दृश्यावरून गाणे ओळखा-३

Submitted by मानव पृथ्वीकर on 18 November, 2020 - 12:29

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.

आधीचा धागा

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मानव बरोबर. पण गाणे लिहा.

कारवी रुमाल टाकला तर मजा जाईल कोडे सोडवण्याची. ज्याने कोणी रुमाल टाकला आणि फिरकलाच नाही तर?

मला इथली काही कोडी पाहून आपण जन्मभर गुगल केले तरी ती सुटणार नाहीत असे वाटते Happy त्यामुळे रुमाल टाकून 4 दिवस मिळूनही उपयोग नाहै.नंतर तोच रुमाल धूळ झटकून उचलावा लागेल आणि जागा रिकामीच राहील.
मग या दुःखावर उतारा म्हणून मीच कोडे टाकते
त्याचाही फडशा पडला की नवे कोडे शोधते.ही एक नशा आहे Happy

रूमाल टाकला की कोडे बुक. ते कोडे त्याचे -- हक्क + कमिटमेंट दोन्ही बाजूंनी. तरच टाकायचा रूमाल.
नाहीतर मग हजीर तो वजीर. आता चालू आहे तसे.
बाकीच्यांनी दुसरे कोडे घ्यायचे समांतर..... ते कोडे रूमालवाल्यासाठी सोडून.
धागाही अडणार नाही; सगळ्यांना संधीही मिळेल

रूमाल टाकला की कोडे बुक. ते कोडे त्याचे -- हक्क + कमिटमेंट दोन्ही बाजूंनी. तरच टाकायचा रूमाल. >> नाय सुटलं रूमाल टाकल्यावर तर मी सैफ अली सारखी मान हलवत 'हाथों मे आगया जो कल" गाईल बरं... आहे मंजूर? (मला नाय सुटलं तरी चालेल पण रूमालाबद्दल गाण्याचा हक्क हवा!!)

मला पण मानव यांची आवडती बेला बोस आणि कुक्कू शोधायला 2 तास लागले आणि शेवटी सुटले नाही. परत एकदा बेला बोस,निगार सुलताना,कुक्कू आल्या की दांडी गुल.

हरे कृष्ण! आठवतच नाहीये.

कारवी यांच्या सुचनेबद्दल:

ज्यांना लगेच उत्तर आले त्यांनी केवळ मला सुटले असे लिहा आणि इतरांना सोडवायला काही वेळ द्या. तासभर. तासाभरात नाही कोणी सोडवलं तर उत्तर देऊन, मैदान मोकळे करा.

डीपेंडिंग अपॉन इथं कितीजण तेव्हा सोडवत आहेत, तासा ऐवजी अर्धातास किंवा दोन तास करता येतील, नियम नाही ज्याला उत्तर आले त्याने ठरवावे , लगेच उत्तर द्यावे किंवा कितीवेळ थांबावे ते. (मी दिलेल्या कोड्यावर तत्काळ उत्तर आले तरी मला आवडेल. मुद्दाम सोपे दिले तर तसे नमूद करत जाईन, त्यावेळी थांबले तर हरकत नाही अन्यथा जितके फास्ट उत्तर तितके बेस्ट. ती पण एक वेगळी मजा आहे. )

सोडवायची मजा हवी ना मग पूर्ण घ्यायची.
हाथों मे आगया जो कल" गाईल बरं... ---- हे कसे चालेल? नामंजूर....
रूमाल = बाकीच्यांनी त्याच्या वाट्याला जायचे नाही; +
रूमाल = रूमालवाल्याने सुटेपर्यंत सोडवायचे. रण्छोडदासगिरी अनुज्ञेय नाही.

2-4 चकल्यांसाठी कशाला राडा. आधिच संपली आहे फराळातून. आता उरलेले लाडू शेव करंजी अनारसे संपवायचे. मग आहेच चिकन बिर्याणी,कोळंबी फ्राय

चला चिल व्हा
सोपा पेपर आहे लगेच सोडवा
(अरे अजून त्या लाल पिवळ्या बायका सुटल्याच नाही होय.आता मलाच प्रयत्न केले पाहिजेत Happy )
IMG_20201121_124326.jpg

देऊन टाका १ तासाने
श्रद्धाने पुसले लिहीलेले; मानव विसरले; मृणाली येत नाही म्हणाल्या
मी नवीन गाण्याच्या फंदात नसते

नवीन नाहीये
माझ्या अंदाजाप्रमाणे 14 वर्षे जुने आहे. बरोबर ना श्रद्धा?

हो

हो हो
तो लाल माणूस आयकॉनिक आहे.

तो लाल माणूस आयकॉनिक आहे.<<<<<< दिनेश हिंगु.

सीमंतिनी तू तरी 'हाथो मे आ गया जो कल रुमाल आपका...' म्हणणार आहेस, मला तर डायरेक्टली 'मिरची रे मिरची कमाल कर गई...' आठवले होते. Lol

गुनगुना रहे है भंवरे खिल रही है कली कली - आराधना.

शर्मिलाच्या डोक्याचा थोडाजरी भाग दिसला तर आयडेंटिफाय होते ती. Proud

Pages