खाऊगल्ली - आजचा मेनू - (३)

Submitted by ऋन्मेऽऽष on 17 November, 2020 - 06:02

१. खाद्यपदार्थ सुबक पद्धतीने मांडा
२. फोटो काढा
३, अपलोड करा

मगच त्यावर तुटून पडा Happy
घरी बनवलेला सुंदरसा खाद्यपदार्थ आणि मोबाईल कॅमेरा
नवीन लेखनाचा धागा काढायचे पाककृती विभागात बंद झाल्याने असे पाककृती फॉर्मेटमध्ये धागा काढावा लागतोय.
तरीही बिलकुल संकोच न बाळगता आधीसारखाच तुडुंब प्रतिसाद येऊद्यात आपल्या खाऊगल्लीला Happy

आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/75488

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

लावण्या : बटाटेवडा मस्त.
मृणाली: बाहेर उन तळपत असताना दुपारी थंड दहीभात खाण्यासारखं सुख नाही.

वर्णिता बरोबर Happy
ओट्स उपमाच आहे तो...वर चमचमीत पदार्थ त्यात हे बोरींग.. गम्मत केली हो.. Wink

मागील काही दिवसांमध्ये केलेले पदार्थ..
टोमॅटो राईस आणि मसाला दही
Screenshot_20210411-105634.jpg

नाचणी चे धीरडे आणि ताजे लोणी
Screenshot_20210411-105618__01.jpg

लच्छा पराठा
Screenshot_20210411-105612__01.jpg

मुळ्याचा पराठा, जवसाची चटणी आणि चहा!
Screenshot_20210411-105606.jpg

मस्त!
नाचणी धिरडे पाकृ लिहाल का?
कसला मस्त जाळीदार दिसतोय.

धन्यवाद मानव!
२ वाट्या नाचणी चे पीठ, १/२ वाटी हरभरा डाळीचे पीठ, एक वाटी ताक आणि मीठ एकत्र करून एक तास भिजवून ठेवले. सरबरीत होण्यापुरते पाणी घातले. सकाळी उठल्या उठल्या मी हे पीठ भिजवले आणि मग बाकी स्वयंपाकाला सुरुवात केली. नाश्त्याची वेळ येईपर्यंत छान भिजले होते. लोखंडाच्या तव्यावर एक चमचा तेल घातले, चिमुटभर जिरे आणि त्यावर एक डाव हे पीठ घालून पसरवले. वरून कच्चा कांदा आणि बारीक चिरलेली मिरची घातली. दोन्ही बाजूंनी चांगले भाजून घेतले.. झाली रेसिपी Happy

गुलाब जाम मस्त.
जाई सन्डे स्पेशल मेन्यू मस्त.
मी विसरलेच कालचा फोटो टाकायला..आता शिळं झाले ताट Proud गरम करून टाकते फोटो.
IMG_20210411_211847.JPG

नट रोस्ट मधे भरडलेले नटस (काजू, पिस्ते, आक्रोड, शेंगदाणे, ब्राझिल नट) , गाजर, ढोबी मिरची, मिरची, तिखट, ४ स्लाइस ब्रेडचा चुरा, ४ अंडी. (चार पाच रेसिप्या यूट्युबवर बघून भारतीय ट्विस्ट). थोड बेक केल्यावर वरून चीज. परत बेक
ओव्हन मधे २५ मिनिटे बेक.
मॅश्ड बटाटा - उकडलेला बटाटा, दूध, लोणी. अनेक रेसिप्या यूट्युबवर आहेत.

वर लिहिलेल्या नट रोस्टच्या पदार्थात कांदा, लसूण लिहायचे राहून गेले. २ कांदे चिरून ४-५ पाच लसूण बारीक कापून तेलात परतून घेतले, त्यात ३-४ हिरव्या मिरच्या, गाजर, ढोबी मिरची, थोडी परतून अर्धवट शिजवली. तिखट आणी मीठ टाकले.. नटस सगळे वेगळे भाजून घेतले व मग भरडले. मग ब्रेडच्या चुर्‍याबरोबर मिसळले मग अंडी मिसळली. एक चमचा साखर आणि६८-१० मिर्‍या टाकल्या. (बेदाणे टाकणार होतो पण विसरलो). मग हे सगळ परतलेल्या कांदा मिश्रणात मिसळून बेक केल.

Pages