नुकताच मराठी म्हणींच्या धाग्यावर ‘उसापोटी कापूस जन्मला’ या म्हणीचा अर्थ विचारला गेला होता. त्यावर शोध घेताना मला रोचक माहिती मिळाली. वास्तविक सदर म्हणीत ‘कापूस’ शब्द नसून ‘काऊस’ हा शब्द आहे. त्याचा अर्थ ‘उसाच्या शेंड्याचा नीरस भाग किंवा कुचकामाचा माणूस’. ‘काऊस’ हा जरा विचित्र शब्द असल्याने याचा कापूस असा सोयीस्कर अपभ्रंश झाला असावा.
या निमित्ताने मनात एक कल्पना आली. वरील म्हणीप्रमाणेच आपल्या भाषेत अनेक शब्द, म्हणी अथवा वाक्प्रचार यांचे अपभ्रंश कालौघात रूढ होतात. त्याची अशी काही कारणे संभवतात :
१. एखादा मूळ शब्द उच्चारायला कठीण असतो
२. तो लोकांत खूप अपरिचित असतो, किंवा
३. भाषेच्या विविध बोली अथवा लहेजानुसार त्यात बदल संभवतात.
म्हणी आणि वाक्प्रचार हे कित्येक शतकांपासून भाषेत रूढ आहेत. तेव्हा त्यांचे विविध अपभ्रंश नक्की कधी झाले हे समजणे तसे कठीण असते. मात्र एकदा का ते रूढ झाले, की त्या पुढील पिढ्यांना तेच जणू मूळ असल्यासारखे भासतात. त्यातून बरेचदा संबंधित म्हणीचा अर्थबोध होत नाही. काहीसे बुचकळ्यात पडायला होते तर काही वेळेस काही शब्द हास्यास्पद भासतात. मग या अपभ्रंशांची नवनवीन स्पष्टीकरणे सामान्यांकडून दिली जातात आणि त्यातून काहीतरी नवेच रूढ होते. काही अपभ्रंशांच्याबाबत विविध शब्दकोश आणि भाषातज्ञात देखील मतांतरे अथवा मतभेद असतात. असे काही वाचनात आले की एखाद्या भाषाप्रेमीचे कुतूहल चाळवते. तो त्याचा अधिकाधिक शोध घेऊ लागतो. अशाच काही मजेदार बदल अथवा अपभ्रंशांची जंत्री करण्यासाठी हा धागा.
माझ्या माहितीतील काही उदाहरणांनी (संदर्भासह) सुरुवात करून देतो. नंतर इच्छुकांनी भर घालत राहावी.
…
१. आठराविश्वे दारिद्र्य
अर्थ : पूर्ण दारिद्र्य
आता १८ ‘विश्वे’ कोणती असा प्रश्न पडतो.
त्याची २ स्पष्टीकरणे मिळाली :
अ) वीस विश्वे (विस्वे) पैकीं अठराविश्वे म्हणजे जवळ जवळ पूर्ण दारिद्र्य. = १८/ २०
(https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BF%...)
ब) 'अठरा विसा' याचा अर्थ १८ x २० = ३६० दिवस, असा होतो. ३६० दिवस म्हणजे एक वर्ष. वर्षाचे सर्व दिवस, सदासर्वकाळ दारिद्रय घरात वसतीला असणे, यालाच 'अठरा विश्वे दारिद्रय' म्हणतात (हणमंते, श्री०शा० १९८० : संख्या-संकेत कोश. प्रसाद प्रकाशन, पुणे)
http://maparishad.com/content/%E0%A4%85%E0%A4%A0%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A...
आहे की नाही गम्मत ! गणितानुसारही चक्क २ वेगळे अर्थ झाले :
१८/२० आणि
१८ गुणिले २० !
२. पुराणातली वांगी पुराणात
अर्थ : उपदेश नुसता ऐकावा, करताना हवे ते करावे ( शब्दरत्नाकर).
आता इथे भाजीतील ‘वांगी ’ कुठून आली हा अगदी स्वाभाविक प्रश्न. मी यासाठी शब्दरत्नाकर व बृहदकोश दोन्ही पाहिले असता त्यात ‘वांगी’ च स्पष्ट लिहिलेले आहे. मात्र ‘वांगी’ हा वानगीचा अपभ्रंश असल्याचे संदर्भ मिळतात. उदा :
“यातला मूळ शब्द ‘वानगी’ म्हणजे नमुना हा असावा, ज्याचा नंतर ‘वांगी’ हा अपभ्रंश झाला, असे काही भाषातज्ज्ञांचे मत आहे”.
https://www.loksatta.com/vishesh-news/scientific-research-in-indian-myth...
३. उंसाच्या पोटीं काऊस जन्मला
= हिर्याच्या पोटीं गारगोटी. [सं. कु + इक्षु]
https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%8A%E0%A4%B8
इथे कापूस या अपभ्रंशांने खरेच बुचकळ्यात पडायला होते. ऊस श्रेष्ठ असेल तर कापूस कनिष्ठ कसा?
४. परोक्ष
मूळ अर्थ :
एखाद्याच्या पाठीमागें, गैरहजेरींत; डोळ्या-आड; असमक्ष.
मात्र व्यवहारात त्याचा वापर बरोबर उलट अर्थाने ( समक्ष) केला जातो !
हा पाहा संदर्भ :
“अडाणी माणसें परोक्ष याचा समक्ष या अर्थीं उपयोग करतात व असमक्ष करितां अपरोक्ष योजतात”.
(https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%95%...)
५. मेत(थ)कूट
याचा सर्वपरिचित अर्थ हा:
तांदूळ, निरनिराळ्या डाळी, मोहऱ्या, मेथ्या इ॰ एकत्र दळून केलेलें पीठ व त्यांत दहीं घालून तयार केलेलें एक रुचकर तोंडीलावणें.
यात मेथ्या असल्याने ते खरे मेथकूट आहे.
पण, ‘मेतकूट जमणे / होणे’ याचा उगम मात्र मित्र + कूट असा आहे.
मेळ; एकी; दृढ मैत्री. 'शिंदे, बाळोबा व भाऊ यांचें मेतकूट झालें होतें.' -अस्तंभा ९६. [सं. मिथः कूट; मित्र-प्रा. मित + कूट] (वाप्र)
दाते शब्दकोश
https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95%...
......
वानगीदाखल मी काही वर दिले आहे.
येउद्यात अजून असे काही. चर्चा रोचक असेल.
**************************************
संवादाला भाषेपेक्षा जास्त
संवादाला भाषेपेक्षा जास्त काहीतरी गरजेचे असते, नाहीतर ते फक्त 'बोलणे' होते. कुमारसरांच्या वरील पोस्टीचा असा अर्थ घेतलाय मी !
संवाद = communication =
संवाद = communication = transmission of information
एखादे संगीत समजून घ्यायला
एखादे संगीत समजून घ्यायला किंवा त्यापासून आनंद मिळवायला भाषेचे बंध नसतात यावर अनेक मान्यवरांनी विविध अवतरणे लिहिली आहेत. ती वाचायला मजा येईल : https://www.searchquotes.com/search/Music_Has_No_Language/
जगाच्या पाठीवर आपण कुठेही गेलो आणि कानांना सुखद वाटेल असे कुठलेही संगीत कानावर पडले तरी आनंद होतो. "संगीताला भाषा नसते" हे विधान लाक्षणिक अर्थाने घेऊन त्यापासून मला आनंद होतो.
त्या वाक्याची चिरफाड करुन मी तो आनंद गमावू इच्छित नाही.
मी नाही ऐकणार जा
संवाद = communication = transmission of information>>>>>>
मी नाही ऐकणार जा
, तुम्ही तरी ऐकलं असतं का 

या न्यायाने तर विश्वकोश वाचता येणारा प्रत्येक माणूस थोर वक्ता/लेखक झाला असता
येते आता.
संगीताचा एक प्रकारे अतिरेक
संगीताचा एक प्रकारे अतिरेक सुद्धा झालाय. कुठलाही व्हिडीओ असो किंवा स्लाईड शो त्याला पार्श्वसंगीत दिलेले असते.
याची एवढी सवय झालीय की कधी मला खुप आनंद झाला किंवा वाईट वाटले की आता लगेच कोणीतरी त्याला साजेसे पार्श्वसंगीत वाजवेल अशी अपेक्षा मनात कुठेतरी असते.
आणि काही विपरीत घडताना त्या स्लो मोशनचे सुद्धा असेच झालेय. कधी घराला आग लागली की मी स्लो मोशनमध्ये तर धावणार नाही ना अशी धास्ती वाटते कधी कधी.
'केसरिया तेरा इश्क है पिया'
'केसरिया तेरा इश्क है पिया' हे गाणे टिकटॉक वरच्या असंख्य पाककृती मागे वाजतेयं. काय संबंध आहे बरं, केसरिया म्हणतात व पिझ्झा बॉल्स, दोसा, आलू टिक्की वगैरे दाखवतात.
पार्श्वसंगीत: अतिरेक>>>>
पार्श्वसंगीत: अतिरेक>>>>+१११२२
छान चर्चा. डॉ कुमार, तुम्ही
छान चर्चा. डॉ कुमार, तुम्ही गणिताचे उत्तम उदाहरण दिलेत.
थोडा विचार केल्यावर असं वाटतं आहे, की गणित, संगीत, चित्रपट ह्या वैश्विक भाषा आहेतच, पण त्या परिपूर्ण नसाव्यात. म्हणजे काही ठराविक भाव त्यातून व्यक्त होऊ शकतात, पण गुंतागुंतीचे विचार, दुहेरी संवाद, इत्यादीसाठी त्या भाषा पुरेश्या नाहीत. त्यामुळेच शाब्दिक भाषांचं अस्तित्व हे त्यांना समांतर आणि मोलाचं आहे, हे नाकारता येत नाही.
शाब्दिक भाषांचं अस्तित्व हे
शाब्दिक भाषांचं अस्तित्व हे त्यांना समांतर आणि मोलाचं आहे, >>> सुंदर !
या वाक्यात वरील सर्व चर्चेचा सारांश आहे.
अधिक लिहिणे न लगे ..
संगीत, अन्नचिंतन, चित्रे ह्या
.संगीत, अन्नचिंतन, चित्रे ह्या जोड किंवा साहाय्यक भाषा आहेत. कारण ह्या गोष्टी अर्थवाही असतात. शब्दांना जर चित्रांची साथ मिळाली तर एकूण अर्थ गडद होतो. कथनामध्ये अधिक स्पष्टता येते. अन्न चिंतन हे बोलण्यास उद्युक्त करते. दोन व्यक्तींमध्ये संवाद घडवण्यास साहाय्य करते. एक प्रकारे कॅटलिस्ट.
मानवी कंठ्यध्वनीतून अर्थ निर्माण होईल व तो ध्वनी कुठेही ,कधीही उच्चारला तरी तोच अर्थ इतरांपर्यंत पोचेल अशी ध्वनि प्रणाली निर्माण करता येण्यास मानवाला हजारो वर्षे लागली असतील. इतके कष्ट घेऊन मिळवलेले कौशल्य आपल्या जनुकसमूहातून अल्पावधीत स्थानभ्रष्ट होईल ह्याची शक्यता कमी वाटते.
बोंद्री हा शब्द प्रथमच
बोंद्री हा शब्द प्रथमच वाचनात आला. शब्दकोशात बोंदरी (= तरटाची पिशवी) असा शब्द आहे.
या दोन रूपांपैकी एक दुसऱ्याचा अपभ्रंश असावा काय ?
तरीसुद्धा मी जे वाक्य वाचले त्यातून त्या शब्दाचा नक्की अर्थ समजला नाही. रंगनाथ पठारे यांच्या लेखातील ते वाक्य असे आहे,
" मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा तिन्ही भाषांची बोंद्री या पर्यावरणाचा (संशोधन विभागाचा) भाग असते”..
इथे लेखकाला बोंद्रीचा अर्थ पोतडी असा अभिप्रेत असावा काय? की मिश्र बोली ?
दक्षिण कोकणात बोंदरी/ रा/रे
दक्षिण कोकणात बोंदरी/ रा/रे म्हणजे ठिगळ ठिगळाचे बनलेले वस्त्र, चिंध्या,मलीन, घाणेरडे, पसारा करणारे, ' काय ते ध्यान मधले ध्यान वगैरे.
'नुसते बोंदर नेसून बसलीय!: वगैरे.
बोंद्री म्हणजे रिकामी गोणी/
बोंद्री म्हणजे रिकामी गोणी/ पोतं- ज्यूट निर्मित. विदर्भात वापरतात. उदा. बसायला बोंद्री/ बोंदरी आथरली.
धन्यवाद
धन्यवाद
पण मी दिलेल्या वाक्यातील त्या शब्दाचा अर्थ काय घ्यायचा नक्की ?
जाडे भरडे वस्त्र. स्वतःचा
जाडे भरडे वस्त्र. स्वतःचा पोत नसलेले.
Submitted by हरचंद पालव on 8
Submitted by हरचंद पालव on 8 January, 2023 - 10:22
Submitted by हीरा on 8 January, 2023 - 12:36
बरोबर, छान पोस्ट्स.
संगीत ही "शब्देवीण संवादु, दुजेविण अनुवादु" साधणारी भाषा आहे. व्यक्ती सापेक्ष आहे.
'हत्ती चाले भारंभार, कुत्री
'हत्ती चाले भारंभार, कुत्री भुंकतात जिन्नसवार'
याचा नक्की अर्थ कोणी सांगू शकेल का ?
हत्ती चाले भारंभार - म्हणजे
हत्ती चाले भारंभार - म्हणजे हत्तीवर कितीही ओझं लादलं, तरीही तो न कुरकुरता चालत राहतो. (कितीही भार लादला तरी)
कुत्री भुंकतात जिन्नसवार - कुत्र्यावर एक लहान गोष्टीचा भार जरी पडला, तरी तो भुंकायला सुरुवात करतो. (एक लहान वस्तू - जिन्नस)
अर्थ - कामसू व्यक्ती कुठलेही मोठं कार्य शांतपणे तडीस नेतात, मात्र आळशी व्यक्तीवर एक लहान कार्य जरी सोपवलं, तरी ती कुरकुर करते.
हिंदीत याचा अपभ्रंश झाला तो म्हणजे - हाती चले बजार, कुत्ते भौके हजार!
म्हणजे एखादी व्यक्ती चांगले काम करत राहिली, तर तिला नावे ठेवणारे अनेक लोक लोक असतात.
अर्थ छान समजवून सांगितलात
अर्थ छान समजवून सांगितलात
धन्यवाद !!
तो वाक्प्रचार मी लक्ष्मण माने यांच्या लेखात वाचला. त्याच्यापुढे ते म्हणतात,
" आपण आपलं चालत राहायचं"...
" आपण आपलं चालत राहायचं"...
" आपण आपलं चालत राहायचं"...
>>>>
यासाठी हिंदीतला वाक्प्रचार चपखल लागू पडेल.
>>शाब्दिक भाषांचं अस्तित्व हे
>>शाब्दिक भाषांचं अस्तित्व हे त्यांना समांतर आणि मोलाचं आहे, >>> +११
>>>हत्ती चाले भारंभार>>> आवडला. छान अर्थ.
>>शाब्दिक भाषांचं अस्तित्व हे
ड पो
सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय
सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय आजपासून प्रादेशिक भाषांमध्ये; प्रजासत्ताक दिनापासून सेवा सुरू; सरन्यायाधीश चंद्रचूड यांची घोषणा
https://www.loksatta.com/desh-videsh/supreme-court-judgments-will-availa...
जांगडगुत्ता व झांगडगुत्ता
जांगडगुत्ता व झांगडगुत्ता
हे दोन मजेदार शब्द आहेत. ते एकमेकांचा अपभ्रंश आहेत का याची कल्पना नाही.
दोन्ही शब्द थेट शब्दकोशात सापडत नाहीत.
त्यांची फोड करून २ वेगळ्या शब्दांचा अर्थ मिळतो :
जांगडगुत्ता = सांगड + गुंता
झांगड = भांडण; कलह
झांगडगुत्ता या नावाचे एक पुस्तक आहे : https://www.amazon.in/%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%A1%E0%A...
याचा अर्थ काय?
याचा अर्थ काय?
मी जुगाड या अर्थाने एक दोन ठिकाणी (सोमीवर) वाचला.
हा अर्थ बरोबर आहे का?
जांगडगुत्ता = खूप/ विचित्र
जांगडगुत्ता = खूप/ विचित्र गुंतागुंत
असे वाटते.
? तंगड्यात तंगडे अडकणे
रत्नाकर, ताम्राकर, करूणाकर हे
रत्नाकर, ताम्राकर, करूणाकर हे शब्द सर्वपरिचित आहेत.
परंतु ‘आकर’ हा शब्द स्वतंत्रपणे सहसा वाचनात येत नाही.
आकर =खाण
त्यापासून बनलेले हे दोन विशेष शब्द :
आकरग्रंथ = प्रचंड ग्रंथ.
व
आकरज्ञान = खाणीसंबंधी शास्त्राचे ज्ञान
रत्नाकर, ताम्राकर, करूणाकर हे
.
मग आपण जे 'आगर' म्हणतो, ते
मग आपण जे 'आगर' म्हणतो, ते 'आकर' वरून आलं आहे का? कलावंतांचे आगर, विद्येचे आगर वगैरे.
आगार म्हणजे डेपो, याही शब्दाचं मूळ हेच आहे का?
वर दिलेल्या शब्दात रत्नाकर,
वर दिलेल्या शब्दात रत्नाकर, ताम्राकर जुळतात. पण करूणाकर = करुणेची खाण असा एक सुंदर अर्थ नव्याने लागला. तो शब्द मुळात करुणा करणारा (करुणाम् करोति इति -- कर्मधारय तत्पु?) - असा सामासिक शब्द असावा. परंतु करुणा + आकर अशी त्याची फोड करून function at() { [native code] }इशय सुंदर अर्थ लागतो आहे. (दोन वेगळ्या पद्धतींनी समासविग्रह केल्याने हा आता द्व्यर्थी झाला आहे.)
Pages