श्रावण आणि पुरण!

Submitted by सांज on 10 August, 2021 - 00:31

श्रावण मासी हर्ष मानसी..’ वगैरे सगळं लिहण्या-वाचण्या पुरतं ठीक आहे. पण आता कोणी मान्य करो अथवा न करो, श्रावणाची एंट्री ही समस्त महिला वर्गाच्या मनात धडकी भरवणारीच असते. आणि अशा दहशतीमागचा कर्ता-सवरता असतो तो ‘पुरणाचा स्वयंपाक’! श्रावण महिना म्हटलं की सणावारांची गडबड हे तर ठरलेलच असतं.. श्रावणातले शुक्रवार, नागपंचमी, श्रावणी सोमवार, राखी पौर्णिमा, गोकुळाष्टमी, पोळा.. इ.इ. आणि ही तर फक्त सुरुवात.. पुढचा भाद्रपद तर याहून अधिक डेंजर असतो. आणि यापैकी बहुतांश वेळेला करावा लागतो तो हा पुरणाचा स्वयंपाक! याला आपण स्वयंपाकातला ‘ड’ गट म्हणू शकतो. बरं, पुरणाचा स्वयंपाक म्हणजे केवळ पुरणपोळी असं समजणार्‍यांना आत्ताच सांगते, तुम्ही घोर अज्ञानात जगत आहात. यूपीएससी चा सिलॅबस जसा व्हास्ट असतो नं तसाच या पुराणा-वरणाच्या स्वयंपाकाचा सिलॅबस पण भल्या-भल्यांना घाम फुटायला भाग पाडतो. एखाद-दुसरी चटणी, कालवलेलं मेतकूट, पंचामृत, कोशिंबीर, एक फोडभाजी, एक पालेभाजी, तळलेले पापड, भजी, कुरवड्या, कटाची आमटी, कढी, साधं वरण, सुधारस, लिंबाची फोड इ.इ. सुग्रास दागिन्यांनी वर्तुळाकार ताट सजलं की मधोमध येऊन विराजते ती लुसलुशीत पुरणपोळी! आणि याला म्हणतात ‘पुरणाचा स्वयंपाक!’ आणि हा जिला जमतो ती असते खरी सुगरण!

असा हा पुरणाचा स्वयंपाक श्रावणात, चार शुक्रवार, नागपंचमी, पोळा इ धरून किमान 5-6 वेळा तरी होतोच होतो. म्हणजे किमान मराठवाड्यात तरी असं चित्र आहे. मोठ्या शहरांनी आता यातलं फारसं काही उरलेलं नाही.. बहुतांश ठिकाणी तो आऊट ऑफ सिलबस होण्याच्या मार्गावर आहे. पण मराठवाड्यात तरी अजून तसं नाही. आला सण की शिजवा पूरण ही पॉलिसी अजून तरी इथे अस्तित्वात आहे. मराठवड्यातल्या देवांना पुरणाशिवाय दूसरा नैवेद्य चालतच नाही यावर आता माझा ठाम विश्वास बसलेला आहे. पण त्यामुळे मला वाटतं सणांची authenticity अनुभवता येते. साध्या श्रीखंड, खीर वगैरे क्षुद्र पदार्थांवर इथे सणांची बोळवण अजिबात होत नाही. आणि असा चारी-ठाव स्वयंपाक करणार्‍या निष्णात बायका इथे घरोघरी सापडतात. म्हणजे अर्थातच मी आधीच्या पिढी विषयी बोलतेय. माझ्यासारखा तरुण वर्ग अजून तरी ट्रेनिंग फेज मध्येच आहे. एकवेळ नुसती पुरणपोळी वगैरे करणं जमू शकतं, पण समग्र ‘पुरणाचा स्वयंपाक’ अतिशय कुशलतेने करून, म्हणजे एकीकडे तर्हे-तर्‍हेच्या फोडण्या देत दुसरीकडे योग्य consistency मध्ये पूरण वाटणं (हो, consistency फार महत्वाची असते.. पोळ्यांची कणीक आणि पूरण ह्यांची consistency सारखी असली तरच पुरण सगळीकडे सम-प्रमाणात पसरून सुंदर पोळी तयार होते) किंवा एकीकडे भजी तळत दुसरीकडे लुसलुशीत पोळ्या लाटणं आणि वर प्रसन्न मुद्रेने सगळ्यांना आग्रह करत जेवायला वाढण यासाठी नेक्स्ट लेव्हल ची स्किल्स असावी लागतात. हे साक्षात अन्नपूर्णेचच काम आहे॰

बरं या अशा सगळ्या प्रकारच्या चवी आणि रंगांनी संपन्न अशा आर्टिस्टिक स्वयंपाकाचा आवडीने आस्वाद घेणार्‍या मंडळींचीही इकडे वानवा नाही. बसल्या बैठकीला 3-4 मध्यम आकाराच्या, तुपात थबथबलेल्या पुरणपोळया, सोबतचे सगळे पदार्थ तोंडी लावत, घासागणिक अन्नपूर्णेच कौतुक करत खाणे आणि वर कटाची आमटी पैज लावून ओरपणे यालाही स्किल्सच असावी लागतात. माझ्या लहानपणी सणावारांना एकावेळी 15-20 माणसांची पंगत बसलेली आणि पैजा लागलेल्या मी पाहिल्या आहेत. एक-दोघी जणी वाढायला उभ्या आणि आई किंवा आजी सर-सर गोल गरगरीत पोळ्या लाटत बसलेल्या आणि आम्ही सगळे मस्त चेष्टा-मस्करीसह जेवतोय हे मनावर कायमचं कोरलं गेलेलं चित्र आहे. या बायका हे सगळं तेव्हा कसं पेलायच्या याचं आता नवल वाटतं.

महालक्ष्म्यांचा (म्हणजे गौरीचा, मराठवाड्यात महालक्ष्मी म्हणतात) स्वयंपाक तर अतिशय क्लिष्ट! वर उल्लेखलेले सगळे पदार्थ प्लस सोळा प्रकारच्या भाज्यांचा compulsory वापर, साखरभात, मसालेभात, साधा भात, सोवळयातल वळवट, त्याची खीर, उडीदाचे पापड इ.इ.इ.

बहुतेक वेळा बायकांचा दिवस जातो यात.

सध्याच्या वेगवान जगात जिथे बायका-मुली बाहेर पडून इतरही कामं करतायत तिथे आता हे सगळं जमवण थोडसं कठीणच आहे. पण वर्षातून एकदातरी हा असा सुग्रास स्वयंपाकाचा घाट घालून तो चाखण्याचा आनंद सगळ्यांनी अनुभवायलाच हवा असं वाटतं. बाहेर तर्हे-तर्हेच्या थाळ्यांचा आस्वाद घेत असताना आपली ही परिपूर्ण, मराठमोळी, चविष्ट पुरणा-वरणाची थाळी आपण नक्कीच जपायला आणि पुढच्या पिढीपर्यंत पोचवायला हवी..:)

सांज
www.chaafa.com

Group content visibility: 
Public - accessible to all site users

असूया असू शकते.
तसेच 'हे सगळं असूये पोटी चाललंय बरं' हे करून घेतलेलं समाधानही असू शकतं.
हा सुद्धा मानवी स्वभाव आहे.

राज, तुम्हांला आंघोळ करून , धूत वस्त्र नेसून उपास करून यार्ड मेन्टेन करायला लागतो का? नाही ना? मग हे रिग्रेसिव नाही!

'हे सगळं असूये पोटी चाललंय बरं
>>>>

कमॉन,
"सगळं" हा शब्द त्यात टाकून वेगळेच वळण देऊ नका.

ही अनेक शक्यतांपैकी एक शक्यता आहे जी काही केसेसमध्ये लागू होऊ शकते.

अजून एक उदाहरण देतो,
ऑफिसमध्ये चार टाळकी जी उशीरापर्यंत थांबून काम करतात त्यांच्यामुळे वर्क कल्चर बिघडते आणि आमच्याकडूनही थांबायची अपेक्षा केली जाते असा एक ओरडा असतो.

यात बरेचदा असेही असूच शकते की उशीरापर्यंत थांबणाऱ्यांना खरेच कामाची आवड असू शकते. ते त्यांचे पॅशन असू शकते. आणि ते यामुळे बॉसचे लाडके असणे आणि त्यांना प्रमोशन मिळणे हि असूया काही ओरडा करणाऱ्यांच्या मनी असू शकतेच.

असूया हा मानवी स्वभाव आहे. मी कधीच या भावनेला हिन लेखत नाही. मनात असूया येणे ईट्स ॲबसोल्यूटली फाईन.

की ईथे सगळ्यांना एकच कारण एकच शक्यता हवी आहे. केसवाईज मल्टीपल शक्यता असू शकतात हे आपल्याला मान्यच करायचे नाहीये. राज यांनी एक मुद्दा मांडला मला ती शक्यताही पटली. मी अनुमोदन दिले. त्याला लगेच सगळ असूयेपोटीच असते का वगैरे जोडायची काहीच गरज नाही.

हो हो, मी ही अनुमोदनच दिले. जी कुणी खपते, करते तिला जरा बरं वाटल्याशी कारण. म्हणजे आपला पुरणपोळ्यांचा ओघ कसा व्यवस्थित राहतो, नाही? आपण तिला म्हणायचं 'हे रिग्रेसिव्ह आहे' आणि ती तिच्या मजबूरीचा राग/स्वतःच्याच आवडीचा संताप आपल्यावर काढायची. मग आपल्याला खपून पुरणपोळी करणं आलं. त्यापेक्षा धोरणाने रहावं. "इतरांना असूया आहे", "तू म्हणून करतेस हो, दुसरी असती तर केव्हाच पळून गेली असती", "इतकी खपतेस" इ इ हळव्या हळव्या गोड गोष्टी बोलत राहायचं. सगळेच सुखात अशाने!!!

भाक्र्या बडवायचि जेलसी’ माय फुट!
>>>>

व्यक्ती तितक्या प्रकृती !
आमच्या ऑफिसमध्ये मी लंचला एकटाच पुरुष सहा सात बायकांमध्ये बसतो. त्यामुळे टिपिकल लेडीज टॉल्क अनुभवायला मिळतो जो मिक्स ग्रूपमध्ये तितका होत नाही. त्या अनुभवावरून हे सांगू शकतो की आमच्या ग्रूपमध्ये जिला जेवण सर्वात उत्तम जमते तिच्याबद्दल उरलेल्या बायकांमध्ये एक असूया आहेच. भले त्या सर्वच ऑफिस कामात हुशार ईंजिनीअर आर्किटेक्ट बायका आहेत. तरी जेवण त्यातही नॉनवेज उत्तम जमणारी ती नेहमी भाव खाऊन जातेच.

सगळं चा काय अर्थ तू काढलास माहिती नाही.
एखाद्या केस वरच ऑब्जेक्शन घेतलं आणि त्यातून अजून दोन तीन मुद्दे निघाले की त्याला "हे सगळं असूये पोटी बरं का" असं म्हणणारे लोक ही असतात. आणि तो ही मानवी स्वभावच आहे. हेच वर मी नमूद केलंय.
असूया असू शकते, तसेच हे ही असू शकते. मी दोन्ही शक्यता मांडल्या.

सामो, ‘भाक्र्या बडवणं!’ Is not a bad thing.. it is also a great cuisine and needs proper skills!
You don’t like it, that’s okay!
You don’t want to ‘बडव भाक्र्या’, that’s also completely fine!
But this doesn’t mean, that you should treat it like some minuscule thing that shouldn’t even gather anyone’s attention Happy

एक अजून विचार
भाकऱ्या बडवणे वा पुरणपोळ्या बनवायला खपणे असे म्हणत आपण या कामाचे अवमूल्यन केल्यामुळे पुरुषप्रधान संस्कृतीतील पुरुष हे काम टाळायला बघतो.
तेच व्यवसाय म्हणून हॉटेलात पुरुष मंडळीच तंदूर रोट्या बनवतात. एखादा संजीव कपूरही स्वयंपाक करण्यात खपूनच स्टार होतो.
त्यामुळे पुरुषांनीही स्वयंपाकघरात शिरायला हवे असे वाटत असेल तर त्यांना लहानपणापासून स्वयंपाक शिकवणे पुरेसे नाही तर या कामाला महत्व देणेही गरजेचे आहे.

भाकरी उत्कृष्ट पदार्थ आहे.
मी पुरण पोळी करून बघेन ही हिंमत दाखवली, पण भाकरी करून (खास करून बडवून) बघण्याची हिंमत अजून तरी दाखवू शकत नाही. ते म्हणजे अजून बारावी पास नाही आणि सरळ पोस्ट ग्रॅज्युएशनचा एक कठीण पेपर देणे होइल माझ्यासाठी.

त्यामुळे पुरुषांनीही स्वयंपाकघरात शिरायला हवे असे वाटत असेल तर त्यांना लहानपणापासून स्वयंपाक शिकवणे पुरेसे नाही तर या कामाला महत्व देणेही गरजेचे आहे. >>> औरत करे तो फर्ज, मर्द करे तो कला...

पुरुष फक्त महत्त्वाची कामं करतात. एखादे काम महत्त्वाचे वाटत नसेल तर पुरुष ते करणार नाही
>>>>>>>>

+७८६
याला जबाबदार पुरुषप्रधान संस्कृती जी पुरुषांना वरचे स्थान देते.

घरी स्वयंपाक करायचे काम बायकांकडे
हॉटेलातील आचाऱ्यांमध्ये पुरुषवर्ग जास्त.

घरी सुईदोरा हाती घेणे बायकांचे काम
बाहेर टेलर पाहिलेत तर तिथेही पुरुषवर्ग जास्त.

धुणीभांडी करणे हे काम मात्र बाहेरही बायकाच जास्त.

असे का याचा विचार केलात?
खूप सिंपल उत्तर आहे. फक्त ते स्विकारायचा प्रामाणिकपणा हवा.

आणि हो,
जर आपला समाज स्त्री प्रधान असता तर हेच चित्र उलटे दिसले असते.

No I am not saying it’s trivial. But it’s not worth jealousy.
My friend had a dream of giving her grandkids,her pen as a gift.
Now that’s something I’m jealous of. That kind of vision she had. She may achieve may not but her ability of dreaming big is worth my envy.

I have neither achieved great feats in career nor on home front. I am mediocre but I do not envie cooking skills. That’s for sure.
~~~~~
Please pardon spelling & language. Unable to type .

असे का याचा विचार केलात?
खूप सिंपल उत्तर आहे. फक्त ते स्विकारायचा प्रामाणिकपणा हवा.
>>>

एखादं काम महत्वाचं आहे हे सांगून ते पुरुष करू लागल्याने पुरुष प्रधान संस्कृतीत काहीही फरक पडणार नाही.
त्यामुळे नसती डिप्लोमसी करण्यापेक्षा घरात काम ही बरोबरीने, जबाबदारीने, विभागून केली पाहिजेत, महत्वाची वाटत असो वा नसो हा अप्रोच सस्टेनेबल राहील.

एखादं काम महत्वाचं आहे हे सांगून ते पुरुष करू लागल्याने पुरुष प्रधान संस्कृतीत काहीही फरक पडणार नाही.
>>>>>

बिलकुल
दोन्ही बदल आपल्या जागी वेगवेगळे घडवायचे आहेत. एकमेकात मिसळायची गल्लत नाही करायची.

बरेच जण म्हणतात आपल्या मुलांनाही स्वयंपाक शिकवा. पण ते शिकवणे पुरेसे नाही, कारण शिकूनही पुरुष त्याचा वापर मोजकाच करणार जोपर्यंत स्वयंपाकघर हि जागा आणि तिथले काम कनिष्ठ समजले जाणार.

आता जर समाज पुरुषप्रधान नसता तर कनिष्ठ समजले जाणारेही काम पुरुषाला बरोबरीने करावेच लागले असते. पण तसे नाहीये. आजही बहुतांश समाज पुरुषप्रधानच आहे. मग त्यांना स्वयंपाकघरात कसे पिटाळायचे. तर ते कामही महत्वाचे आहे दर्शवून.

आदर्शवादी विचार मांडायला आपण लाख मांडू. पुढे काय. विचार प्रॅक्टीकल हवा. तरच पुढे जाऊन सोल्युशन मिळते.

पुरणावरणाचा सगळा स्वैपाक मला एकटीने करावा लागतो अशी कुण्या स्त्रीची तक्रार असेल तर तिने ती तिच्या कुटुंबाशी बोलून सोडवावी त्यावर सोशल फोरमवर लिहून काय होणार? . म्हणजे हा पर्सनल , कौटु़ंबिक मुद्दा झाला.
पण पुरुष अमक़ं काम महत्त्वाचं नाही म्हणून मी करणार नाही म्हणतो तेव्हा त्याला अख्खा समाज, संस्कृती जबाबदार.

ज्यांना करायची असतात ते सगळ्या कामांना सारख्याच महत्त्वाचं मानतात.
ज्यांना करायची नसतात ते बहाणे शोधतात.
मायबोलीवरच तशा नोंदी आहेत

पण पुरुष अमक़ं काम महत्त्वाचं नाही म्हणून मी करणार नाही म्हणतो तेव्हा त्याला अख्खा समाज, संस्कृती जबाबदार.
>>>

बिलकुल जबाबदार आहे.
आणि हे ईथे सर्वांना ठाऊक आहे.
तेच अधोरेखित करायला आपण ५०० पोस्ट केल्या धाग्यावर तर त्याला काही अर्थ नाही.
चर्चा सोल्यूशनवर व्हायला हवी.

बिलकुल जबाबदार आहे. >

आणि तेवढाच जबाबदार 'पुरणावरणाचा सगळा स्वैपाक मला एकटीने करावा लागतो अशी कुण्या स्त्रीची तक्रार असेल' तर त्यालाही आहे. तो कौटुंबिक मुद्दा रहात नाही. आणि इथूनच चर्चा सुरू झालेली दिसतेय.

स्वयंपाक हे फार महत्वाचे काम आहे हे बिंबवायचे हे हास्यास्पद आहे. ते तसे ऑलरेडी बिंबवले जातंय केव्हापासून . House Maker हा किती ग्रेट जॉब आहे वगैरे. किती पुरुष वळले तिकडे? असते तर आपण ही चर्चा करत बसलो नसतो.

ते तसे ऑलरेडी बिंबवले जातंय केव्हापासून . House Maker हा किती ग्रेट जॉब आहे वगैरे. किती पुरुष वळले तिकडे?
>>>>

हे जे बिंबवणे आहे ते आता शिकून सवरून या हाऊस मेकर कामातून बाहेर जाणार्‍या स्त्रियांच्या मनावर बिंबवले जातेय कारण त्यांनी वेगळी वाट धरू नये.
मी म्हणतोय ते पुरुषांमध्ये वा एकूणच समाजात हे बिंबवणे.

आणि हे देखील चुटकीसरशी होणारे नाहीये. यालाही वेळ जावा लागणार.
मी वैयक्तिक पातळीवर माझ्या परीने हे करतच आहे. सर्वांनी करावे, आणि त्याचे लेख लिहावे. डोक्युमेंटेशन की काय म्हणतात ते करावे.

या धाग्याच्या संदर्भाने - घरात सणाचा, पूजेचा स्पेशल स्वैपाक होत असेल त्यात पुरुषाने बरोबरीचा वाटा उचलावा.
या स्वैपाकाचा त्या स्त्रीला ताण येतो हे तर लेखातच सुरुवातीला आलंय.

सर्वांनी मदत करावीच पण सोवळं इ नियम आता ह्या पिढीनं तरी पाळू नयेत. आणि झेपेल तसं आणि आवड असेल तरच करावं. लहान असताना आई श्रावण सोमवार , शुक्रवार करत असे मार्गशीर्ष गुरुवार (आणि त्याबरोबर येणारे खान पान) पण करत असे आता ह्यातलं काही करत नाही.

लहान असताना आई श्रावण सोमवार , शुक्रवार करत असे मार्गशीर्ष गुरुवार (आणि त्याबरोबर येणारे खान पान) पण करत असे आता ह्यातलं काही करत नाही.
>>>>>

सेम, हे वरचे सर्व आमच्याकडे व्हायचे. आता नाही करत आई. मी सुद्धा दर वर्षाला बस्स आता वयानुसार झेपत नाही तर कश्याला करतेस, मुलगा सेटल झाला मग देवाकडे कश्याला आणखी काय मागत राहतेस, कश्याला ऊपास तापास करतेस असे बोलून बोलून तिला बरेच काही सोडायला लावले. बरेच वयस्कर बायकांना हे झेपत नसते तरी आपण घरातील वडीलधारी व्यक्ती आहोत, आपणच हे नाही पाळले तर पुढच्या पिढीत कोण पाळणार म्हणत पुढच्या पिढीला हे पास करायला करत असतात. म्हणून मी ते सुद्धा घरी स्पष्ट सांगितले आहे की मला या देवधर्मात रस नसल्याने मी तसेही यातले काहीच रीतीरिवाज पुढे घेऊन जाणार नाहीये. तुमच्यासोबतच हे संपणार आहे तर आताच थांबवा, काही हरकत नाही. त्यामुळे बरेच काही थांबलेय. लहानपणी आई मला इमोशनल ब्लॅकमेल करून श्रावणी सोमवार आणि सणवार पाळायला लावायची. आता मी तिला ढांचे देत एकेक वार सोडायला लावलेत.

>>राज, तुम्हांला आंघोळ करून , धूत वस्त्र नेसून उपास करून यार्ड मेन्टेन करायला लागतो का? नाही ना? मग हे रिग्रेसिव नाही!<<
नाहि हीराशेठ, मी तर बुरसा राहुन यार्डवर्क करतो, जेंव्हा करतो तेंव्हा. कारण नंतर आंघोळ करावीच लागते. आणि यार्डवर्कचं सुद्धा एक प्रिपरेटोरी रुटिन असतं. तुम्हि म्हणतांय तसं काहिसं सोवळ्यासारखं. नाहि पाळलं तर पुढे त्रास होउ शकतो.

बाय्दवे, मी काल दुपारी खेळायला बाहेर पडलो तेंव्हा तो ग्रीनथंब, ९० डिग्रीत त्याचं नवाढलेलं लॉन मोव करत होता. आता काय म्हणावं त्याला, रिग्रेसिव कुठचा... Wink

कदाचित त्या शेजाऱ्यालाच तुमचा मत्सर वाटत असेल. "त्यांचं काय बुवा, त्यांच्या इथे चालतं असं लॉनमध्ये रान माजलं तरी. आमच्या इथे गवताचं एक पातं जरी मर्यादा सोडून वाढलं तरी खपवून घेतलं जातं नाही..! पाहा कसा इतकी कामं पडलीयत आणि हा सकाळी सकाळी ऐटीत गॉल्फ खेळायला जातोय लेकाचा! "

Pages