दृश्यावरून गाणे ओळखा-३

Submitted by मानव पृथ्वीकर on 18 November, 2020 - 12:29

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.

आधीचा धागा

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

@लंपन, श्रवुंनी पण क्ल्यू मागितला आहे वर.
एखादा लागेलच. गाणे चित्रपटगीत आहे की अन्य?
गदिमा गीतरामायण वगैरे

नाही, कारवी सीमंतिनी आता श्रध्दाक्कानी पण क्लू मागितला की मी देणार क्लू .. महानोर नाहीत गीत रामायण नाही. ढिपांग तर नाहीच नाही.

नाही नाही हो कुठे तो गुरू ठाकूर आणि कुठे हे कवी.. मानव नाही हे पण.. अजून एक कडवं , हे पण गाण्यात नाही.

सैर भैर येडपीस xxxx छातीच, आल्या आल्या कसं सोडू पारवळ हातीचं.. एक शब्द गाळत आहे चाणाक्ष पब्लिक लगेच गाणं ओळखेल .

सुधीर मोघे पण लिहायचे अशी भाविक गाणी... मूळात गाणे भाविक आहे ना? नायतर एक ओळ अशी आणि दुसरी लगेच प्रेयसीबद्दल काहीतरी असायचं...

नक्षत्रांचे देणे लागायचे पूर्वी अल्फा (झी) मराठी वर . त्याचा पहिला भाग आरती प्रभूंवर होता त्यात ही दोन नवी कडवी ऐकली होती आणि सुखद धक्का बसला होता . चाल पण पूर्ण वेगळी आहे. एकदम फिदाच होणार लोक्स चालीवर. तो कार्यक्रम आम्ही घरी सर्वजण एखादी पर्वणी असल्यागत बघत असू.

मस्तच गाणं , आठवलंच नाही... ट्युब लाईट उशिरा पेटते.
आरती प्रभूंचा तो कविता संग्रह घरी असूनही आठवले नाही...

गायिका गुणी पण फिल्मी गाणी फार नाहीत यावरून पद्मजा फेणाणी आठवल्या. संगीत हृदयनाथ म्हटल्यावर लवलव करी पातं आणि केव्हातरी पहाटे आठवलं. केव्हा तरी पहाटेमध्ये तुम्ही लिहिलेली कडवी असतील असं वाटलं नाही. Happy मस्त कोडं होतं.

एक पाहिला(अकरावा) लंपन पण शीर्षक गीत दिवसभर गुणगुणत होते. Happy आभार.

निवडुंग आठवलं...अर्चना जोगळेकर, रविंद्र मंकनी सगळे आठवले पण नंतर.... हिंदी सिनेमातली पोलीस आहे मी Lol

Pages