आपल्या समाजात पुरुषांवर कमवायचे आणि कमावत राहायचे दडपण असते का?

Submitted by ऋन्मेऽऽष on 2 November, 2019 - 05:16

पेपरात एक बातमी वाचण्यात आली. तीन बहिणींच्या एकुलत्या एक भावाने भाऊबीजेच्या पुढच्याच दिवशी आत्महत्या केली. कारण त्याच्या बहिणींनी त्याला भाऊबीजेची भेट म्हणून बाईक घेऊन दिली आणि तो भाऊ असूनही त्याच्याकडे बहिणींना द्यायला प्रेमाव्यतिरीक्त काही नव्हते. तो एक सुशिक्षित बेरोजगार होता. त्याला हे शल्य बोचू लागले आणि ते देखील या थराला गेले की त्याने आपले जीवनच संपवले.

अत्यंत दुर्दैवी घटना. आदल्या दिवशीच्या आनंदी दिवसानंतर अचानक हे.. काय वाटले असेल त्याच्या बहिणींना आणि आईवडीलांना कल्पनाही करवत नाही.

योगायोगाने काही वर्षांपूर्वी माझ्याही ओळखीच्या एका घरात अशी भाऊबीज पाहण्यात आलेली. तिथेही नेमके तीन बहिणी एक भाऊ होता. चारेक महिने भाऊ जॉब सुटल्याने बेरोजगार होता. अश्यात बहिणींना काही द्यावे या परीस्थितीत नव्हता. बरं या आधी त्याच भावाने त्या बहिणींना आधीच्या भाऊबीजना मोबाईल वगैरे महागडी गिफ्टस देऊन झालेल्या. त्यावरून त्या बहिणी यंदा काही नाही का दादा अशी त्याची मजा घेत होत्या. मला तरी त्यात कुठेही टोचून बोललेले जाणवत नव्हतो. ओळखीची फॅमिली. तसा त्यांचा स्वभावही नाही. पण वेगळ्याच मनस्थितीत असलेल्या त्या भावाच्या ते मनाला लागले. आणि हसता हसता अचानक तो हुंदके देत धाय मोकलून रडायला लागला. त्या बहिणींनाही अपराधी वाटले आणि त्याही रडायला लागल्या. मी मग फार न थांबता तिथून निघालो. प्रसंग मात्र मनावर कोरला गेला.

मी स्वत:ही एकेकाळी या बेरोजगारीच्या लाचार काळातून गेलो आहे. एक नोकरी काही कारणांनी अचानक सोडावी लागली आणि दुसरी लगेच मिळायला तयार नव्हती. साधारण दोनतीन महिने मी जॉबलेस होतो. फार नाही. आणि त्यातही आधीची सेव्हिंग माझे खर्च चालवायला पुरेशी होती. घरखर्च चालवायला आईबाबा समर्थ होते. वर्षभर खुशाल स्वखुशीने घरी बसलो असतो तरी चालले असते. पैश्याची चिंता करावी अशी स्थिती दूरदूरपर्यंत नव्हती.
पण तरीही मन खात राहायचे. शिक्षण झालेय. कमवायला लायक झालो आहोत. पण कमावत नाही आहोत. ही भावना बोचत राहायची. दिवसभर घरी आयते लोळून खातोय असे उगाचच वाटत राहायचे. संध्याकाळी नेहमीच्या कट्ट्यावर मित्रांसोबत गप्पा मारायला जायचीही लाज वाटू लागलेली. कोणी काही तरी विचारेल. काय उत्तर द्यायचे. विचारले नाही तरी समोरच्याच्या डोक्यात तेच प्रश्न असणार असे उगाचच वाटायचे. एखादा आपल्यापेक्षा कमी शिकलेला आणि आपल्या निम्मा पगार घेणारा मित्रही आता आपल्याकडे बेकार म्हणून बघत असेल असे स्वत:लाच वाटायचे. बेकार. फार बेकार शब्द आहे हा. आणि तितकीच बेकार भावना. कमवायची पात्रता आहे पण न कमावणारा...

कदाचित मी चुकतही असेन, पण मला वाटते हे न कमावते असण्याचे दडपण मुलींपेक्षा मुलांवर जास्त असते. जसे काही समस्या महिलांशी निगडीत असतात तसे ही पुरुषांसमोरील एक समस्या वाटते. येत्या वाढत्या बेरोजगारीच्या काळात ही समस्या जास्तीत जास्त मुलांना भोगावी लागणार. त्यांना सांभाळून घ्या _/\_

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिलंय हे. पटलं.
जवळंच कुणी सध्या ह्याच फेज मधी आहे म्हणुन जीवला लागलं हे लेखन.

मला वाटते हे न कमावते असण्याचे दडपण मुलींपेक्षा मुलांवर जास्त असते >>> असे काही नाही, सध्या जॉब असणे ही मुलांईतकी मुलींची पण गरज आहे. मी स्वत: या सगळ्यातुन गेले आहे. आयुष्यातील सर्वात दुर्दैवी काळ होता तो. प्रचंड नैराश्येत होते, परीणामी हातातला जॉब सोडुन ब्रेक घ्यायचा ठरविला अन नेमका तो ही निर्णाय फसला. आधीच नैराश्य त्यात जॉबलेस, सारखे वाटायचे की घरी आपली काहीच मदत होत नाहीये , ऊलट त्यांच्यावर भार. कधी कधी जॉब हा फक्त कमावण्यासाठीच नसुन मानसिक शांतीसाठी खुप महत्वाचा असतो. माझीही काही पैशांची खुप अडचण होती असे नाही तरी खोटे वाटेल कदाचित पण काहिही न खाता पीता एकाच दिवशी मी ६ इंटरव्यु दिले होते अन दिवसाअखेरीस बिपी लो होवुन हॉस्पीटलमध्ये. खरेतर ट्रेनमधुन पडुनच मेले असते पण नशिबाने वाचले ( मी माझ्या आजवरच्या आयुष्यात किमान पाच ते सहा वेळा ट्रेन मधुन पडता पडता वाचलीये कधी नशिबाने तर कधी कुणीतरी वाचविल्याने, मरण सोपे नाही हेच खरे). असो, घरच्यांनी खुप साथ दिली मला. अन एक वेळ अशी आली की माझ्या हातात ४ चांगल्या ऑफर होत्या अन त्यातल्या एकात मी अजुनही आहे.

हे झाले माझे, पण माझ्या ओळखिच्या बर्याच जणींची हिच गत आहे, जॉब असणे , कमावणे खुप गरजेचे आहे हल्ली, नाहीतर आजच्या काळात सुद्धा हि बसुन खाते असे टोमणे मारुन लोक जगणे हैराण करुन सोडतात. अन हल्ली तर लग्नासाठी सुद्धा कमावत्या मुलींनाच प्राधान्य असते म्हणुन सुद्धा बर्याच जणींना ईच्छे विरुद्ध जॉब करावा लागतो

साधारण दोनतीन महिने मी जॉबलेस होतो. >>>>>>>>
जवळ जवळ ८/९ महिने घरी बसले होते. आधीची नोकरी सुटली आणि PF चे पैसे होते गाठीशी तेच पुरवून खाल्ले पण सतत टेन्शन शिकून सवरून गाठीला चांगला दांडगा अनुभव असूनही नोकरी मिळत न्हवती दिवसाआड सायबर कॅफे मध्ये जाऊन वेगवेगळ्या साईट्सवर जॉब शोधत बसायचे. एका ठिकाणी इंटरव्यू दिला जॉब लागला पण तो फक्त तीनच महिने टिकला एकतर तो इंडस्ट्रियल एरियात होता आणि प्रवास खूप करावा लागायचा सोडला. आणि पुन्हा सायबर कॅफेत जाऊन /पेपरमध्ये नोकरी शोधू लागले. मनात खूप वाईट विचार यायचे अगदी डिप्रेशन आले होते पण मुलींच्या तोंडाकडे बघून ते विचार झटकून टाकायचे आणि पुन्हा नव्या दमाने नोकरी शोधकार्य सुरु करायचे. शेवटी एका मैत्रिणीच्या ऑफिसात तिने इंटरव्यू साठी बोलावून घेतले आणि आधीच्या प्रोफाइल आणि अनुभवाचे शून्य धरून जो प्रोफाइल मिळाला तो घेतला आणि कमी पगारात सेटल झाले. आज ३ वर्षे ६ महिने झाले खुश आहे. पेरोल वर आणि बोनस इतर बेनिफिट्स मिळतात म्हणून पगार कमी असूनहि त्यात माझं आणि माझ्या मुलींचे भागतेय ना एवढेच बघते.

VB यांच्याशी सहमत.

हे न कमावते असण्याचे दडपण मुलींपेक्षा मुलांवर जास्त असते.
>>>

ह्या वाक्यात 'न' शब्द नको आहे. मुलांवर कमावते असण्याचे / राहण्याचे दडपण जास्त असते हे खरे आहे; त्याचे प्रमुख कारण समाज धारणा हे तर आहेच पण अजून एक निरिक्षण असेही आहे की बायका-मुली घरात जितकी कामे करतात तितकी कामे मुले करत नाहीत. घरातली / घरात राहून करता येण्याजोगी अनेक छोटी मोठी कामे आहेत असतात, ती केली तर आपण बेकार आहोत ही भावना वाढीस लागणार नाही. तसेही बहुतांश वेळा असे आढळते की घेतलेले शिक्षण स्वतःच्या पायावर उभे राहण्यास सक्षम बनवू शकत नाही. खरे शिक्षण काम धंद्याच्या ठिकाणीच होते.

बेरोजगार तरुणच नव्हे तर अगदी निवृत्तवेतनधारी पुरुषांनाही आपण आता बेकार झालो कोणाच्या कामाचे राहिलो नाही अशी भावना निर्माण होते. आणि तसे होण्याचे कारणही माझ्यामते हेच असावे. (म्हणजे ह्याचा संबंध फक्त पैसे मिळवण्यावरती / आर्थिक स्वावलंबनावर अवलंबून नसावा)

रच्याकने - माबोवर परत भरपूर सक्रिय झालायस, नोकरी लागली वाटतं Wink

> असे काही नाही, सध्या जॉब असणे ही मुलांईतकी मुलींची पण गरज आहे.

हे झाले माझे, पण माझ्या ओळखिच्या बर्याच जणींची हिच गत आहे, जॉब असणे , कमावणे खुप गरजेचे आहे हल्ली, नाहीतर आजच्या काळात सुद्धा हि बसुन खाते असे टोमणे मारुन लोक जगणे हैराण करुन सोडतात. अन हल्ली तर लग्नासाठी सुद्धा कमावत्या मुलींनाच प्राधान्य असते म्हणुन सुद्धा बर्याच जणींना ईच्छे विरुद्ध जॉब करावा लागतो
>
लेख
According to a Deloitte report, the female labour force participation in India has fallen to 26 per cent in 2018 from 36 per cent in 2005 due to many social and economic barriers limiting their opportunities. These numbers came as a shocker to many.

वाचला लेख, अन वाचुन अजुन एक गोष्ट लिहावीशी वाटतेय, पुरुषांना कमावते असणे नसणे याने काही फरक पडतो की नाही माहीत नाही पण एका स्त्रिला बॉस म्हणुन स्विकारणे नक्कीच जड जाते. माझ्या टीममध्ये ८ मुले आहेत पण जर ते चुकले अन मी ओरडली तर त्यांचा ईगो दुखावतो पण तेच त्यांना त्यांचा जुना मेल बॉस ओरडायचा तेव्हा कुल असायचे Angry पण मुलींचे असे नाही.

आर्थिक परिस्थिती वर अवलंबून आहे.
गरीब घरातील मुला ,मुलींना घर चालवण्यासाठी कमवावेच लागते.
मध्यम वर्गीय कुटुंब असेल तर वेळ असतो नोकरी शोधण्यासाठी किंवा व्यवसाय करण्यासाठी.
गडगंज संपत्ती असलेला घरात चारी बाजूने पैसा येत असतो.
आपली मानसिकता आपण ठरवायची.
स्वतःची तुलना कधीच दुसऱ्याशी करायची नाही .
दुःख कमी होते .
भौतिक गरजा आपण आपल्या परिस्थी ला अनुरूप च ठेवाव्यात.
उगाच दुसरा आयफोन वापरतो म्हणून आपण कर्ज काढून आयफोन घेण्याची गरज नाही

@VB मी स्वतः आजपर्यंत एकूण 17 कंपनीत काम केले आहे...(दहावीनंतर शिकत शिकत) तर बहुंताशी ठिकाणी फिमेल बाॅस लाभलेल्या...आणि खरं सांगू का फिमेल च्या हाताखाली काम करणं खरंचं जड जात..
इगो दुखावला जातो म्हणून नाही...किंवा स्त्रीबद्दल असूया आहे म्हणून नाही..

स्त्रीया काय करतात माहीतेय??

घरातला, सासू सासर्यांचा, परत मासिक जो त्रास असतो त्याचं सगळं frusrtation खालच्या लोकांवर काढतात..त्यामानाने मेल बाॅस साॅर्टेड असतात..

परत फिमेल बाॅस एका फिमेलची खुपच तरफदारी करतात...म्हणजे तास न तास वाॅशरूममध्ये मेकअप करण्यात घालवले तरी त्यांना इतका काही वाटत नाही तेच जर मेल employee दहा मिनिट सिगारेट प्यायला गेला की लगेच बोंबलतात..

male employee ओवरटाईम करून घरदार विसरून काम करू शकतो..

पण स्त्री आहे उशिर होईल रात्री जाऊ कशी? एरवी बोंबलत 12 वाजेपर्यंत फिरत बसतील पण कामे आली की, स्त्रीसुलभ बहाणे सुरू..

असो जाऊ दया अजुन लिहणार नाही मी...पण हा माझा पर्सनल अनुभव आहे...

<<<
पुरुषांना कमावते असणे नसणे याने काही फरक पडतो की नाही माहीत नाही पण एका स्त्रिला बॉस म्हणुन स्विकारणे नक्कीच जड जाते.
त्यांचा ईगो दुखावतो पण तेच त्यांना त्यांचा जुना मेल बॉस ओरडायचा तेव्हा कुल असायचे Angry पण मुलींचे असे नाही.
>>>

हा एक स्वतंत्र धाग्याचा विषय होऊ शकतो.
मी अतिशय चांगले आणि अतिशय हलकट पुरुष बॉस बघितले आहेत, अनेक स्त्री बॉसेस बरोबर काम केले आहे. यात इगोचा मुद्दा नाही, कामाच्या स्टाईलचा मुद्दा पटकन लक्षात येतो. जर मला चॉईस असेल तर पुरुष बॉस पसंत करेन. (अर्थात तसा चॉईस कधीच न्हवता.)

स्त्रियांवरही दडपण असते कमावण्याचे. आणि अनेक ठिकाणी घरातून तसा सूरही असतो. सुरवातीला नोकरी नाही परंतु नंतर नवऱ्याची कमाई पुरेशी नसल्याने किंवा नवऱ्याची नोकरी गेली / बिझिनेस ठीक चालला नाही म्हणुन नोकरी करून घर चालवण्यात सर्वात मोठा वाटा उचलणाऱ्या स्त्रिया पाहिल्या आहेत.

घरकामे, वॉचमन अशी कामे करणाऱ्या आर्थिक स्तरांच्या लोकांत स्त्रियांवर कमावण्याचे दडपण जास्त असावे असे मला वाटते.

आपल्या समाजसंस्थेमुळे आपले न कमावणे काही पुरुषांच्या अधिक जिव्हारी लागु शकते. लेखातील दोन्ही उदाहरणे या प्रकारात मोडणारी वाटली.

आमची काही वर्षे एक स्त्री बॉस होती. इगो प्रॉब्लेम थोडक्याच पुरुषांमध्ये जाणवला.

घरातला, सासू सासर्यांचा, परत मासिक जो त्रास असतो त्याचं सगळं frusrtation खालच्या लोकांवर काढतात..त्यामानाने मेल बाॅस साॅर्टेड असतात.. >> नक्की मासिक म्हणायचे आहे का मानसिक???? PMS वगैरे ??

मी पण अनुभवाने असे म्हणेन की स्त्रिया ह्या दुसऱ्या सहयोगी स्त्री शी खूप असूया बाळगतात.
तसे पुरुष करत नाहीत.
बॉस हा हाताखालील कर्मचारी वर्गा पेक्षा हुशार आणि समजूतदार असावा पण खूप वेळा वाशिल्या मुळे आणि चापलुसी गिरी मुळे लायक नसलेली व्यक्ती जेव्हा बॉस होते तेव्हा त्या बॉस बरोबर काम करणे खूप अवघड असते

जर स्त्रियांवर कमवण्याचे दडपण असते तर ते डेटा मधून दिसून यायला हवे. 2005 साली 36% अर्थार्जन करणाऱ्या स्त्रिया होत्या आणि 2018 मधे 26% अर्थार्जन करणाऱ्या स्त्रिया आहेत हा डेटा स्त्रियाना लेबर फोर्समधुन काढून घरकामाला लावलं जातंय हे दर्शवतो आहे.

https://www.livemint.com/news/india/india-s-workforce-is-masculinising-r...
Just nine countries around the world, including Syria and Iraq, now have a fewer proportion of working women than India, new official data confirms. And if Bihar were a country, it would have the lowest share of working women in the world. Among urban women who do work, domestic cleaning work is the second most common profession after textile-related jobs,

While the LFPR for women aged 15-29 fell by eight percentage points between 2011-12 and 2017-18 to 16.4%, the LFPR for women fell by at least seven percentage points for every age bracket between 30-50 as well. The decline was highest among women aged 35-39 years (LFPR for this age bracket fell 9 percentage points to 33.5%). Among women in the prime working ages of 30-50, more than two in three women are not in the workforce, with the majority of them reporting that they are “attending to domestic duties only".

Among men, caste and religion make no real difference to workforce participation rates. But among women, Muslim women have the lowest LFPR while among Hindu women, forward caste women have the lowest LFPR, implying that social norms and religious conservatism might play a role in women being “allowed" to work.
The most common jobs for urban women are of garment workers, domestic cleaners and ‘directors and chief executives’.
That last one is also the most common job for urban men. Sounds high-skilled and well-paying? Not so much, labour economists find: it might just be a fancy-sounding way of describing women who run their own small enterprises.
“99% of (women workers described as directors and chief executives) were self-employed, of which around one-third worked as unpaid family workers,"

“Such women were mainly engaged within the self-help groups and co-operatives as partners and had thus been recorded as directors or working proprietors, even as their activities, for the most part, remained confined to food processing and garment manufacturing. A large proportion of self-employed women workers were also engaged in outsourced manufacturing work, typically characterised by low earnings, long hours of work and lack of any form of social protection."
The high-skilled, white collar jobs that young women desire are rare. Instead, domestic work, house cleaning and salespeople dominate the urban sector for women. The only exception is the teaching profession, which makes it to the top 10 most common jobs for women.

PMS म्हणायचं आहे मला..आय नो इट्स नॅचरल..पण स्त्री बाॅसला तो त्रास होतोय तर इतरांवर उगाचच राग काढायचा हे मान्य नाही..

PMS म्हणायचं आहे मला..आय नो इट्स नॅचरल..पण स्त्री बाॅसला तो त्रास होतोय तर इतरांवर उगाचच राग काढायचा हे मान्य नाही.. >> अजय चव्हाण, तुम्ही दरवेळी बॉस चिडल्यावर तिला विचारायचात का की तुझे पिरियड्स जवळ आले आहेत का? तुम्हाला इतकी खात्री कशी काय की नेमक्या ह्याच त्रासामुळे तिची चिडचिड होते आहे?

स्त्री अधिकार्‍याने स्वतः आपल्या गटाला आणि मनुष्यबळ (एच.आर्) खात्यास सांगितले असेल की मला पी.एम. एस चा त्रास होत आहे तर गोष्ट वेगळी आहे. व्यक्तिगत बाबी माहिती नसताना असे तर्क करणे, पसरवणे ह्याबद्दल बहुतेक कार्यालयात मनुष्यबळ खात्याची काही धोरणे असतात. ती जरूर जाणून घ्यावी. उदा: एखाद्या पुरूष अधिकार्‍याबद्दल ह्याला ई.डी चा त्रास आहे म्हणून हा कायमच "फ्र्स्ट्रेटेड" असतो अशी भाषा वापरली तर ते योग्य नाही. हॉर्मोन्सचा त्रास होतो पण त्यापलिकडेही ती व्यक्ती सक्षम अधिकारी आहे ह्याचे भान हवे व सामान्यपणे एच.आर ह्याबद्दल सजग असते.

तुम्ही दरवेळी बॉस चिडल्यावर तिला विचारायचात का की तुझे पिरियड्स जवळ आले आहेत का? >> जि, अगं... नोकरी जायची त्यांची, डोंट गिव्ह देम आयडीयाज... Wink Happy

नैसर्गिक गोष्टी ह्या कमजोरी असू शकत नाहीत .
स्त्री वर त्या वरून कमेंट करणे अयोग्य आहे.
अतिशय हुशार आणि balance साधणाऱ्या खूप स्त्री बॉस असतात .
आणि त्यांचा आदरच आहे

भारतात स्त्रियांना नोकरी मिळणाच्या संध्या पुरुषांच्या तुलनेत फार कमी आहेत. त्यामुळे पुरुषांच्या तुलनेत काम करणाऱ्या स्त्रियांचे प्रमाण कमी असणारच .
(चीन मध्ये बुलडोझर, क्रेन ऑपरेटर स्त्रिया पाहिल्या, भारतात अजून बघण्यात आली नाही.)

इच्छुक, गरज (आणि परवानगी) असणाऱ्या स्त्रियांपैकी किती स्त्रियांना नोकरी मिळते याचाही डेटा हवा. पुरुषांच्या तुलनेत अशा स्त्रियांना नोकरी मिळवणे अधिक कठीण आणि त्यामुळे दडपण जास्त असेल.

अहो मी नाही विचारत...पण महीन्याच्या ठराविक वेळी उगाचच बाॅस राग राग करायला लागली की, कळत आपोआप..

अहो मी नाही विचारत...पण महीन्याच्या ठराविक वेळी उगाचच बाॅस राग राग करायला लागली की, कळत आपोआप.. >> Haha.. You don't have a clue about periods or PMS. It's a cycle of 28 days and can range from 21 to 45 days which is normal. शिवाय प्रत्येक बाईला प्रत्येक वेळी PMS चा त्रास होतोच असंही नाही. आता तुमच्या बॉसचा पिरियड पॅटर्न नक्की माहीती नसताना केवळ महिन्याच्या विशिष्ट तारखांना तुम्ही असं समजत असाल की ही बाई PMS मुळे चिडचिड करते आहे तर तुम्ही मूर्ख आहात. कारण सहा महिन्यांत जर २८ दिवसांची सायकल असेल तर बाईच्या पाळीची तारीख साधारणपणे बारा दिवसांनी मागे गेलेली असू शकते. पुढच्या वेळी नक्की विचारून घ्या बॉसला की चिडचिड का होते आहे. सी म्हणाली तसं फार तर तुमची नोकरी जाईल पण दर महिन्याची कटकट पण जाईल ना Happy

नी व्यक्ती स्त्री बॉस ची

गुणवत्ता तिच्या नैसर्गिक mc जोडत आहे .
ती व्यक्ती शत मूर्ख आहे आणि अशा व्यक्ती ची दखल घेणे हे शत मूर्ख पणाचे लक्ष्‍ण आहे

बापरे जि !!
अहो मी नाही विचारत...पण महीन्याच्या ठराविक वेळी उगाचच बाॅस राग राग करायला लागली की, कळत आपोआप.. >> ही विचारसरणी नवी नाही. त्यात काय चूक हे जि ने फार स्पष्ट आणि बोचर्‍या शब्दात मांडले आहे Happy तेव्हा नवीन विचार करायचे दडपण नसल्याने बुरसटलेल्या विचारसरणीच्या पुरूषांनी निदान जुने पुराणे कमावण्याचे दडपण तरी नीट निभवावं...

भारतात स्त्रियांना नोकरी मिळणाच्या संध्या पुरुषांच्या तुलनेत फार कमी आहेत. >>>>. हल्ली बऱ्याच कॉर्पोरेट मध्ये diversity candidate hire करणं आणि वर्षभरात किती (lady employees चं) hiring झालं, ते HR/staffing ऑडीट मध्ये जाहीर करणं अनिवार्य असतं. काही विशिष्ट पोझीशन्स विशिष्ट काळ reserved असतात आणि अगदीच सुटेबल लेडी employee नाही मिळाली तरच मग पुरुष अधिकारी hire केला जातो. याबद्दल मतं ऐकायला आवडतील.

मला व्यक्तिशः अशी पोझिशन रिझर्व्ह करणं अपमानास्पद वाटतं. म्हणजे मी मेरिटवर जागा मिळवली तरी बाकी कलिग्जचा बघण्याचा दृष्टिकोन diversity candidate म्हणून झालेली निवड असा असू शकतो. आपण सरकारी नोकरीबद्दल नको बोलूयात. पण MNCs किंवा मोठ्या भारतीय कॉर्पोरेट मध्ये स्त्री employeeला ज्या थोड्या सवलती मिळतात त्याबद्दल मी स्त्री असूनही माझी हरकत आहे ( एक उदा. Riserved पार्किंग, दुसरं उशीरा घरी जाणाऱ्या (फक्त) स्त्रियांना घरी जाण्यासाठी कंपनी provided cabs).

ही पोस्ट अवांतर आहे आणि हा विषय मुळ लेखाला वहावत नेत असेल तर ऋन्मेषने सांगावं, मी पोस्ट उडवेन. पण वरचे काही प्रतिसाद वाचून ही मनातली खदखद बाहेर आली.

ते ट्रॅक करत असतील pms बॉस चा.जिज्ञासा तुम्ही जे ज्ञान पाजळलय इथे ते शाळेतल्या मुलांना देखील माहित आहे.
कशाच्या आधारे अजय ला मूर्ख म्हणताय?

तेव्हा नवीन विचार करायचे दडपण नसल्याने बुरसटलेल्या विचारसरणीच्या पुरूषांनी निदान जुने पुराणे कमावण्याचे दडपण तरी नीट निभवावं...
Submitted by सीमंतिनी on 2 November, 2019 - 23:57

>>>>>

याचा राग त्याच्यावर काढू नका Happy

@ मीरा, स्त्री बॉस हा विषयही महत्वाचा वाटल्याने मी स्वतंत्रच धागा काढला आहे. तिथेही आपण आपली पोस्ट कॉपीपेस्ट करू शकता. ईथेही हरकत नाहीच Happy

स्त्री बॉस म्हटलं की पाळीचा मुद्दा आणणे हे गैर आहे. अतिशय चूकीचे आहे. तुम्हाला काय माहीत पाळी आहे की नाही?
>>>>>>>>>पण महीन्याच्या ठराविक वेळी उगाचच बाॅस राग राग करायला लागली की, कळत आपोआप..>>>>>>>>>> बालीश बहु ....!! काय वाट्टेल ते बर्का.
ऋन्मेष तिथेही पेस्ट करते आहे.

Happy नाही, एका आयडीचा अजिबात राग नाही. रागावून काय मिळणार? तो आयडी आपले विचार बदलणार? शक्यता अत्यल्प. पण पीएमएस, पिरीयडस व प्रोफेशनलिझम बद्दल नवीन विचार करणे शक्य आहे हे त्यांना चर्चेतून जाणवले तरी पुष्कळ आहे.

त्यांची प्रतिक्रिया फार प्रातिनिधीक आहे. त्या प्रतिक्रियेबद्दल राग आहे, आयडी बद्दल नाही .

त्यांची १७वी नोकरी तरी टिकावी अशीच सदिच्छा आहे.

Pages