नुकताच मराठी म्हणींच्या धाग्यावर ‘उसापोटी कापूस जन्मला’ या म्हणीचा अर्थ विचारला गेला होता. त्यावर शोध घेताना मला रोचक माहिती मिळाली. वास्तविक सदर म्हणीत ‘कापूस’ शब्द नसून ‘काऊस’ हा शब्द आहे. त्याचा अर्थ ‘उसाच्या शेंड्याचा नीरस भाग किंवा कुचकामाचा माणूस’. ‘काऊस’ हा जरा विचित्र शब्द असल्याने याचा कापूस असा सोयीस्कर अपभ्रंश झाला असावा.
या निमित्ताने मनात एक कल्पना आली. वरील म्हणीप्रमाणेच आपल्या भाषेत अनेक शब्द, म्हणी अथवा वाक्प्रचार यांचे अपभ्रंश कालौघात रूढ होतात. त्याची अशी काही कारणे संभवतात :
१. एखादा मूळ शब्द उच्चारायला कठीण असतो
२. तो लोकांत खूप अपरिचित असतो, किंवा
३. भाषेच्या विविध बोली अथवा लहेजानुसार त्यात बदल संभवतात.
म्हणी आणि वाक्प्रचार हे कित्येक शतकांपासून भाषेत रूढ आहेत. तेव्हा त्यांचे विविध अपभ्रंश नक्की कधी झाले हे समजणे तसे कठीण असते. मात्र एकदा का ते रूढ झाले, की त्या पुढील पिढ्यांना तेच जणू मूळ असल्यासारखे भासतात. त्यातून बरेचदा संबंधित म्हणीचा अर्थबोध होत नाही. काहीसे बुचकळ्यात पडायला होते तर काही वेळेस काही शब्द हास्यास्पद भासतात. मग या अपभ्रंशांची नवनवीन स्पष्टीकरणे सामान्यांकडून दिली जातात आणि त्यातून काहीतरी नवेच रूढ होते. काही अपभ्रंशांच्याबाबत विविध शब्दकोश आणि भाषातज्ञात देखील मतांतरे अथवा मतभेद असतात. असे काही वाचनात आले की एखाद्या भाषाप्रेमीचे कुतूहल चाळवते. तो त्याचा अधिकाधिक शोध घेऊ लागतो. अशाच काही मजेदार बदल अथवा अपभ्रंशांची जंत्री करण्यासाठी हा धागा.
माझ्या माहितीतील काही उदाहरणांनी (संदर्भासह) सुरुवात करून देतो. नंतर इच्छुकांनी भर घालत राहावी.
…
१. आठराविश्वे दारिद्र्य
अर्थ : पूर्ण दारिद्र्य
आता १८ ‘विश्वे’ कोणती असा प्रश्न पडतो.
त्याची २ स्पष्टीकरणे मिळाली :
अ) वीस विश्वे (विस्वे) पैकीं अठराविश्वे म्हणजे जवळ जवळ पूर्ण दारिद्र्य. = १८/ २०
(https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BF%...)
ब) 'अठरा विसा' याचा अर्थ १८ x २० = ३६० दिवस, असा होतो. ३६० दिवस म्हणजे एक वर्ष. वर्षाचे सर्व दिवस, सदासर्वकाळ दारिद्रय घरात वसतीला असणे, यालाच 'अठरा विश्वे दारिद्रय' म्हणतात (हणमंते, श्री०शा० १९८० : संख्या-संकेत कोश. प्रसाद प्रकाशन, पुणे)
http://maparishad.com/content/%E0%A4%85%E0%A4%A0%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A...
आहे की नाही गम्मत ! गणितानुसारही चक्क २ वेगळे अर्थ झाले :
१८/२० आणि
१८ गुणिले २० !
२. पुराणातली वांगी पुराणात
अर्थ : उपदेश नुसता ऐकावा, करताना हवे ते करावे ( शब्दरत्नाकर).
आता इथे भाजीतील ‘वांगी ’ कुठून आली हा अगदी स्वाभाविक प्रश्न. मी यासाठी शब्दरत्नाकर व बृहदकोश दोन्ही पाहिले असता त्यात ‘वांगी’ च स्पष्ट लिहिलेले आहे. मात्र ‘वांगी’ हा वानगीचा अपभ्रंश असल्याचे संदर्भ मिळतात. उदा :
“यातला मूळ शब्द ‘वानगी’ म्हणजे नमुना हा असावा, ज्याचा नंतर ‘वांगी’ हा अपभ्रंश झाला, असे काही भाषातज्ज्ञांचे मत आहे”.
https://www.loksatta.com/vishesh-news/scientific-research-in-indian-myth...
३. उंसाच्या पोटीं काऊस जन्मला
= हिर्याच्या पोटीं गारगोटी. [सं. कु + इक्षु]
https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%8A%E0%A4%B8
इथे कापूस या अपभ्रंशांने खरेच बुचकळ्यात पडायला होते. ऊस श्रेष्ठ असेल तर कापूस कनिष्ठ कसा?
४. परोक्ष
मूळ अर्थ :
एखाद्याच्या पाठीमागें, गैरहजेरींत; डोळ्या-आड; असमक्ष.
मात्र व्यवहारात त्याचा वापर बरोबर उलट अर्थाने ( समक्ष) केला जातो !
हा पाहा संदर्भ :
“अडाणी माणसें परोक्ष याचा समक्ष या अर्थीं उपयोग करतात व असमक्ष करितां अपरोक्ष योजतात”.
(https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%95%...)
५. मेत(थ)कूट
याचा सर्वपरिचित अर्थ हा:
तांदूळ, निरनिराळ्या डाळी, मोहऱ्या, मेथ्या इ॰ एकत्र दळून केलेलें पीठ व त्यांत दहीं घालून तयार केलेलें एक रुचकर तोंडीलावणें.
यात मेथ्या असल्याने ते खरे मेथकूट आहे.
पण, ‘मेतकूट जमणे / होणे’ याचा उगम मात्र मित्र + कूट असा आहे.
मेळ; एकी; दृढ मैत्री. 'शिंदे, बाळोबा व भाऊ यांचें मेतकूट झालें होतें.' -अस्तंभा ९६. [सं. मिथः कूट; मित्र-प्रा. मित + कूट] (वाप्र)
दाते शब्दकोश
https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95%...
......
वानगीदाखल मी काही वर दिले आहे.
येउद्यात अजून असे काही. चर्चा रोचक असेल.
**************************************
वावे
वावे
चांगला प्रश्न ! मी देखील आधीच पाहून ठेवले होते.
आगर' व 'आकर
ते दोन्ही शब्द बृहदकोशात एकाच पानावर आहेत. त्यांचा एक अर्थ समान आहे पण अन्य अर्थछटा वेगळ्या
आहेत:
https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%86%E0%A4%95%E0%A4%B0
आगर (आकर S) वरूनच आलेला दिसतो
ह पा
ह पा
**दोन वेगळ्या पद्धतींनी समासविग्रह केल्याने हा आता द्व्यर्थी झाला आहे
>>> सुंदर विश्लेषण !
१) आकर हा शब्द म्हणजे कडधान्य
१) आकर हा शब्द कडधान्य भिजवून आणलेले मोड किंवा नुसतेच कोंब, मोड, अंकुर ह्या अर्थाने वापरलेला ऐकला आहे.
२) आगार हा शब्द अलीकडे डेपो ह्या शब्दाचा समानार्थी म्हणून वापरात आणला गेला आहे.
३) भांडार, भंडार म्हणजे गोदाम किंवा वखार.
बंदरात बाहेरगावचा माल उतरतो. तो गोदामात ठेवतात. बंदर ही गलबते किनाऱ्याला लागण्याची जागा. मालाच्या वखारी/ भांडारे बांधलेली असण्याची/ समुद्री व्यापार चालवण्याची जागा.
त्या भांडारांतल्या मालावर देखरेख ठेवणारे, त्याचे रक्षण करणारे सशस्त्र लोक म्हणजे भंडारी/भांडारी.
४) आगार राखणारे ते आगारी/ आगरी. (असावेत.)
अशा तऱ्हेने आगरी भंडारी हे साधारण समान पेशाचे लोक होते असावेत. कदाचित मोकळ्या जागेवर उतरलेला माल आणि बांधलेल्या गोदामात ठेवलेला माल ह्याची निगा आणि देखभाल वेगवेगळ्या पद्धतीने होत असावी, अर्थात तश्या वेगळ्या पद्धती कराव्या लागल्या असाव्यात. उघड्यावरचा आणि बंदिस्त माल ह्यांच्या हाताळणीत फरक होता असणारच. मुळात मालाचेही वर्गीकरण त्याप्रमाणे होत असणार. म्हणजे उघड्यावर ठेवला तरी लवकर खराब न होणारा माल आणि जमिनीवर उतरवल्यावर लगेच बंदिस्त करावा लागणारा माल. त्यानुसार दोन वेगवेगळे पेशे निर्माण झाले असावेत.
बंदरगाह हा पर्शियन शब्द. शब्द कोशानुसार मूळ कदाचित बंद दार ( gate, गाह)आणि पुढे माझी जोडणी गृह.
असा समंदे - तलाश कुठेही दौडवायला मजा येते.
.
एसटीचा डेपो याअर्थाने आगार हा
एसटीचा डेपो याअर्थाने आगार हा शब्द मी माझ्या लहानपणापासून वाचलेला आहे. म्हणजे तीस-पस्तीस वर्षं. अलीकडे म्हणजे किती वर्षांपासून वापरात आणला गेला आहे?
आगर हा शब्द कोकणात वाडी, म्हणजे बागायत, याअर्थानेही वापरतात.
दिवेआगरचं नाव बऱ्याच वेळा दिवेआगार असं चुकीचं लिहिलेलंही पाहिलं आहे.
आगरी-भंडारी हे रोचक आहे.
छान मुद्दे आणि चर्चाबंदरगाह>>
छान मुद्दे आणि चर्चा
बंदरगाह>>
यावरून पोर्तुगीजांनी त्यांच्या भाषेत मुंबईला दिलेले नाव आठवले
बाम + बाही अर्थात
सुंदर बंदर
वावे, तीस पस्तीस वर्षे म्हणजे
वावे, तीस पस्तीस वर्षे म्हणजे अलीकडेच !
शुद्धलेखनाचे नियम बदलून, अनेक अनुस्वार काढून टाकून, नपुंसक लिंग न ओळखता येण्यासारखे करून आता जवळजवळ साठ वर्षे होतील! आणि ख मधले र आणि व वेगवेगळे होते ते एकत्र आणूनही बराच काळ लोटला की!
बाँ ( बॉम्) बहिया.
बाँ ( बॉम्) बहिया.
मला वाटते हे बंदराचे वर्णन आहे. बंदराला दिलेले नाव नसावे.
असे फार वर्षांपूर्वी वाचले आणि लिहून ठेवले होते की मूळ कागदपत्रांमध्ये ह्यातल्या बाँ वर एक आडवी रेघ की कायसे आहे त्यामुळे तो शब्द स्त्रीलिंगी की कायसा होतो जो त्या काळात पोर्त्युगीजमध्ये तसा नसे. म्हणजे व्याकरण दृष्ट्या अशुद्ध. किंवा वेगळा अर्थ दाखवणारा. आता त्यामुळे शब्दाचे लिंग बदलले की वचन ते काही आठवत नाही. टिपणांच्या वह्यासुद्धा जीर्ण होऊन, विरून, दमट होऊन गेल्या. शाई अस्पष्ट होऊन पुसली गेली. उरलेसुरले सगळे जुने कागद २००५ जुलै २६ ला समुद्रास्तृप्यंतु झाले.
ओह! धन्स.
ओह! धन्स.
आगर आणि आकर समान अर्थ असलेले
आगर आणि आकर समान अर्थ असलेले दोन शब्द बघून 'प्रकट आणि प्रगट' आठवले. फक्त उच्चारायला सोपा जावा म्हणून 'प्रगट' हा शब्द जास्त प्रचलित आहे. आगर म्हणजे 'साठा' हेच माहिती होते.
सागर शब्द स+ आगर असा संधीविग्रह होतो ना.
रत्नाकर त्याचाही रत्न + आकर , दोन्ही शब्दांचा अर्थ समुद्र .
हीरा यांच्या पोस्टवरुन वेगळे अर्थ कळले.
-------
बाम + बाही अर्थात
सुंदर बंदर >>>>>
हे फार मस्त आहेे.
उरलेसुरले सगळे जुने कागद २००५
उरलेसुरले सगळे जुने कागद २००५ जुलै २६ ला समुद्रास्तृप्यंतु झाले.>>> अरेरे
भंडारी लोक नाविक असतात. https
भंडारी लोक नाविक असतात. https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%AD%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BE%...
शंकराला भंडारी का म्हणत असतील?
तीस पस्तीस वर्षे म्हणजे
तीस पस्तीस वर्षे म्हणजे अलीकडेच >>बरं बरं
काळ हा सापेक्ष असतो.
चिडकू, वरची लिंक पाहिली. त्यात एक अर्थ 'माडी काढणारे' असाही आहे. श्री.ना.पेंडशांच्या 'तुंबाडचे खोत'मध्ये त्यांनी हे लिहिल्याचं आठवतंय.
शिव भोला भंडारी.
शिव भोला भंडारी.
भंडार हे भांडारचे हिंदी मराठी रूप. हिंदीत भंडारी म्हणजे कोठाराचा, खजिन्याचा, कोठीचा रक्षणकर्ता, राखणदार. शिव हा अधिकाराने इतका मोठा असूनही खूप साधाभोळा आहे, असा अर्थ कदाचित असावा. दुसरे म्हणजे खंडोबाचे दैवत हे शिवरूपी मानतात. तिथे
' भंडारा' उधळतात. अर्थात ह्या दोघांचा अर्थाअर्थी काही संबंध दिसत नाही. पण हळद उधळणे हे सोने उधळण्याचे प्रतीक आहे असे लोकपरंपरांचे काही अभ्यासक मानतात, त्यानुसार खजिन्याच्या अध्यक्षाला सोनेनाणे देऊन संतुष्ट केले जाते असे म्हणता येईल. पण अर्थाची खूपच ओढाताण करावी लागतेय.
भंडाऱ्याचा (भंडारा या शब्दाचा
भंडाऱ्याचा (भंडारा या शब्दाचा) अर्थ अन्नदान असा सुद्धा आहे.
सृष्टी निर्माण केली तेव्हा सगळे मांस खाउ लागले, ब्रम्हदेवाने मग शंकराला उपाय करायला सांगितला आणि शंकराने मग सर्व प्राणीमात्रांना खाता येईल असे विविध अन्न (वनस्पतीं) निर्माण केले म्हणुन ब्रह्मदेवाने त्याला भंडारी म्हटले अशी दंतकथा आहे.
@वावे कोकणातले भंडारी हे माडी
@वावे कोकणातले भंडारी हे माडी वरून आले असणे जास्त योग्य वाटतंय.
उत्तरेत भंडारी एक जात आहे कुमाऊ राजपुतांमध्ये. कुठेतरी राजाला भंडारी म्हणायची पद्धत असल्याचे वाचलंय. शिव हा भोळा राजा आहे हे जास्त योग्य वाटतय. पण काही संदर्भ मिळत नाही.
@हीरा भंडारा हा सूर्याचे
@हीरा भंडारा हा सूर्याचे प्रतीक म्हणून उधळतात. सूर्य > सोने > भंडारा
राजा हा सूर्याचा अंश म्हणून त्याचा जन्म हिरण्यगर्भातून झालाय म्हणून सोने आणि सोन्याला पर्याय म्हणून त्याला भंडारा लावतात.
हळदीला भंडार का म्हणायचे आणि त्याचा राजा या अर्थाबरोबर काय संबंध आहे हे फारच इंटेरेस्टिंग दिसतंय.
मापृ, होय.भंडारा म्हणजे
मापृ, होय.भंडारा म्हणजे अन्नदान हा एक ठळक अर्थ आहेच. शिवाय कोठी म्हणजे स्वयंपाकाच्या साधनांचे,कच्च्या अन्नधान्याचे कोठार. त्याचा अध्यक्ष किंवा मुख्याधिकारी म्हणजे भंडारी असा एक अर्थ शब्दकोशात दिला आहे.
एका शब्दाच्या वेगवेगळ्या
एका शब्दाच्या वेगवेगळ्या अर्थांचा एकमेकांशी संबंध जोडणं , त्यांच्या व्युत्पती इ. प्रकार मला फारच ओढूनताणून केलेले वाटतात.
भाषा ही अनेक प्रवाहांचा संगम आहे. तो प्रवाह काल-प्रदेश यांनुसार बदलत जातो. अशा दोन्ही गोष्टी आहेत.
सहमत आहे भरत.
सहमत आहे भरत.
महाराष्ट्रात सुजय हे नाव खूप
महाराष्ट्रात सुजय हे नाव खूप मुलांचे आढळते. परंतु दुर्जय कधी ऐकले नव्हते.
परवा एका बंगाली लेखकांचे नाव दुर्जय असे पाहिले. म्हणून कुतूहल चाळवले.
दुर्जय = अजिंक्य, दुर्भेद्य
(दूर + जय ).
दु म्हणजे वाईट हा माझा गैरसमज होता ; नेहमीच त्याचा अर्थ वाईट असा नाही. शब्दाच्या फोडीनुसार घ्यावा लागेल.
मग पुढे जाऊन दुर्योधनचा अर्थ शोधला. शब्दकोशात काही मिळाला नाही परंतु जालावरील वृत्तपत्र किंवा ब्लॉग संदर्भात तो असा दिलेला आहे :
‘लढण्यास कठीण’, ‘हरवण्यास कठीण’
(https://divyamarathi.bhaskar.com/news/MAG-raghuvir-kul-article-about-dur...)
म्हणजेच,
त्याची फोड दूर + योधन (= युद्ध)
https://hi.wikipedia.org/wiki/%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4...(%20%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%A4%20%3A%20%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%A7%E0%A4%A8%20%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%20%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%95%E0%A5%87,%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%82%20%E0%A4%B8%E0%A4%AC%E0%A4%B8%E0%A5%87%20%E0%A4%AC%E0%A4%A1%E0%A4%BC%E0%A4%BE%20%E0%A4%95%E0%A5%8C%E0%A4%B0%E0%A4%B5%20%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A5%A4
वरील संदर्भात एक शंका :
वरील संदर्भात एक शंका :
दुर्जन हा सज्जनचा विरुद्धार्थी शब्द असतो.
तसा सुजयचा विरुद्धार्थी करायचा झाल्यास तो काय होईल ?
..
दु = अभाव, निकृष्टपणा, दुष्टपणा इ॰ कांचें वाचक दुर् उप सर्गाबद्दल समासांत योजावयाचे मराठी रूप. जसें:-दुकाळ = दुष्काळ; वाईट काळ; दुबळा = बलहीन; दुर्बळ. [सं. दुर्; दु; दुस्; प्रा. दु]
https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%A6%E0%A5%81%3A
https://dsal.uchicago.edu/cgi
https://dsal.uchicago.edu/cgi-bin/app/date_query.py?qs=%E0%A4%A6%E0%A5%8...
उपसर्गघटित शब्द आणि सामासिक शब्द वेगळे ना? सा मासिक शब्दातले प्रत्येक पद स्वतंत्रपणे वापरता येते. उपसर्ग नाही.
सुजय असा शब्द आहे का? नाव म्हणून ठेवलेले सगळेच शब्द अर्थपूर्ण असतात असं नाही.
भरत मुद्दा समजला. धन्यवाद !
भरत
मुद्दा समजला. धन्यवाद !
सुजय असे सामान्यनाम मराठीत
सुजय असे सामान्यनाम मराठीत दिसत नाही पण हिंदीत दिसतंय :
https://educalingo.com/mr/dic-hi/sujaya
दूर + जय, दूर + योधन : अशी
दूर + जय, दूर + योधन : अशी फोड पहिल्यांदा पाहिली.
दूर = अत्यंत कठिन, योधन : हे सुद्धा.
दु: चा तसा अर्थ आहे आणि या विसर्ग र् संधी आहेत असे वाटते.
विसर्गाच्या मागे अकारांत किंवा आकारांत स्वर
असल्यासनसल्यास विसर्गाचा र् होतो.हो. हिंदीत सुजय आहे
हो. हिंदीत सुजय आहे
भरत यांनी दिलेली लिंक आता नीट
भरत यांनी दिलेली लिंक आता नीट वाचली.
सामासीक शब्दांबाबत माझाही चांगलाच गोधळ होता/आहे हे लक्षात आले. त्यातील बऱ्याच शब्दांना संधी समजत होतो.
अकारांत किंवा आकारांत स्वर >>
अकारांत किंवा आकारांत स्वर >> तुम्हाला अ किंवा आ स्वर म्हणायचं आहे. अकारांत किंवा आकारांत वर्ण किंवा अक्षरे किंवा शब्द असतात, ज्यांच्या (शब्द असेल तर शेवटच्या अक्षरातल्या) व्यंजनांच्या अंती हे स्वर येतात.
हपा, बरोबर. अकारांत किंवा
हपा, बरोबर. अकारांत किंवा आकारांत अक्षर नसल्यास, ( अ किंवा आ हा स्वर नसल्यास). असे म्हणायचे आहे. आणि पुढे मृदू वर्ण आल्यास विसर्ग र् संधी.
अकारांत स्वर म्हणजे पिवळे पितांबर सारखे झाले.
पण मग दुर्जय मध्ये अकारांत
पण मग दुर्जय मध्ये अकारांत अक्षरच आहे की!
Pages