Submitted by ऋन्मेऽऽष on 17 November, 2020 - 06:02

१. खाद्यपदार्थ सुबक पद्धतीने मांडा
२. फोटो काढा
३, अपलोड करा
मगच त्यावर तुटून पडा
घरी बनवलेला सुंदरसा खाद्यपदार्थ आणि मोबाईल कॅमेरा
नवीन लेखनाचा धागा काढायचे पाककृती विभागात बंद झाल्याने असे पाककृती फॉर्मेटमध्ये धागा काढावा लागतोय.
तरीही बिलकुल संकोच न बाळगता आधीसारखाच तुडुंब प्रतिसाद येऊद्यात आपल्या खाऊगल्लीला
आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/75488
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
मस्तच दिसतो आहे केक.
मस्तच दिसतो आहे केक.
नाचणी, खजूर आणि ड्राय फ्रुट्स
नाचणी, खजूर आणि ड्राय फ्रुट्स चे लाडू
मस्तच.
मस्तच.
आता याची सुद्धा पाकृ हवीय. लिहिणार असाल तर पाकृ विभागात नवा पाकृचा धागा काढुन लिहा, इथे कुठेतरी गडप होऊन जाते पाकृ.
धन्यवाद मानव ! अगदी खरं
धन्यवाद मानव ! अगदी खरं सांगायचं तर वेगळी पाककृती लिहावी एवढं मोजून-मापून प्रमाण मी कधीच घेत नाही. साधारण अंदाजाने घेते आणि पदार्थ छान होतात. बेसिक पाककृती ची लिंक खाली देते आहे. त्यात मी थोडे बदल केले आहेत जसं शेंगदाण्या ऐवजी बदाम आणि अक्रोड वापरले. खारकेची पूड पण घातली. शेवटी मिश्रण जरा कोरडं वाटलं म्हणून तूप गरम करून घातलं आणि लाडू वळले. माझ्या छोट्या मुलीला लाडू खोबर्याच्या किसात घोळवायचे काम खूप आवडले!
https://youtu.be/q66hQHAjkW0
लाडू छान आणि पौष्टिक ही.
लाडू छान आणि पौष्टिक ही.
केक आवडल्याबद्दल धन्यवाद सगळ्यांना. जाई, अश्विनी पाकृ लिहायचा प्रयत्न करते नक्की.
झंपी ,हो केक गोडमिट्ट होतो. पण सुंदर लागतो.
धन्यवाद प्राजक्ता.
धन्यवाद प्राजक्ता.
कालची फ्रायडे नाईट, बायकोने
कालची फ्रायडे नाईट, बायकोने आदल्या दिवशी केलेल्या पांढऱ्याशुभ्र पण शिळ्या ईडल्यांना मी तडका दिला. सोबत तिने बनवलेली चटणी आणि किस्सानची शेजवान चटणी घेतली. कॉफी कंपलसरी असतेच ..
वाढणी प्रमाण - जेवढं बनवतो ते दोघांत फस्त करतो
.
.
इडली फ्राय
इडली फ्राय
असे इडली चिली करतात , सिमलाचे तुकडे वगैरे घालून फ्राय
वरच्या लाडूंना झब्बू-
वरच्या लाडूंना झब्बू-

आईच्या हातचे चूर्मा लाडू .. घरात मी सोडून बाकी सगळेच गोड खाऊ असल्याने ४ दिवसातच लाडू संपले
किती सूबक लाडू! आईचा हात
किती सूबक लाडू! आईचा हात कळतोच...!
(No subject)
चिकन चेट्टीनाड
चिकन चेट्टीनाड

मी पण आजच केले नाचणीचे लाडु.
मी पण आजच केले नाचणीचे लाडु. मोबाईलवरुन फोटो देता येत नाही. इन्सर्टचा अॉप्शनच येत नाही.
मोबाईल ऍप वरून नाही येत
मोबाईल ऍप वरून नाही येत इन्सर्ट ऑप्शन.
पण मोबाईलवर वेब ब्राऊजर (क्रोम / फाफॉ)वरून लॉग इन केले की येतो,
रमझान स्पेशल चिकन केप्सा राईस
रमझान स्पेशल चिकन केप्सा राईस..
भायखळ्याच्या अफजल रेस्टॅारंट मधली एक फेमस डिश.. माझ्या प्रचंड आवडीची.. तशी हि पर्शियन दरबारात पण मिळते पण मला अफजलमधलीच जास्त आवडते
चिकन चेट्टीनाड आहे की सरडा
चिकन चेट्टीनाड आहे की सरडा चेट्टीनाड ?
रमझान स्पेशल चिकन केप्सा राईस
रमझान स्पेशल चिकन केप्सा राईस..
भायखळ्याच्या अफजल रेस्टॅारंट मधली एक फेमस डिश.. माझ्या प्रचंड आवडीची.. तशी हि पर्शियन दरबारात पण मिळते पण मला अफजलमधलीच जास्त आवडते
>>>>>>>>
भायखळा नाही माझगाव


अफझल आमच्या नाक्यावर आहे.. खिडकीतून डोकावले की उघडे आहे की बंद हे दिसते
हा केप्सा खाण्यात अर्धे आयुष्य गेले. ( अर्धे यासाठीच की लहानपणी नव्हते हे)
आताही ईथे नवी मुंबईला स्थायिक झालोय. पण मुंबईहून वडील येतात तेव्हा हा घेऊन येतात
बाकी पर्शिअन दरबार भायखळ्याला आहे. मलाही तिथला आवडत नाही. अफझलच्या समोर मुंबई दरबार म्हणून अजून एक हॉटेल आहे. तिथेही केप्सा मिळतो. मलाही अफझल ऊर्फ माओचाच सर्वात जास्त आवडतो. बहुधा ईथेच हा प्रकार शोधला गेला आहे आणि फेमस झाला आहे ... कारण आयटमच्या मानाने दर माफक आहे. पोरापोरांची देखील छान पार्टी होते.
बहुधा ईथेच हा प्रकार शोधला
बहुधा ईथेच हा प्रकार शोधला गेला आहे आणि फेमस झाला आहे >> हो.. त्या एरियातल्या बऱयाच ठिकाणी हा प्रकार मिळतो ..पण ओरिजिनल केप्सा राईसला तसा चायनिज टच नसावा ..ती अफजलवाल्यांचीच देण असावी.
हो, काही ठिकाणी केप्सामध्ये
हो, काही ठिकाणी केप्सामध्ये चायनीज फ्राईड राईस की बिर्याणी राईस असे विचारतात. मलाही चायनीज टचच आवडतो.
तिकडे आमच्याकडे होम डिलीव्हरीला तो मोठी परातीच्या आकाराची थाळी घेऊनच यायचा. नंतर दुसरया दिवशी परत न्यायला यायचा. असो, हा पुर्ण महिना लॉकडाऊनमुळे वडिल आलेच नाहीत. नेक्स्ट टाईम येतील तेव्हा आता हा अफजलचा केप्सा सांगावाच लागणार
इडली चटणी सांबार
इडली चटणी सांबार
किती सूबक लाडू! -- खरचं..
किती सूबक लाडू! -- खरचं.. खुपच मस्त फोटो.
चिकन चेट्टीनाड सही.. आणि केप्सा राईस तर झकास दिसतो आहे..
ई.सा. ..आॉ.टा.फे. ब्रेकफास्ट डिश..मस्त.
मसाला आप्पे
मसाला आप्पे
इडली, आप्पे, लाडू मस्तच
इडली, आप्पे, लाडू मस्तच
लावण्या ,☺️
लावण्या ,☺️
म्हाळसा, रेसिपी द्या ना,
पिकू आणि लावण्या धन्यवाद
पिकू आणि लावण्या धन्यवाद
हि घ्या लिंक -केप्सा राईस
हि घ्या लिंक -केप्सा राईस
https://youtu.be/w2hx4v1QBEc
Mhalsa, Churma Ladoo Recipe
Mhalsa, Churma Ladoo Recipe please.
आप्पे खूप छान दिसत आहेत.
आप्पे खूप छान दिसत आहेत. कोथिंबीर टाकून केलेल्या गोल भज्या वाटत आहेत.
म्हाळसा छान आहे तुमचा चॅनेल..
म्हाळसा छान आहे तुमचा चॅनेल... मस्त हिंदी बोलता...
म्हाळसा छान आहे तुमचा चॅनेल..
म्हाळसा छान आहे तुमचा चॅनेल... मस्त हिंदी बोलता >>> छे छे.. माझं चॅनल असतं तर मी पावरी स्टाईलमधे हिंदी बोलले असते
Churma Ladoo Recipe please>> टाकते लवकरच
Pages