दृश्यावरून गाणे ओळखा-३

Submitted by मानव पृथ्वीकर on 18 November, 2020 - 12:29

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.

आधीचा धागा

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला जो रोल हीरो ने केलेला तो या पिक्चर मध्ये विलन नी केला या क्लू वर संघर्ष आहे ते कळाले. पण गाणे शोधण्या साठी यूट्यूब वर जायचा कंटाळा आलेला Proud

बराच वेळ बाफ थंड होता, म्हणून फिरकले नाही, तर आता येईपर्यंत क्लु देऊन कोडे सोडवून पुन्हा सामसूम! Proud

अनु, सियोना, खंगरी कोडी येऊ द्या पुढची.

Screenshot_20201119-133509_YouTube.jpg

_/\_

Screenshot_20201119-134900_YouTube.jpg

बिंगो!

मला हे फोटो बघून गाण्याचा काहीही थांगपत्ता लागत नाही Proud त्यामुळे तुम्ही सगळे धन्य आहात. _/\_

पण गूगल इमेज सर्च वापरून मलापण बरोबर हेच गाणं मिळालं.

IMG_20201119_161053.jpg
मागितल्यास अजून क्लू देण्यात येतील.

नारींगी रंगाचा जम्प्सूट (बहुधा एकसंध असेल, मध्ये स्किन कलर कापडासहीत) घालण्याचे फॅशन डेअर करणारी ही सुंदरी जवळून बघा:
गंमत अशी की हिचा सूट बघून गाणं रॉक अ‍ॅन्ड रोल असेल असं वाटलं तरी गाणं बर्‍यापैकी ट्रेडिशनल म्युझिक सह आहे.
हा एक सस्पेन्स सिनेमा आहे ज्यात एका व्यक्तीचा घाऊक वेळा आणि नंतर एकदा खराखरा खून होतो(बहुतेक)
IMG_20201119_165900.jpg

हिरोचा जावई,२ भाऊ,मुलगा, मुलगी, सावत्र बायको, पुतण्या, व्याही, सवता हे सर्व चित्रपट सृष्टीत आहेत.

आलीस गं बाई Happy
मी आता हिरॉइन च्या वंशावळी उचकून काढणारच होते.

Pages