खाऊगल्ली - आजचा मेनू - (३)

Submitted by ऋन्मेऽऽष on 17 November, 2020 - 06:02

१. खाद्यपदार्थ सुबक पद्धतीने मांडा
२. फोटो काढा
३, अपलोड करा

मगच त्यावर तुटून पडा Happy
घरी बनवलेला सुंदरसा खाद्यपदार्थ आणि मोबाईल कॅमेरा
नवीन लेखनाचा धागा काढायचे पाककृती विभागात बंद झाल्याने असे पाककृती फॉर्मेटमध्ये धागा काढावा लागतोय.
तरीही बिलकुल संकोच न बाळगता आधीसारखाच तुडुंब प्रतिसाद येऊद्यात आपल्या खाऊगल्लीला Happy

आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/75488

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

चहा मला ॲक्चुअली वाफाळताच लागतो. त्यामुळे मी तो नेहमी शेवटच्या प्लेटला घेतो. सुरुवातीपासूनच घेतला तर थंड होतो Happy

+१
अनेक ठिकाणी नाश्त्याची ऑर्डर घेताना चहा की कॉफी असे विचारतात. तेव्हा अमुक हवंय पण नाष्ट्यानंतर असे सांगितले तरी चहा / कॉफी नाश्त्याच्या मध्येच येऊन आपण घेई पर्यंत मजा न येण्या इतपत गार झालेली असते.
तेव्हा सरळ मी नंतर सांगेन म्हणावे आणि आपला नाश्ता संपत आला/ आटोपला की मग चहा/कॉफी ची ऑर्डर द्यावी.

ऋ, Happy
मला भजीचा एक घास मग चहाचा अशी सवय होती एके काळी. आता चहाच सोडला.. असो.

20210517_184356.jpgखेकडा भजी चा धागा वर आला होता.. आणि मस्त पावसाळी हवा.. खेकडा भजी करण्याची इच्छा झाली ..खाऊन झाल्यावर शेवटची २ च उरली असताना फोटो काढायची आठवण झाली..

Wow

चिन्मयी, गुलाबजाम अफाट सुंदर आहेत!

लावण्या, लाडू- बालूशाही ...गोड सप्ताह सुरू आहे! भारीच आहे सगळे!
आणि ईडली प्लेट...अहा! कधीही खाऊ शकते मी..

श्रवु, बरोबर -ती गन पावडर आहे. पातळ केलेलं तूप घातलं होतं त्यात. अमेझॉन वरून मागवली होती. Supathya Milagai podi म्हणून. अजिबात आवडली नाही. कुठलीच चव नाही तिला Sad

Pages