.
>>>>
ॲक्चुअली हा पॉईण्ट वॅलिड आहे. असे सुद्धा होऊ शकते. हुमायुन नेचरचा भाग आहे हा..
मुद्दाच कळत नसला तर मग काहीही
मुद्दाच कळत नसला तर मग काहीही आणि कसेही फाटे फुटू शकतात.
बाकीच्यांना असूया असते की
बाकीच्यांना असूया असते की नसते ते माहिती नाही; पण "असूया असते गं" म्हणल्यावर ती मायेने, कौतुकाने दोन पोळ्या अधिक वाढते हे नक्की
#बिनदेयरडनदॅट
Pages