Submitted by Filmy on 17 January, 2021 - 10:05
क्रिकेटवरील पहिले पाच धागे -
http://www.maayboli.com/node/1889
http://www.maayboli.com/node/30450
http://www.maayboli.com/node/51908
https://www.maayboli.com/node/60723
https://www.maayboli.com/node/67443
भारत-ऑस्ट्रेलिया टेस्ट मालिका संपत आली आहे. जुन्या धाग्यावरील प्रतिक्रिया ओसंडून वाहत असल्याने परंपरेनुसार २K हून अधिक प्रतिक्रिया असल्याने हा नवा धागा. खेळातला रस निघून जातोय असे वाटत असतानाच नवी पिढी वा जनता असा खेळ करते की गोडी पुन्हा क्रिएट होते. आणि म्हणून हा प्रपंच.
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
*मलाही तुमची पांचट
*मलाही तुमची पांचट व्यंगचित्रे बघून तुमच्या बौद्धिक वयाविषयी संशय वाटतो पण मी तो नेहमी बोलून दाखवतोच असे नाही* तें परवडलं व आवडलंही असतं.; निदान तें औचित्यपूर्ण तरी आसतं. हायपोथेटीकल मुद्दा घेवून अखंड वाद घालत बसण्यापेक्षा !
'आहे त्यापेक्षा नक्कीच जास्त'
'आहे त्यापेक्षा नक्कीच जास्त'.

मला असे व्हेग बोलणे आणि विचार करणे जमत नाही. लगोलग जास्त म्हणजे किती जास्त २००, ५००, १०००, २००० असाच प्रश्न पडतो. तुला परिक्षेत अपेक्षेपेक्षा कमी मार्क पडले, बोनस अपेक्षेपेक्षा कमी मिळाला तू मास्तर्/मॅनेजरला म्हणशील मला जास्त अपेक्षित होते. पण त्या अपेक्षेलाही काही नंबर असेल की नाही. की मास्तरने १ मार्क वाढवला किंवा मॅनेजरने १०० रूपये काढून दिले तर तुझी अपेक्षा पूर्ण होईल? नाही ना? तर तो वाढीव नंबर तुझ्या मागच्या काही परिक्षेतल्या मार्कांच्या आसपास किंवा मागच्या दोनेक वर्षात मिळालेल्या बोनसच्या सरासरीच्या फरकाच्या आसपास असू शकतो. हे लॉजिकल झाले.
तसेच प्रत्येक खेळातले प्रावीण्य मोजायला नंबर सिस्टीम अस्तित्वात आहे. क्रिकेटमध्ये स्टॅट्स आहेत आयसीसी रँकिंग्ज आहेत, ईंपॅक्ट अॅनालिसिस आहे...असे सगळे असतांना 'खोर्याने/अधिक' म्हणजे किती जास्त? हा प्रश्न मी विचारू नये असे तुझे म्हणणे असेल तर... क्रिकेट स्कील असे वेग टर्म्स मध्ये मोजता येत नाही असेच म्हणेन.
कदाचित तो वरच्या नंबरवर खेळला असता तर ग्रेग ब्ल्युएट ह्या ऑसी टॉप ऑर्डर बॅट्समन सारखा ३०-४० टेस्ट मध्येच संपला असता असेही म्हणू शकतो... हू नोज.
जर तरच्या भाषेत तर काहीही होऊ शकते.. म्हणून त्यातल्या त्यात स्टॅट्स अँड नंबर्स आर अवर बेस्ट फ्रेंड्स व्हेन ईट कम्स टू अॅनालाईझिंग समवन्स परफॉर्मन्सेस ऑर पोटेंशिअल.
हायपोथेटीकल मुद्दा घेवून अखंड
हायपोथेटीकल मुद्दा घेवून अखंड वाद घालत बसण्यापेक्षा ! >> पण दोन लोकांनी अशी चर्चा (हा वाद आहे हे तुमचे हायपोथेसिस झाले, आणि असेलही वाद बरं मग?) केल्याने तुम्हाला नक्की काय त्रास झाला हे तुम्ही सांगू शकाल का? असामी आणि मी दोघेही जेव्हा नको असते तेव्हा 'आता बास' असे म्हणून थांबतो...किंवा थांबतही नाही. पुढचा विषय येईपर्यंत पुन्हा बोलत बसतो. व्हाय ईट शूड बॉदर यू ऑर एनीवन? यू डोंट ओन द स्पेस डु यू?
तुम्हाला चालू चर्चेत मुद्दा मांडायचा आहे खुषाल मांडा, दुसरा विषय चालू करायचा आहे खुषाल लिहा, मी लिहिलेले वाचायचे नाही ईग्नोर करा. मी ईथे तुम्हाला काय वाटेल ते समजून ऊमजून लिहायला येत नाही. जसे तुम्ही मला व्यंगचित्र आवडेल की नाही ह्याचा विचार करून ते काढायला घेत नाही.
लेट मी आस्क यू धिस, वुड यू रादर प्रीफर अ सायलेंस अंडरमायनिंग माय राईट टू डिस्कस समथिंग विथ अ विलिंग पार्टी.
जर तरच्या भाषेत तर काहीही होऊ
जर तरच्या भाषेत तर काहीही होऊ शकते.. म्हणून त्यातल्या त्यात स्टॅट्स अँड नंबर्स आर अवर बेस्ट फ्रेंड्स व्हेन ईट कम्स टू अॅनालाईझिंग समवन्स परफॉर्मन्सेस ऑर पोटेंशिअल. >> इथे 'त्यातल्या त्यात' शब्द प्रयोग करावा लागला ह्यातच सगळे आले.
असे सगळे असतांना 'खोर्याने/अधिक' म्हणजे किती जास्त? हा प्रश्न मी विचारू नये असे तुझे म्हणणे असेल तर.. > तू विचारलेल्या प्रश्नाला मी उत्तर दिले पाहिजे असे बांधील आहे का ? जसा 'तुझा प्रश्न विचारण्याचा हक्क आहे' तसेच 'माझे विधान मला हव्या त्या कोंदणात घेतले जावे - कमीत कमी मी पॉईंट केल्यावर तरी' असा माझा आग्रहही तितकाच योग्य नाही का ?
वर तू पाटा खेळपट्ट्या असा उल्लेख केला आहेस. असाच उल्लेख मी इथे बरेचदा वाचला आहे. ह्यावर मी रुमाल टाकून ठेवतो.
*लेट मी आस्क यू धिस, वुड यू
*लेट मी आस्क यू धिस, वुड यू रादर प्रीफर अ सायलेंस अंडरमायनिंग माय राईट टू डिस्कस समथिंग विथ अ विलिंग पार्टी.* - Let me answer this straight -
मला त्या चर्चेत काडीचाही रस नव्हता पण ज्याना होता त्यानी ती चर्चा करण्याबद्दल मला आक्षेप आसणयाचं कारणच नव्हतं. पण तें कारण तुम्हीच माझ्यावर लादलंत. तुम्ही जर खुल्या चर्चेत कुणालाही ' अरे दोन मोठी माणसे बोलत असतांना शेंबड्या पोरांनी मध्ये मध्ये बोलू नये....'
' असं म्हटलंत, तर त्यावर त्या ' मोठयांचया चर्चे'विषयीचं मत मांडणयाचं तें निमंत्रणच ठरतं. व तें मतही मीं सुसंस्कृतपणे मांडलंय असा मलां विश्वास आहे.
हायझेनबर्ग,
हायझेनबर्ग,
प्रतिसादाची भाषा संभाळा. आत्ता प्रतिसाद अप्रकशीत केला आहे. पुन्हा दिसलं तर सदस्यत्व रद्द करण्यात येईल.
प्रतिसादाची भाषा संभाळा.
प्रतिसादाची भाषा संभाळा. आत्ता प्रतिसाद अप्रकशीत केला आहे. पुन्हा दिसलं तर सदस्यत्व रद्द करण्यात येईल. >> जरूर करा, आजच करा.
मी विषयाला धरूनच लिहित आलो आहे आणि तसेच लिहित राहीन. पण ऊगीच कोणाचेही प्रोवोकेशन खपवून घेणार नाही. परागला अनेकवेळा माझ्या संबंधित पोष्टींपासून लांब रहा असे बजावलेले आहे. आणि मी कधीही जाणूनबुजून त्याच्या वाट्याला गेलेलो नाही. तुम्हाला जर त्याने अनेकवेळा जाणून बुजून केलेले प्रोवोकेशन दिसत नसेल किंवा बघायची तसदी घ्यायची नसेल तर हे पुन्हा होणार हे आत्ताच सांगून ठेवतो.
मायबोलीच्या क्रिकेट
मायबोलीच्या क्रिकेट खेळपट्टीवर एका पानावर एकच आखुड टप्प्याची टिपण्णी असावी आणि शरीरवेधी उत्तरे बंद करावीत असा प्रस्ताव मी मांडत आहे.
. याचा भंग केल्यास व विनाकारण खेळपट्टीवर नाच करून खेळपट्टी खराब केल्यास संहिताभंगाचे दोन नकारात्मक गुण देण्यात येतील .
तर भारतातर्फे खेळलेल्यापैकी एखादा निकृष्ट फलंदाज वा गोलंदाज यावर ४ वाक्य लिहावी लागतील. याखेळपट्टीवर बागडणार्या कुठल्याही रसिकास पंच म्हणून कार्य करून अशा पद्धतीची चूक नोंद करून त्याबद्दलची शिक्षा सुनावता येइल असे अधिकार आम्ही बहाल करत आहोत. 
अशी नोंदणी झाल्यास त्याचे क्षालन करण्यासाठी एखाद्या ऑस्ट्रेलियन अथवा पाकिस्तानी खेळाडूच्या खिलाडूवृत्तीबद्दल दोन चांगले शब्द लिहिण्याची स्वशिक्षा घ्यावी लागेल याची नोंद घ्यावी. (यासाठी खूप अभ्यास करावा लागेल याची आम्हास जाणीव आहे, पण तीच शिक्षा आहे हे नम्रपणे आम्ही आपणा सर्वांच्या निदर्षनास आणू इच्छितो.) हे कदापी जमणार नसेल
हायझेनबर्ग गेले वाटते
हायझेनबर्ग गेले वाटते
एका आयडीची साळसूदपणे लोकांना
...
अरे वा आय ड्या उडवायचा
अरे वा आय ड्या उडवायचा सिलसिला अजून चालूच आहे वाटते
उद्यापासून टेस्ट चँपियनशिप चा
उद्यापासून टेस्ट चँपियनशिप चा न्यूझिलंड वि. भारत सामना रंगणार!! भारताने प्लेयिनंग ११ जाहिर केले आहेत. कुठलेही सरप्राझेस नाहीत. भारतीय संघाला शुभेच्छा!!
कल से अपना चुम्मा सब का बदला
कल से अपना चुम्मा सब का बदला लेगा
भारताने प्लेयिनंग ११ जाहिर
भारताने प्लेयिनंग ११ जाहिर केले आहेत. कुठलेही सरप्राझेस नाहीत. भारतीय संघाला शुभेच्छा!! >> +१. जडेजा नि अॅशच्या बॅटींग वर जबरदस्त भरवसा दाखवलाय. विहारी काऊंटी खेळतोय हे बघून त्याला ६+१+४ असे करायला हवे होते का अशी चूटपूट लागायला नको अशी आशा धरूया.
किव्जीज बॉलिंग चिवट आहे, चूकांची वाट बघत थकवतात हे लक्षात ठेवून डावपेच असतील.
जाता जाता :
१. शास्त्रीच्या "तीन सामने हवे होते" ह्याला अनुमोदन. एक मॅच मटका ठरू शकते.
२. बीसीसीआय ने किवी बोर्डाच्या धर्तीवर किमान एक तरी सामना ठेवायला हवा होता आपला रस्टी नेस जमा धरता नि आय सी सी ने अशा प्रिमियम टूर्नामेंट करता फेयरनेस साठी दोन्ही संघाना समान पूर्वतयारी ची संधी द्यायला हवी होती.
आजचा सामना ऐतिहासिक पहिल्या
आज सुरूं होणारा सामना ऐतिहासिक पहिल्या ' टेस्ट चॅम्पियनशिप 'च्या फ़ायनलला साजेसा व्हावा, ही प्रार्थना !
तीन सामने अवघड आहे याला
तीन सामने अवघड आहे याला आयसीसीने उत्तर दिले आहे. तीन सामन्यांना महिन्याभराचा कालावधी जाईल. कोणते दोन संघ फायनलला जातील हे नक्की नसल्याने हा महिना कुठून काढायचा याचे आधीच प्लानिंग करणे अवघड.
भारताला सराव सामना मिळाला असता पण बहुधा कोरोनाने गोची झाली असावी. म्हणून आपसात खेळावे लागले.
दोन्ही संघांना हे सराव सामने जिथे फायनल सामना आहे त्या देशातील ए टीमसोबत खेळवता आले असते.
न्यूझीलंडचा ईंग्लंड दौरा याचवेळी असणे हा योगायोग असावा. नशीब चांगले त्यांचे.
*तीन सामने अवघड आहे याला
*तीन सामने अवघड आहे याला आयसीसीने उत्तर दिले आहे* - यावेळी समर्थनीय असलं, तरी पण बीसीसीआय दौरे आखताना सराव सामन्यांबाबत फारसं आग्रही नसतं ह्यातही तथ्य आहेच!
*चूकांची वाट बघत थकवतात हे लक्षात ठेवून डावपेच असतील*- त्यातही, ढगाळ वातावरण अपेक्षित असल्याने फलंदाजीत सलामीच्या जोडीची कामगिरी आत्यंतिक महत्वाची ठरणार आहे.
पावसाची शक्यता खूप आहे, सामना
पावसाची शक्यता खूप आहे, सामना पूर्ण झाला पाहिजे, माझ्या मते 6 फलंदाज आणि पंत , 4 गोलंदाज ज्यामध्ये 1 फिरकी असे कॉम्बिनेशन खेळवायला हवे होते. पण ही टीम पण चांगली आहे, फलंदाजी वर अवलंबून आहे
असामी, FTP schedule, टेस्ट
असामी, FTP schedule, टेस्ट चँपियनशिप ला लागणारा कालावधी वगैरे लक्षात घेता, बेस्ट ऑफ थ्री मॅचेस किंवा पूर्वतयारी साठी वेळ ठेवणं आयसीसी साठी अवघड आहे हे जरी मान्य केलं तरी इतक्या मोठ्या इव्हेंटसाठी अशी काही सोय करता आली तर ते त्या इव्हेंट ला न्याय दिल्यासारखं होईल हे नि:संशय.
"पण बीसीसीआय दौरे आखताना सराव सामन्यांबाबत फारसं आग्रही नसतं" - भरगच्च टाइमटेबलमधे सराव सामन्यांसाठी वेळ नसतो हे खरंय. पण आता आपण टूर सुरू होण्याआधी 'ए' टीम्स ची टूर खेळवतो. मध्यंतरी हा एक लेख वाचला. क्रिकेटपटू घडवण्याची ही प्रोसेस नक्कीच प्रशंसनीय आहे: https://www.thecricketmonthly.com/story/1265703/sidharth-monga---how-did...
आजचा दिवस पावसाने पूर्ण वाया
आजचा दिवस पावसाने पूर्ण वाया गेला. उद्या खेळ होईल असं वाटतंय.
भारतीय स्त्री संघपण छान खेळला, पण पूर्वी (९० च्या दशकापर्यंत) ज्या चुका पुरूष संघाकडून व्हायच्या त्याच चुका स्त्री संघाने करून हातात आलेली संधी दवडली. १६७/० वरून १८७/५ (दिवस संपता संपता) ही पडझड मोठी होती. असो. पण अनुभवातून त्या शिकतीलच. शफाली वर्मा छान खेळतेय (सलग दुससं अर्धशतक). पहिल्या इनिंग ला ९६ वर असताना नर्व्हस शॉट खेळून तिने पदार्पणातल्या शतकाची संधी दवडली. आता दुसर्या इनिंगमधे काय होतं ते पाहू.
त्यातही, ढगाळ वातावरण
त्यातही, ढगाळ वातावरण अपेक्षित असल्याने फलंदाजीत सलामीच्या जोडीची कामगिरी आत्यंतिक महत्वाची ठरणार आहे. >> +१. खर तर ११ जण जाहीर करायची एव्हढी काय घाई होती ते मला कळले नाही. प्ले युअर बेस्ट ११ हे मान्य असले तरी इंग्लंड मधे हवामानाकडे दुर्लक्ष करणे हा तद्दन गाढवपणा आहे असे माझे प्रामाणिक मत. अजूनही ११ बदलू शकतो असेवाचले पण तसे होणार नाही हे माहित आहे.
कोणते दोन संघ फायनलला जातील हे नक्की नसल्याने हा महिना कुठून काढायचा याचे आधीच प्लानिंग करणे अवघड. > >अरे दोन वर्षे आधी पासून प्लॅनिंग करतायेत त्यांना महिनाभराची गॅप आधीच आखून देता आली नसती का खरच ? मार्की स्पर्धा आहे म्हटल्यावर एव्हधे कष्ट तर करता आलेच असते. उरलेल्या आयपील साठी हवी तशी अॅडजस्टमेंट करतील च ना आता दोन महिन्यांनंतर
अरे दोन वर्षे आधी पासून
अरे दोन वर्षे आधी पासून प्लॅनिंग करतायेत त्यांना महिनाभराची गॅप आधीच आखून देता आली नसती का खरच ?
>>>>>
फायनलचे दोन संघ कोण हे निश्चित नसताना सर्व संघाना ती गॅप ठेवायला सांगणे वा लावणे अवघड आहे असे आयसीसीने म्हटले आहे. कारण उरलेल्यांची गॅप मग फुकट जाणार..
आयपीएलमध्ये सारे संघाचे खेळाडू असतात. त्यामुळे आयपीएलशी तुलना चुकीची.
आणि महिन्याभराची गॅप म्हटले असले तरी ती पुढचा मागचा कालावधी जोडल्यास अधिक झाली. तीन सामन्यांची एक कसोटी मालिका जो प्रत्येक संघ या काळात खेळू शकतो ती तुम्ही नका खेळू असे त्यांना सांगण्यासारखे झाले.
अर्थात हे आयसीसीने दिलेले कारण आहे. माझे मत नाही.
मला पर्सनली ३ फायनलचा फंडाच बोअर वाटतो.
चार वर्षातून एकदा येणारा वर्ल्डकप एकाच फायनलमध्ये विजेता ठरवला जातोच ना. फायनलच नाही तर सेमी सुद्धा एकाच सामन्यात ठरवली जाते. म्हणजे शेवटच्या दोन नाही तर चार संघात नॉक आऊट होते. २०-२० सारखा फॉर्मेट जो छोटा असल्याने अनिश्चितता वाढते, दोन तीन ओवरमध्येही जिथे सामना पलटू शकतो, एखादा नॉन डिजर्व्हिंग संघही त्यांच्या दिवसाला जिंकू शकतो तिथेही एकाच सामन्यात कोण विजेता हे ठरवतात तर हि चॅम्पियनशिप केवळ दोन वर्ष चालते म्हणून तीन सामने खेळा याला अर्थ नाही असे मला वाटते.
याऊपर जास्त ताणून बोअर करण्यातही अर्थ नाही. आधीच नवीन पिढीचा ओढा पाच दिवसांच्या सामन्याकडे कमी आहे. त्यात ऋषभ पंतसारखे प्लेअर आलेत म्हणून सध्या क्रेझ निर्माण झालीय. त्यात आपल्या गेल्या दोन मालिका जश्या रोचक झाल्या त्या पार्श्वभूमीवर अचानक तीन सामन्यांची मालिका झाली तर तशीच धमाल येईल असेही वाटत असेल. पण अश्या मालिका नेहमी होत नाहीत. त्यामुळे फायनलच्या सामन्याला मालिका बनवून फायनलची मजा घालवू नये असेच मला वाटते.
प्रत्येक प्रतिक्रियेत पंत ला
प्रत्येक प्रतिक्रियेत पंत ला घुसवलंच पाहिजे का? किती अती करतोस बघ. मला ही आवडतो पंत पण तु जास्तच... सांघिक खेळ आहे नी कसोटीत गोलंदाज़ी पाहण्यात जी मजा आहे ती फलंदाजीत नाही...
परवाच सचिन चा एक इंटरव्ह्यू
परवाच सचिन चा एक इंटरव्ह्यू ऐकला. त्यात त्याने लोक हल्ली (टी-२० च्या अतिरेकामुळे) कसोटीकडे चुकीच्या दृष्टीकोनातून पहातात असं म्हटलंय. कसोटीत शॉट्स खेळण्याइतकंच, वेळ खेळून काढणं, गोलंदाजांना दमवणं, बॉल्स सोडणं ह्यालाही महत्व आहे. हे सगळं न पहाता जे प्रेक्षक फक्त फलंदाजांचा स्ट्राईक रेट पहातात आणि फलंदाजांकडून फक्त फटकेबाजीची अपेक्षा करतात त्यांना हा खेळ अजून समजून घेण्याची गरज आहे असं तो म्हणाला. (श्रीभगवान उवाच!
)
*फलंदाजांकडून फक्त फटकेबाजीची
*फलंदाजांकडून फक्त फटकेबाजीची अपेक्षा करतात त्यांना हा खेळ अजून समजून घेण्याची गरज आहे* - खेळाडूंचं मूल्यमापन फक्त आंकडेवारीवरूनच करण्याचा आतिरेकही थांबवणं तितकंच निकडीचं असावं.
किंबहूना relevant statistics
किंबहूना relevant statistics / आकडेवारी वापरणं गरजेचं आहे असं मला वाटतं. उदा. ऑस्ट्रेलियात पुजाराचा स्ट्राईक रेट काय होता ह्यापेक्षा तो १,०००+ बॉल्स खेळला हे अधिक संयुक्तिक स्टॅटिस्टिक्स आहे.
*किंबहूना relevant statistics
*किंबहूना relevant statistics / आकडेवारी वापरणं गरजेचं आहे असं मला वाटतं*. मीं अतिरेक होतोय त्याबद्दल म्हणतोय.
* ह्यापेक्षा तो १,०००+ बॉल्स खेळला हे अधिक संयुक्तिक स्टॅटिस्टिक्स आहे.* पण खेळाच्या कोणत्या अवस्थेत कसा व किती खेळला हे कसोटी सामन्यात सर्वाधिक महत्वाचं व तें आंकडेवारीतून समजणं कठीणच.
वरील सर्व पोस्टशी सहमत आहे.
वरील सर्व पोस्टशी सहमत आहे.
तसेच जो कसोटीत फटकेबाजी करतो तो उत्तम कसोटी प्लेअर नाही असाही एक भाबडा समज असतो
सामान्य क्रिकेटप्रेमी खरे तर आकडे बघत नाहीत. ते नुसते चर्चा करायला शेअर करायलाच वापरतात. पण त्यांना एखादा खेळाडू आवडू लागतो ते त्याच्या खेळींचा ईम्पॅक्ट काय आहे यावरूनच. पुजारासारखे प्लेअर म्हणाल तर लगेच पॉप्युलर होत नाहीत. पण जेव्हा ते लवकर बाद होतात तेव्हा आता एक बाजू कोण लाऊन धरणार अशी चिंतेची लकीर जी चाहत्यांच्या कपाळावर उमटते तीच त्यांच्या खेळाची पावती.
पण माझे निरीक्षण असे आहे की पंतच्या सध्याच्या धडाकेबाज खेळाने पुजाराही ऊठून दिसू लागलाय. म्हणजे सोमि वर सुद्धा क्रिकेटप्रेमी पंत सोबत पुजारा असणे सुद्धा गरजेचे आहे, पंतच्या धडाक्यात अंगावर चेंडू खाऊन दटून उभे राहणारया पुजाराला विसरू नका, तो खरा रीअल हिरो होता वगैरे पोस्ट फिरवू लागलेत.
@ प्रवीण, हो मी पंतबद्दल जास्त करत असेल. क्या करे अपना दिल ही ऐसा है. तो भारतीय संघात येण्याआधीपासून मी त्याचा फॅन आहे. त्याच्या अपयशी काळात त्याच्या बाजूने दटून उभे राहत भांडलोय एकेकाशी. त्यामुळे आता त्याचे कौतुक करताना एक वेगळाच आनंद एक वेगळेच समाधान मिळते. हुमायुन नेचर
आपल्याला पहिली फलंदाजी
आपल्याला पहिली फलंदाजी दिली आहे ! न्यूझीलंडला त्याचा पश्चात्ताप व्हायची पाळी येईल ? सलामीच्या जोडीवर बरचसं अवलंबून आहे याचं उत्तर.
भारताला शुभेच्छा!
१२ ओवर खेळून काढल्या ४१-०
१२ ओवर खेळून काढल्या ४१-०
सो फार सो गूड
सोडायचा बॉल सोडत आहेत, मारायचा मारत आहेत. दोघे ऑफ स्टंप पाठ करून आलेत आपला.
Pages