श्रावण मासी हर्ष मानसी..’ वगैरे सगळं लिहण्या-वाचण्या पुरतं ठीक आहे. पण आता कोणी मान्य करो अथवा न करो, श्रावणाची एंट्री ही समस्त महिला वर्गाच्या मनात धडकी भरवणारीच असते. आणि अशा दहशतीमागचा कर्ता-सवरता असतो तो ‘पुरणाचा स्वयंपाक’! श्रावण महिना म्हटलं की सणावारांची गडबड हे तर ठरलेलच असतं.. श्रावणातले शुक्रवार, नागपंचमी, श्रावणी सोमवार, राखी पौर्णिमा, गोकुळाष्टमी, पोळा.. इ.इ. आणि ही तर फक्त सुरुवात.. पुढचा भाद्रपद तर याहून अधिक डेंजर असतो. आणि यापैकी बहुतांश वेळेला करावा लागतो तो हा पुरणाचा स्वयंपाक! याला आपण स्वयंपाकातला ‘ड’ गट म्हणू शकतो. बरं, पुरणाचा स्वयंपाक म्हणजे केवळ पुरणपोळी असं समजणार्यांना आत्ताच सांगते, तुम्ही घोर अज्ञानात जगत आहात. यूपीएससी चा सिलॅबस जसा व्हास्ट असतो नं तसाच या पुराणा-वरणाच्या स्वयंपाकाचा सिलॅबस पण भल्या-भल्यांना घाम फुटायला भाग पाडतो. एखाद-दुसरी चटणी, कालवलेलं मेतकूट, पंचामृत, कोशिंबीर, एक फोडभाजी, एक पालेभाजी, तळलेले पापड, भजी, कुरवड्या, कटाची आमटी, कढी, साधं वरण, सुधारस, लिंबाची फोड इ.इ. सुग्रास दागिन्यांनी वर्तुळाकार ताट सजलं की मधोमध येऊन विराजते ती लुसलुशीत पुरणपोळी! आणि याला म्हणतात ‘पुरणाचा स्वयंपाक!’ आणि हा जिला जमतो ती असते खरी सुगरण!
असा हा पुरणाचा स्वयंपाक श्रावणात, चार शुक्रवार, नागपंचमी, पोळा इ धरून किमान 5-6 वेळा तरी होतोच होतो. म्हणजे किमान मराठवाड्यात तरी असं चित्र आहे. मोठ्या शहरांनी आता यातलं फारसं काही उरलेलं नाही.. बहुतांश ठिकाणी तो आऊट ऑफ सिलबस होण्याच्या मार्गावर आहे. पण मराठवाड्यात तरी अजून तसं नाही. आला सण की शिजवा पूरण ही पॉलिसी अजून तरी इथे अस्तित्वात आहे. मराठवड्यातल्या देवांना पुरणाशिवाय दूसरा नैवेद्य चालतच नाही यावर आता माझा ठाम विश्वास बसलेला आहे. पण त्यामुळे मला वाटतं सणांची authenticity अनुभवता येते. साध्या श्रीखंड, खीर वगैरे क्षुद्र पदार्थांवर इथे सणांची बोळवण अजिबात होत नाही. आणि असा चारी-ठाव स्वयंपाक करणार्या निष्णात बायका इथे घरोघरी सापडतात. म्हणजे अर्थातच मी आधीच्या पिढी विषयी बोलतेय. माझ्यासारखा तरुण वर्ग अजून तरी ट्रेनिंग फेज मध्येच आहे. एकवेळ नुसती पुरणपोळी वगैरे करणं जमू शकतं, पण समग्र ‘पुरणाचा स्वयंपाक’ अतिशय कुशलतेने करून, म्हणजे एकीकडे तर्हे-तर्हेच्या फोडण्या देत दुसरीकडे योग्य consistency मध्ये पूरण वाटणं (हो, consistency फार महत्वाची असते.. पोळ्यांची कणीक आणि पूरण ह्यांची consistency सारखी असली तरच पुरण सगळीकडे सम-प्रमाणात पसरून सुंदर पोळी तयार होते) किंवा एकीकडे भजी तळत दुसरीकडे लुसलुशीत पोळ्या लाटणं आणि वर प्रसन्न मुद्रेने सगळ्यांना आग्रह करत जेवायला वाढण यासाठी नेक्स्ट लेव्हल ची स्किल्स असावी लागतात. हे साक्षात अन्नपूर्णेचच काम आहे॰
बरं या अशा सगळ्या प्रकारच्या चवी आणि रंगांनी संपन्न अशा आर्टिस्टिक स्वयंपाकाचा आवडीने आस्वाद घेणार्या मंडळींचीही इकडे वानवा नाही. बसल्या बैठकीला 3-4 मध्यम आकाराच्या, तुपात थबथबलेल्या पुरणपोळया, सोबतचे सगळे पदार्थ तोंडी लावत, घासागणिक अन्नपूर्णेच कौतुक करत खाणे आणि वर कटाची आमटी पैज लावून ओरपणे यालाही स्किल्सच असावी लागतात. माझ्या लहानपणी सणावारांना एकावेळी 15-20 माणसांची पंगत बसलेली आणि पैजा लागलेल्या मी पाहिल्या आहेत. एक-दोघी जणी वाढायला उभ्या आणि आई किंवा आजी सर-सर गोल गरगरीत पोळ्या लाटत बसलेल्या आणि आम्ही सगळे मस्त चेष्टा-मस्करीसह जेवतोय हे मनावर कायमचं कोरलं गेलेलं चित्र आहे. या बायका हे सगळं तेव्हा कसं पेलायच्या याचं आता नवल वाटतं.
महालक्ष्म्यांचा (म्हणजे गौरीचा, मराठवाड्यात महालक्ष्मी म्हणतात) स्वयंपाक तर अतिशय क्लिष्ट! वर उल्लेखलेले सगळे पदार्थ प्लस सोळा प्रकारच्या भाज्यांचा compulsory वापर, साखरभात, मसालेभात, साधा भात, सोवळयातल वळवट, त्याची खीर, उडीदाचे पापड इ.इ.इ.
बहुतेक वेळा बायकांचा दिवस जातो यात.
सध्याच्या वेगवान जगात जिथे बायका-मुली बाहेर पडून इतरही कामं करतायत तिथे आता हे सगळं जमवण थोडसं कठीणच आहे. पण वर्षातून एकदातरी हा असा सुग्रास स्वयंपाकाचा घाट घालून तो चाखण्याचा आनंद सगळ्यांनी अनुभवायलाच हवा असं वाटतं. बाहेर तर्हे-तर्हेच्या थाळ्यांचा आस्वाद घेत असताना आपली ही परिपूर्ण, मराठमोळी, चविष्ट पुरणा-वरणाची थाळी आपण नक्कीच जपायला आणि पुढच्या पिढीपर्यंत पोचवायला हवी..:)
सांज
www.chaafa.com
उगाच की.. त्याला कोण झोडपत
उगाच की.. त्याला कोण झोडपत आहे इथे.. त्याचे points खोडून काढणे म्हणजे झोडपणे असेल तर चर्चा च संपली.. माझ्या घरी मी कधी काय कसं बोलायचं ते बघीन च की मी.. इथलं नाही कोणी येणारे मदतीला.. तुम्ही नका काळजी करू..
दळणाला माझ्या
दळणाला माझ्या
जमल्या गं आयाबाया
मुठी मुठी धान्य
सोडितो ऋ. राया
अरे मी एकटाच गातोय ओव्या. या की सगळ्यांनी!
Submitted by सीमंतिनी on 19
Submitted by सीमंतिनी on 19 August, 2021 - 10:29>>
+ infinity. मधले काही प्रतिसाद म्हणजे "कठीण आहे" कॅटेगिरी आहेत. निरर्थक बडबड करत राहिली की लोक भलतीच चर्चा सुरू करतात. वेळ कसा घालवायचा हा प्रश्न सुटतो त्या लोकांचा असं वाटतं वाचून. I am glad I don't have as much time.
हायला, +१ किंवा +११ इ मिळाले
(No subject)
सी,काही गोष्टी स्वीकाराव्या
सी,काही गोष्टी स्वीकाराव्या लागतीलच ना!
आपणच हळुहळू खंबीर नको का व्हायला?( हे विधान वैयक्तिक नसून सरसकट आहे.)
(पहिली माझी ओवी गं च्या सुरात
(पहिली माझी ओवी गं च्या सुरात वाचणे ;))
@मोरोबा
पुरणात माझ्या गोडी गं
खरपूस, चविष्ट अन वडी गं
हवं तिथे मुळूमुळू अन
नको तिथे चुरुचुरु
मुळी न माझे धोरण गं
काय सांगावी जनरीत हो
शब्दांची नुसती घोडी हो
वाद कसला घालतोय कुठे
कुणा न कसले सूतक हो
ललित गेलं चुलीत गं
'गुळाची चव' तरी गोडच गं
दुसर्याचं ते कारटं अन
आपला तो बाळू
अशीच सारी गाणी गं ..
मला ते नेमक्या शब्दात सांगणं
मला ते नेमक्या शब्दात सांगणं जमलंच नसतं, आणि हेच शब्द आजपर्यंत खूप वेगवेगळ्या प्रसंगी वापरता आले असते मला स्वतःला. म्हणून infinity.
Glad it made your day.
बदल हा हळूहळूच होतो, पण प्रयत्नातलं सातत्य आवश्यक आहे. इथे काही मंडळी न थकता मुद्दयाला धरून दरवेळेला योग्य ठिकाणी आक्षेप नोंदवतात त्याचं कौतुक वाटतं. Good job!
या सगळ्यात सणांचे सगळे पदार्थ
या सगळ्यात सणांचे सगळे पदार्थ आरोग्यदायी आणि पौष्टिक हा मुद्दा कुठल्या कुठे गेला. त्यावर स्वतंत्र धागा हवा खरं तर.
देवकी, खंबीर व्हायला हवे
देवकी, खंबीर व्हायला हवे ह्याबद्दल दुमत नाही. आक्षेप 'तिचा प्रॉब्लेम आहे, तिलाच सोडवायला हवा; आम्ही किती आवडीने करतो' ही हात झटकायची भूमिका असते किंवा 'वन-अपमनशिप'चा प्रयत्न आहे त्याला आहे. ते भाडिपा मध्ये अनि हे पात्र 'माझ्याशी नीट बोलायचं' म्हणतो नेहमी, तसं सुनांना म्हणायची वेळ येते हे काय बरोबर नाही.

@ममो,
@ममो,
>>> मूळ लेखात सोवळं ओवळ, चव न घेणे , कुळाचार हे काही आलं आहे असं मला वाटत नाही. फक्त सोवळ्यातळ वळवट लिहिलं आहे बाकी कुठे सोवळ्याचा उल्लेख मला तरी दिसलेला नाही.
तुम्ही लोकांनी दिलेला twist आहे का किंवा तुमचं presumption आहे का हे ?
<<<
लेखातली ही वाक्यं वाचा:
>>>
श्रावणाची एंट्री ही समस्त महिला वर्गाच्या मनात धडकी भरवणारीच असते...
...म्हणजे एकीकडे तर्हे-तर्हेच्या फोडण्या देत दुसरीकडे योग्य consistency मध्ये पूरण वाटणं (हो, consistency फार महत्वाची असते.. पोळ्यांची कणीक आणि पूरण ह्यांची consistency सारखी असली तरच पुरण सगळीकडे सम-प्रमाणात पसरून सुंदर पोळी तयार होते) किंवा एकीकडे भजी तळत दुसरीकडे लुसलुशीत पोळ्या लाटणं आणि वर प्रसन्न मुद्रेने सगळ्यांना आग्रह करत जेवायला वाढण यासाठी नेक्स्ट लेव्हल ची स्किल्स असावी लागतात. हे साक्षात अन्नपूर्णेचच काम आहे॰...
...बहुतेक वेळा बायकांचा दिवस जातो यात
<<<
हे वाचल्यावर
१. एका घरातील साधारण किती जण मिळून हा स्वयंपाक करताहेत आणि वाढताहेत असं चित्र डोळ्यांसमोर उभं राहातं?
२. त्या चित्रात किती पुरुष सहभागी दिसतात आणि त्यांची भूमिका काय असते?
३. त्या स्वयंपाकाची पूर्वतयारी करायला किती अवधी मिळाला होता असा अंदाज करता येतो?
या प्रश्नांची जी उत्तरं आली असतील तीच का आली असावीत असं तुम्हाला वाटतं?
बरं यावर आक्षेप घेतल्यावर 'नसेल जमत तर नवर्यांची मदत घ्या, पुरणपोळी हे सर्वात पोषक मिष्टान्न आहे, कोकणस्थांना पुरणाचा घाट घालावा लागतो' वगैरे मुद्दे खुद्द धागाकर्तीनेच प्रतिसादांत लिहिणं यात तुम्हाला काही ट्विस्ट्स किंवा प्रिसम्प्शन्स दिसतात का?
बरोबर आहे सी!
बरोबर आहे सी!
पण सगळ्या/सगळेच ससा (समाज सुधारक) होऊ शकत नाही ना एकदम.मग प्रत्येकीने आपापली वाट काढायला हवी ना ? की त्यांच्यासाठी अजून कोणीतरी रस्ता तयार करायला हवा?
.मग प्रत्येकीने आपापली वाट
.मग प्रत्येकीने आपापली वाट काढायला हवी ना ? की त्यांच्यासाठी अजून कोणीतरी रस्ता तयार करायला हवा? >>बरेच कंगोरे आहेत या प्रश्नाला आणि उत्तराला पण.
तुम्ही rhetoric म्हणून विचारला असेल तरी माझे विचार लिहिते.
शिकल्या सवरलेल्या, सोशल मिडिया वापरणार्या स्त्रियांनी तरी फक्त आपली तेवढीच वाट काढून गप्प राहू नये. आपण जाणता अजाणता इतरांच्या मार्गात अडचणी आणत नाही ना ( नोकरी सांभाळून आम्ही नाही का केले सणवार किंवा एखाद दिवशी कुटुंबाच्या आनंदासाठी कष्ट केले तर काय बिघडलं इ. ) हे पहावे.
ओळखी पाळखीत / शेजारी / नात्यात इत्यादी कोणी आपल्या मागे काही पावले असेल ( नवीन लग्न, लहान मुल, ह्यांच्यात / त्यांच्यात असा फरक असलेले जोडपे असेल ) तर त्यांना आधाराचा , मदतीचा हात द्यावा. आपला मार्ग आपल्या आधी अनेकांनी थोड्याफार प्रमाणात सुकर केला आहे त्याची जाणीव असावी, ते थोडे पे इट फॉरवर्ड करावे .
आपापल्या घरातल्या लोकांशी प्रत्येकीला डील करावे लागतेच. आणि जमेल तसे प्रत्येक स्त्री करत असतेच. पण कोणी मदत करू नये , धीर देऊ नये अस थोडीच आहे
) तर त्यांना आधाराचा , मदतीचा
) तर त्यांना आधाराचा , मदतीचा हात द्यावा...... अरेरे !
प्रत्येकीने स्वतःपुरतीच वाट काढावी असे नव्हे तर स्वतःपासून सुरुवात नक्कीच करावी.अशा एकेक जण मिळूनच प्रवाह होईल हे अपेक्षित होते. संकुचित अर्थाने म्हटले नव्हते.तुम्हाला तसे वाटले हा माझ्या लेखनाचा दोष!
घरातलं फ्रुस्ट्रेशन इथल्या
घरातलं फ्रुस्ट्रेशन इथल्या लेखावर का? आणि सोवळं बद्दल घरात बदल करणं ज्यास्ती योग्य, कि असे लेख लिहूच नये, असे बोलणे.....
खर तर सगळ्यांनी मिळून नैवेद्द्य करावा, हे घरात सुरु करने जास्ती योग्य.......का सगळंच बंद करा +
सगळ्यांनीच बंद करा बोलणे.......
कूकिंग ला आपल्याकडे नेगेटिव्ह घेतलं जाते, पण its a necessary skill, आणि सगळ्यांनाच यायला हवे. घरातल्या मुलांना + नवऱ्याला इन्व्हॉल्व्ह करून नैवेद्द्य काय किंवा party/get-together करणं better.
प्रत्येक नवीन गोष्ट खालपर्यंत झिरपायला वेळ लागतोच, इथल्या लोकांच्या घरात बदल झाले तर बाहेरही घडतील.
प्रवेशपत्रिकेत कुठेच
प्रवेशपत्रिकेत कुठेच स्त्रियांनीच करावे असा आग्रह नव्हता.
>>>>
प्रवेशपत्रिकेत नसेना, पण जर ईथल्या नैवेद्य स्पर्धेला मिळालेला प्रतिसाद बघून जर ईथल्या एखाद्या नवर्याने आपल्या बायकोने तसा नैवेद्य करावा अशी अपेक्षा धरली वा एखाद्या सासूने आपल्या सुनेकडून ईतक्या नैवेद्याची अपेक्षा धरली तर त्याला स्पष्ट नाही म्हणने तिला जमेल का?
यापुढे सीमंतिनी यांचा प्रतिसाद कॉपीपेस्ट करतो
<<<< स्पष्ट नाही म्हणणे जमले तरी नंतर जो आफ्टरमॅथ होईल तो सोसण्याची हिंमत असेलच असे नाही. 'हिला कसली आवडच नाही' ह्या शेजार-पाजारी केलेल्या जननिंदेला सातत्याने तोंड देणे सोपे नसते. मुलांना तिच्याविरूद्ध चिथवणे (अमक्या ढमक्याची आई करते, तुमच्या आईला झेपतच नाही इ इ), माहेरच्यांना अपमानास्पद बोलणे (कसं बाई असतं एकेका घरात! इइइइइ.) इ इ तिचा पूर्ण सोशल स्फियर तिच्याविरूद्ध जाईल (काय तरी सासर तुझं... इतकी कटकट पेक्षा एक दिवस कर नि हो मोकळी...) इतके ड्रामे घडतात.
Submitted by सीमंतिनी on 19 August, 2021 - 19:59 >>>>>
आणि यालाच अनुमोदन देतो
मुळात जर या कुळाचारांचे डोक्युमेंटेशन वा त्याला मिळणारी प्रसिद्धी काही स्त्रियांना मारक ठरणार असेल तर मग त्या कुळाचारांना प्रसिद्धी देणारी, त्यांना ग्लोरीफाय करणारी स्पर्धा तरी का भरवायची? ती स्पर्धा नैवेद्य स्पर्धा या नावाखाली न भरवता ईतर पाककृती स्पर्धांसारखी पंचपक्वांनाचे ताट म्हणून घेता आली नसती का?
जर तुम्ही अश्या लेखांना डोक्युमेंटेशन म्हणून विरोध करता तर अश्या स्पर्धांनाही विरोध करा.
जर कोणी सार्वजनिक हळदीकुंकुवाचे कार्यक्रम आयोजित करत असेल तर त्यालाही विरोध करा. तिथेही कोणावर यायची जबरदस्ती केली नाही असा सूर नको.
लेखांना, अश्या स्पर्धांना, अश्या कार्यक्रमांना वेगवेगळे निकष लाऊ नका ईतकेच.
बाकी माझा पर्सनली त्या स्पर्धेला शून्य विरोध होता आणि आहे हे तिसर्यांदा नमूद करू ईच्छितो. मी हा मुद्दा फक्त ईतक्यासाठीच उचलला आहे की .........
पुन्हा एक ब्रेक घेतो. आता माझी कॉफी आणि भेळ करायची वेळ झाली आहे. या नादात कॉफीची चव बिघडली तर पुन्हा बायकोच्या शिव्या खाव्या लागतील
हाऊस वाईफ असेल आणि स्वयंपाक
हाऊस वाईफ असेल आणि स्वयंपाक करत असेल तर ऑब्जेक्षण काय आहे कळले नाही...
हाऊस हसबंड असेल तर त्यानेही घरकाम करावेच...
एखाद्या मुद्द्या वर तोंडा वर
एखाद्या मुद्द्या वर तोंडा वर आपटायला झाले की स्पर्धा वगैरे भलतेच काही मुद्दे घ्यायचे आणि स्व स्तुती मधे मधे पेरत स्वतःचा आणि ईतरांचा वेळ वाया घालवायचा.. किंवा सार्कॅझम म्हणुन म्हटले होते ते तुम्हालाच कळाले नाही अशी मुसंडी मारायची..
) 
चालू द्या.
मला सांज यांचे लेखन आवडते. त्यांनी खचून न जाता लेखन करत रहावे अशी आशा करते.
(ज्याने खचून जायला हवे तो उलट उड्या मारत अजून धागे काढतो
(ज्याने खचून जायला हवे तो उलट
(ज्याने खचून जायला हवे तो उलट उड्या मारत अजून धागे काढतो Wink ) >>>>>>>

मला सांज यांचे लेखन आवडते.
मला सांज यांचे लेखन आवडते. त्यांनी खचून न जाता लेखन करत रहावे अशी आशा करते.>>>>>> +१११११
^^^^^ या धाग्यावरचे प्रतिसाद
^^^^^ या धाग्यावरचे प्रतिसाद हे धागाकर्ता खचून जाऊ शकतो असे आले आहेत - पाँईट टू बी नोटेड
@च्रप्स,
हाऊस वाईफ असेल आणि स्वयंपाक करत असेल तर ऑब्जेक्षण काय आहे कळले नाही.
>>>>
कारण घरगुती कामात स्वयंपाकाला समाजाने दुय्यम दर्जा दिला आहे. घरातल्या कामाच्या वाटणीत ज्याच्या वाट्याला स्वयंपाक येतो त्या व्यक्तीचाही दर्जा दुय्यम हे सुद्धा ठरवले आहे. त्यामुळे एखादी व्यक्ती आवडीने स्वयंपाक काम निवडू हे शकते हे आपल्याला मान्य होत नाही.
याचा अर्थ असे नाही की समाजात नाईलाजाने स्वयंपाक लादलेल्या स्त्रिया नाहीतच. किंबहुना त्या आहेतच. आजच्या काळात स्त्री-पुरुष दोन्ही कमावते असतानाही जर स्वयंपाक वर्षानुवर्षे स्त्रियाच करतात म्हणून एकट्या स्त्रिच्याच गळ्यात तिच्या मनाविरुद्ध मारला जात असेल तर नक्कीच ते चूकच आहे. किंवा हाऊसवाईफ असणार्या स्त्री वरही तिच्या आवडीविरुद्ध आणि क्षमतेपेक्षा जास्त अतिरीक्त स्वयंपाकाचे ओझे टाकले जात असेल तरीही तो अन्यायच आहे.
पण म्हणून दुसरी बाजू नाकारायचा अट्टाहास नको. खास करून सध्याचा काळ स्त्रियाही कमावू लागल्याने बदलाचा आहे. ईथे प्रत्येक घरात तुम्हाला वेगळी केस मिळू शकते. त्यामुळे ओवरऑल सर्व समाजाला एकच निकष लाऊन कोणालाही जज करणे पहिले आता सोडायला हवे. शेजारच्या घरात डोकावून तिथे स्वयंपाकघरात कोण आहे केवळ एवढे बघून त्या घरात स्त्री-पुरुष समानता किती जपली जातेय याचे अंदाज बांधणे सोडायला हवे.
स्पष्ट नाही म्हणता येत नसेल
स्पष्ट नाही म्हणता येत नसेल तर खुशाल घासत बसावं. पण कुणी स्वतःच्या घरच्या, कम्युनिटीच्या चालीरितीत कसं काय असतं, जेवणंखावणं कशी असत/ आहेत, ईतर पद्धती बद्ल लिहीलं की लिहिणारी रिग्रेसिव, काय बाई नुसतं रांधा वाढा उष्टी काढा, हे असले लेख लिहितात म्हणुनच मला जबरदस्ती सगळं करावं लागतं अशा रडगाण्याला काय अर्थ आहे?
शिकल्या सवरलेल्या, सोशल
शिकल्या सवरलेल्या, सोशल मिडिया वापरणार्या स्त्रियांनी तरी फक्त आपली तेवढीच वाट काढून गप्प राहू नये. >>> आमचंही काही आयडीजचं हेच म्हणणं आहे. की आधी स्वतःपासुन तर सुरुवात करा मग समाजाला सुधारूयात. इतरवेळी तर आपणच म्हणतो की सुधारणेला स्वतःपासुन किंवा स्वतःच्या घरापासुन सुरुवात करावी. प्रत्येकाने आपल्यात योग्य बदल केले तर समाज बदलेल इ इ. आणि मग माझ्यात / माझ्या घराच्या विचारसरणीत बदल केल्यावर जे मागे राहिले आहेत त्यांना हात देता येईल. नाही तर मग आहेच ' लोका सांगे ब्रह्मज्ञान............'.
हे म्हणजे मला लोकांनी/ सासरच्यांनी नावं ठेऊ नयेत म्हणुन मी मनाविरुद्ध आदर्श सुन बनुन रहाणार आणि दुसरी मनापासून आनंदाने करते तिला सांगणार की तू पण करू नको, नाही तर माझ्याकडुन अपेक्षा केली जाते. म्हणजे माझ्यावर घरचे रितिरिवाजांची जबरदस्ती करतात म्हणून जिची आवड/श्रद्धा असेल तर तिनेही ते करू नये अशी जबरदस्ती मी करावी का?
बाकी मी लेख वाचला आणि मनात असे कुठलेही किंतु, शंका न येता मला आवडला.
अनायसे इतक दळण दळुन झालच आहे
अनायसे इतक दळण दळुन झालच आहे तर कोणी तरी पुरण घ्या वाटायला. सगळे जण मिळुन सामुहिक (आजकाल हा शब्द फारच बदनाम झालाय पुर्वी फक्त विवाह या साठी वापरला जायचा) पुरणपोळ्या बनवु या.
मीरा +1
मीरा +1
जेबॉ, आधीच लिहिलंय. नो ऊठसट पुपो. फक्त ओस्पिशियस वुडबर्निंग डे लाच.
नाही बाई! आज केल्या पुपो.किती
नाही बाई! आज केल्या पुपो.किती दिवस पुपो करीन करीन म्हणतेय आज केल्या एकदाच्या.शांत वाट्ले.
जपान ऑलिम्पिक मध्ये 'सुतावरून
जपान ऑलिम्पिक मध्ये 'सुतावरून स्वर्ग गाठणे' असा क्रीडाप्रकार असता तर माबोबायकांनी भारताला आणखी काही सुवर्णपदकं पटकावून दिली असती, असं आम्हाला राहून राहून या ठिकाणी वाटतंय.
मीरा +७८६
मीरा +७८६
पहिल्या पोस्टपासून हेच म्हणतोय.
स्त्रियांच्या समस्या मान्य आहेतच. पण दोष चुकीच्या कारणाला देत चुकीच्या जागी लढा द्याल तर सोल्युशन शून्य.
कालच थ्री ईडियट्स पाहिला
बाबा रणछोडदास म्हणतात, "कामयाब होने के लिये नही, काबिल होने के लिये पढो. एक्सलेंन्स का पीछा करो, सक्सेस झक मार के तुम्हारे पिछे आयेगी.."
ईथेही तेच लागू. स्त्री सक्षमीकरणाला सपोर्ट करा. एकदा समाजातील सक्षम स्त्रियांची टक्केवारी वाढू लागली की त्यांना दाबणे अवघड ते अशक्य होत जाणार.
मग एखाद्या स्त्री ला आपल्या आवडीने स्वयंपाक करणे आणि मर्जीने नकार देणे दोन्ही शक्य होईल.
मागच्या पानावर भरत यांच्या घरातल्या निर्णयात स्त्रियांना किती अधिकार असतो याबाबत उत्तर देताना मी आमच्या घरचे उदाहरण दिलेले. कि कसे माझ्यापेक्षा बायकोच जास्त निर्णय घेते आणि बरेचसे व्यवहार तीच बघते.
आता हे काय मी फार आदर्शवादी पुरुष वा नवरा आहे म्हणून नाही तर मला कल्पना आहे की ती माझ्यापेक्षा शंभर पट स्मार्ट आहे, तिचे कम्युनिकेशन स्किल माझ्यापेक्षा हजारपट जास्त आहे.
जर ते तसे नसते तर चित्र वेगळे असते
ऋन्मेष प्लस वन...
ऋन्मेष प्लस वन...
प्रत्येक घरात बॉस स्त्रीच असते, जरी बाहेर पब्लिक ला माहीत नसेल तरी..
नवरे बिचारे राब राब राबतात , भांडी घासणे, कपडे धुणे, भाज्या चिरून देणे, मुलांची शी शु साफ करणे, बाहेरची कामे करणे...
बायका फक्त त्या चिरलेल्या भाज्यांना फोडणी देतात आणि क्रेटिड घेतात स्वयंपाकाचे...
मीरा, सस्मित, Runmesh,
मीरा, सस्मित, Runmesh, manimihor, साधना यांना अनुमोदन
Pages