खाऊगल्ली - आजचा मेनू - (३)

Submitted by ऋन्मेऽऽष on 17 November, 2020 - 06:02

१. खाद्यपदार्थ सुबक पद्धतीने मांडा
२. फोटो काढा
३, अपलोड करा

मगच त्यावर तुटून पडा Happy
घरी बनवलेला सुंदरसा खाद्यपदार्थ आणि मोबाईल कॅमेरा
नवीन लेखनाचा धागा काढायचे पाककृती विभागात बंद झाल्याने असे पाककृती फॉर्मेटमध्ये धागा काढावा लागतोय.
तरीही बिलकुल संकोच न बाळगता आधीसारखाच तुडुंब प्रतिसाद येऊद्यात आपल्या खाऊगल्लीला Happy

आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/75488

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

सर्वांचे धन्यवाद. Happy
माझंही असंचे सियोना त्या दिवशी फोटो काढून इथे टाकायचा, एरवी नाही. Lol
आइसक्रीम आहाहा, मसूर आमटी, सँडविचेस, (वेज आहे मी तरीही )मटन मस्तच दिसतेय.

वा. भारी बेत सगळयांचे. अरे ते मटर पनीर कसलं कातिल दिसतंय. अस्मिता रेसिपी प्लिज. तशी माहितीये पण सेम असंच दिसलं पाहिजे अशी द्या. Happy

भाग्यश्री एक दोन तीन Happy
तिखट चांगले लाल हवं मग म.प. चा रंगही चांगला येतो.
मी नेहमीचा कांदा, आलं लसूण, टमाटे हा बेस परतून काढून ठेवला. पुन्हा कढईत थोडे तेल थोडे बटर घालून ती पेस्ट परतली व तिखट घातले आणि गरम पाणी घालून ढवळत राहिले, आच मोठी असली की तेल सुटते व रंगही छान येतो. मगं मटार घालून शिजवले व शाही पनीर मसाला घातला. शेवटी पनीर घातले. पुन्हा थोडे शिजवले. यावेळी बटर जास्त पडले त्याने अर्थातच चांगले जमले. एरवी मी एवढुसं तेल टाकून तेल कसं सुटत नाही अशी काळजी करायचे. असायला तर पाहिजे सुटायला... Wink
तिखट देगी मिर्च किंवा कश्मिरी लाल मिर्च चांगले आहे. थँक्स.

या गेल्या विकांताचा मेनू
मटण घावणे आणि खीमा पाव Happy
यातला खीमा पाव जवळपास वर्षभराने...

1620770780824.jpg

.
1620770813485.jpg

धन्यवाद अस्मिता.

३ वाट्या तांदूळ, १ वाटी उडदाची डाळ आणि १ वाटी नाचणी, थोड्या मेथ्या सकाळी भिजत घातलं. संध्याकाळी वाटून घेतलं. रात्र भर आंबवलं. सकाळी सरबरीत करून मीठ घातलं. डिनर मेनू असल्याने पीठ फ्रीज मध्ये ठेवलं. रात्री non stick तव्यावर डोसे केले. हा तवा घेतल्या पासून मी त्याला अजिबात तेल लावलेलं नाहीये. डोसे तयार होई पर्यंत कुठेच तेल घातले नाही म्हणून झिरो ऑईल रेसिपी!

आज ईदची सुट्टी होती त्यामुळे वेळ होता म्हणून पोह्याचे कटलेट करून पाहिले. अमितच्या रेसिपीने पराठे विकांताला जमवेन . आज चटपटीत खायचा मूड होता. Proud
IMG_20210513_194351_081.jpg

नवीन Submitted by Prajakta Y on 7 May, 2021 - 16:48
<<

रेस्पी लिहिली, तर नवा धागा काढावा. एकाच पदार्थाच्या अनेक रेसिपीज असतील तर उदा. "चित्रान्न फॅन क्लब" नावाने काढावा. जेणे करून नंतर पाकृ शोधणे सोपे जाते.

तेव्हा प्राजक्ता तै, हे नव्या धाग्यात हलवा पाहू. ग्रूप पाककृती सिलेक्ट करा.

धन्यवाद अस्मिता.

३ वाट्या तांदूळ, १ वाटी उडदाची डाळ आणि १ वाटी नाचणी, थोड्या मेथ्या सकाळी भिजत घातलं. संध्याकाळी वाटून घेतलं. रात्र भर आंबवलं. सकाळी सरबरीत करून मीठ घातलं. डिनर मेनू असल्याने पीठ फ्रीज मध्ये ठेवलं. रात्री non stick तव्यावर डोसे केले. हा तवा घेतल्या पासून मी त्याला अजिबात तेल लावलेलं नाहीये. डोसे तयार होई पर्यंत कुठेच तेल घातले नाही म्हणून झिरो ऑईल रेसिपी!
Submitted by Prajakta Y on 12 May, 2021 - 22:23
<<

परत तेच. कितीदा सान्गायला हवं ? :फिदि:

डोश्यान्च्या धाग्यात देखिल हे पेस्टा.

वाह केळीच्या पानाचा वेगळाच फिल असतो...
वाट्याही त्यात कमीच ठेवाव्यात, आणि चटण्या जास्त, पानात एकत्र मिक्स झाले आणि त्यात केळीच्या पानाची चव उतरली की मस्त वाटते खायला

Pages