दृश्यावरून गाणे ओळखा-३

Submitted by मानव पृथ्वीकर on 18 November, 2020 - 12:29

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.

आधीचा धागा

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

या कथेवर एक मराठी आणि एक हिंदी पिक्चर परत बनले
हा माणूस बाथरोब मध्ये आहे.
लागल्यास अजून क्लू देईन
IMG_20201120_001545.jpg

मुझे मेरी बिवी से बचाओ - आज की ताजा खबर.. किरणकुमार.
यावरून बनलेला हिंदी म्हणजे गोलमाल रिटर्न्स.

येस
आणि मराठी फेकाफेकी
तू कसं ओळखलंस?

बै! मला तर शोधून शोधून काहीच सापडत नै. (पण त्या निमीत्ताने गाणी बघायला मजा येते) आणि इकडे जनरल डोक्यात वगैरे. __/\__

सियोना, अगदी अस्पष्ट चित्र आहे. लाल शर्टातील माणूस काय करतो आहे? व्हायलीन इ आहे काय की डान्स करतो आहे?

ह्म्म्म मि. नटवरलाल मध्ये असले बूट होते त्याचे. त्या काळातला कुठला तर मारधाड सिनेमा असणार. ती वरती एका ओळीत उलटी मडकी टांगण्याचे दुसरे कारण काय? डाकू लोक्स बंदूकीने उडवणार काय??

https://youtu.be/XMueQRVqFBE?t=197 पक्षी आणि नटी.
हे गाणे लता मंगेशकरांचे एकमेव कॅबरे साँग आहे. सबब थॉट प्रोसेस विचारू नये Wink

हो
आणि अत्यंत रेसिस्ट गाणे पण.
मी जो भाग कापला आहे त्यात एक आफ्रिकन पिंजऱ्यात ठेवला आहे.
आपण लहानपणी काय काय बघून मनोरंजन करुन घ्यायचो हे आता क्रिन्जवर्दी वाटते आहे.

लहानपणी काय "और दस्स कितनी तरिफा" मध्ये पण अफ्रो कट असलेल्या मुली केज डान्सर्स आहेत. पण कमी दाखवल्या आहेत हे नशीब.

Pages