वेबसीरीज २

Submitted by sonalisl on 2 June, 2021 - 19:58

तुम्हाला कोणती मालिका आवडली, नाही आवडली, कुठे पाहिली, पाहता येईल त्यावर चर्चा वेबसीरीज. ( https://www.maayboli.com/node/65774 ) या धाग्यावर सुरू झाली. आता तिथली प्रतिसाद संख्या २०००+ झाल्यामुळे हा नवीन धागा..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

राणा नायडु - फडतुस. बंद केली ३ भागानंतर.

भरत. धन्यवाद. बोन्सबद्दल विचारलेलें मीच विसरले होते.

सोनी लिव्हवर 'गुल्लक' बरेच दिवस सजेशन्समध्ये येत होती, पण मी दुर्लक्श केलं होतं.

कालपासून बघायला सुरुवात केली. मस्त आहे, सिम्पल, नर्मविनोदी,
गीतांजली कुलकर्णीचा जरा जास्त चढा आवाज लागलाय. पण ते जाणीवपूर्वक असावं, पुढे त्या पात्राच्या ग्राफशी त्याचा संबंध असू शकतो.
थोरल्या मुलाचं काम करणारा कोण आहे, त्याची मी फॅन झालेय इन्स्टंटली.

गेल्या १-२ महिन्यांत दोन सीरीज बघायला सुरुवात करून सोडून दिल्या (असं मी क्वचित करते, त्यामुळे फारच वाईट वाटतंय)

द स्टेअरकेस - (प्राइम)
सिनॉप्सिस आणि कॉलिन फर्थमुळे बघायला सुरुवात केली. पण अर्ध्यावर कंटाळा आला.
कॉ.फ. एक लेखक असतो, पुढच्या स्थानिक निवणुकीतला उमेदवार असतो. एका रात्री त्याची बायको घरातल्या जिन्याच्या पायाशी मृतावस्थेत सापडते, जिन्यावरून घसरून पडली असावी असं मानायला जागा असते, पण काही पुरावे कॉ.फ.च्या विरोधात जाणारे असतात. त्याचा तपास सुरू होतो. हा भाग सत्यघटनेवर आधारित आहे. तसा इंटरेस्टिंग आहे.
एक डॉक्यु. मेकरला या खटल्यात रस निर्माण होतो, तो कॉ.फ.ला भेटतो आणि खटल्याशी संबंधित सगळ्या गोष्टींचं रेकॉर्डिंग करण्याची परवानगी मागतो. कोर्टातल्या खटल्याचं रेकॉर्डिंग करण्याचीही त्याला परवानगी मिळते.
इथून पुढे सिरीजचा फोकस डॉक्यु. मेकिंगवर गेला आहे. तिथपासून मला बोअर व्हायला लागलं.
सत्यघटना घडली होती, त्यावेळीही पुढे त्यावर डॉक्यु. आली होती म्हणे, तेच इथे दाखवलंय. सिरीजचा तोच उद्देश असेल कदाचित. पण मग त्याचा प्रोमो, टीझर, सिनॉप्सिस सगळं मिसलीडिंग आहे.

द ब्रिज - (प्राइम)
मूळ स्वीडिश/डॅनिश मालिका. स्वीडन आणि डेन्मार्कला जोडणारा खाडीपूल, त्या पुलावर जिथे दोन देशांची सीमा आहे, तिथे एक डेड बॉडी आणून टाकली जाते. दोन्ही देशांचे पोलीस मिळून तपास सुरू करतात. खुन्याला त्या भागातल्या एका सामाजिक समस्येकडे लक्ष वेधायचं असतं. ती समस्या पटण्यासारखी आहे.
मूळ भाषेतला ऑडिओ आणि इंग्रजी सबटायटल्स - असा ऑप्शन मला दिसला नाही. त्यामुळे इंग्रजी डबिंगसहित बघायला सुरुवात केली. डबिंग वाईट आहे, त्यामुळे आणि एकूण स्क्रिप्ट कॅची न वाटल्याने कंटाळा यायला लागला.

हो गुल्लकचे सगळे सिजन बेस्ट आहेत
फॅमिली एंटरटेनमेंट एकदम.
गीतांजली कुलकर्णी मराठी आहे हे कुठेही accent मधून लक्षात येत नाही.
तो धाकटा पण भारीय
आणि भोचक शेजारीण.

हॉटस्टारवर Will Trent नावाची डिटेक्टिव्ह सिरीज चालू आहे . दर शुक्रवारी नवीन एपिसोड येतो. प्रत्येक कथा एका एपिसोडमध्ये संपते . सगळ्यांचा अभिनय छान आहे

MH370 (Netflix) चे तीनही भाग बघितले.
बघताना खुप अस्वस्थ व्हायला झालं त्यामुळे एक भाग ही सलग बघु शकले नाही. मधे मधे थांबुन. आधीची माहिती डायजेस्ट करुन झाल्यावर पुढे असं करत बघितलं.
मुळात विमानप्रवासाचा मला फोबिया आहे. पण नाईलाजाने करावा लागतो तेव्हा पुर्णवेळ रामरक्षा म्हणतच प्रवास चालु असतो.त्यात अधे मधे टर्ब्युलन्स वगैरे आला तर झालंच मग. त्यामुळे बघावं का नाही असा विचार करत होते. पण ज्या गोष्टीचा फोबिया/भिती असते त्याबद्दल उत्सुकता पण असते आणि त्यामुळेच ही पुर्ण घटना, त्याच्या बातम्या सगळं मी तेव्हा पण फॉलो केलं होतं.

MH370 गायब होण्यामागे नक्की काय असावं याबद्दल गोळा केलेल्या माहितीनुसार ३ शक्यता यात मांडल्या आहेत.
खरतर यात स्पॉईलर असं काही नाहिये पण तरी ज्यांना कोर्‍या पाटीने सिरीज बघायची आहे त्यांनी पुढे वाचु नका:

MH370 हे मलेशिया वरुन चीन ला जाणारे विमान, मलेशिया एअरझोन मधुन व्हिएतनाम च्या एअरझोन भागात ट्रान्स्फर होणार होते, त्यावेळी कोणत्याही एअरझोन चा कंट्रोल नसलेल्या भागातुन जाताना अचानक हे विमान रडार वरुन नाहिसे झाले आणि त्याचा अद्याप शोध लागलेला नाही. Inmarsat या सॅटेलाईट सर्विस प्रोव्हायडर ने दिलेल्या डेटा नुसार ज्या वेळी विमान एका झोन मधुन दुसर्‍या झोन मधे जाणार होते तेव्हा अचानक विमानाने यु टर्न मारला आणि ते परत मलेशिया वरुन प्रवास करुन सरळ पुढे आले आणि साउन ईडियन ओशन च्या दिशेने डाविकडे वळले होते.या समुद्रात कुठेतरी ते कोसळले असावे असा त्यावरुन निष्कर्ष काढला गेला. या विमानाचे काही अवशेष पण या महासागरात सापडल्याचा दावा आहे पण काही स्वतंत्रपणे तपास करणार्‍या मंडळींना हे मान्य नाही आणी या सगळ्या अभ्यासातुन तीन शक्यता या सिरीज मधे मांडण्यात आल्या आहेत.
१. विमान जेव्हा मलेशिया एअरझोन मधुन व्हिएतनाम च्या एअरझोन भागात ट्रान्स्फर होणार होते तेव्हा विमानाच्या मुख्य पायलट ने जाणून बुजुन सर्व संपर्क यंत्रणा बंद केली आणि विमान यु टर्न मधे वळवले.केबिन मधला ऑक्शिजन पुरवठा बंद केला आणि शांतपणे दक्षिण हिंदी महासागरात विमान बुडवले.
२. विमानात असलेल्या काही रशियन व्यक्तींनी विमानाच्या पोटात असलेल्या ईलेक्ट्रॉनिक बे मधे जाउन कॉकपिट मधील सर्व यंत्रणेचा ताबा घेतला. कम्युनिकेशन बंद केले. ऑक्सिजन सप्लाय बंद केले आणि यु टर्न घेतलेले विमान साउथ ईंडियन ओशन कडे न वळवता नॉर्थ ला वळवुन पुढे कझाकस्तान च्या दिशेने नेले असावे.
३. या विमानात शेवट्च्या क्षणी स्कॅन न करता काही मोठ्या कार्गो (२.५ ट्न लिथियम बॅटरीज, ईलेक्ट्रॉनिक्स ई) लोड केल्या गेल्या होत्या आणि या कार्गो चीन ला जाणार होत्या. ज्यावेळी ही घटना घडली तेव्हा अमेरिका चीन मधे युद्धसराव चालु होते. अमेरिकन यंत्रणांना या कार्गो चा सुगावा लागला आणि त्यांना चीन ला जाण्यापासुन रोखण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. ज्यावेळी विमान मलेशिया एअरझोन मधुन व्हिएतनाम च्या एअरझोन भागात ट्रान्स्फर होणार होते त्यावेळी अमेरिकेच्या awacs planes (he E-3 Sentry is an airborne warning and control system, or AWACS, aircraft) नी MH370 चे सर्व कम्युनिकेशन्स बंद केले आणि कॅप्टन ला विमान लँड करायची आज्ञा दिली. पण कॅप्टन ने ऐकले नाही. त्यामुळे व्हिएतनाम एअरझोन मधे पोचायच्या आत हे विमान मिसाईल ने उडवण्यात आले.
या सगळ्या थीअरीज मांडताना त्याच्या मागची कारणं/पुरावे दिले आहेत ती पाहुन तिसरी थीअरी जास्त पटण्यासारखी आहे.

जे झाले असेल ते असेल पण भयंकर गोष्ट ही आहे की जे झाले ते काही शक्तींना, लोकांना माहिती आहे पण आपल्या प्रियजनांचे काय झाले हे त्यांच्या कुटूंबियांना अजुनही माहिती नाही.
अभ्यासपूर्ण आणि सर्व शक्यतांचा विचार करुन बनवलेली ही सिरीज ज्यांना ईंटरेस्ट असेल त्यांनी नक्की बघा.
विमानाचं काय झालं हा प्रश्ण आपल्यापुरता नक्की सुटेल.

MH370 डॉक्युमेंटरी काल आमच्याघरी बघत होते. मी जेवायला घेताना थोडी पाहिली. फार ऊदास ऊदास वाटू लागले. जेवताना नको बघायला म्हणून सोडली आणि आत जाऊन बसलो. जेवढी पाहिली तेवढी जेन्युईन वाटली. आवड असलेल्यांनी जरूर बघावी.

Staircase मी पण अर्ध्यात सोडली. कंटाळा आला.

370 बघायची आहे. सध्या बॉश सोडवत नाहीये Happy
गुल्लक छानच आहे. गीतांजलीची आई फार आवडली.
एकदम खमकी . त्रासलेली, रोज राबणारी गरीब बिचारी नाहीये.
प्रसंगी नवर्याला , मुलांना चांगलीच धारेवर धरते.

ऍटरनी वू पाहिली. ->=१११ कोरिअन फिल्म इंडस्ट्री बद्दलचा आदर खूपच वाढला . केसेस पण खूप वेग वेगळ्या घेतल्या आहेत . खूप लवकर संपली असे वाटले.

romantics पाहिली, आवडली पण यशराज सिनेमातील संगीत यावर जास्त काहीच बोलले नाहीत. आदित्य चोप्रा कधी मध्यमा समोर येत नाही पण इथे आलाय. YRF चे फारच वाईट दिवस आलेले दिसतात.
MH370 पाहून मलाच closure नाही मिळाला तर त्या कुटुंबीयांची काय अवस्था असेल.

राणा नायडु - नॉट टू बॅड. रे डानावनचं इण्डियन अ‍ॅडाप्टेशन बर्‍यापैकि जमलंय. थोडक्यात स्टोरीलाइन सांगायची झाली तर - ए फिक्सर रिटेन्ड बाय सेलब्रेटिज टु क्लिनप देर शिट बिफोर इट हिट्स द फॅन. यातल्या नागा नायडुचं काम मस्त आहे; क्रिस्प डायलॉग्ज, टायमिंग, डिलिवरी सगळंच मस्त. बाकि राणाचा रोल करणारा मिस्फिट वाटतो, शरद केळकर मस्त फिट झाला असता... Wink

ताज - Divided by blood पाहते आहे. अगदीच आवडत नाहीए कारण पात्रांच वागणं आणि भाषा ऐतिहासिक सिरिजला शोभेसं नाही. एपी 3 चालु झाला, पण कथाही अजुन पकड घेत नाही.

HBO वरच्या सिरीज hotstar वर दिसणार नाहीत ह्या महिन्यानंतर म्हणून हाऊस ऑफ ड्रॅगन बघून घे नवऱ्याला सांगितलं, तीन भाग बघितलेले त्याने, मी येता जाता. उरलेले सात मीही बघितले.

ती क्वीन होती तिने acting जबरदस्त केलीय, विशेषतः फेस acting आवडली, कसली गेम खेळते, आपल्या मुलाला किंग करते.

ती प्रिन्सेस कसली लफडेबाज दाखवली आहे. तिचा मुलगा मरतो का शेवटी, ज्याला खरंतर राजाने वारसदार म्हणून निवडलं होतं. मला वाटलं शेवटच्या भागात लढाई वगैरे दाखवतील, पण कसलं काय, दुसरा सिझन येणार.

किती ते गुंतागुंतीचे नातेसंबंध.

राणा नायडू बघायला घेतली, फा ने सांगितल्याप्रमाणे सगळे "चेकमार्क्स" असले तरी एकूण इन्टरेस्टिंग वाटली. रे डॉनॉवन मी पाहिलेली नाही.
त्या निमित्ताने वेन्कटेश, नागार्जुन , नागा चैतन्य, राणा डग्गुबाती हे एकमेकांशी जवळच्या नात्यात आहेत हे कळले Happy
प्रियामणी चा रोल फॅमिली मॅन मधल्या रोलसारखाच वाटला. राणा डग्गुबातीच्या अभिनया(?)बद्दल फा ला +१ Happy ९०ज मधला तेलगू हिरो वेंकटेश चे काम चांगले आहे. सुशांत सिंग पण आवडतो मला. तो लहान भावाचा रोल केलेला पण चांगला अ‍ॅक्टर आहे.

प्रियामणी चा रोल फॅमिली मॅन मधल्या रोलसारखाच>> ,ह्यात सुरवीन चावला आहे. पियामणी नाही. तसाही काय फरक पडतो म्हणा Happy

तिचा मुलगा मरतो का शेवटी, ज्याला खरंतर राजाने वारसदार म्हणून निवडलं होतं.
>>>>> राजाने वारसदार प्रिन्सेसला च निवडलेले होते.
ड्रॅगनवर परत येत असताना १ मुलगा मरतो/ राणीचा मुलगा मारतो खर तर

किती ते गुंतागुंतीचे नातेसंबंध.
>>>>> हो ना. ते उलगडण्यात सगळा सिजन खर्ची घातला आहे.
जरा कूठे कथानक वेगवान झालं अन सीजन च संपला Lol

तो लहान भावाचा रोल केलेला पण चांगला अ‍ॅक्टर आहे. >>> तो अभिषेक बॅनर्जी. इथे खूप वेगळा रोल आहे त्याला. तो जनरली नॉर्थच्या क्राइम सिरीज मधे असतो. मिर्झापूर मधे त्या मुन्नाचा वस्तर्‍याने कापणारा मित्र आहे तो. पाताल लोक मधे आणखी जबरी रोल आहे त्याचा. तेथेही किलर दाखवला आहे तो.

सुशांत सिंग मलाही आवडतो (तो "सत्या" मधे वस्तरा वापरायचा Happy ) . पुढच्या भागांमधे मालिका व संवाद जास्त हैदराबादी होत जातात. ते ही मजेदार आहे. आशिष विद्यार्थी व त्याच्या फॅमिलीचा अतरंगीपणा जबरी आहे Happy

राणाच्या मुलीचा ट्रॅक जरा बोअर आहे.

बॅनर्जी चांगला ऍक्टर आहे.

त्याला पहिल्यांदा आजी सिनेमात पाहिलेले आठवते, त्यात त्याने व्हिलन चा रोल उत्तम केला होता.

ड्रॅगनवर परत येत असताना १ मुलगा मरतो/ राणीचा मुलगा मारतो खर तर >>> हो ते समजलं.

राजाने वारसदार प्रिन्सेसला च निवडलेले होते. >>> हे नवऱ्याला समजलं, मला तिच्या मुलाला वाटलं. धन्यवाद आबा.

बॅनर्जी चा हाथोडा त्यागी चा रोल पण जबरदस्त होता.. मस्त ऍक्टर आहे तो. मला त्याच्यासाठी भेडिया पहायचा आहे..

Prime वर Happy Family - Conditions apply नावाची सिरीज पाहिली. रत्ना पाठक, अतुल कुलकर्णी, राज बब्बर, आयेशा जुल्का, सना कपूर, इत्यादी मंडळी आहेत. विनोदी मालिका आहे. संवाद मस्त. रत्ना पाठकचा कजाग सासूचा रोल मस्त केलाय.

एक एपिसोड पाहिला हॅप्पी फॅमिली चा.रत्ना पाठक शाह सॉलिड.अतुल कुलकर्णी अजून तरी जरा सटल आहे.राज बब्बर एकदम वेगळ्याच रोल मध्ये.
धमाल वाटतंय बघून.

हॅप्पी फॅमिली बघतोय सध्या
मजा येतेय
अतुल कुलकर्णीचे आणि रत्ना पाठकचे संवाद फार फार भारी आहेत.
काही ठिकाणी फुटायला होईल अशी सिच्युएशनल कॉमेडी.
पाहिले एक 2 एपिसोड टोन सेट करण्यात स्लो झालेत.

ये तो उसकी पेहचान है Happy >>>> या व्यतिरिक्त कधी आणि कशात असा रोल केलाय ? माहितीसाठी विचारले आहे.

Pages