दृष्यावरून गाणे ओळखा- ४

Submitted by Barcelona on 11 January, 2021 - 22:25

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे. अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.

विचित्र दृष्य देऊन जसे हिरॉईनच्या नाकपुड्या, हिरोचे पाय, पडलेली अंगठी इ कोडे खंगरी करण्याचा प्रयत्न करू शकता. शेंदूर फासूनही चित्र खंगरी करू शकता. आपल्या आजीच्या जन्माआधीची गाणी देवूनही खंगरी करू शकता. खंगरी नसलेले कोडे भलतेच क्ल्यू देऊन खंगरी करू शकता. उदा: हिरोच्या सावत्र बायकोचा आजी नवरा... Uhoh कधी कधी कुणी चकली इ बक्षीस देते. वाटून घ्यावे कारण उत्तर एकाला आले तरी दहाजणांनी विचारलेले प्रश्न उपयोगी पडलेले असतात. तीन-चार दिवस कोडे अडकले तरी दयाळू होण्याची गरज नाही. दिग्गज लोक आहेत. शोधतात बरोबर उत्तरे, पेशंस ठेवायचा.

आधीचा धागा
त्या आधीचा धागा

वरील चित्र एका रखडलेल्या सिनेमातील आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नाही
(दक्षिणेकडून उसना घेतलेला पिक्चर या कोनावर जास्त विचार करा सगळे जण.)

ABCD

नाही
याच जोडीचा दुसरा पिक्चर सुपरहीट आहे.

सांबा सांबा - लव्ह बर्ड्स. प्रभुदेवा, नगमा.
याचे जास्त गाजलेले गाणे 'नो प्रॉब्लेम'. अपाची इंडियनने गायलेले.

रा.आ. इथे परवानगी द्यायला कोण विराट कोहली किंवा तत्सम कॅप्टन नाही, खेळा बिनधास्त...
(बाकी "किसी कि मुस्कुराहटों" हे तत्त्व जिवंतपणी पाळलं असतत तर आता असं रात्रीचा आत्मा बनून फिरायची वेळ नसती आली Wink Happy हलके घ्या!!)

बरोबर , हे गाणं मुद्दाम दिलं. आमचे पुरंदरे वाड्यातील शेजारी गिरीश प्रभुणे ह्यांना पद्मश्री जाहीर झालाय. मुकेश हा ह्या फॅमिलीचा आवडता गायक Happy म्हणून हे गाणं प्रभुणे काकांसाठी Happy आज हम बहोत खुश हय ...

क्लू द्या. आधी मला ही बैजू बावरा मध्ये 'हो रहेगा मिलन' गाणार्‍या भोचक कोरस लोकातील एखादी आजी वाटली पण नाही. क्ल्यू लागेल, भजन असावे?

अवघड आहे. माझा पण पास.
(इतक्या जुन्या चित्रपटातली दृश्ये ओळखीची नाहीत. देवदर्शनाशी संबंध असेल असं वाटलं पण चित्रपट माहीत नाहीत).

काठीचे एकच गाणे आठवत होते म्हणून 'मौसम बिता जाए' वीस वेळा बघून घेतलं...
भाग्यश्री१२३, अपनी कहानी छोड जा, कुछ तो निशानी छोड जा, कौन कहे इस ओर, तू फिर आए ना आज....

Submitted by भाग्यश्री१२३ on 25 January, 2021 - 23:32 >>>>
ऐ मेरे दिल कही और चल -- तलत ( फास्ट पेस) --- ललिता पवार, दिलीप कुमार, बकर्‍या

क्या बात है कारवी‌. सही.

सीमंतिनी >> या धाग्यावर बरेचसे लोक ‌धुरंधर आहेत Happy म्हणून क्लू देण्याची घाई केली नाही.

क्लू द्या बरं आत्मा
अगदी गळे बघून पण ओळखलं असतं पण गळे पण लांबून दिसतायत.

मला मीच रात्रीचा आत्मा अश्या आयडीने लिहीते की काय असं वाटायला लागलं>
असे क्लु मी देते (आता हे वाचताना ते सोडवणं किती कठीण आहे हे जाणवू लागलं.)

चौथा क्लू: हा जितेंद्र किंवा डॅनी असू शकेल
सहावा क्लू: हा मिथुन चक्रवर्ती असेल

मी हे सर्व लिहेपर्यंत लोकांनी कोडं सोडवून टाकलं. प्रतिसाद फाऊल.

Pages