दृश्यावरून गाणे ओळखा-३

Submitted by मानव पृथ्वीकर on 18 November, 2020 - 12:29

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.

आधीचा धागा

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

द्या कुणी कोडे... (आत्त्ताच मी https://www.youtube.com/watch?v=hsUUM1mzyFY ही लिंक ऐकत होते... नि त्यांचं मराठी 'काळरातीला सोपं पड्लं' वाचून लईच भंजाळले होते.. आर्टीफिशियल इंटेलिजन्स मध्ये इंटेलिजन्स आवश्यक अशी बात नसते काय? असं कसं काळराती वाचतात!) असो अवांतर झाले... पण मुद्दा - द्या काही कोडे म्हणजे डोके जाग्यावर येतं...

हा विनोद मेहरा आहे की काय
हे असे फुल स्लीव्ह शर्ट कोण घालतं
रमता जोगी मध्ये अनिल कपूर घालायचा.
अरविंद स्वामी नाहीये.त्याचे स्वेटर लाल भडक आणि निळा भडक आहेत गाण्यात.

हिरोच्या स्टायिल वर लक्ष दिले तर उत्तर मिळेल .

हिरो आणि हीरोइन दोघे पिवळा आणि काळा कॉम्बो ड्रेस घालून शिमला मधील बर्फात हातात हात घालून गाणे म्हणत आहेत.

अजून एक क्लू या चित्रपट दिग्दर्शकाला बर्फ आणि थंड हवेच्या ठिकाणीच गाणी चित्रीत करायला आवडतात.

खूप झाले क्लू.

उशीर झाला. Proud

हेअरस्टाईल आणि उभं राहण्याच्या पद्धतीवरून शर्मिला टागोर ओळखू येते.

पहिला फोटो गोंधळवणारा होता. नीतू सिंग 'नजरोंसे कह दो' आठवत राहिलं. दुसर्‍या फोटोत शर्मिला ओळखली पण शशीकपूर की राजेश खन्ना गोंधळ होता. पण दिग्दर्शकाला थंड हवा आवडते म्हणल्यावर शर्मिला यश चोप्रा शोधलं Happy

Done! Proud

Screenshot_20201121-112633_YouTube.jpg

हे घ्या सोपे.

सिमंतिनी आणि श्रद्धा लाडू देईन यावेळी. चकली संपली फराळात सगळ्यात पहिले.

माझ्या डोक्यात गाणं येईपर्यंत इथे उत्तर आलेलं असतं..
सियोना मला उत्तर सापडेपर्यंत उरलेला फराळ पण संपून जाणार बहुतेक Happy

माधुरीचा तो पिवळा कफ्तान, पिवळा हेडबँड, तिच्या बाथरूममधले पिवळे वॉशबेसिन, पिवळा बाथटब, पिवळ्या दातांसाठी पिवळा टूथब्रश.... अरारारा इंटिरियर सगळंच! टोटल अविस्मरणीय!

मृणाली आपल्याकडे सिमंतिनी आणि श्रद्धा सारखी हुशार मुले वर्गात लवकर पहिली येऊन सगळा फराळ गट्टम करतात. 20201121_115426.jpg

हे घे आता सोडव

Submitted by सियोना on 21 November, 2020 - 11:55 >>>>>
आणि ही बाकीची जनता का? एखादा चुकला-माकला चकली तुकडा मिळण्यासाठी टपून बसलेली?

इथे कोण ऑनलाईन आहे, कोण निघून गेले कळत नाही. कधी गर्दी असते तर कधी सामसूम. मग जे असतात ते उत्तर देऊन पुढच्या कोड्याचा रस्ता मोकळा करतात, इतकेच.

एक करता येईल --- ज्यांना सिरीयसली सोडवायचेच्च आहे त्यांनी कोडे आल्या आल्या रूमाल टाकायचा. म्हणजे "माझा रूमाल" असा प्रतिसाद देऊन कोडे बुक करायचे. मग बाकीचे त्या वाटेला जाणार नाहीत. ४ तास लागोत, २ दिवस लागोत सुटायला, कोडे रूमालवाल्याचेच राहील.

Pages