खाऊगल्ली - आजचा मेनू - (३)

Submitted by ऋन्मेऽऽष on 17 November, 2020 - 06:02

१. खाद्यपदार्थ सुबक पद्धतीने मांडा
२. फोटो काढा
३, अपलोड करा

मगच त्यावर तुटून पडा Happy
घरी बनवलेला सुंदरसा खाद्यपदार्थ आणि मोबाईल कॅमेरा
नवीन लेखनाचा धागा काढायचे पाककृती विभागात बंद झाल्याने असे पाककृती फॉर्मेटमध्ये धागा काढावा लागतोय.
तरीही बिलकुल संकोच न बाळगता आधीसारखाच तुडुंब प्रतिसाद येऊद्यात आपल्या खाऊगल्लीला Happy

आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/75488

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

पनीर बटर मसाला आणि बटाटेवडे बघून तोंडाला पाणी सुटलं !

छोटी घ्या आग्रहा खातर पुरण घातले....
Screenshot_20210414-220304.jpg

मग कटाची आमटी करणं आलं!
Screenshot_20210414-220310.jpg

आणि हा किंचित जूना फोटो...
Screenshot_20210304-221857.jpg

काय मस्त फोटो!! तों पा सु.
म्हैसूर डोसा पाहून वैशाली ची आठवण आली..(पुण्यातील हॉटेल) .
कट आमटी, अंडा बिर्याणी, फ्रुट प्लेट सहीच. चिली मशरूम पण यम्म!!

शनिवारी रविवारी हे दोन मेन्यू केले..

घरच्या कैरीचे डाळ आणि पन्हं
20210415_190106.jpg

बटर चिकन आणि गार्लिक रोटी
20210416_210753.jpg

मँगो लस्सी पॉप्सिकल भारी दिसतेय; आमच्या मुंबईची केशर कॅण्डी आठवली. काही कृती वा टिप्स वगैरे असेल तर टाका

ते वरचे बटर चिकन गार्लिक रोटी घरचे आहे का.. फारच तोपासू दिसतेय

या विकेंडची बर्गर पार्टी
याचे वैशिष्ट्य म्हणजे हे मी बनवले आहे सगळं
फक्त त्या आतल्या वड्या बायकोकडून तळून घेतल्या Happy

1618696398857.jpg

हि मागच्या विकेंडची मसाला म्यागी आणि सुखा भेल पार्टी
याचेही वैशिष्ट्य सेम हे सगळे मीच बनवले आणि अरेंज केले आहे.
फक्त कांदा बारीक बायकोने कापून दिलाय Happy
सोबत फोटोत नसलेली कॉफी होतीच. ती आमच्याकडे मीच बनवतो बाय डिफॉल्ट.

1618776141750.jpg

हि कालची केक पार्टी
याचे श्रेय सारे बायकोचेच आहे
फोटो सुद्धा मी तिच्याच स्टेटसवरून चोरला आहे Happy

IMG_20210419_013819.jpg

मॅंगो लस्सी पॅाप्सिकल्स -
२ आंब्यांचा पल्प, १ कप दही, ३ चमचे साखर, थोडंसं केशर
मिक्सरमधे पाणी न घालता फिरवायचं.. पॅाप्सिकल्सच्या मोल्डमधे थोडं केशर टाकायचं, वरून मिक्सरमधे बनवलेली लस्सी ओतायची आणि ५ तास फ्रिजरमधे ठेवायचं.

धन्यवाद Happy
लस्सी मला आवडत नाही पोरांसाठी करता येईल

हो घरचे च आहे. रोटी कणकेची आहे तव्यावर केली.
मँगो पॉप्सिकल मस्त.. करून बघते आता.. कलर पण सही आलाय.
बर्गर भारी..आणि केक पण.

धन्यवाद Happy
तशी ती डिझाइन प्रायमरी लेव्हलची आहे. करायला गेले गणपती आणि झाला मारुती असं झालंय डिझाइनच्या बाबतीत. अजून हात बसायचाय.
अजून एक गम्मत म्हणजे त्या लाल पाकळ्या गुलाबाच्या नाहीत , जास्वंदीच्या आहेत. : P लोकडाऊन मुळे फुलांची दुकानं बंद आहेत. घरातले गुलाब कटिंग केलेले आहेत.

मस्त दिसतोय रसमलाई केक

वर्णिता , वेगळा धागा काढून कसा करायचा ते लिहा. खूप दिवसापासून हा केक विशलिस्टवर आहे .

तशी ती डिझाइन प्रायमरी लेव्हलची आहे. करायला गेले गणपती आणि झाला मारुती असं झालंय डिझाइनच्या बाबतीत. >>> रिस्पेक्ट !!
रसमलाई आवडत नाही म्हणून माझा पास Happy
पण दिसतोय जबराट .

Pages